काहीबाही..

0
0

प्रेयसी ही चीजच मोठी कमाल आहे. नाही ?
तासनतास चालणारी भेट पण काही क्षणातच भुर्र झालीये असे वाटावे. कसली ती ओढ, काय तो वेडेपणा !! तासांमागुन तास, सकाळ नंतर दुपार अन शेवटी संध्याकाळ येतेच. सातच्या आत घरातला नियम वाकवुन नउच्या आत घरात झालेला. मॅक्डीच्या काउंटरवर एक मिनिट उशिर झाला म्हणुन फुकटातले कोल्ड्रिंक मागणारा 'तो' अन अन नउचा काटा जवळ येतोय म्हणुन गप्पगप्प झालेली 'ती'. अनेक न सुटणार्‍या प्रश्नांवरचा उहापोह, खरेदीची प्लॅनिंग, आईबापांबरोबरची व्युहरचना आणी भारंभार स्वप्नांच्या ओझ्याखाली दबलेला दिवस कातरवेळेबरोबर दिनवाणा होत जातो. दुचाकीही जराशी संथ आणी मिठीही तशीच .. सैलसर. तिला शेवटी उतरायचे असतेच, दिशा-रस्ता आणी सोबत ठरवुन थोडेच होते. रस्ता वळतो दिशा बदलते आणि सोबत संपते. शाश्वत आणि चिरंतन एकटेपणाला कवेत घेउन खुराड्यात शिरायचे.

----------------------------------------------------------------------------------------

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

----------------------------------------------------------------------------------------

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?

----------------------------------------------------------------------------------------

तिच्या डोळ्यातली स्वप्नं, तिचा आनंद आणि तिच्या बेमालुम झाकलेल्या जखमा.
वेड्या कविता, रेहमानची गाणी आणि निलाजरे घड्याळ.
भरुन आलेले आभाळ, हलकासा मृदगंध आणि कर्कश्य डोअरबेल.
वळणारा रस्ता, बदललेली दिशा आणि संपलेली सोबत.

----------------------------------------------------------------------------------------

क्या बात है !

1

आंद्यायात्री का माणुस आम्हाला कधी कळला नाही आणि बहुतेक यापुढेही कळणार नाही. फोनवर सटासट शिव्या घालतो आणि क्षणात असले हळवे 'काहीबाही' लिहुन जातो एकदम सहजच ....

तुमच्या हळव्या भावना आम्हाला कळणे अवघडच, पण मांडणी उत्तम आहे असे म्हणतो ...
काही वाक्ये खुपच आवडली.

>>सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?
वाह, क्या बात है !

असेच लिहीत रहा मालक ...

सहमत

2

>>>>सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

हम्म. सुख छोटे असेल म्हणून लगेच खोटे का म्हणावे?

देवा शपथ हा मानुस कधी कळलाच

3

देवा शपथ हा मानुस कधी कळलाच नाही रे डॉन्या... पॉरेडाईज मध्ये माझ्या संगे गप्पा मारणारा व दिलखुलास पणे आर.सी. चे बील भरणारा रात्री हा हाच माणूस आहे काय रे ? अशी शंका येते कधी कधी...

काळाच्या खपला जख्मेवर आम्ही अक्षरशः ओढून जगत असतो व हा ... काही क्षणामध्ये त्या खपल्या ओरबडून काढतो व नंतर.... छे... रक्तबंबाळ तर सगळेच... पण असे शब्दबध्द होणे कधी आम्हाला जमलेच नाही... चारच ओळी असतील वरच्या... पण नको त्या खपली... नको ती जुनी दास्तना ह्याने कळत न कळत उघड्या केल्या व आम्ही.. आता फक्त तळमळत रात्र काढायची..

वरील चार ओळी मध्ये किती जगलो हे सांगणे शक्य नसले तरी काही ओळी मध्ये किती वेळा मेलो हे आमच्या मित्रास नाही उमजणार... कधीकधी लाटे वर स्वार होणे सोपे असते... पण भर समुद्रात गटागंळ्या खाताना .. तिचा हात हातातून निसटत आहे ही भावना मनात असताना जगणे किती अवघड आहे हे त्यास उमजले नाही असे कसे म्हणून मी...

उदास ( राजे)


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

रसायन

4
देवा शपथ हा मानुस कधी कळलाच नाही रे डॉन्या... पॉरेडाईज मध्ये माझ्या संगे गप्पा मारणारा व दिलखुलास पणे आर.सी. चे बील भरणारा रात्री हा हाच माणूस आहे काय रे ? अशी शंका येते कधी कधी...

आम्हाला आंद्या या रसायनाची नितांत काळजी वाटते. त्याच्याकडुन काळजी चे हक्क नकळत व निरपेक्ष मिळालेत. त्याच्या लिखाणात खरा आतल्यासहीत माणुस असतो.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आणंदयात्री हे आम्हाला जालावर

5

आणंदयात्री हे आम्हाला जालावर सापडलेलं एक अफलातुन रसायन आहे !!
शंभर दुष्मण कुर्बान ह्या एका मित्रा साठी हास्य

व्वा !! यात्री ,, जियो !

- अनंतखात्री

मुक्तक एकदम मनास भीडले. >>सुख

6

मुक्तक एकदम मनास भीडले.
>>सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?

हे वाक्य तर खासच. फक्त एक सुचवावे वाटते की आपण सुख हे अनुभवतो, वापरण्यापेक्षा. एकवेळ दु:खाचा वापर केला जाउ शकतो. मी चूकही असू शकते, कोणी जाणकार माहिती देतील.

+१

7

>>फक्त एक सुचवावे वाटते की आपण सुख हे अनुभवतो, वापरण्यापेक्षा.
मलाही असच वाटल

आंद्याच्या लेखातल्या शब्दांना

8

आंद्याच्या लेखातल्या शब्दांना कायमच वजन असते... हळवे लेख लिहावेत ते आंद्यानेच...

अप्रतिम.

...

9

....

10

!!

.....

11

!!!
आंद्या, सुरेख लिहिलं आहेस!
आवडलं!!

आंद्या

12

आंद्या.

आंद्या, जबरदस्त भावनांचा

13

आंद्या, जबरदस्त भावनांचा कल्लोळ उतरलाय लेखात...

आत्ता या क्षणी, आंद्या नामक

14

आत्ता या क्षणी, आंद्या नामक माणसाला भयानक शिव्या घालायची इच्छा होते आहे. चार शब्दात पिळवटून टाकतो भोसडीचा... छ्या: !!!

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

उसके दुष्मन है बहोत, आदमी

15

उसके दुष्मन है बहोत,
आदमी अच्छा होगा..

!!!!!

16

अप्रतिम मित्रा. अप्रतिम लेखन!!!!!


-ऋ

आंद्या ... काय लिहू रे?

17

आंद्या ... काय लिहू रे?

छे!!! हा आंद्या खरोखर एक अजब

18

छे!!! हा आंद्या खरोखर एक अजब रसायन आहे...

>>सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ? का सुखाला सुखच मानणे सोडायचे ?
हे वाक्य क्लासच लिहिले आहे...


-निखिल

निशब्द

19

केलस मित्रा


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

निशब्द केलस मित्रा

20

निशब्द केलस मित्रा

तरल..

21

खूप तरल लिहिले आहेस रे आंद्या,
स्वाती

!!!!!!!!!!!!!!!!

22

!!!!!!!!!!!!!!!!

खरच प्रतिभावन्त

23

खरच प्रतिभावन्त आहेस्.अप्रतिम!

मस्त

24

लेख

+१

25

+१

धन्यवाद

26

धन्यवाद
हास्य

!!!

27

अप्रतिम.

आंद्याऽऽऽ................. हव

28

आंद्याऽऽऽ.................
हवं तर दोन मुस्काडात मार बाबा, पण पॉझिटिव्ह थिंकिंगवरुन असं झोडु नको रे!

सही...काही जगलो ..काही पाहिले

29

सही...काही जगलो ..काही पाहिले ....काही अक्षरश ....प्रेत म्हणुन वावरलो..

सुख संपते म्हणुन वापरायचेच

30

सुख संपते म्हणुन वापरायचेच नाही का ?
कारे हळवा करतोस.....
हे प्रश्न मी स्वतःला विचारायचे धाडस करत नाही.....

वो मरहम के बहाने जख्म कुरेद जाते है
हमे अतीत मे दफना के चले जाते है....


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

इजुभाउ, असे शेर टाकुन विकांत

31

इजुभाउ,
असे शेर टाकुन विकांत खराब का करताय??

आंद्या छान रे.. मस्त लिहीले

32

आंद्या छान रे.. मस्त लिहीले आहेस.


-पुण्याचे पेशवे

आमी आउट्......... पायाखालून

33

आमी आउट्.........

पायाखालून सतकत जाणार्‍या वाळूप्रमाणे
वेळ कधी निसटत जाते ते उमगत नाही
मागे उरते हुळहुळणार्‍या स्पर्षाची केवळ जाणीव
....नेणीवेच्या पलीकडे नेणारी .....


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

अतर्क्य!!!!!!!!!!!!

34

उद्या उठुन लचके तोडणार्‍या लांडग्यांसमोर बिनदिक्कत स्वतःला झोकुन द्यायचे अन जखमांना पॉझिटिव्ह थिंकिंगचे बेगडी मलम लाउन झोपी जायचे. जखमा भरल्याच पाहिजेत .. नायतर लांडगे कसे पोसणार ?
आंदाभाऊचं मुक्तक, विजूभाऊंच्या काव्यात्म प्रतिक्रिया, जयपालचा खास शैलीतला प्रतिसाद, सगळंच अतर्क्य! आम्ही पामरांनी फक्त वाचत रहायचं!


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल