त्या दिवशी संध्याकाळी मी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी म्हणून टॅक्सीच्या शोधात होतो तेव्हा स्ट्रँड बुकस्टॉल च्या जवळ माझा वरळीचा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र मला भेटला.
"काय कुठे ?" त्यानी मला विचारलं.
"काही नाही आपलं एक चर्चासत्र आहे दादरला .जरा जाऊन येतो." मी हळूच उत्तर दिलं. तसा मी प्रसिध्दीचा झगमगाट टाळतोच म्हणा.
पण हा म्हणजे प्रसिध्दीवाला मित्र .तो म्हणाला "म्हणजे ते गांगलांच्या साईटच्या उदघाटनाला जातोयेस म्हण की."
मी मान डोलावली.
"मग घाई काय आहे .जरा स्वागतमध्ये इडली खाऊ. मग जा दादरला.मी माझ्या गाडीतून सोडतो."त्याने प्रस्ताव मांडला .
माझ्या मनात दोन विचार आले.
एक म्हणजे गांगलांनी टॅक्सीभाडं दिलंच तर किती सांगावं ? आणि चर्चा सत्र म्हणजे काहीतरी पोटभरीचं खाणं असणारच .
माझा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र हुशार आहे.उगाच एकविसाव्या मजल्यावर थोडी राहणारे.
तो म्हणला माझं ऐक ."इथेच आता काय ती इडली वगैरे खाऊन घे .तिथे काही नसणार.
फक्त स्वच्छ निर्मळ थंड पाणी."
म्हण्जे माझ्या मनात फार काही नव्हतंच पण आपण गेलोच तर चार कवि लेखक भेटतील
माझ्या मनातला विचार ओळखून तो म्हणालाआणि "तसंही आज कोणी फारसं नसणार .सगळे गेलेत दुबईला.
अरे बाबा तो काही म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स कंपनीचा मेळावा नाहीय्ये."
तसा मी फारसा चटावलेला नाहीय्ये पण...
मी इडलीच्या प्रस्तावाला होकार दिला.
***********************************************************************************
दादरला पोहचे पोहचे तो बिपीनचा फोन .
"मी पोहचतोय मालक"
(बिपीन तात्याला आणि सगळ्यांना एकाच मापात घेऊन मालक म्हणतो.तरी बरे तात्यानी त्याला संपादक बनवलं आहे)
"पंधरा मिनीटात.तात्या आलेत का ?"
आता मला माहीती नव्हतंच पण तात्या आला नाहीतर बिपीनला उभं करण्याचा प्लॅन बिपीनच्या लक्षात आला काय बॉ असं माझ्या मनात आलं खरं.
पण मी पोहचेतो तात्याचा फोन आलाच.
आता मात्र मला पोहचणं भागच होतं.
हो स्साला !!
या तात्याचा काय भरवसा नाय.
गांगलसाहेब माझ्या आधी त्याला भेटलेच तर .....
"बा झवला !! या वयात कसली साईट वगैरे काढताय ?" असं म्हणत एक नाही चर्चासत्रातल्या दोन खुर्च्या रिकाम्या करायचा.
आणि माझं तर पहीलंच चर्चासत्र...वगैरे मनात येऊन मी कासावीस झालो.
पण तसं काही झालं नाही बॉ.
मी आणि बिपीन हॉलमध्ये गेलो तेव्हा तात्या शांतपणे आनंद घारे आणि मुंडले काकांसोबत बसला होता.
*************************************************************************
आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. कवायती शिस्तीत .
आधी गुलाबाची फुलं वाटून कार्यक्रमाला सुरुवात झाली .
(माझ्या मनात आलं की फुलं म्हण्जे गुच्छ नाही म्हणजेच टेक्सीचं बिल आणि अल्पोपहार पण नाही.)
माधवराव शिरवळकर तयारीनी आलेले होते.त्यानी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच सांगीतलं की ही चर्चा फक्त चाळीस मिनीटाचीच आहे.
मा. अतुल तुळशीबागवाले यांना पहीली खेळी देण्यात आली.
त्यांनी मराठी संस्थळाबद्दल त्यांचा अनुभव सांगीतला.पण त्यासोबत असेही म्हणाले की त्यांचा आणि मराठीचा संपर्क जरा उशीराच झाला आहे.शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे वगैरे.
त्यांना मिळालेली दोन मिंटं संपत आल्यावर त्यांनी खेळी मा. संजीव लाटकर यांचेकडे दिली .
संजीव लाटकर साहेब म्हणाले की "कठीण आहे बॉ.मराठी ब्लॉग्ज्सला काही फारसे चांगले दिवस दिसणार नाही."
मग माधवराव म्हणाले की हे तुमचं फारच निगेटीव्ह मत आहे बॉ.
मग तात्या म्हणाले की मला तर काही वाईट दिवस दिसत नाहीय्येत.
आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा चकलीताईचा ब्लॉग.त्यावरच्या रेसीपी बघा.आहाहा...असं म्हणता म्हणता रुमाल शोधायला लागले मग मी संधी घेऊन सांगीतलं की मला तर ब्लॉग म्हणजे साठवणीच्या टाक्यांसारखे दिसतात.म्हण्जे उद्या तात्यानी चपला घालायला सांगीतलं की आपलं लिखाण कसं सुरक्षीत वगैरे असलेलं बरं .तरीपण ...
हा मुद्दा मांडल्यावर लगेच संपला.पण माझं दिड मिनीटं वाचलं त्याचं काय करावं कळेना .
मग माधवराव म्हणले की मराठी संस्थळं आणि पैशे याचा ताळमेळ कसा बसवावा बॉ.
मा.अतुलसाहेबांनी यावर काहीतरी उच्च विचार मांडला.पण मला तो काही कळला नाही .
संजीव लाटकर साहेब मात्र कळवळून म्हणाले "अहो मराठी संस्थळ म्हण्जे माझी पॅशन हो पण पैशे काय कोणी देत नाही .आता पैशे पाहीजेत म्हण्जे कल्पकता पाहीजे.कल्पकता वापरल्याशिवाय संस्थळातून पैशे मिळणार नाहीत."
यावर तात्यांनी डोळे मिटून मान डोलावली हे मी पाहीलं .
आता मालकांनी मान डोलावल्यावर मी पण मानेत मान डोलावली.
लाटकरसाहेबांचा लॉस मात्र फारच मोठा असावा.कारण नंतर त्यांनी उरलेली माझी आणि तात्यांची मिनीटं खाऊन टाकली.मग आम्ही काय गप्प बसलो.मी म्हटलं की बिकातरी प्रेक्षकातून ओरडून काही म्हणेल पण तो आपला गप्प.मी पुढच्यावेळी टारझनलाच घेऊन जाईन.
मी प्रयत्न करणार तेव्हढ्यात लाटकर साहेबांनी नजरेनीच गप्प करून टाकलं.
(सोसायटीचे नवीन मेंबर एस आर ए च्या लाभार्थींकडे जसं बघतात तसं बघीतलं .मग मला खूपच वाईट वाटलं)
मग ते काही बोल्ले ते सगळं त्यांनी रवीवारच्या अंकात छापून आल्यामुळे मी काही लिहीत नाही.
फक्त एकच महत्वाचा मुद्दा म्हणजे साडेतीन टक्के लोकांकडे ब्रॉडबँड आहे.
त्यातले दोन टक्के हापीसाचे आहेत .असं ते काही म्हणाले नाहीत पण मला आपलं तसं वाटतं.
हा साडेतीन टक्क्याचा आकडा फार वाईट आहे.त्यामुळे बरेच वर्षं वाद चालत राहतात.
(तसं बघीतलं तर तीनाचे सगळेच अपूर्णांक वाद घालण्यात हुश्शार असतात बॉ. असं मी म्हणणार होतोच पण गप्प बसलो.)
आधीच मराठी माणसं कष्टानी एकत्र येतात.
आलीच तर वाद घालतात.
ज्यांना वाद घालता येत नाहीत त्यांना मग दुसर्या संस्थळावर जावंस वाटतं पण तिथेही मालक आणि वाद असतात.
मग सेलेब्रीटी ब्लॉग्ज्स आणि युनीकोड यावर आम्ही उगाचच काहीतरी बोललो.आणि चर्चा संपली.
***********************************************************
भूक लागली होती .गांगलांचे पेढे दातातल्या फटीत अडकतील येवढे छोटे होते.
तात्या मात्र हुश्शार.थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
अतुल तुळशीबागवाले आणि संजीव लाटकर साहेब स्टेजवरून उतरल्यावर ब्रॉडबँड आवरतं घेऊन आपापल्या मराठी नॅरोबँड सोबत घरी गेले.
थोडक्यात या चर्चेची फलशृती काय ?
या निमीत्ताने मिसळपावची जनमानसात ओळख वाढली.
गांगलांच्या पुण्याईने आमची नावं पेपरात छापून आली .लोकसत्तात फोटो आला.
तसा मी प्रसिद्धीच्या झोतात यायचे टाळतोच पण आता मराठीचा मुद्दा म्हटल्यावर....
*********************************************************************
हॅ हॅ हॅ
>>पुढच्यावेळी टारझनलाच घेऊन जाईन

खरचं घेवून जायला हव होत...
>>गांगलांचे पेढे दातातल्या फटीत अडकतील येवढे छोटे होते
>>तात्यानी चपला घालायला सांगीतलं की आपलं लिखाण कसं सुरक्षीत वगैरे असलेलं बरं
हे मात्र खर ... बरेच ब्लॉग असेच असावेत ...
क आणी ड आणि क!!!! _/\_ उग्गा
+ १
+ १
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>औंदाच्या निवडणुकीचं तिकीट
>>औंदाच्या निवडणुकीचं तिकीट तुम्हाला मिळेपर्यंत आख्खा आझमगड आम्ही पेटता ठेऊ
अगर ये टिकट आपको नहीं मिला तो पार्टी हिला देंगे (टारझन को सांगेगे हिलानेको)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
ध.मु.शी सहमत
आठवणी जाग्या करण्यास मुद्दाम परत एकदा हा फोटो
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
अवांतर...विषयांतर...जंतरमंतर होतंय....
अरे....त्या तिसर्या माकडाला आवरा रे कोणीतरी

मायला, दोघांची चाललीये हाणामारी..अन ह्याची काय मध्येच तिसरीच घाई
अरे....त्या तिसर्या माकडाला
धम्या सारखंच दिसतंय, बरोबर नको तिथे बघतंय!
-Nile
अंहं...
पर्फेक्ट नायल्या....
तसुभरही फरक नाही सवयीत!
किती ही अहमहमिका
किती ही अहमहमिका, पूर्वज तेच हे सांगण्याची? दोघंही नगाला नग आहात! एकाला झाकावं दुसऱ्याला काढावं!!!
माननीय जयपाल्-जी आपली
माननीय जयपाल्-जी आपली चित्रांतर्फे प्रतिक्रीया द्यायची कल्पना छानच आहे पण सदान कदा तसे करु नये हि विनंती. बर्याचदा आपल्या चित्रांमुळे धागा उघडायला उगाचच वेळ लागतो. तरी योग्य तो मतितार्थ समजुन घ्यावा हि विनंती. बाकी धम्या वगैरे आपल्या चित्रांचे फ्यान असल्याने त्यांच्या खवत आपण प्रसंगानुरुप चित्रे डकवुन इथे दुवा दिल्यास आम्ही सुद्धा वेळ मिळाल्यावर त्यांचा लुत्फ उठवु शकु.
गुलाम मुलगा
:-)
आग्गागागागा!!
बिन देअर डन दॅट, साडेतीनटक्के काय, कल्पकता-पैसे-डोळे मिटून मान डोलवणे, नेहमीप्रमाणे गप्प बिका,अपूर्णांक वाद, स्थळोस्थळी मालक आणि वाद, थिंक-ड्रींक, ब्रॉडबँड्-नॅरोबँड, फलशृती!!!!!!!!!!!
फुटाफुटाला कसलं इंचाइंचाला एक्शन!!!
असेच म्हणतो
+१
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अगदी अगदी...
बिन देअर डन दॅट, साडेतीनटक्के काय, कल्पकता-पैसे-डोळे मिटून मान डोलवणे, नेहमीप्रमाणे गप्प बिका,अपूर्णांक वाद, स्थळोस्थळी मालक आणि वाद, थिंक-ड्रींक, ब्रॉडबँड्-नॅरोबँड, फलशृती!!!!!!!!!!!
फुटाफुटाला कसलं इंचाइंचाला एक्शन!!!
अगदी सहमत... सॉलिड्डच!!!
स्वाती
शब्दा शब्दाला फुटलो... रामदास
शब्दा शब्दाला फुटलो...
रामदास काक सगळ्यांनाच बेक्कार हाणलाय
तो तीन च्या अपुर्णांकाचा पंच असु द्या की ब्रॉडबँडचा... जबरा लिहलय
-निखिल
फु ट लो
लय भारी रामदासकाका, मजा आली
-ऋ
कसचं कसचं!
हॅहॅहॅ कसचं कसचं! अगदी मनातल बोल्ला ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
बेक्कार, बेक्कार, बेक्कार
बेक्कार, बेक्कार, बेक्कार शॉट्ट आहे कार्यक्रमाचं हे वर्णन!
रामदासकाका, ठाण्याला येणार असेन तेव्हा आधी नक्की कळवेन तुम्हाला! तुम्हाला भेटायचंच आहे!
(७०% टक्क्यातली, साडेतीन टक्क्यातली, दोन आणि दीड टक्क्यातलीही) ३.१४ विक्षिप्त अदिती
अवांतरः गोडबोले कुठे हरवले?
'टक्का'टक लेख. ३३
'टक्का'टक लेख.
३३ टक्क्यांबाहेरचा (भोचक)
हा आमचा स्वभाव
क ड क मा ल !
क ड क मा ल !
मुनीवर्य .. साष्टांग
मुनीवर्य ..
साष्टांग दंडवत....
=))
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
-Nile
साडेतीन टक्के!
रामदासकाका,

तुम्ही बाकी सगळं सगळं सांगितलंत...
कोणाचं उदघाटन, कोण व्यासपीठावर बसलं, कोणकोण बोललं, काय बोललं वगैरे वगैरे!!!
पण एक गोष्ट सांगितलीच नाहीत....
समोर ऐकायला किती (आणि कोण) लोकं होती?
त्यातच तुमच्या साडेतीन टक्क्यांच्या प्रश्नाचं उत्तर दडलंय, नाही का?
आपला मध्यमवर्गीय,
बूरझवा डांबिस!
खि खि खि
बूरझवा डांबिस!
bourgeois च्या नावाने तो मार्क्स रडत असेल ! हाहाहाहा
बूरझवा डांबिस
मेलो, खपलो, चचलो,पञ्चत्वात विलीन झालो
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ऑबॉबॉबॉबॉबॉबॉ......
हरयाणवीनं केला मरहट्टी भ्रतार......
आयला..बुडांकाका, आज अंमळ रंगात येऊन प्रतिसाद देताय की काय?
बाझवला!!
बूर्झ्वा कुठे आणि बूरझवा कुठे!! (नको तिथे शुद्धलेखनाला फाट्यावर मारलं म्हणजे असं होतं!!!)

(अतिडावा)चतुरंग
+१ हेच म्हणतो
बूर्झ्वा कुठे आणि बूरझवा कुठे!!
शुद्धलेखनाच्या बैलाला...
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
!!!!!!!!!!
बूरझवा डांबिस!
*&%@^#*(!
=))
च्यायला....... असली भारी कोटी आजतागायत नव्हती पाहिली .... यापुढेही पाहणार नाही....
काका!!!!!!!!!!!!!!!! मुजरा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
०
च्यायला....... असली भारी कोटी आजतागायत नव्हती पाहिली ....
काका!!!!!!!!!!!!!!!! मुजरा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
+१
यापुढेही पाहणार नाही....
-१
का रे बाबा? का नाही पाहणार ? काका अजुन आहेत ना रे बिका? का तु निघालास लगेच?
च्यायला....... असली भारी कोटी
च्यायला....... असली भारी कोटी आजतागायत नव्हती पाहिली ....
+२
-निखिल
+३
+३
हॅहॅहॅ
शिव शिव! बूडां
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
(विषय दिलेला नाही)
बुडां काका
__/\__

आता आम्ही तुम्हाला पिडांकाकांऐवजी बुडां काकाच म्हंण्णार
-ऋ
-ऋ
हम्म
बुडाचे बुढा काका होऊ देऊ नका म्हणजे मिळवली
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बूरझवा डांबिस!
-Nile
>>बूरझवा डांबिस!
>>बूरझवा डांबिस!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बोलती बंद
बोलती बंद झाली आहे!
वंदन
वेडझवा रामदास आणि बुरझवा डांबिस ह्या दोघानाही साष्टांग.
अगायाया!!!!!!!!!!!!!
अगायाया!!!!!!!!!!!!!
सगळे प्रतिसादपण खतरी.
डांबीसकाकानी सिक्सरच हाणली..