काही दिवसांपूर्वी मी २२ जून १८९७ हा सिनेमा "राजश्रिमराठी.कॉम" वर पहिला. चाफेवर बंधूंवर बनवलेला खरं म्हणजे बराच जुना सिनेमा आहे पण मी आधी कधीही ह्याचं नाव कधी ऐकलं नव्हतं. चाफेकर बंधूविषयी मला माझ्या दुर्दैवाने फार माहिती नव्हती.
ह्या सिनेमात तत्कालीन सामाजिक परिस्थिती मात्र छान रंगवलेय. विशेषत: ब्राह्मण समाजाविषयी गैर ब्राह्मण लोकांचा दृष्टीकोन कसा होता हे सुध्धा चांगल्या पद्धतीने सांगितलेय. सिनामात विखुरलेली गाणी पण खूप चांगली आहेत. (खरं म्हणजे त्या ओव्या आणि तत्सम घरगुती गाणी आहेत. पार्श्व संगीत असं नाहीच आहे.)
पण माझं प्रामाणिक मत सांगायचं तर मला हा सिनेमा पाहून थोडा विरसच झाला. चित्रपटाच्या शेवटी अपेक्षित परिणाम साधला गेला नाही असं मला वाटतं. त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. कदाचित त्यामुळेच आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही.
तुमच्या पैकी कोणी हा चित्रपट पाहिलंय का? तुमची मतं ऐकायला आवडतील.
>>त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि
>>त्यावेळचे "क्रांतिकारक" आणि आजकालचे "अतिरेकी" ह्यात उगाचच साम्य वाटत होतं. >> हे पटलं नाही.
>आपल्या मनातील चाफेकर बंधूंची आणि लो. टिळकांची प्रतिमा आणि सिनेमात दाखवलेली प्रतिमा ह्यांचं समीकरण फारसं जुळलं नाही.>> तुमच्या मनात काय प्रतिमा आहेत?
जरा विस्तारपूर्वक लिहिलेत तर तुमचा दृष्टीकोन तरी समजेल, ह्या ४ ओळींवरुन फारसा उलगडा होत नाही.
प्रसंग माफीपत्र
मला मराठीत लिहिताना खूप वेळ लागतोय त्यामुळे माझं लिखाण अपूर्ण वाटत असल्यास क्षमस्व.
ह्या सिनेमात टिळक आणि चाफेकरांचा एक प्रसंग दाखवलाय की ज्यात चाफेकरांना फाशीची शिक्षा झालेली आहे, आणि ते आणि टिळक एका तुरुंगात असताना टिळक त्यांना एक माफीपत्र लिहायला सांगतात ज्यात "मी (पक्षी चाफेकर) एक सामान्य, कमी शिकलेला, बुद्धीने मंद आहे" अश्या अर्थाचा मजकूर लिहितात.
इथे आपल्या मनातील त्यांची बाणेदार प्रतिमा जुळत नाही असं मला वाटलं.
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
चित्रपट आता पूर्णपणे आठवत
चित्रपट आता पूर्णपणे आठवत नाही, पण तो तर डावपेचांचा भाग असणार ना?
काय आहे ह्याला च गमीनी कावा
काय आहे ह्याला च गमीनी कावा म्हणत असावेत, वेळ प्रसंगी शत्रुशी काही करुन तह करुन नंतर जोमाने लढणे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वास्तवाला धरून
>>>"मी (पक्षी चाफेकर) एक सामान्य, कमी शिकलेला, ----आहे" अश्या अर्थाचा मजकूर लिहितात.<<<
यातील प्रत्येक शब्द हा कदाचीत आश्चर्य वाटेल पण चाफेकर बंधूंच्या संदर्भात वास्तवाला धरून होता. फक्त "बुद्धीने मंद" त्यांनी म्हणले होते का, त्यासाठी इंग्रजीतील नक्की शब्द कुठला आणि कायद्याच्या भाषेत त्याचा अर्थ काय यावर मात्र मला कल्पना नाही.
विकास देशपांडे
मी ह्या चित्रपटाचे नाव आजच
मी ह्या चित्रपटाचे नाव आजच वाचतो आहे
म्हणजेच ह्याला हवी तशी प्रसिध्दी मिळाली नसावी.
पण तुमच्या लेखनामुळे हा चित्रपट लवकरच पाहीन व आपले मत येथे व्यक्त करेन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
२२ जून चित्रपटाची माहिती,
२२ जून चित्रपटाची माहिती, दुवा
ह्या चित्रपटामध्ये पुण्यातल्या थिएटर अकॅडमीच्या कलाकारांचा सहभाग होता. जयराम हर्डीकर, शांता जोग, रविंद्र मंकणी, उदयन दिक्षीत ही काही नावे आठवतात. लोकमान्य टिळकांची भूमिका सदाशिव अमरापूरकर ह्यांनी केली होती.
नचिकेत व जयू पटवर्धन ह्यांचे दिग्दर्शन होते.
लहानपणी बघितला होता हा
लहानपणी बघितला होता हा चित्रपट. आवडला होता. पण मला हा चित्रपट थोडा विस्कळीत वाटतो. पण अजूनही पूर्णपणे स्मरणात आहे असा हा चित्रपट. त्यातली काही काही वाक्ये / गाणी अजूनही नेहमी आठवतात...
गोंद्या आला रे...
एरंडवनात सराव चालतो म्हणे...
आई अंबे जगदंबे...
मला तरी विरस झाल्यासारखे वाटले नाही. मात्र 'क्रांतिकारक' / 'अतिरेकी' हा मुद्दा बराचसा वादग्रस्त आहे...
चूक दुरुस्त
हा चित्रपट आपलीमराठी वर नसून राजश्रीमराठी वर आहे. (चूक दुरुस्त केलेकी आहे.) दुवा देतोय.
http://www.rajshrimarathi.com/Movie/22-June-1897#
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
"चापेकर बंधू" असे असायला
"चापेकर बंधू" असे असायला हवे..
पूर्वी
दोन-तीन वर्षी ह्याच दिवशी दूरदर्शनवर हा सिनेमा बघितल्याचं आठवतंय.
मलातरी आवडला होता. फक्त सदाशिव अमरापुरकर लोकमान्य टिळकांच्या भुमिकेत तितकेसे फिट नव्हते असं वाटलं.
बाकी ह्या चित्रपटाबद्दल अधिक इथे वाचू शकाल.
पाहिला पाहिजे हा
पाहिला पाहिजे हा चित्रपट...
चला अजुन एक यादीत अॅडवला...
-निखिल
चापेकर बंधूंबद्दल जास्त
चापेकर बंधूंबद्दल जास्त माहिती हवी असल्यास, मृणालिनी जोशी यांचे "मृत्युंजय आम्ही" पुस्तक वाचावे. बरचे गैरसमज दूर होउ शकतात.
माझ्याकडे आहे, फोटोकॉपी हवी असल्यास व्यनी करावा.
हे कसे काय?
हे कसे काय? चाफेकर बंधूंनी कार्यक्रमात जाऊन अंधाधूंद गोळीबार केला का ज्यात निष्पाप पुरूष-बायका-मुले मेली? "गोंद्या आला रे" हा गुप्तसंदेश एकदा चुकला आणि त्यात एक चुकीचा बळी गेला हे खरे. पण असा संदेश करून जेंव्हा एकाच माणसासाठी वापरण्याचा प्रयत्न असतो, तेंव्हा त्यात आजकालच्या "अतिरेक्यांचे" त्यात माओवादी पण आले, यांचे दर्शन होते असे कसे वाटले?
त्यांनी कुठेही जाऊन बाँब उडवले का? (अगदी भगतसिंग आणि बटूकेश्वर दत्त यांनी देखील जो बाँब तत्त्कालीन पार्लमेंटमधे टाकला, त्यावेळेस गॅलरीतून अशा ठिकाणी टाकला जिथे खाली मोकळे दिसले आणि मनुष्यहानी झाली नाही)
आता आजकालच्या अतिरेक्यांची आणि दहशतवादाची तुलनाच करायची असेल तर जालीयनवाला बागेत सामान्यांना बाहेर जायची दारे बंद करून गोळीबार करण्याची आणि जीवे मारण्याच्या आज्ञेस, निर्णयास आणि त्याच्या आमलात आणणार्या वृत्तीची करता येईल.
विकास देशपांडे
सहमत आहे. शक्यतो तुलना
सहमत आहे.
शक्यतो तुलना टाळावयास हव्यात.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+२
सहमत आहे.
शक्यतो तुलना टाळावयास हव्यात.
चाफेकर इंग्रजांच्या दृष्टीने
चाफेकर इंग्रजांच्या दृष्टीने अतिरेकी होते.
भारतीयांच्या दृष्टीने क्रांतीकारक.
तुम्हाला ते अतिरेकी वाटले हा शिक्षणाचा दोष जो अहिंसेने स्वातंत्र्य मिळालं असं शिकवतो. असो.
चाफेकर बंधुन सादर प्रणाम.
अतिरेकी अन क्रांतीकारक....
देशभक्ती आणि देशद्रोह या सापेक्ष संकल्पना आहेत. एकेकाळचा अतिरेकी, दहशतवादी त्याचं उद्दीष्ट सफल झालं की क्रांतीकारक, देशभक्त असा संबोधला जातो.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सहमत
सहमत. याउलट पराभूत झाल्यामुळे पुलस्त्य ऋषींचा विद्वान नातू 'असुर' ठरतो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
म्हणजे?
>>>एकेकाळचा अतिरेकी, दहशतवादी त्याचं उद्दीष्ट सफल झालं की क्रांतीकारक, देशभक्त असा संबोधला जातो. <<<
म्हणजे? चाफेकर हे २२ जून १८९७ च्या आधीपर्यंत "नेटीव्हां"मधे अतिरेकी/दहशतवादी संबोधीले जात होते का? का १९४७ पर्यंत?
विकास देशपांडे
चाफेकरांना समर्पित एक ब्लॉग
चाफेकरांना समर्पित एक ब्लॉग आहे, बर्याच नविन गोष्टी त्याबद्द्ल लिहल्या आहेत. बराच शोधला पण सापडला नाही.
-Nile
चाफेकर बंधुंबाबत १८९९ मधे छापुन आलेल्या काही बातम्या....
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=EP18990307.2.34
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=HBH18990308.2.23
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=WC18990308.2.17
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=CL18990217.2.28
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=THD18990213.2.12
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=ME18990214.2.15.1
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=MEX18990211.2....
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=TH18990307.2.14.1
http://paperspast.natlib.govt.nz/cgi-bin/paperspast?a=d&d=PBH18990307.2.16
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अरे वाह ! मस्त संकलन व माहिती
अरे वाह !
मस्त संकलन व माहिती धन्यवाद.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चापेकर हवे ते. सगळे चाफेकर का
चापेकर हवे ते. सगळे चाफेकर का म्हणत आहेत?
चांगली चर्चा
फार छान चर्चा झाली. क्रान्तिकारक आणि अतिरेकी ह्यांची तुलना होउ नये हे एकदम मान्य. (पण चित्रपट बघताना होत होती... कदाचीत फॅक्ट्स अगदिच जसेच्या तसे समोर ठेवल्यामुळे आणि आपण कोणत्या परिस्थितीत ते बघतो त्यामुळे असेल... असो..)
अजुन एक भाग त्यात आहे ज्यामुळे ब्राह्मण समाजाबद्धल इतर महाराष्ट्रिय लोकांची काय मतं होती ते समजतं.
प्रसंगः चापे करांना शिपायाची मारहाण. त्यात शिपायाच्या तोन्डी एक संवाद आहे "पेशवाइ बुडवली तेव्हडं पुरे नाही का झालं" ... ह्या अर्थी.
हा प्रसंग सुद्धा समाजमनाचा वेगळाच चेहरा दाखवतो. ह्या शिपायाला (प्रातिनिधिक) एकुणच ब्राह्मणांविषयी कमालीचा संताप आहे... "इन्ग्रजांविषयी नाही". इथे पुन्हा इन्ग्रजांच्या "फोडा आणि राज्य करा" पॉलिसी चा प्रत्यय येतो.
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/