कट्टा - रंगपंचमीचा !!!
पहाटेचे ९-९.३० वाजले होते, कुठेतरी दुरवर "Bailamos" tonight we dance, I leave my life in your hands. वाजत होते व मी मस्त पैकी लोळत होतो गादी वर तोच मनात एक कुशंका आली आपली रिंगटोन पण हेच गाणे आहे नाही... आपला फोन तर वाजत नाही आहे ना ?? एखाद्या भय स्वप्रातून वेगाने व्हावे ह्या पध्दतीने मी झटापट करुन फोन हाती घेतला... ओह गॉड.. थॅक्यु... आईचा नाही आहे फोन... नाही तर परत रामायण ९.३० वाजले अजून लोळत काय पडला आहेस घोड्या... असे काहीसे सुप्रभात गीत कानावर पडले असते.. 
फोन माझ्या मित्राचा होता..
काय करत आहेस रे ?
लोळतो आहे..
तुला सांगितले होते रे.. घरी येणार आहेस ना आज ?
मी, हो येतो ना काय गडबड आहे..
तो सर्वजण येणार आहेत.. तयार रहा. मी फोन करतो १०.३० ला.
मी ओके.
चादर तोंडावर.. मी परत गुडूप. परत काही क्षणांनी ( १०.३० ला) फोन वाजला.. ओके मी तयार होत आहे असा मॅसेज दिला व म्हणालो उठा देवा ! उठा. लॅपटॉप चालूच होता मार्केट बघितले नॉर्मल होते काही ऑर्डर टाकल्या व टार्गेट सेट केले.
अंघोळ झाली, कपडे घालताना थोडा गोंधळ उडाला ... कुठले घालू ? हा चांगला दिसेल की तो ? असा विचार करण्यात काही क्षण गेले तोच परत फोन वाजला " मी नर्ह्यात आहे, कुठे येउ ? " अरे हा आला पण " मी- अरे ते झेल ( झोल / झील असे दोन तीनदा चित्रविचित्र नाव मी वाचले होते बोर्डवर त्यामुळे नक्की नाव माहीत नाही, माझ्या घरा समोरच आहे) कॉलेज च्या गेट कडे ये मी आलोच.
प्रेस केलेले चांगले कपडे अंगावर चढवले मस्तपैकी बुट चढवले थोडे घाण दिसत होते, सर्फच्या पाण्याने थोडा हलका कपडा मारला माझा रिबॉक रेड्डी फॉर डान्स.. थोडे नाचून झाले पण पाय हलकासा दुखतच होता त्यामुळे नाच आवरला व सरळ लंगडी टाकत पहिल्या मजल्यावरुन खाली आलो. " अरे , मी तुला सोडू का रे ? " एक शेजारी बाईक काढताना ओरडला मी " नको. माझा मित्र आला आहे " असे सांगून त्याला टोलावले. रोडवर आलो. कॉलेजच्या गेट साठी जो रोड जातो त्या रोडवर पाहिले तर मित्राचा मागुस कुठेच दिसेना... एक फोन मारला... अरे मी येथे उभा आहे.. गेट वर.. तो तिकडून मी पण गेट वर उभा आहे... मायला... ! कॉलेज ला दोन गेट आहेत ते मला माहीतच नव्हते.. असो,
अर्ध्या तासाची माझी पायपीट शेवटी मुक्कामावर पोहचली.. समोर दामोदर पंत घोड्यावरुन.. स्वारी.. हिरो होंडावरुन येताना दिसले..
काही शब्द उच्चार न करता मी सरळ बाईकवर बसलो व त्यांनी आपल्या घरी घेऊन गेले... गड चढणे सोपे होते पण ४ थ्या मजल्यावर पंताच्या घरी जाणे म्हणजे.. हॅ हॅ हॅ....... चेहर्यावर हास्य , ह्दयी कळा ह्या पध्दतीने मी कसाबसा वर पोहचलो... मिंटीचे दर्शन झाले ताई ताई म्हणून मिपावर दोन वर्ष दंगा घातला पण प्रत्येक्ष भेटल्यावर ... ही तर लहान आहे माझ्या पेक्षा
मग आम्ही सरळ एकेरीवर आलो... फोटो मधून दर्शन झाले होते त्यामुळे ओळख नवीन नव्हती... प्लस समोर दिवान कम बेड दिसत होता व त्यावर लोळण्याची प्रचंड इच्छा होत होतो, पंतानी खुर्ची देऊ केली पण आम्ही सरळ आक्रमण त्या दिवान कम बेडवरच केले हॅ हॅ हॅ ! सवय... धम्याला समजली असेल सवय आमची.. असो.
बाकी मंडळ कुठे पोहचले ह्याची दोन तीन दा खात्रीलायक माहीती मिळवण्याचा प्रयत्न केला गेला पण असो, शेवटी तो क्षण आला... भीमकाय टारझन व इटुकली पिटुकली नयनी (मृगनयनी) ह्यांचे आगमन झाले... टार्याला मी आधीपासून ओळखत असल्यामुळे त्याला थोडासा इग्नोर केला
व मोर्चा मॅडमकडे वळवला... पण हॅ ... हाच का तो राजे असे विचित्र नजरेने जसे आपण संग्रहालयातील प्राणी पाहतो ह्या नजरेने पाहून ही गप्प बसली...
निषेध !
पण ही नयनी सारखे सारखे आल्यापासून आपली बॅग तपासून पाहत होती , मग कोणीतरी विचारल्यावर समजले बँग मध्ये रंगाच्या पिशव्या होता... मी माझ्या कपड्यांना, बुटांना.. स्वारी म्हणालो... एकदम तहे दिल से.. !
मेथी पराठेचा बेत होता मिंटीचा. पण ते इटुकले पिटुकले पराठे... एक.. दोन.. तीन.. चार ... पाच... करत कीती संपले व आंतर मनाने आवाज दिला... राजे. तो टारझन बघ तुझ्या प्रमाणात तीप्पट आहे काही खातो आहे का... आवर स्वतःला.. शेवटी कसा बसा ६ की ७ वा पराठा आल्यावर मी बस्स म्हणालो ! त्यानंतर मिंटीचे + पंताचे दुसर घर... पाहण्यासाठी आम्ही बाहेर आलो व त्या घरात मस्त पैकी दंगा घातला कारण तेथे पंताच्या घरचे कोणी नव्हते
त्यामुळे मनसोक्तपणे दंगा घालता आला. ह्या जोडीचे लग्नातील व इतर फोटो पाहण्यात व गप्पा मारण्यात वेळ कसा निघून जात होता तेच कळत नव्हते...
शेवटी नयनीचा संयम संपला व तीने आता रंग खेळू या असे फर्मान जाहीर केले.... !
मी थोडा बचावाचा प्रयत्न केला पण नेहमी प्रमाणेच असफल झाला
असो. गेली १०-१२ वर्ष रंग खेळून माहीत नाही त्यामुळे थोडा बावरलो होतो मी.... पण धम्माल आली !
आता रामायण बास्स !
फोटो टाकतो आहे पाहून घ्या... !

दामोदर पंत, मृगनयनी, टार्या व राजे ( मीच तो)


साल्या मराठी संकेतस्थळ काढतोस... असे म्हणून मारताय की काय ... पंत ! 

हॅ हॅ हॅ.... नाम है टार्या.. भले भले को करा देता हूं वार्या 

नयनी देवी !

टार्या मिंटी नयनी राजे !

फोटोचा फोकस नाही चुकला आहे तो रंगच तसा आहे.... हो की नाही रे टार्या 

काही शब्द लिहावे असे वाटत नाही आहे
त्यामुळे लोळतो
आहे 


लहान बाळांनो दचकू नका.... 

लहान बाळांनो... आता दचका.. रडा..
टार्या आला....

हाच तो लहान... एखाद्या निरागस लहान मुलाप्रमाणे असलेला राजे.

बरं बाबा... तुच जिंकलास... तुला रंग फासला काय व रंगाला तु फासलास काय वजन तुझेच जास्त 

हा रंगबीरंगी पोपट 

.jpg)
आयला ...
लै भारी ...
फोटो मुळे ओळख झाली म्हणायचं ...
शेवटून दुसरा फोटो " गरीबांचा खली "
" गरीबांचा खली " अर लै डोके
" गरीबांचा खली "
अर लै डोके खाजवले पण ते खली नाव काय आठ्वले नाय बे मला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लै भारी रे... साला पहिल्यांदा
लै भारी रे...
साला पहिल्यांदा रंगपंचमी मिस झाली राव ...
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!!!!
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
काय हो हे !!!!!!!!!!!!!!!!!!!!
आज झोप नाही येणार....
लैच दंगा केलात राव... मस्त. आमची रंगपंचमी हुकली....
लै भारी रे ...
मस्त फोटो आहेत आणि त्याहुन सुरेख वर्णन.
कट्टा आवडला... !!!
इन्शाल्ल्हा आम्ही पुढच्या (रंगपंचमी) कट्ट्याला पुण्यात असु.
बाकी आमच्या बेंगलोर कट्ट्याचे फोटो इथे टाकण्यासारखे नाहीत
( उगाच व्यनी करुनही लिंका मागु नये, तिथेही दाखवण्यासारखे नाहीत )
ओके मेल करा एक्सल फाईल पाठवू
ओके मेल करा
एक्सल फाईल पाठवू का मेल पत्ता असलेली
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
एक्सेल फाईल वरुन आठवले तो
एक्सेल फाईल वरुन आठवले तो टिंग्या हरामखोर कुठे आहे आजकाल ?
आणि हरामखोरावरुन आठवले तो आपला ... जाऊ द्या !
भारि मजा केलीये
भारि मजा केलीये सगळ्यांनी...त्या टार्याला जरा दुसरा रंग तरी लावायचात...
दिपाली
गल्लत होते आहे.
अगं दिपाली, तुझी काहितरी गल्लत होते आहे बहुतेक.
टार्याला कुठे रंग लावलाय ?
तो आहे तसाच आहे की !
( पळा पळा, टार्या आता मुंडीवर हाणतोय च्यायला )
स्वगत : आमचे तर फोटो म्हणा कुठले चांगले येतात ? लोक येड्यासारखे विचारतात तु रंग खेळला नाही का म्हणुन ! आता ते फोटो इथे टाकुन कशाला इज्जतीचा फालुदा करुन घ्या ?
हा हा हा...तशी शंका आलीच होती
हा हा हा...तशी शंका आलीच होती की टार्याला कुणी कसा रंग लावला नाही पण त्याच्या कपड्यांवरून वाटलं की त्यालाही रंग लावला असेल....
दिपाली
फरक आहे ना ...
टारुला रंग लावले आणि त्याचा कपड्यांना रंग लावणे ह्यात फरक आहे ना.
मी काही बोललो का कपड्यांबाबत ?
काय बोल्लो का ? न्हाई ना, इशय संपला मग.
इशय...कुठला इशय???
इशय...कुठला इशय???
काय गोंधळ चालु आहे रे मुलांनो
काय गोंधळ चालु आहे रे मुलांनो
बाकी आम्हाला अफ्रिकेत गोरा म्हणायचे बरं

आणि अफ्रिकन ब्यांकेतल्या बर्याच पोरी लट्टु होत्या आपल्यावर
बरं बरं @
बरं बरं @
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
हरामखोरांनो.....ऐनवेळी फोन करता होय रे ?
एक दिवस आधी फोन केला असता तर मी सुट्टी नस्ती का टाकली?
ब्बाब्बोय्य.....ती नैनी कसली ड्येंजार दिसतीये राव =)) =))
खंप्लिट घाबर्लो ना राव मी!
हे आले बिझी बाजीराव..........
हे आले बिझी बाजीराव..........
व तो दुसरा नमुना... सौदर्यफुफाट्यातून बाहेर येणेसाठी तयारच नाही
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लेको...खरं बोला की! आदल्या
लेको...खरं बोला की!
आदल्या दिवशी बोललात का मला? बोललात का? नाही ना? मऽऽग????
धम्या तुला बोलवायचंच नव्हतं
धम्या तुला बोलवायचंच नव्हतं या लोकांना...कंपुबाज कुठचे...
दिपाली
होय गं...
अग्गदी खर्रं.............
घ्या ...
>>एक दिवस आधी फोन केला असता तर मी सुट्टी नस्ती का टाकली?
घ्या आता !!!
बोला "पुंढरीक वरदा हाऽऽऽरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम ऽऽऽ "
>> ब्बाब्बोय्य.....ती नैनी कसली ड्येंजार दिसतीये राव
+१, असेच म्हणतो.
पण आपल्याला तीची ५ व्या फोटोतली हेअरस्टाईल मस्त वाटली, अजुन १ महिन्यांनी माझे केस वाढले की थोडी मॉडिफाय करुन तशीच करुन टाकतो.
खंप्लीट 'नेस्टा'सारखीच मायला !
ता.क. : "नेस्टा" हा आमचा आवडता डिफेंडर आहे, ज्याची हेअरस्टाईल आम्ही काही दिवसात आमलात ( द. आफ्रिकेचा नव्हे ) आणणार आहोत.
>>खंप्लीट 'नेस्टा'सारखीच
>>खंप्लीट 'नेस्टा'सारखीच मायला !
बाब्बोय...नैनीच्या छान छान केशरचनेला डायरेक्ट 'नेस्ट' म्हणजे 'घरटं' म्हणतोय हा माणूस!!!
नैने, पाहिलंस का, तुझ्या पाठीमागे कशी निंदानालस्ती चाललीये ते!
अवांतरः आम्हाला ते ताक दही काही दिसत नाहे.
भाड्या ...
भाड्या, का उगाच काड्या लावतो आहेस ?
मला काय 'सग'ळ्यांसारखे समजलास की काय ?
मी म्हणतो आहे Alessandro Nesta ची हेअरस्टाईल, मधीच हे 'घरटे' कुठुन आले आता ?
गुगलवर सर्च मार, १००० फोटो सापडतील ...
बाकी तुमचा सोईस्कर डोळेझाकपणा एक दिवस तुम्हाला संपादक बनवणार बघा, असो आम्ही चलतो आता.
दादा आता हाणाच...
छायाचित्र क्रमांक ३ पाहून एक जुनी आठवण जागी झाली.
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील एका कार्यक्रमात व्यासपीठावर असतानाच त्यांनी खिशातून कंगवा काढला आणि डोक्यावर असतील नसतील तेवढे केस सावरण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नेमकं त्या भागातील एक आमदार अगदी अजीजीनं त्यांच्यासमोर खाली बसले होते. दादा तक्क्यावर, हे आमदार खाली आणि त्यात किंचित वाकले होते. असं दिसायचं की दादांनी आपला हात उंचावला आहे, हातातील कंगवा एखाद्या पट्टीसारखा दिसतोय आणि ते या आमदारांना हाणणार आहेत.
एका वृत्तपत्रानं छायाचित्राला दिलेली ओळ - दादा आता हाणाच!
हे इतकं सत्यच आहे. यापुढचा कल्पनाविस्तार सदस्यांवर सोडून मी आपली रजा घेतो.
वाह काय दिवस होता तो
वाह काय दिवस होता तो
भारी फोटो... टार्याचा फोटोचा
भारी फोटो...
टार्याचा फोटोचा वापर लहान पोरंना घाबरवण्यासाठी करता येईल का???
-निखिल
ते फोटो पाहिल्यापासुन...
माझा मुलगा दचकुन झोपेतनं उठतोय!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
पुणेरीजी
तुमचा तर मुलगा दचकुन झोपेतनं उठतोय !! येवढचना
आमच प्वार तर परत हातरुन ओलं करया लागलया.

गंड,दोरं, अंगारं, धुपारं , ओवाळणी , लिंबु +मिरची कशा कशाचा म्हनुन उपेग हुईना राव!!

आता उतारा एकच एखाद कोंबड न्हाई तर बकर कापाया पायजेल
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
त्यापरास पोराच्या समोर यकांदा
त्यापरास पोराच्या समोर यकांदा निबंद धरा आनि म्हना, "भाड्या ह्याचं ही&ही इडंबन पाडशील तर तुझा आयडी उडवायला मालक बोलविन...." लग्गिच होतं का न्हाई शांत पघा
टारझन!
टारझन आहे तो. एखाद्या कोंबड्यात भागणार नाही. बकरंच! त्यातून कोंबडंच कापायचं असेल तर खुराडं जवळ असेल एवढं पहा!!!
काय गोंधळ चालवला आहे रे
काय गोंधळ चालवला आहे रे ?
माझा फोटो पाहुन मी सुद्धा घाबरलो आहे 

च्यायला
कस्सला सांड फोटू आला आहे .. वा वा वा ! मजा आली !
बाकी राजेचं तंगडं ऑलरेडी मोडलं होतं .. नाही तर माझा पहिलाच लेख काही कुचकट लोकांच्या सांगण्यावरुन उडवल्याबद्दल त्याला उचलुन आपटणार होतो
मस्तच!
फोटो एकदम जबरा आले आहेत!
विकास देशपांडे
च्यायाला एकसाथ सगळी भुतावळ
च्यायाला एकसाथ सगळी भुतावळ गोळ झाल्यासारखे दिसत आहे
धुळवड
धुळवड जोरात साजरी झालेली दिसतेय.. डेंजर आहेत काही काही फोटो..
सह्ही
सह्ही मजा केलेय राव
अवांतरः फोटोपाहुन अगदी लेटस्ट कविता आठवली.
चेतन
भारीच फोटु. राजा कोणता साबण
भारीच फोटु.
राजा कोणता साबण लावतोस लेका.
लयीच तरुण दिसतोस.
राजे मस्त लेख रे.......
राजे मस्त लेख रे.......
सॉलीड मज्जा केली आपण त्यादिवशी......
पण फोटोंखाली टाका की मिंटीच्या सौजन्याने.......
अरे वा..
भरपूर धम्माल केलेली दिसते आहे... मस्तच !
स्वाती
जोरदार....
जोरदार....
व्वा लै मिस करतोय रे
व्वा लै मिस करतोय रे रंगपंचमी....
हा... आता इथे तमिळनाडूतल्या कृष्णसुंदरांच्या पक्क्या रंगावर कोणता रंग उठून दिसेल नक्की सांगता येत नाही.
उगाच एखाद्या अंगावर पिवळा रंग टाकायचा अन तो शिसवी कपटाला व्हार्नीश लावल्या सारखे वाटायचे
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
एकेकदा विजुभाऊ खणखणीत पंच
एकेकदा विजुभाऊ खणखणीत पंच टाकुन जातात राव!
हा हा हा!!
अगदी अगदी!!

पंचमीच की रं राज्या !!
पंचमीच की रं राज्या !! म्हणुनच फोन उचलत नव्हतास व्हय....
रंगबेरंगी अमीतला बघुन लई हसलो राव !!
अरे फोन स्कुटीच्या डिक्कीत
अरे फोन स्कुटीच्या डिक्कीत होते बे त्यावेळी
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा वा वा! लै भारी! त्या बाकी
वा वा वा! लै भारी!
त्या बाकी त्या रंगीबेरंगी अक्षरात लिहणार्या नयनी तै ह्याच का?
-Nile
सोलिड फोटो
सोलिड फोटो
रंग उधळले
लय धमाल केलेली दिसतेय.. सगळ्यांनी (भलतेच) रंग उधळलेत की!
-ऋ
-ऋ
मीच ती मृगनयनी!!!!!!
आई ग्ग्ग!!!!!..... खरंच्च्च्च्च मी अशी दिसत होते का


अगदी "टार्याची" आफ्रिकेतली बहीण वाटतेय मी!!!!!
राजेच्या बैन्डे'ड शर्टाची वाट लावल्याबद्दल दिलगीर आहोत!!!!
आणि मिपावरच्या एका फोटोमध्ये आपण अगदीच वेगळे दिसता.... पण आपले प्रत्यक्ष दर्शन सुखावह होते!.. शेअर ब्रोकर शोभता!!!!
)
(आणि हो! एखाद्या लहान मुलाप्रमाणे दिसणारे निरागस राजे... मी आपल्याकडे काही विचित्र नजरेने वैगैरे पाहत नव्हते हो!!! माझा, आधी मिन्टीचा दीर- म्हणजेच तुम्ही आहात... असा अम्मळ गैरसमज झाला होता..
पोपटराव आणि मैनावतीबै (दाम्या आणि मिन्टी) यान्च्या क्रुपेने "हा" सोहळा आयोजित करण्यात आला होता!!! त्यामुळे यजमान्-पदाची पुरेपूर जबाबदारी या दांपत्याने अगदी व्यवस्थित पार पाडली! मेथीचे पराठे अप्रतिम होते!!
धमालरावान्ना "ऑफिशियल" काम 'त्या' दिवशी जस्त म्हत्वाचे वटल्यने त्यान्नी काळजावर चिमुकला दगड ठेऊन दाम्यामिन्टीकडे येणे टाळले! आणि धमी-उर्फ भौली यान्ची प्रकृती "आता" जपणे महत्वाचे असल्यामुळे
आम्ही त्यान्च्या घरी जाणे रहित केले!
परीकथेतील्-राजकुमार'ला आम्च्याबरोबर रंग खेळण्यापेक्षा समोरच्या ब्युटीपार्लरमधले रंग अधिक भावल्यामुळे आम्ही त्यांच्या सैबर्-कैफेवर रंगधाड टाकायचे रहित केले!

) सखाराम गटणे" असे म्हटले... त्याबद्दल दिलगीर आहे!
आपला अपमान करायचा माझा मुळीच उद्देश नव्हता!!!

(प.रा. उर्फ निळा कोब्रा-- मघाशी फोनवर मी आपल्याला अनावधानाने "गोरा (आणि सभ्य
__________________________
असो... एकंदर खूप मजा आली... पण तरीही अजून मिपाकर असते.... तर अजून धमाल केली असती!!!!!!!
टीपः एरवी रस्त्याने येता-जाता माझ्याकडे अभिलाषापूर्ण पाहणार्या नजरा "त्या" दिवशी अम्मळ भयभीत वाटल्या!... आणि त्याचा मला अम्मळ असुरी आनंद झाला!

'त्या' दिवशी मला अम्मळ प्रेमळ "काली-माते" चे रूप दिल्याबद्दल उपस्थितांचे धन्यवाद!
सगळा रंग त्या दिवशीच संपला
सगळा रंग त्या दिवशीच संपला काय? प्रतिसाद अंमळ बेरंगीच दिसतोय आज
हाहाहा!!! भयानक... आय मीन
हाहाहा!!! भयानक... आय मीन फोटो आणि प्रतिसादसुद्धा!!!
हा हा हा!!
एकदम जॉ ब र्या फटू आणि भयानक प्रतिसाद!!!

हॅ हॅ हॅ.... काली माते... !
हॅ हॅ हॅ.... काली माते... !
कपडे अजून तसेच आहेत... रोज त्यांना बघतो व उद्या ह्यांना पाण्याचे दर्शन करवू कसा उदात्य हेतू ठेऊन त्यांना अजून हात लावलेला नाही आहे
असो.
तुम्ही आमच्या ब्रन्डेड शुज ना विसरलात ह्याचे अतिव दुखः झाले
* मला माहित असते तर तंबाखु काडायला शेतात जे कपडे वापरले जातात ते घालून आलो असतो ना
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मला माहित असते तर तंबाखु
मला माहित असते तर तंबाखु काडायला शेतात जे कपडे वापरले जातात ते घालून आलो असतो ना
तुझे सो कॉल्ड ब्रँडेड कपडे खराब करायचे होते म्हणुन तर तुला आधी सांगितलं नव्हतं ना रे.........
असो. पुढल्या रंगपंचमीला नक्की सांगु हा..... तुला नव्हे.... आर्याच्या मम्मीला..
बाकी नयना देवी खतरनाक प्रतीसाद.......
तु भेटलीस की सविस्तर बोलुच यात.....
"लहान बाळांनो दचकु नका" या
"लहान बाळांनो दचकु नका" या ऐवजि "चुन चुन के बदला लुंगी" कसे वाटेल...???
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
+१
+१
>>> प.रा. उर्फ निळा कोब्रा
>>> प.रा. उर्फ निळा कोब्रा
अ श क्य!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
चक्क हा धागा उघडायचाच राहून
चक्क हा धागा उघडायचाच राहून गेला होता. उघडलान काय साजरे दर्शन झालं सगळ्यांचं वा. मजा आली.
बाकी. यंदा आम्हीही इंदूरात (प्रथमच) जोरदार रंगपंचमी साजरी केली. धुळवडीला समस्त मराठी जनांच्या घरोघरी जाऊन रंग खेळला. नि रंगपंचमीला इथे 'गेर' (रंगांच्या गाड्या) निघते. त्यात रंगांनी सचैल न्हालो होतो. मजा आला.
हा आमचा स्वभाव
आरं तिच्या माला वाटलं की
आरं तिच्या माला वाटलं की राजेला मिशा आसतील. पन काय नाय गड्या.
आन बाकी सगळे रंगीत गडी हायती.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
छानच फोटो
सगळे फोटो मस्त..
धमाल केलेली दिसते आहे.
हॅ हॅ हॅ
सग'ळ्यांचे फोटो पाहुन हहपुवा....
आमच्या टार्याला न रंगवता सोडल्याने निषेध!

राज्या अंमळ गोरा दिसतो आहे.....पर्याकडे जाउन आला होता काय?
मिस्टर पॅन्ट नेहमीप्रमाणे दिलखुलास
नैनीदेवी लै लै लै लै डेंजार! अंमळ घाबरलो
म्यॅडम मिंटी मेथी पराठे पेंडिंग!
म्यॅडम मिंटी मेथी पराठे
म्यॅडम मिंटी मेथी पराठे पेंडिंग!
ये रे या रविवारी घरी..... मनसोक्त पराठे खायला घालते.
हो हो .... लवकर बोलाव टिंग्या
हो हो .... लवकर बोलाव टिंग्या ला .. त्या दिवशी मी न खाल्ल्याने बरेच उरले असतील नाही ? बरंय .. कचर्यात जाण्यापेक्षा

टिंगु बाळ .. लवकर जा हो
चीप! चुकीचे असे टाचण देत आहे.
चीप!
चुकीचे असे टाचण देत आहे.
चीप! चुकीचे असे टाचण देत
चीप!
चुकीचे असे टाचण देत आहे.
का बॉ ?????????????????
हे माझ्या कमेंट ला दिलं होतं
हे माझ्या कमेंट ला दिलं होतं काय धम्या ?
येथे माझी एक कमेंट होती... ती दिसत नाहीये .. येवढ्या साध्या कमेंटला ही चुकिचे टाचण मिळुन ती गायब व्हावी ह्याची मला एक मिमकर म्हणुन शरम वाटते.
खुलासा करावा !
आजचा जोक
(बकर कापल्यावर) माझा मुलगा बरा होउन विचर तो कसा
" बाबा आफ्रिकेतली माणस पण रंगपंचमी खेळतात?"
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त फोटो, खूप धमाल केलेली
मस्त फोटो, खूप धमाल केलेली दिसतेय.
वर्णन देखील मस्त.....!
बाकी टारझन रंगामुळे उठून दिसत होता की रंग त्याच्यामूळे रंगीत दिसत होते काही समजनाच..!
कोण रे तो आमच्या टार्याला
कोण रे तो आमच्या टार्याला नावे ठेवतोय....???
टारझन के अंदर जो "अस्थि विमा एजंट" सोया है उसे ना जगाइयो....!!!
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
एक आश्चर्य :
मला एका गोष्तीचे राहुन राहुन आश्चर्य वाटते की राज्या एवढे "मेक ओव्हर" कसे करु शकतो ?
प्रत्येक प्रसंगात तो वेगळाच दिसतो.
आत्तापर्यंत त्याला १ वेळा भेटलो आहे, ५-६ वेगवेगल्या प्रसंगांचे फोटो पाहिले अहेत, प्रत्येकवेळी वेगळाच दिसतो.
काय गमजा आहे मायला ?
जाणकारांनी प्रकाश टाकावा अशी नम्र विनंती
नशीबाचे झटके बसू लागले की असे
नशीबाचे झटके बसू लागले की असे होते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ठिक
ते ठिक आहे हो, पण वय कसे काय वाढत नाही फोटोत ?
कोणता "साबण" लावता ?
हॅ हॅ हॅ !!!
हॅ हॅ हॅ ! जॉनी... ये कमाल
हॅ हॅ हॅ !
जॉनी... ये कमाल तो.... सिग्नेचर / आरसी / फोस्टर मिलके बनता है...
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चुक !!!!!! तो लहान दिसतोय ती
चुक !!!!!!
तो लहान दिसतोय ती कमाल आहे माझ्या फोटोग्राफीची........
मिनिएचर फोटोग्राफीचा सल्ला
मिनिएचर फोटोग्राफीचा सल्ला एवढ्या लवकर अंमलात आणला का काय?
मिनिएचर फोटोग्राफीचा सल्ला
मिनिएचर फोटोग्राफीचा सल्ला एवढ्या लवकर अंमलात आणला का काय?
हॅ हॅ हॅ ! बरं !
हॅ हॅ हॅ !
बरं !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अम्ही सुधा कत्ता केला
अम्ही सुधा कत्ता केला
फटू?
वृत्तांत आणि फटू कुठेत?
थापा मारु नका, केला असेल तर
थापा मारु नका, केला असेल तर फोटो दाखवा.
-Nile
'अम्ही सुधा कत्ता केला'
'अम्ही सुधा कत्ता केला'
नंतरचा स्मायली तोंडच्या वाफा घालवतानाचा वाट्तोय का....???
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
आयला यांनी कट्टा केला का
आयला यांनी कट्टा केला का कत्तल केली?
-पुण्याचे पेशवे
बिप्न्या मकी मी व निख्या
बिप्न्या मकी मी व निख्या
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!!!!!!!!!!! मज्ज्जा आली नै?
आता कळलं बिका कोणत्या तीन
आता कळलं बिका कोणत्या तीन महिलांबद्दल बोलते होते ते.
-Nile
निळ्या, तू अंमळ हाच आहेस बघ.
निळ्या, तू अंमळ हाच आहेस बघ. अरे बाबा.... तीन म्हैलांमधे निख्या कसा येईल? तूप्पण ना... त्या तीन लोकोत्तर म्हैला वेगळ्या रे!!!
हेहेहेहे
हे म्हणजे पराच्या शब्दांत सांगायचं तर पॉपकॉर्न खाऊन दडपे पोहे खाल्ल्याचा टेंभा मिरवण्यासारखं झालं. टाका की वृत्तांत आणि फटू. तेव्हाच खरं.
बरं पॉपकॉर्न तर पॉपकॉर्न...
बरं पॉपकॉर्न तर पॉपकॉर्न... आमचं काय म्हन्नं नाय ब्वॉ... आम्ही आमच्या पॉपकॉर्नमधे खुश आहोत.
आम्ही भेटलो... गप्पा मारल्या, दोन चार फोन केले. वेगवेगळ्या फ्लेवरचे सोडा प्यायलो, वडापाव खाल्ले.... मस्त आल्याचा चहा प्यायलो... लै लै लै गॉसिप केले.... फोटो मात्र नाही काढले...
सबुत काय?
सबुत काय?
-Nile
द्यायची गरज नाय... पटलं तर
द्यायची गरज नाय... पटलं तर ऐका नाय तर... चप्पल वगैरे...
थापा नुसत्या...
थापा नुसत्या...
-Nile
हॅहॅहॅ!!! बी माय गेस्ट !!!!!!
हॅहॅहॅ!!! बी माय गेस्ट !!!!!!
चालतंय, पण आमच्या कडं महिला
चालतंय, पण आमच्या कडं महिला नाय, आधिच सांगतो.
-Nile
येतील...
येतील...
येतील...
येतील...
'या!' म्हटलं तर?
'या!' म्हटलं तर?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हॅहॅहॅ!!!... या तुम्ही पण...
हॅहॅहॅ!!!... या तुम्ही पण... भरपूर जागा आहे विहिरीत.... काय म्हणता?
साखी विसरलास काय?
साखी विसरलास काय?
काय बिका?
साखी की साकी?
व्हय व्हय... साखि... विसरलोच
व्हय व्हय... साखि... विसरलोच की........ मस्त होती...
मिष्टर मोडक... साखि = साबुदाणा खिचडी
चुचु काकु जाम चांगल्या गप्पा
चुचु काकु जाम चांगल्या गप्पा मारतात हा!!
सहजकाका उगाच त्यांना निर्मिति सावंत म्हणत होते...
-निखिल
जाऊदे...
जाऊ दे. आता बोलत नाही. साखि मलाही आवडते म्हणून गप्प बसतो!
धत्त.. मला वाटलं दोन ही हिरवी
धत्त..
मला वाटलं दोन ही हिरवी खोडं 'सखी'बद्दल बोलताहेत. म्हणलं कोण बरं ही सखी?
१०० व्या प्रतिसादाबद्दल राजे
१०० व्या प्रतिसादाबद्दल राजे अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
जबरदस्त ............
जबरदस्त ............