भक्तीविभोर....!!

0
0

...गझल...

भक्तीविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला

आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला

आता दह्यादुधाला कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

प्रेमात वारसांच्या स्वहिता भुलून गेला
नात्यास भार होता स्वजनात चोर झाला

यावे तसेच जावे ना 'अभय'दान कोणा
मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला

गंगाधर मुटे

दूधादह्यास आता कान्हा नशीब

1

दूधादह्यास आता कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

प्रेमात वारसांच्या स्वहिता भुलून गेला
नात्यास भार होता स्वजनात चोर झाला

Sad

सहमत आहे.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हम्म

2

हम्म

ह्म्म

3

ह्म्म


-निखिल

यावे तसेच जावे ना 'अभय'दान

4

यावे तसेच जावे ना 'अभय'दान कोणा
मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला >>.

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

कवितेतुन टोलवा-टोलवी आवडली...

खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम

5

खास! अप्रतिम शब्द आणि अप्रतिम कविता.

+१

6

असेच म्हणतो ..

दूधादह्यास आता कान्हा नशीब

7
दूधादह्यास आता कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

जबरदस्त!!!
गंगाधरपंत, तळमळ अगदी पोहोचते आहे शब्दा शब्दांतून.!!

अगदी अगदी..पण कवितेचे नाव

8

अगदी अगदी..इकडेही सारखेच आहे.
पण कवितेचे नाव भक्तीविभोर खटकते.

प्रत्येक गोष्ट येथे "टॉगल" होतांना दाखवलेली आहे. काहीतरी वेगळे नाव हवे असे वाटते. अर्थात लेखन स्वातंत्र हा मुद्दा आहेच म्हणा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

जबरदस्त!!!!

9

जबरदस्त!!!!


- प्राजु

जबर दस्त!!!!

10

जबर दस्त!!!!

रे. तिळ्काच्या कवितेसारखी

11

रे. तिळ्काच्या कवितेसारखी आहे.
'' मातीत ते पसरले अतिरम्य पन्ख"

भाकित

12

या कवितेवर विडंबन पाडायचे विचार कुणाच्या तरी मनात येताहेत. लवकरच विडंबन पडेल असे आमचे भाकित. असो
गंगाधर पंत कविता आवाल्डी बरं का? तुमचे लेखण आवडते. लिहित र्‍हावा!


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

तुमीच पाडा की कधीतरी इडंबन

13

तुमीच पाडा की कधीतरी इडंबन

धन्यवाद.

14

सह्रदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे सर्वांचा. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

यावे तसेच जावे ना 'अभय'दान

15

यावे तसेच जावे ना 'अभय'दान कोणा
मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला

हम्म्म्म भले भले मी मी म्हणत नंतर भक्तीविभोर होऊन गेले.
छान आहे गझल.


-पुण्याचे पेशवे