शनिवारी प्रवासात एक भारतीय कुटुंब भेटल्..आई-बाबा-बेबी. फिरता फिरता रस्ता चुकले होते ...आईंनी माहिती विचरली, मला होती तितकी मी दिली. नाव-गांव विचारपूस केल्यावर तेही महाराष्ट्रातील च निघाले. त्यांना मराठी बोलण्यात अजिबातच रस नव्हता त्यामुळ प्रश्न इंग्रजी आणी माझ उत्तर मराठी अस चालू होत. मग मी बोलता बोलता बेबी ला नाव विचारल..
मी : नाव काय तुझ..?
आई : तिच नाव राही आहे ( अर्थातच इंग्रजीत )
मी : अरे वा ! एकदम देवीच नाव...
आइ : छे , हे खूप मॉडर्न नाव आहे, अमेरिकेतल्या लोकांना म्हणायला सोपं जाव म्हणून खूप विचारांती ठेवलय
मी : ( काहिही कारण नसताना, खर तर मी गप्प बसायला हव होत)
पण आम्ही ' जयदेव जयदेव जय पांडुरंगा, रखुमाइ वल्ल्भा राहीच्या वल्लभा...' अस म्हण्तो
आई आणि बाबा: आम्हांला अस धर्म नावांत दाखवायला आवडत नाही...अस म्हणून तड्काफडकी निघून गेले..
मला खर तर विशेष टिप्पणी करायची गरज नव्हती, माझा त्यांचा अपमान करायचाही हेतू नव्हता त्यामुळं थोड वाइट वाट्ल. पण तेंव्हापासून मी विचार करतेय राहीदेवींचा..या राहीं च देउळ कुठे आहे? त्यांच्याबद्द्ल काही अख्यायिका आहेत का? आरतीत त्यांचा उल्लेख आहे पण संतांच्या अभंगातून वगैरेही उल्लेख आहेत का? आणि त्या अशा-कशा लुप्त झाल्या? जाणकारांनी माहिती द्यावी प्लीज..
चांगला विचार दिला
चांगला विचार दिला डोक्याला.
त्या आई वडिलांचे खुळ राहू दे बाजूला पण नक्कीच राहि देवी विषयी माहिती शोधावयास हवी.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
त्यांना मराठी बोलण्यात
त्यांना मराठी बोलण्यात अजिबातच रस नव्हता त्यामुळ प्रश्न इंग्रजी आणी माझ उत्तर मराठी अस चालू होत
अवांतरः असं असणं म्हणजेच " मोठं " झाल्याचं लक्षण आहे का???
नाही हो, मी कसली स्वत:ला मोठी
नाही हो, मी कसली स्वत:ला मोठी समजतेय ...मी आपुलकीन बोलत होते त्यांच्याशी..
पुष्करिणी
यु नो...
आम्ही कि नाही, मुलांशी मराठीतच स्पीक करतो पण इतरांशी सगळेच इंग्लीशमधेच टॉक करतात ना. आपला ओरिजिन काय आहे ते पीपलना रिअलाईझ व्हायलाच हवे पण आफ्टर ऑल इंग्लीश इज ग्लोबल लँग्वेज यु सी. बेटा से हाय टु ग्रॅन्डपा इन मराठी.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आम्ही कि नाही,
आम्ही कि नाही, .......................ऑल इंग्लीश इज ग्लोबल लँग्वेज यु सी. बेटा से हाय टु ग्रॅन्डपा इन मराठी. >>>
आईशप्पथ प्रसनदा...तुम्ही गोट्याशी असे बोलत असल्याचे चित्र समोर उभे राहिले....
@#$%^
पण ते कल्पनेतलंच चित्र बरं का? गोट्याबरोबर सगळे घरचे लोक मराठीतच बोलतात. शाळेत सांगीतलं होतं तुम्ही मुलाशी इंग्रजीतच बोला म्हणजे इंग्रजी लवकर शिकेल. मी म्हणलं काही घाई नाही, शिकेल हळु हळु, पाया पक्का हवा मग बांधकाम पक्क होतं. मी नाही वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजी शिकायला लागलो?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
>>>शाळेत सांगीतलं होतं तुम्ही
>>>शाळेत सांगीतलं होतं तुम्ही मुलाशी इंग्रजीतच बोला म्हणजे इंग्रजी लवकर शिकेल.
अगदी मी पण ह्या कारणामुळेच एका आज्जीला आपल्या नातीला चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट इंग्रजीमध्ये सांगताना ऐकला आहे.
तुफान मजा आली होती.
हाईट्ट आहे! समटाईम ही स्टोरी
हाईट्ट आहे!
समटाईम ही स्टोरी त्यांच्याकडुन रेकॉर्ड करुन अपलोड कर ना
मी पण ह्या कारणामुळेच एका
मी पण ह्या कारणामुळेच एका आज्जीला आपल्या नातीला चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट इंग्रजीमध्ये सांगताना ऐकला आहे
वॉक मिस्टर पम्पकीन टुणूक टुणूक
.

.
.
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
देवाधर्मात काही गती नाही. पण
देवाधर्मात काही गती नाही. पण नावाची गंमत वाटली. अनेक चिनी लोकं पाश्चात्य देशात जाऊन आपली नावं बदलतात तसं वाटलं. म्हणजे कागदावरचं नाव मूळ जे असेल तेच, पण वापरातलं नाव जोन्स, माईल, जेनी वगैरे काहीतरी!
या जोडप्यालाही धर्म वगैरे नाही तर मुलीचं नाव जेनीफर नाहीतर डेब्रा ठेवता आलं असतंच ना ... व्हायचं तर पूर्णच पाश्चात्य व्हायचं!
रखुमाई आणि राही या
रखुमाई आणि राही या विठ्ठलाच्या बायका मानल्या जातात.
अधिक माहिती - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4730925.cms
वरती उल्लेखलेली आरती खालीलप्रमाणे..
युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ जय देव जय देव ॥धृ॥
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटीं ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढें उभे राहती ॥२॥
धन्य वेणुनाद अनुक्षेञपाळा ।
सुवर्णांची कमळें वनमाळा गळां ॥
राही रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमांजी स्नानें जे करिती ।
दर्शनहेळामाञें तयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओंवाळिती ॥५॥
अनेक संतांच्या अभंगात उल्लेख आहेत. संदर्भ हाताशी नाहीत. कालानुरुप देवतांमधे बदल होतो. राहिचे तसेच झाले असावे. आणि विठ्ठल रखुमाई हेच रुप प्रचलित राहिले (कदाचित हिंदूनी स्विकारलेले एकपत्नीव्रत देवावर पण लादले गेले असावे
)
>>हिंदूनी स्विकारलेले
>>हिंदूनी स्विकारलेले एकपत्नीव्रत देवावर पण लादले गेले असावे
तसे नसावे. विट्ठलाच्या दोन बायकांचे उल्लेख सर्वत्र आहेत. राही हे (खात्री नाही) हे तुळशीचे दुसरे नाव असावे. विट्ठल चोरून राहीला भेटतो म्हणून नाराज झालेल्या रुक्मिणीचे दु:ख शब्दबद्ध करणार्या काही ओव्या आहेत. एवढेच नव्हे तर जनीवर असलेल्या विट्ठलाच्या प्रेममय मायेबद्दल रूक्मिणीचा रोष व्यक्त करणार्या ओव्याही आहेत. एकुण काय निदान लोकमानसात तरी विट्ठल हा रामाप्रमाणे एकपत्नीव्रती वगैरे नसावा.
(संदर्भः अरुणा ढेरे यांचे लिखाणः आठवले तसे लिहिले आहे. तपशीलात चूक होऊ शकते. नेमका संदर्भ घरून देईन.)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
नक्की सांगता येत नाही.
राही हेच तुळशीचे दुसरे नाव समजले तर दिवाळीनंतर जे आपण जे तुळशीचे लग्न लावतो त्यात विठ्ठलाला श्रीकृष्णाचे रुप समजुन त्याचा विवाह तुळशीशी लावतो असा तर्क निघतो कारण ह्या तुळशीविवाहात आपण बाळकॄष्णाची मुर्ती वापरतो.
असो.
दुसरी कथा अशी की "इंद्राची राणी शची ही वैकुंठास गेली असता तिला श्रीहरीच्या अर्धांगी बसावे, अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे तिने तप केले. कृष्णाने तिला आलिंगन दिले व आपल्या अंकी बसवले,ती राधा. तेव्हापासून राधा-कृष्णाचे पूजन एकत्र होते. एकदा रुक्मिणी कृष्णदर्शन घ्यावयास येताना तिला कृष्णाच्या मांडीवर राधा बसलेली दिसली. हे पाहिल्यावर तिला क्रोध आला. परंतु, श्रीकृष्णाचे कार्य संपत आले आहे, हा भविष्यार्थ जाणून रुक्मिणी दिंडीरवनात पंढरपुर येथे तप करण्यास गेली".
पंढरपुरात आजही रुक्मिणीचे वेगळे ( मुळ मंदिरातले सोडुन ) असे मंदिर आहे दिंडीरवनात ( आता ह्या भागाला स्थानिक परिभाषेत वेगळे नाव आहे ) व इथल्या देवीला ( पक्षी : रुक्मिणीला ) सखुबाई ( बहुतेक, नक्की आठ्वत नाही, क्षमस्व ) म्हणतात.
अर्थात सर्वच ठिकाणी विठ्ठल हे कॄष्णाचेच एक रुप मानले गेल्याचे आढळते.
असो.
चुभुद्याघ्या.
उत्तम माहीती !
उत्तम माहीती !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
>>"इंद्राची राणी शची ही
>>"इंद्राची राणी शची ही वैकुंठास गेली असता तिला श्रीहरीच्या अर्धांगी बसावे, >> अशी इच्छा झाली...
हम्म. वाण नाही पण गुण लागला म्हणायचा.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बरोबर लॉजिक आहे ...
बरोबर लॉजिक आहे ...
पुष्करिणी
तुळ्शीच लग्न श्रीकॄष्णाशी होत
तुळ्शीच लग्न श्रीकॄष्णाशी होत हे सोडून मला हे काहिच माहित नव्हत...
या राधेची मराठीत राही झाली का?
पुष्करिणी
राही
हे कदाचित 'राधी' चे रूपही असेल.
(आता स्वतःच गंडलेला) विराम.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
धन्यवाद, मला उगीचच वाटत होत
धन्यवाद, मला उगीचच वाटत होत की राही हा रखुमाई चा डुप्लिकेट आय. डी आहे म्हणून..
मला आरत्या फक्त दुसर्यांनी म्हणायला सुरूवात केली की येतात ( ध्रुवपद सोडून)...एरवी सगळी कडवी आणि तीही क्रमान नाही येत म्हणता, त्यामुळ बर झाल दिलित .
रुक्मिणी , सत्यभामा या कृष्णाच्या ८ राण्यांपैकी २ ...राही ही पण त्या ८ पैकी एक का?
पुष्करिणी
>>धन्यवाद, मला उगीचच वाटत होत
>>धन्यवाद, मला उगीचच वाटत होत की राही हा रखुमाई चा डुप्लिकेट आय. डी आहे म्हणून..<<
तेव्हा पण नक्की आंतरजाल आणि तद्भव मारामार्या होत्या का काय?
आंतरजालाच माहित नाही पण
आंतरजालाच माहित नाही पण मायाजाल तर होतच की...राण्या काय दस्तुरखुद्द श्रीक्रुष्णाचे पण असे आय. डी असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
( बाय द वे क्रुष्ण मधला क्रु कसा लिहायचा ? )
पुष्करिणी
कृष्ण = kRUShNa
कृष्ण = kRUShNa
अर्थातच
>>दस्तुरखुद्द श्रीक्रुष्णाचे पण असे आय. डी असण्याची शक्यता नाकारता येत नाही..
त्याशिवाय का एकाच वेळी अनेक गोपींशी रासलीला खेळू शकला. अहो दर बुधवारची 'आवडती स्त्री' वेगळी असते ना मॅडम, तसेच हे.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हे 'आवडती स्त्री' हे काय
हे 'आवडती स्त्री'
हे काय प्रकरण आहे? मला नाही माहित ...
पुष्करिणी
हॅ हॅ हॅ
जालावर नव्या आहात असे वाटते. जुन्या-जाणत्यांना विचारा. जरा 'त्या तिथे पलिकडे' डोकवत चला अधूनमधून.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
भलत्या ठीकाणी जातील रे
भलत्या ठीकाणी जातील रे त्या.... नीट लिंक दे व्यनीतुन त्यांना
शांतम् पापम्
हॅ हॅ हॅ
आधीच दिली आहे. असो. सल्ल्याबद्दल धन्यवाद.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
थोर आहात
_/\_
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
राई
>>अमेरिकेतल्या लोकांना म्हणायला सोपं जाव म्हणून खूप विचारांती ठेवलय
शेवटचे व्यंजन हलके उच्चारण्याच्या सवयीमुळे ते लोक तिची 'राई' करणार.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अॅक्चुली आरती म्हणताना बरेच
अॅक्चुली आरती म्हणताना बरेच लोक ~राइच्या वल्लभा~ असच म्हण्तात
पुष्करिणी
पुष्करिणी....थोडक्यात मोठा
पुष्करिणी....थोडक्यात मोठा संदेश देनारा लेख आवडला....
या राहीं च देउळ कुठे आहे? त्यांच्याबद्द्ल काही अख्यायिका आहेत >>>
थोड्या दिवसात फोटोसकट लेख टाकतो ह्या विषयावर...
संदेश नाही हो , शंका होती
संदेश नाही हो , शंका होती ...लवकर टाका लेख , प्रतिक्षेत ....
पुष्करिणी
राही ही विठ्ठलाची दुसरी
राही ही विठ्ठलाची दुसरी बायको. धनगर समाजातली ही राही. विठोबाला आवडली आणि त्याने तिच्याशी लग्न लावले. रुक्मिणीला अर्थातच ह्याबाबत अंधारात ठेवले. सत्य समजल्यावर रुक्मिणी रागावली... असे काहीसे वाचले आहे.
अरुणा ढेरे व दुर्गाबाई भागवत ह्यांनी यासंबंधात लिहिले आहे. उद्या वाचून नक्की सांगते. आत्ता नक्की लक्षात नाही.
करेक्ट
>>धनगर समाजातली ही राही.
इथे विट्ठलाच्या कानडाऊ असण्याशी/ मूळ अनार्य दैवत असण्याशी काही. संबंध आहे असे वाटते.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
तो विषय वेगळा
आर्य आणि अनार्य हा विषय वेगळा आहे, त्यावर नंतर कधीतरी सविस्तर लिहेन असे सांगतो.
तुर्तास विठ्ठल किंबा गेलाबाजार खुद्द श्रीकृष्णही आर्य असण्याची शक्यता नाही असे वाटते. मुळात आर्य / अनार्य वगैरे संकल्पना वेगळ्या समजुतीवर आधारलेल्या आहेत.
अजुन एक म्हणजे कॄष्णाची एक पत्नी - जांबुवंती ही आजच्या व्याख्येत चक्क 'अनार्य' मानायला हवी.
असो, मोठ्ठा विषय आहे.
नंतर कधीतरी खरडेन
जांबुवंती ही अनार्यच होती असे
जांबुवंती ही अनार्यच होती असे वाटते.
होय ...
आजच्या 'आर्य / अनार्य'च्या व्याख्या पाहिल्या तर तसे म्हणु शकतो. म्हणजे आपल्या सापेक्ष ते काय होते हे आपल्याला ठरवता येईल.
मात्र त्या काळात असे काही प्रवर्ग होते का ह्याबद्दल शंका आहे असे मी म्हणतो, बहुतेक नसावेत असे वाटते.
मला ही श्रीकृष्ण/विठ्ठल आर्य
मला ही श्रीकृष्ण/विठ्ठल आर्य आहेत अस वाटत नाही...
सविस्तर माहिती वाचायला आवडेल, नक्की लिहा.
पुष्करिणी
'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी'
'ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी' आत्ता समोर आहे. त्यात विठोबाच्या पदुबाई या बायकोची कहाणी दिली आहे. ती माळीराजाची मुलगी आहे असा उल्लेख आहे (पर्यायाने माळीसमाजातील असावी). तिचे मंदिर पंढरपुरात विठोबाच्या जवळच आहे असाही उल्लेख आहे. राहीबाईचा उल्लेख या पुस्तकात तरी कुठेच आढळला नाही.
जनकोजी पाटलाची मुलगी
माळीराजा हा विठोबाचा भक्त, ज्याचा आदरसत्कार न केल्याने पदुबाईला शाप मिळाला तो.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
'पैस' ह्या दुर्गाबाईंच्या
'पैस' ह्या दुर्गाबाईंच्या पुस्तकात ही सगळी कथा विस्ताराने आलेली आहे.
काहीतरी लोकल संदर्भ असावा अस
काहीतरी लोकल संदर्भ असावा अस मला ही आता वाट्तेय्..नक्की लिहा उद्या ..
पुष्करिणी
सही! मस्तच चर्चा! नव्यानंच
सही!
मस्तच चर्चा! नव्यानंच माहिती कळतीये
बाकी, त्या थोर मातापित्यांबद्दल काय बोलु? उदाहरणार्थ वगैरे ते थोरच आहेत. बरं झालं त्यांनी मराठीपण टाकलं...मराठीलाही त्यांची लाजच येते.
मराठीलाही त्यांची लाजच येते.
लाज येते की वाटते?
_______________________________________________
सातारकरांची अनुदिनी
कधी होणार ही चर्चा
कधी होणार ही चर्चा? विठ्ठला, तूच सांग आता...
>>>बाकी, त्या थोर
>>>बाकी, त्या थोर मातापित्यांबद्दल काय बोलु? उदाहरणार्थ वगैरे ते थोरच आहेत. बरं झालं त्यांनी मराठीपण टाकलं...मराठीलाही त्यांची लाजच येते.
मला अस वाटत की एका छोटयाश्या उदाहरणावरुन आपण कोण किती थोर आहे हे ठरवू नये. आता मला वा अथवा तुला जर कोणी अनोळखी व्यक्ती अनोळ्ख्या देशात उगाच धमाल मुलगा हे नाव कसा धार्मिक आहे किंवा नीलम हे नाव कसा शुध्द्लेखनाने निलम असा लिहिला पाहिजे. तर काही लोकांना तो चोबंडेपणा वाटू शकतो.
मला असे लोक भेटले आहेत, जान ना पेह्चान आणि एक तास एका माणसाणे मला माझ नाव आणि त्याच स्पेलिंग मराठी, इग्रंजी कसा मी चूक लिहिते आणि माझ्या मूळ नावाचा इतका प्रगल्भ अर्थ असताना मी नीलम हे नाव वापरणारी किती क्षुद्र व्यक्ती आहे हे एकवले आहे. शेवटी मी पळ काढण्यासाठी इंग्रजी मध्ये उत्तर दिले आणि ते आजोबा गप्प.
असो, वरती लेखिकेने स्पष्ट केले आहे की हा तिचा लेखाचा मुद्दा हा नाही त्यामुळे अवांतराबद्दल क्षमस्व.
+१
असहमतीचा प्रश्नच येत नाही. सगळे मुद्दे बिनशर्त मान्य!
माझं म्हणणं होतं ते
ह्यामुळे. उग्गाचंच कोणी आव आणला की किंवा, मराठीला असं कस्पटासमान लेखलं की कवटी भिरभिर होते म्हणून..
-(आज सक्काळीच तिर्थरुपांशी 'सीएनबीसीच्या पुणे ऑफिसवाल्यांशी हिंदीत का बोलता' असा वाद रंगवुनच आज हापिसात आलेला) ध.
>>>नाव-गांव विचारपूस केल्यावर
>>>नाव-गांव विचारपूस केल्यावर तेही महाराष्ट्रातील च निघाले. त्यांना मराठी बोलण्यात अजिबातच रस नव्हता त्यामुळ प्रश्न इंग्रजी आणी माझ उत्तर मराठी अस चालू होत...
हम्म.. असे बरेच असतात. अरे मला तर एक संगमनेर मूळ गाव असणार्या मुलीने/बाईने मी माझ्या मुलीशी कुठल्या भाषेत(मराठी) बोलतेय असा विचारला होता. आणि परत मी माझ्या मुलीला हिंदी येत नाही हे सांगितल्यावर माझ्याबद्दल दुसर्याबाईशी माझ्यासमोरच हिंदी मध्ये चर्चा सुरु केली, मग मला सांगाव लागला की अग मला समजतय हिंदी, मुलीला नाही.
_/\_ पुढच्यावेळी भेटली तर
_/\_
पुढच्यावेळी भेटली तर माझ्यातर्फे खणानारळानं ओटी भरुन घ्या तिची!
आणि संगमनेरात कुठे तेव्हढं विचारुन घ्या... आमच्या श्रीधरकाकांच्यामार्फत जंगी मिरवणुकच काढू चंदनापुरी घाटापासुन ते घरापर्यंत!
>>>पुढच्यावेळी भेटली तर
>>>पुढच्यावेळी भेटली तर माझ्यातर्फे खणानारळानं ओटी भरुन घ्या तिची!
माझ्याकडे भेटायला येशील तेव्हा खणानारळाचा पोत घेउन यावा लागेल तुला.
आईशप्पथ ईतके नमुने भेटले आहेत गेल्या ५ वर्षात की मला स्वपरिक्षण करावा की काय वाटायला लागला आहे.
चांगलंय! आपणच चांगभलं
चांगलंय!
आपणच चांगभलं म्हणायचं आणि पुढे जायचं. दुसरं काय?
"राही"
विषयी हाही एक धागा दुवा
मस्तच! धन्यवाद वाचक. खुप
मस्तच!
धन्यवाद वाचक. खुप चांगली माहिती मिळाली. विशेषतः क्षेत्रपाळ वगैरे...
असेच म्हणतो. छान दुवा.
असेच म्हणतो.
छान दुवा.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
खुप चांगली माहिती मिळाली
अत्यंत माहितीपूर्ण दुवा..मजा
अत्यंत माहितीपूर्ण दुवा..मजा आली, बरच काही माहिती नव्हत,
पुष्करिणी
आर्य अनार्य नक्की काय आहे ?
आर्य अनार्य नक्की काय आहे ?
मी ही शोधतो आहे... ! (
मी ही शोधतो आहे... !
( आर्याच्या मम्मीच्या शोधात) राजे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
( आर्याच्या मम्मीच्या शोधात)
( आर्याच्या मम्मीच्या शोधात) राजे
जा !! कायम शोधातच राहशील असा तुला वर देत आहे.
राजे ला 'वर' नाही 'वधू' हवी
राजे ला 'वर' नाही 'वधू' हवी आहे!
-अनामिक
हॅ हॅ हॅ
जे आर्य नाहीत ते अनार्य आणि जे अनार्य नाहित ते आर्य. येवडं शिंपल तर हाय.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
मग द्रविड कोण ? आता
मग द्रविड कोण ? आता क्रिकेटपटु असे सांगु नका
परीक्षा
घेताय का नाना.
>>मग द्रविड कोण ? आता क्रिकेटपटु असे सांगु नका>>
नाय वो. आमी तुमची अशी थट्टा कशी करू गुर्जी.
जे द्राविडी प्राणायम करतात ते द्रविड. पास झालो का आम्ही?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
अस होय
आमाला वाटलं द्रविड मुनेत्र कळघम / अण्णा ... द्रविड मुनेत्र कळघम वाले द्रविड ...
तुम्हीच सांगा..तुम्ही मराठीचे
तुम्हीच सांगा..तुम्ही मराठीचे प्राध्यापक
आहात अस आत्ताच कळल
* शब्द्शः अर्थ : पाण्याच्या काठाला द्रविड म्हण्तात बहुतेक
पुष्करिणी
आर्य अनार्य नक्की काय आहे
आर्य अनार्य नक्की काय आहे ?
एक वांझोटा युक्तीवाद.
-पुण्याचे पेशवे
कसा ?
कसा ?
मन्थुनि अनन्ता तैसे घे
मन्थुनि अनन्ता तैसे घे अनन्ता
वाया व्यर्थ कथा सान्डी मार्गु
एक प्रश्नः (अनुस्वार कसा देतात?)
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
प्यारेभाई
शिफ्ट + एम दाबलत की आधीच्या अक्षरावर अनुस्वार येतो
एम+शिफ्ट+एम = मं
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मंडळ आभारी आहे.....!
मंडळ आभारी आहे.....!
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)