बायोडाटा..!!

0
0

बायोडाटा..!!

जीवाचा
आटापिटा
हाच त्यांचा
बायोडाटा...

चोचीत मिळण्या
तृणवत काडी
फ़िरवित पंख
रान पछाडी...

तृणकाड्यांची
गुंफ़ण करूनी
खोपा विणला
लक्ष धरूनी..

कोण ती विद्या?
गुरू कोणता?
घरटे बांधणे
शिकवित होता..

कसे उडावे
किती उडावे
कसे उमजले
कोणा ठावे..

करूनी फ़डफ़ड
प्रयास करणे
हव्यास धरणे
निरंतर धरणे..

गवसून घेतो
स्वंयेच वाटा
तोच त्यांचा
बायोडाटा...!!

गंगाधर मुटे

करूनी फ़डफ़ड प्रयास

1

करूनी फ़डफ़ड
प्रयास करणे
हव्यास धरणे
निरंतर धरणे..>>

आईशप्पथ....सही...

सही ....

2

जबरदस्त कविता ..
खूप छान

चांगली

3

चांगली कल्पना. चांगली कविता.

मस्तच. आवडली .. झक्कास !

4

मस्तच.

आवडली .. झक्कास !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद.

5

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

धन्यवाद.

6

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

करूनी फ़डफ़ड प्रयास

7

करूनी फ़डफ़ड
प्रयास करणे
हव्यास धरणे
निरंतर धरणे.

छान कविता


-निखिल

चांगली कविता.

8

चांगली कविता.

धन्यवाद.

9

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

आभाराबद्दल धन्यवाद

10

आभाराबद्दल धन्यवाद

धन्यवाद

11

आभाराचे आभार मानल्याबद्दल आभारी आहे. हास्य
धन्यवाद


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

हा हा हा.... गंगाधरपंत, वेलकम

12

हा हा हा....

गंगाधरपंत,
वेलकम टू क्लब टवाळ Big smile

पर्याय.

13

जन्म देतांना विधात्याने माझेसमोर दोन पर्याय ठेवलेत.
टाळकी की टवाळकी...??
मला टाळक्याची गरज नव्हती... मी टवाळकी निवडला.
चुक नाही ना केली? हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

आहो गंगाधरपंत

14

हे कसलं बोलण. चुक कसली आगदी योग्य निर्णय घेतलात तुम्ही आणि हे लवकरच लक्षात येइल तुमच्या.
मी पण आधी रस्ता चुकलेलाच होतो पण मित्रांच्या नादाने आता रस्त्यावर(योग्य) आलो आहे.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

टाळकी की टवाळकी?. मला

15
टाळकी की टवाळकी?.
मला टाळक्याची गरज नव्हती... मी टवाळकी निवडला.

हा हा हा.....क्या बात है!!! एकदम आवडलं हास्य
मिलाव हाथ! Big smile

>>चुक नाही ना केली?
ल्लो कल्लो बात! च्यायला ही जर चुक असेल तर हे जगच चुक आहे असं म्हणेन Big smile

उग्गाच सतत सुतक असल्यासारखं लांब तोंडं करुन आयुष्य संपेपर्यंत ओढत रहाण्यापेक्षा असं मनसोक्त जगणं हेच खरं! असं करता येणं हेही भाग्याचं असतं हास्य

बरी जमलिए

16

बरी जमलिए

आभारी आहे

17

सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.