http://www.mimarathi.net/node/754 ..........भाग एक...
" खुप उपकार झाले आपले,आपण नसता तर माझाच नव्हे तर माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव ही धोक्यात आला असता"मी तिची सुसंस्कृत भाषा पाहून दंग झालो.
" बाई तुम्ही कोण आहात ? कुठुन आलात ? "
तिने हकीकत सांगायला सुरुवात केली.ती मुळची जालन्याची. वडील औरंगाबादला सरकारी नोकर असल्याने वडलांबरोबर राहुन तिचं कॉलेज शिक्षण घेत होती.तिच्या होणार्या बाळाच्या बापाशी तिथेच भेट घडली, पण तो तिच्या कॉलेजात नव्हता. तो पुण्यातला.औरंगाबादला ताज रेसिडन्सी ला हॉटेल मॅनेजमेंट च्या ट्रेनींग साठी सहा महिन्यांसाठी आलेला.प्रेम जमले, पण तो पुण्यात परतल्यावर गाठीभेटी मात्र कमी झाल्या.मग त्याकरिता,तो गाडीवर नगर पर्यंत यायचा आणि ती बसने नगरला यायची.संध्याकाळी दोघेही परतायचे. प्रेमाची परिणीती शरीर संबध ठेवण्यापर्यंत गेली. एक दिवस तिला दिवस गेले. तसे तिने त्याला फोनवर कळविले. त्यांनंतर त्याने परत हिचा फोन उचललाच नाही. नंबरही बंद केला.
शेवटी त्याचा पत्ता ताजमधून तिने मिळविला आणि तो पत्ता शोधत-शोधत पुण्यात आली. त्याच्या बंगल्यावर तिला आत शिरु दिले नाही. तो यु.एस.ला गेला आहे असे तिला सांगण्यात आले. आई वडील दिल्लीला गेले असल्याचे सांगीतले गेले. ती तिथेच तशीच न खाता-पिता,भेटण्याच्या आशेवर पडून राहिली दोन दिवस. दोन दिवसांनी बाहेरच्या गार्ड्स नी तिला बसमध्ये बसविले. तिला पुढे नेमके कुठच्या बसमध्ये बसायचे हे न सुचल्याने ती लोहगाव च्या बसमध्ये बसली आणि पुढे हा सगळा प्रकार घडला.
मी स्तंभित होतो.आजकाल नववी-दहावीचे मुलं/मुली देखील प्रोटेक्शन घेउन फिरतात. मग इतके असून ही..
" मला त्यांनी लग्नाचं वचन दिले होते, मला त्यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, पण मला एकदा त्यांची भेट घ्यायची आहे. त्यांना सांगायच की मी अॅबॉर्शन करणार नाही, माझ्या बाळाची जबाबदारी मीच घेणार आहे. कदाचित कधीतरी त्यांना माझ्या खर्या प्रेमाची साक्ष पटेल आणि ते मला स्वीकारतील. "
ह्या वर मी काय बोलु शकत होतो. काय म्हणावे ? इतकं होउन पण ही त्या हरामखोराला धिक्कारत नाही.माझा त्याच्या विषयीचा राग वाढत होता आणि त्यावेळेला तिच्यावर मला दया येत होती. सुंदर स्त्रीचा सहवास सुखावह असतो, हे जरी खरे असले, तरी तिचे निःस्वार्थी प्रेम हे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सुखावह असते,ह्याची जाणीव पुरुषाला कधी होणार काय माहिती ?
हे सगळं एकण्याचा नादात मी तिने त्याचे सांगीतलेले नाव विसरलो.तिने परत मला नाव सांगीतले.पत्ता सांगीतला.नाव जरा परिचयाचे वाटत होते.पण खात्री नव्हती.मी तिथुन बाहेर पडलो.जाताना तिने मला विचारले " तुम्ही त्यांना मारहाण तर करणार नाही ना ? "
मला काय बोलावे तेच सुचेना.पोरांपाशी आलो. नाव आणि पत्ता कन्फर्म केला. तो तोच होता. दोनवेळा आमदारकी गाजविलेल्या, कधी एकेकाळचा सुप्रसिद्ध गुंड ,आणि आता तिसऱ्यांदा आमदारकीच तिकीट मिळवणार्या आमदाराचा पुतण्या, मी पोरांना त्याला शोधून काढण्यासाठी पिटाळला. फोनाफोनी सुरू झाली. कामावर सुट्टी घेतली. माझ्या पक्षातल्या पुण्यातील सर्वोच्च पदस्थाला कळविले, पण त्याचा ओढा राजकीय फायदा उचलण्याकडेच जास्त होता. मी सर्वात वर फॅक्स पाठविला. दोन तासानी " गो-अहेड" चा मेसेज आला.
झालं, मी तयारीला लागलो. प्रकरण मोठं होतं. पहिले तक्रार(FIR), मग मानवाधिकार आयोग, मिडीया. पहिला फोन फौजदाराला लावला. त्यांनी सरळ चौकीला बोलवून घेतलं.
"प्रकरण आपल्या अंगाशी येईल बर का ? तु जरा दमानं घे,मी आधी एकदा त्याच्यावर हात टाकला होता.मला थेट दिल्लीवरून फोनवर धमकावण्यात आलं होत, मला माफी मागावी लागली होती, मी तुला त्यांना भेटवतो, आधी एकदा भेटून ये.काय म्हणतात ते बघ. जर जास्तच झालं तर मग बघुया. मग आपण मानवाधिकार आयोगाकडे जाऊ."
बांडगुळ साला...नाव एकल्यावर साधी तक्रार घ्यायला तयार नव्हता.
"ठीक आहे.भेटीचा कार्यक्रम ठरवा"
ठरल्याप्रमाणे दसर्या दिवशी त्या आमदाराच्या कार्यालयात गेलो.दोनचार पोर सोबतीला होते. रितसरपणे कार्ड दिले. आम्हाला त्याने एक तासभर वाट बघायला लावून. शेवटी एकदाच आत बोलाविले. आम्ही सगळे शिरायला लागलो तर शिरू दिले नाही. मला एकट्यालाच आत घेतलं, पण आत तो नव्हता, होता तो त्याचा पि.ए.
" *** *** " कुठाय ?"
"ते नाहीत, दिल्लीला गेलेत, मी आहे ना तुमची सेवा करायला ?" . त्याचा बेरकीपणा माझ्या नजरेतून सुटला नाही.मी मग जरा स्पष्टच बोललो.
" ती पोरगी पोटुशी आहे, ***** *** कुठाय ? "
पि.ए.च्या चेहर्यावरचे भाव बदलले.
" तुमची चौकशी केलीय साहेब मी, खूप चांगलं काम करताय तुम्ही लोहगावमध्ये, आमदार साहेबानी स्वतः सांगितलाय. ते म्हणाले इतका चांगला कार्यकर्ता सडतोय नको त्या पक्षात, तरीही आपण त्याची मदत करू. ते धानोरीतले एक बियर शॉपीच लायसन पेंडीग आहे. ते तुम्ही घ्या, शिवाय छोट्या-छोट्या रस्त्यांच बांधकाम आहे,ड् रेनेजची लाईन आहे."
" ***** *** कुठाय ? "
"तुम्ही का त्या फंडात पडताय साहेब,आम्हालाही सगळं काही मॅनेज करता येतं. पोलीस म्हणा, मानवाधिकार आयोग म्हणा वा मिडीया म्हणा, बाकी राडेबाजीच म्हणाल तर तुम्ही दोन ट्रक आणले तर आम्ही चार आणू "
मी खुर्चीतून उठलो.
" माझी ऑफर काय वाईट नाही साहेब,तरी एकदा विचार करा ",मला सहसा बोलायला आवडत नाही,पण राग आवरला नाही.
" हे बघा पि.ए.साहेब, ती बाई, तुम्ही हे सगळे गेले ****, माझी पहिली भांडणं का आणि कशी झाली ते सांगतो तुम्हाला. ज्याला मी फोडला होता तो, माझ्या इथे, नागपूर चाळीत वीज-बिले गोळा करायला यायचा. मशीनमध्ये बिलाचा आकडा फुगवायचा आणि कमी करतो असे म्हणून दर बिला मागे ३००-४०० रु. उकळायचा. तेव्हा माझ्या पुर्ण घराची महिन्यातली मिळकत होती ८,००० रु. तो दर दिवसाला.२०-३० घराची बिले गोळा करायचा, त्याची दिवसाची कमाई ही तेव्हढीच होती. माझ्या डोक्यात बसला होता तो. मला २० एक दिवस त्याचाच चेहरा दिसायचा. एक दिवस मी त्याला फोडला. पब्लीक नी मला साथ दिली. पण त्या दिवसापासून माझ्या इथल्या बारा पोल्स ची, साधारण शंभर एक घराची, वीज अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ बंद होत नाही, लोडशेडींग असलं तरी, आणि वीज बिले पण नीट येतात. हेच तुम्हाला सांगायच,जर ***** *** मला भेटला तर मी फोडून काढेन, जेणेकरून ह्या पुढे असले धंदे करण्याच्या आधी लोकं विचार करतील."
" साहेब,त्या पोराचं करियर,साहेबांची प्रतिमा व तुमच्या भविष्याचा जरा विचार करा,डॉक्टर पोरीशी लग्न होणार आपले उद्या "
" आणि ह्या पोरीचं काय ? तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं काय ? "
" ते आम्ही संभाळून घेऊ "
मी झटदिशी दरवाजा बंद केला. माझ्या चेहऱ्यावरचा संताप पाहून पोरं समजून गेली की आत काय झाले असेल. गाड्यांना किक मारली.जर्मन ईंजिनीयरिंगच्या चौकात आल्यावर माझ्या गाडीला कारने धडक दिली. जाडे-भरडे जॅकेट आणि हेल्मेट घातल्यामुळे केवळ बोटांना दुखापत झाली. गुडघा सुजला. बोटातून रक्ताची धार लागली होती. रस्त्याच्या कडेला असलेली माती बोटाला लावली.रक्त थांबले.त्याचवेळी माझा फोन वाजला.
" हॅलो "
" आज फक्त बोटांवरच निभावलंय,साहेब, आमच्या ऑफर चा जरा विचार करा "
क्रमश....
आयला.....
तेव्हाच हे सगळं का नाही रे बोलला? केली असती ना गेम!
पुढं काय झालं ते येऊ दे पटापट.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
पुढं?
पुढं?
च्यायला, हे काय रे
च्यायला, हे काय रे भलतेच?
बाबा रे, तू ठीक आहेस ना? आधी स्वत:ची काळजी घे नाहितर लोकांनाही मदत नाही करता यायची! पुढे काय झालं याच्या उत्सुकतेपेक्षा आता तुझीच काळजी वाटते आहे.
अगदी हेच म्हणतो.... काळजी घे
अगदी हेच म्हणतो.... काळजी घे रे बाबा!
-अनामिक
पुढचा भाग???
पुढचा भाग???
-निखिल
आयचा घो...सुहास्या भाड्या ठीक
आयचा घो...सुहास्या भाड्या ठीक आहेस ना तू???
वाचतोय..पु ले प्र.
ओ तेरी... हेच सांगतो म्हणत
ओ तेरी... हेच सांगतो म्हणत होतास का त्या दिवशी
माय गॉड.. काय हे !
लवकर लिही पुढे काय झाले रे ???
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
बापरे
बापरे!!! पुढे?
वाचतोय... तो प्रसंग आठवला.
वाचतोय... तो प्रसंग आठवला.
-पुण्याचे पेशवे
आयच्या गावात पाय ! वाचतो आहे
आयच्या गावात पाय !
वाचतो आहे रे, इथे काही जास्त लिहीत नाही, पुण्याला भेटशील तेव्हा बोलु !
बापरे... याची तर कल्पनाच केली
बापरे...
याची तर कल्पनाच केली नव्हती रे...
पुढे काय झाले मग???
अरे बापरे..
आज फक्त बोटांवरच निभावलय,साहेब, आमच्या ऑफरचा जरा विचार करा
सिनेमात दाखवतात तसेच चालले आहे की, काळजी घे रे बाबा..
स्वाती
मलाही हेच म्हणायचं आहे...
काळजी घ्या ...
?!?!?!?!
?!?!?!?!
ह्म्म्म
कथेने वेगळाच टर्न घेतला. लेखक जवळचा असल्याने प्रतिक्रिया जास्त काळजीची.
ह्म्म पुढे?
हे वेगळ्या अॅंगलनी चाललं
हे वेगळ्या अॅंगलनी चाललं आहे! लोक इतक्या बेदरकारपणे वागु शकतात??
अगा बाबौ!!! लवकर लवकर
अगा बाबौ!!!
लवकर लवकर लिहि....
हम्म.... पुढे?
हम्म.... पुढे?
!
>>> " आज फक्त बोटांवरच निभावलय,साहेब, आमच्या ऑफरचा जरा विचार करा "
--- बाब्बौ...
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
ह्म्म्म सुरुवात झाली
ह्म्म्म सुरुवात झाली म्हणायची...
!
वेलकम टु हार्डकोअर राजकारण!!
बोटांपुरता सत्कार झाला तुमचा.
आणि हो...हे आपले आमदार खासदार! निवडणुकीच्या प्रचारावेळी ह्यांना ओवाळायला सुवासिनींनी पुढे तरी कसं जावं?
पार्ट ३ कुठे आहे बे चोच्या
पार्ट ३ कुठे आहे बे चोच्या ????
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
पुढं काय झालं सुहासराव?
पुढं काय झालं सुहासराव?
..............................................................
....चलते रहते हैं कि,.. चलना है मुसाफ़िर का नसीब|....
....सोचते रहते हैं, किस राहगुज़र के हम हैं|....
पुढ काय झाल..
सुहासराव,
पुढ काय झाल ते सांगा. लिहीते व्हा...
कस सोल्व्ह केला हा प्रश्न ? सांगुन टाका.. मार्गदर्शेन होईल.
मी सुध्दा अशा एका प्रश्नाचा साक्षीदार आहे. खुप प्रयत्न केला होता मी संबधीत व्यक्तीला अडकवण्याचा पण सगळ पाण्यात गेल. हो पण तुमच्या प्रमाणॅ हा गुन्हेगार राजकारणातला नव्हता मराठी नाट्य आणि सिनेमाशी निगडीत होता.
त्याचे नाव आणि पोस्टर्स पाहिले की खुप त्रास होतो. प्रत्येकवेळेस पराभवाची आठवण होते. पण का कुणास ठाऊक असले हरामखोर लोकच यशस्वी होताना दिसतात.
व्यवस्थापक : खुप जुना धागा वर आणल्याबद्दल माफी असावी.
कळावे,
___मनस्वी राजन
अनुभव… क्षण वेचलेले…
आयला सुहास.. कधी बोलला नाहीस
आयला सुहास.. कधी बोलला नाहीस यार. पुढे काय झालं? पुढचा भाग कुठे आहे?
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
पुढ्च्या भागाचा पत्ताच
पुढ्च्या भागाचा पत्ताच नाहीये.........
मी किती तरी वेळ शोधत होतो मागे....
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
पुढच्या वर्षी येइल
पुढच्या वर्षी येइल युपो......
वाश्या तेवढ्या बाबतीत फार पंक्चुअल आहे
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
मूळ धाग्याने ऑलरेडी दीड वर्ष
मूळ धाग्याने ऑलरेडी दीड वर्ष ओलांडले आहे की....
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
म्हणुन तर म्हटले.... प्रत्येक
म्हणुन तर म्हटले....
प्रत्येक वर्षी एक भाग
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
मग बघा वाट...
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
आम्हाला सवय झालीय आता.
आम्हाला सवय झालीय आता. मिपाच्या दिवसांपासून सहन करतोय या माणसाला
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
धन्यवाद !
वेळ काढुन लवकरात लवकर पुर्ण करण्याचा प्रयत्न करतो.
अरे .... वा... चक्क....!
अरे .... वा... चक्क....! प्रतिसादांचा उपयोग झाला म्हणायचा...... हेही नसे थोडके
Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का !
तू सांगच रे सुहास
कोण आहे तो xxxxx
पुढची सगळी स्टोरी सांग रे सुहास...
हे असले सगळे मॅनेज करु म्हणणारे लोक आपल्यात ठेवायलाच नाही पाहिजे.
जाहीरपणे अशा लोकांना ठेचून काढले तरच यांना आवर घालता येईल.
केवळ मजा म्हणून असले धंदे करायला या लोकांना लाज कशी नाही वाटत?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/