आज महिलादिन.
रोजच्या आयुष्यात असंख्य रुपाने आणि हातांनी आपल्याला उपयोगी पडणार्या महिलांच्या कष्टाची जाण आणि त्याला जमेल तशी मानवंदना म्हणुन "महिला दिन" साजरा करणार्याचे ठरले. वरकर्णी पाहता त्यात चुकीचे असे काही नाही.
ह्यातुन जे काही चांगले घडते आहे त्याचे आम्हाला नक्कीच कौतुक आहे पण हे सर्व पाहताना मनात 'महिला दिन' हा दिवस पण "इव्हेंट" बनवुन त्याचा बाजार मांडला जातोय काय अशी आजकाल शंका यायला लागली.
गेल्या ३-४ दिवसांपासुन पेपरवाल्यांनी ह्या दिवसाची प्रचंड जाहिरातबाजी सुरु केली, त्यांच्या स्वतःच्या खास पुरवण्याही आज पेपराबरोबर आल्या. नेहमीप्रमाणे त्यात काही अपवाद वगळता गेल्यावेळी झळकलेल्या सुप्रसिद्ध (?) महिला ह्यावेळीही झळकताना दिसल्या. तेच सिनेमा, मॉडेलिंगमधले नेहमीचे प्लास्टिकचे चेहरे, तेच यशस्वी उद्योजिका वगैरे, त्यात जुन्या ३-४ क्रिडापटु, अजुन अशाच विविध क्षेत्रात काम करणार्या नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना आज पुन्हा फ्रंटपेजवर पाहुन अखेर महिलादिनाचाही "इव्हेंट" झाल्याचे कळुन आले.
आता उद्या अजुन पंतप्रधान / राष्ट्रपती / इतर उच्चपदस्थ यांची महिलांबरोबर किंवा एखाद्या 'एन जी ओ' ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढलेली छायाचित्रे, लोकल मिडियातुन लोकल एखाद्या बड्या धेंडाच्या चमच्यांनी ह्या निमित्ताने केलेला त्याचा उदोउदो, ह्या निमित्ताने महिला डॉमिनिटेड पेज-३ पार्ट्या ( दचकु नका, अशा जाहिराती होत्या ) वगैरे पहायची तयारी ठेवली आहे.
पण ह्या सर्व घोळातुन सर्वसामान्य महिलेच्या आयुष्यात नक्की काय फरक पडतो आहे ?
'महिला दिन' साजरा करणे म्हणजे केवळ गोड गोड संदेश देऊन समारंभ करणे अशा खुळात आपण किती दिवस राहणार आहोत ?
ज्यांना खरच मदतीची आणि सहानभुतीची गरज आहे अशा महिलांपर्यंत आपण केवळ ह्या महिलादिनाच्या निमित्ताने तरी पोचणार आहोत की नाही ?
- अजुनही भारतातल्या कित्येक खेड्यात आणि बर्यापैकी शहरातही सासुरवास किंवा सासरी केला जाणारा छळ ही प्रमुख समस्या आहे. त्याच्या अनुषंगाने हे महिलादिनवाले काय करतात ?
- रोजच्या प्रवासात, सामाजिक आयुष्यात अनेक प्रकारचे लैंगिक, मानसिक, शारिरीक अहवेलना आणि शोषण सहन करत आपले आयुष्य जगणा-या महिलांसाठी आपण आता तरी "सेफ झोन" तयार करणार आहोत की नाही ?
- अवघ्या ५ वर्ष्याच्या चिमुरडीपासुन ते थेट ७० वर्षाच्या म्हातारीवर बलात्काराच्या घटना मिडियामधुन येत असताना ह्या महिलादिनाची उपयुक्तता आणि यशस्विता ह्यावरच प्रश्नचिन्ह नाही का उभे रहात ?
( कालच कुर्ल्याला एका ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खुन केल्याची घटना महिलादिनाच्या पुर्वसंध्येला समोर आली, ह्याबाबत महिलादिनवाले काय करणार आहेत ? सामान्य पब्लिकने कालच पोलिस स्टेशनवर हल्ला बोलुन आपला निषेध नोंदवला )
- शिक्षणाची समस्या आहेच, अजुनही स्त्री केवळ "चुल आणि मुल" ह्याएवढीच मर्यादित समजली जात असेल तर तिचा कसला आलाय महिलादिन वगैरे ?
- देशातल्या काही भागात मुलगी जन्माला येताच ते नको म्हणुन तिला मारुन टाकण्याची घ्रुणास्पद प्रथा आहे, त्याच्या प्रबोधनासाठी काही संस्था काम करत आहेत पण त्यांना मदत ह्या 'हाय प्रोफाईल महिलादिनवाल्यांनी' करायला नको का ?
- सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात स्त्रीयांना भेडसावणारी आणि बहुसंख्यवेळा दाबुन टाकली जाणारी "लैंगिक शोषणाची समस्या" अजुनही तेवढीच बिकट आहे.
मग तरीपण कंपन्या काही कमिट्या स्थापन करुन आपले हात कसे झटकु शकतात ?
समोर आलेल्या किती केसेसमध्ये खरोखर निष्पक्षपाती निर्णय होतो ?
बहुसंख्यवेळा मानसिक त्रासाला कंटाळुन स्त्रीयांनीच जॉब बदलल्याचे दिसते, बाकी क्रिमिनल तसाच मोकाट फिरत असतो.
असे १ नाही हजारो प्रश्न आहेत.
त्यांचे गांभिर्य व त्यानिमित्ताने त्यातुन स्त्रीयांचे आयुष्य सुखकर होण्याला आपण काही सिरीयस विचार करणार आहोत की नुसताच इव्हेंट साजरा करत राहणार आहोत ?
असो.
आज आम्ही महिलादिनाच्या निमित्ताने काय पाहिले ते सांगतो :
- मस्त साड्यावगैरे नेसुन दागदागिने घालुन आणि नटुन "इव्हेंट" साजरा करणार्या महिला.
- काही हॉटेलात आज महिलांना म्हणे डिस्काऊंट आहे बिलावर
( डिडन्ट मेक्स सेन्स अॅट ऑल )
- कॉर्पोरेट कंपन्यांनी काय केले तर रांगोळी, फॅशन शो, डान्स, म्युसिक अशा स्पर्धा घेऊन त्याचाही "इव्हेंट" साजरा केला. ह्याच्या निमित्ताने 'एच आर' मधल्या वरिष्ठ मुलींनी कंपनीतल्या काही कनिष्ठ आणि नवशिक्या मुलींना भरपुर राबवुन 'महिलादिन' साजरा केला.
- छान छान आणि गोड गोड भाषणे झाली, काही बाहेरुन वक्ते आले होते, ह्यानिमित्ताने 'एच आर'च्या खात्यावर ४ गुण जास्त लागले.
- रोजच्या प्रवासात शुभेच्छांची देवाणघेवाण झाली व त्यानिमित्त्ताने कुणाकुनाच्या 'लुक्स'चे कौतुक झाले ...
थॅट्स इट, असा साजरा करतो आपण एक मह्त्वाचा दिवस ...
असो, तमाम महिलावर्गालाही आमच्याकडुन महिलादिनाच्या अनेक शुभेच्छा !!!अ
खरं तर काही होत नाही हाच तर
खरं तर काही होत नाही हाच तर मोठा प्रॉब्लम आहे. नुस्ते समाजात मिरवता यावे म्हणून एखादी संस्था उघडली जाते... व ज्या खरोखर अडचणीत आहेत त्यांना मदत करणे ह्यांना गरजेचे वाटत नाहीच ना.. अहो पेज थ्री पार्टीमध्ये अथवा तस्म पध्दतीच्या एकाद्या कार्यक्रमामध्ये बक्षिस मिळाले की सर्व स्त्री जातीच्या कल्याणाची जबाबदारी आपण पेलून आलो आहोत अश्या पध्दतीचे हास्य करुन फोटो काढले की झाले.... संपला महिला दिवस.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
वा वा!!
आज महिला दिन! छान छान. हे म्हणजे बैल (की गाय) पोळ्यासारखंच झालं की. तसेही हे असले दिन कायमच इव्हेंटच होते की. खरच महिलांबाबत कृतज्ञता, कौतुक वगैरे वाटायला असा दिन कश्याला लागतो? आईबाबतचं प्रेम, कृतज्ञता वगैरे फक्त मदर्स डे पुरतंच असतं? पण एक आहे - यानिमित्तानं अनेकांना एक दिवस तरी, लाजेकाजेनं का होईना अन मुखवटा पांघरुन का असेना बायकांना बरी वागणुक द्यावी लागते. हरकत नाही. अगदी सगळ्या बायका सरसकट चांगल्या किंवा वाईट असे म्हणता येत नसले तरी.
पण....
या सगळ्या छान छान, गोड गोड दिवशी जरा खाली दिलेल्या महाराष्ट्र सीआयडीच्या आकडेवारीकडे पण पहा. २००८ मधे २००७ च्या तुलनेत राज्यातले महिलांविरुद्धचे गुन्हे ९०० ने म्हणजे ५.४२ टक्के वाढले. ती वाढ अशी (कंसातले आकडे वाढीची टक्केवारी दाखवतात): हुंड्यासाठी खुनाचा प्रयत्न (३.७०), बलात्कार (७.३७), अपहरण (३.२१), पती व सासरच्या मंडळींकडुन छळ (६.४३), विनयभंग (९.४७), लैंगिक छळ (५), अनैतिक व्यवसाय करण्यास महिलांना भाग पाडणे (१.५५) आणि हुंडाबळी (८.८९).
उपरोक्त काळातील महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात जेथे लक्षणीय प्रमाणात गुन्हे झाले त्या स्थळांबाबतचा विदा असा (कंसातले आकडे वाढीची टक्केवारी दाखवतात): मुंबई (९.३), अहमदनगर (५), ठाणे शहर (४.४), पुणे शहर (४.२), जळगांव (४.२) तर चंद्रपुर, बुलढाणा, बीड आणि नागपुर प्रत्येकी ३ टक्के. अन्य ६२ टक्के गुन्हे वर दिलेल्याखेरीज राज्यातील अन्य जिल्ह्यांमधे घडले होते.
२००८ मधे १५६७ महिलांवर राज्यात बलात्कार झाले त्यापैकी ११८ जणी १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या, १३५ जणी १०-१४ वयोगटातल्या होत्या, ४४१ जणि १४-१८ वयोगटातल्या होत्या, ७०७ जणी १८-३० वयोगटातल्या होत्या, १६१ जणी ३०-५० वयोगटातल्या होत्या तर पाच जणी ५० पेक्षा जास्त वयाच्या होत्या.
आकडेवारी दाखवते त्यापेक्षा झाकते असे म्हणतात. पण तरीही ही आकडेवारी बरेच काही बोलुन जाते अन त्याचवेळी महिलादिन रोजच यावा अन प्रत्येकाने महिलांबाबतच्या सद्भावना मनी कायम ठेवाव्यात ही गरज आहे असेही दर्शवते असेच मला वाटते.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
क्या बात है !
खुप छान प्रतिसाद रे प्रस्सनदा, आकडेवारीच्या आधारे मस्त झणझणीत अंजन घातले आहेस डोळ्यात.
बाकी आज आम्ही काही वर्तमानपत्राच्या स्पेशल पुरवण्यातले लेख चाळले.
" वाह वाह, छान छान , गोड गोड " एवढेच म्हणतो, इव्हेंट है भाई !
जेव्हा कोणत्याही गोष्टीचा
+१
+१
डॉन्राव शब्दाशब्दाशी सहमत !
डॉन्राव शब्दाशब्दाशी सहमत !
माझ तर वैयक्तीक मत आहे की हे
माझ तर वैयक्तीक मत आहे की हे सगळे "दिन" hallmark आणि archies सारख्या कंपन्याने आपल्यावर लादलेले सण आहेत. महिला दिन असो का फादर्स डे, मदर्स डे, सगळी फक्त फ्याशन आहे.
सहमत आहे. * ह्या डेज् मुळे
सहमत आहे.
* ह्या डेज् मुळे कधीतरी माझा पण डे ठेवावा लागणार आहे
अनुभवामुळे शहाणा (राजे)
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ओ, त्यात तुमचा प्रिय
ओ, त्यात तुमचा प्रिय व्हॅलेंटाईन्स डे पण आला हो.
-पुण्याचे पेशवे
>>अनुभवामुळे शहाणा
>>अनुभवामुळे शहाणा (राजे)
मघाशी एका सासुरवाशिणीच्या लेखावर सुध्दा स्वानुभावरुन लिहिलेला होतस.
राजे तुला कश्या कश्याचे अनुभव आहेत?
अनुभवाचे विचारु नकोस, एक एक
अनुभवाचे विचारु नकोस, एक एक लेख लिहावा लागेल
*
सासुरवाशिणीचा अनुभव ह्यासाठी माहीत आहे की माझ्या घराण्यामध्ये ( खानदान इतर फिल्मी टाईप नाही हं) मी १६ बहिणी मध्ये एकुलता एक आहे व देवाच्या कृपेने त्या सर्व बहिणीशी माझे चांगलेच पटते त्यामुळे त्यांचे अनुभव माहित आहेत मला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नीलमताई, अगदी सहमत आहे.
नीलमताई, अगदी सहमत आहे. हॉलमार्क आणि आर्चिज हे कदाचित हिमनगाचं टोकच असेल.
मुळात महिला दिनाचं उद्दीष्ट चांगलं असेलही पण 'येईल तो दिन माझा' असं म्हणायला आपण (फक्त महिलाच नव्हे) कधी शिकणार? चांगलं काम करायला, चांगलं दिसायला, चांगलं असायला एका दिवसाच्या उत्सवाची गरजच काय? मी स्वतः अनेक सण साजरे करत नाही; त्यात हाही आलाच.
बाकी प्रसनदा, तुम्ही दिलेली आकडेवारी, डॉन्याने मांडलेले मुद्देसुद्धा आजच महिला दिनाला पेपरात येतात, चर्चेला येतात त्यांच्याबद्दल एवढंच म्हणावसं वाटतं, किमान आजतरी अर्ध्या जगाचं दु:ख समोर येत आहे. मी स्वतः, व्यक्तीशः या गोष्टीबाबत काही करू शकेन असं मलातरी वाटत नाही.
पण किमान भेटणार्या कित्येक मुली, ज्या या ना त्याप्रकारे जेंडर बायसला (मराठी शब्द?) बळी पडल्या आहेत त्यांना आणखी जास्त ताठ आणि महत्त्वाकांक्षी बनायला मी नक्की सांगते. आज जर मला हे असं दुसर्या मुलींना, स्त्रियांना सांगण्याचा आत्मविश्वास आहे, आणि याचं सगळं श्रेय माझ्या पालकांचं, भावाचं आणि नवर्याचं आहे. लहानपणी घरात नियम होते, पण त्यात लहान-मोठं आणि मुलगा-मुलगी असे भेद नव्हते. तेव्हा ते नियम आवडले, नाही आवडले ही वेगळी गोष्ट पण भेदभाव अजिबात नव्हता. आपापल्या घरांमधे, कामाच्या ठिकाणी आपण एवढंतरी नक्कीच करू शकतो.
आमच्या विषयात, खगोलशास्त्रात, खूपच कमी मुली/महिला दिसतात. अगदी अमेरिका, युरोपमधेही हे चालतं. त्यामुळे अमेरिकेतल्या नोकर्यांच्या जाहीरातींमधे स्पष्टपणे 'लिहावं लागतं', "आमच्या संस्थेत स्त्रिया आणि अपंग नोकरीची समान संधी दिली जाते."
पण सुदैवाने असेही कलीग्ज भेटतात जे मनापासून अनेक (असल्याच) संस्थांना, विद्यापीठांना बोल लावतात, जिथे हेतूपुरस्सर महिलांना डावललं जातं, तेही दोनच कारणांवरून: एकतर ही बाई उद्या मॅटर्निटी लीव्हवर गेली तर नुकसान होईल, नाहीतर बाई डोक्यावर बसलेली चालत नाही. माझ्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांनी, अगदी शिकलेल्या लोकांमधेही, याचा त्रास सहन केलेला आहे, असणार. किमान माझ्या पिढीतले पुरूष उघडपणे याविरुद्ध बोलत आहेत. चित्रं थोडंतरी बदलत आहे, हेही नसे थोडके.
अदिती
खरं आहे अदिती....
पण अनेक सकारात्मक बदल नक्कीच आहेत. आज मुली नक्कीच जास्त कॉन्फीडंट आहेत. त्या अगदी धोकादायक समजल्या जाणार्या क्षेत्रांमधे पण जातात आणि चांगलं काम करतात. अगदी क्राईम रिपोर्टिंगमधे पण बर्याच मुली आहेत. अन हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
येस!
बदल एका पिढीत होणार नाहीत पण सुरुवात झाली तशी प्रगती होणे गरजेचे! एकेक मुद्दा जमेल तिथे, जमेल तेव्हा घाव घालून ठोकत राहणे हेच खरे!
'अग्निपंख' ह्या अब्दुल कलामांच्या अत्मचरित्रात एक वाक्य आहे "वेळ आपली नसेल त्यावेळी आपण घाव सोसायचे, पण वेळ येताच घाव घालायलाही मागे पुढे बघायचे नाही; ती संधी सोडाल तर तुम्ही तुमच्या दुर्दैवाला जबाबदार असाल!"
सहमत आहे, या दिनानिमित्त ,
सहमत आहे,
या दिनानिमित्त , स्टॅटिस्टिक्स च्या रूपान का होइना या प्रश्नांना एक प्रकारच व्यासपीठ मिळत, उजळ्णी होते.
परिस्थिती एक्दम बदलली नाहे गेली तरी त्या दिशेन एक पाउल पुढे प्रवास होतो.
पुष्करिणी
महिला दिन असो का फादर्स डे,
महिला दिन असो का फादर्स डे, मदर्स डे, सगळी फक्त फ्याशन आहे.
अगदी सहमत..
असो आमच्या तर्फे पण महिला दिनाच्या शुभेच्छा
-निखिल
>>असो आमच्या तर्फे पण महिला
>>असो आमच्या तर्फे पण महिला दिनाच्या शुभेच्छा
धन्यवाद.
अगदी अगदी माझ्या मनातला
अगदी अगदी माझ्या मनातला बोललीस अदिती.(नुसता अदिती चालेल ना? मला सुध्दा ताई नको). आमच्याही घरी जे काही नियम होते ते मला किंवा भावाला सारखेच होते. पण मी स्वानुभावरुन नक्की एक सांगू शकते की अमेरिका असो वा भारत, जगात मुलींना जास्त झगडाव लागत स्वताला सिद्ध करायला, आणि त्याचा कोतुक करायला एका विशिष्ट दिवसाची गरज नाहिये.
नीलम, आपल्यासारख्या मुलींनातर
नीलम, आपल्यासारख्या मुलींनातर खरंच या दिवसाची काही गरज नाही. फक्त एका वेगळ्या दृष्टीकोनाची गरज आहे. कोणतीही आपत्ती इष्टापत्तीच समजा. त्यातून मार्ग काढायचाच, आणि असं ठरवलं की या गोष्टींचा त्रास होत नाही. उलट आपलीच सगळी स्किल्स त्यातून तयार होतात. मलाही लहानपणी पोरांनी मुलगी म्हणून डावललं नाही असं नाही आणि आजही असं होत नाही असं नाही. पण एकदा करतील, दोनदा करतील त्यापुढे मी त्यांना तसं करू देत नाही.
आणि डॉन्या, प्रसनदा, निखिल, माझा हा कलीग ज्याबद्दल लिहीलं आहे, या धाग्यावर लिहीणारे पुरूष कमी अधिक संख्येने सगळीकडे असतातच. आपल्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांना कदाचित हेही सुख नव्हतं. पुरुषांनाही कदाचित असं वाटत असेल तरी दाखवता येतं हे माहित नसेल ... न पेक्षा हे ही चांगलंच आहे.
एकेकाळी स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. आज हे ऐकून विचित्र वाटतं. कदाचित हा 'महिला दिन' नंतर ऐकायला विचित्र वाटेल. असा दिवस लवकर येवो एवढीच इच्छा!
(अवांतरः नीलम, एकेरी उत्तमच!)
बरोबर आहे. मला असा वाटत की,
बरोबर आहे. मला असा वाटत की, हे सगळे दिन आपल्या सारखे सुशिक्षीत लोकांनी थोडे दुर्लक्षीत केले की ह्याच स्तोम जरा कमी होईल.
मध्ये कुठेतरी वाचले होते
मध्ये कुठेतरी वाचले होते भारतामध्ये सर्वाधिक डेज् हे मध्यमवर्गिय समाजामध्येच जास्त साजरे केले जातात व ह्यामुळेच त्या कंपन्यांनी ह्या वर्गाला टार्गेट करण्याचा नवीन ट्रेन्ड मार्केटमध्ये आणला.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तेच तर ...
>>हे सगळे दिन आपल्या सारखे सुशिक्षीत लोकांनी थोडे दुर्लक्षीत केले की ह्याच स्तोम जरा कमी होईल.
+१, हेच म्हणतो.
तरी बरे की 'महिला दिन' वगैरे प्रकार अजुन सामान्य लोकांपर्यंत नाही आलेत, अजुन ते कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी माध्यमे आणि काही एनजीओस पर्यंतच मर्यादित आहे.
त्यांहीही सिंपल स्ट्रॅटेजी आहे, लाईमलाईट मिळते आहे ना ? मग का सोडा ?
बाकी 'दुर्लक्षा'चे बरोबर म्हणलात.
तसे जर घडत गेले आणि असल्या फालतु 'इव्हेंट्स'ला असणारा विरोध समोर आला तरी पुढच्या वेळी सदर इव्हेंट घडवताना निदान थोडा विचार होईल.
सहमत! आपण या एका दिवशी स्त्री
सहमत!
आपण या एका दिवशी स्त्री ला देवीचं रुप देतो पण बाकीचे ३६४ दिवस बहुतांश ठिकाणी तिला कशी वागणुक मिळते ते सांगायला नकोच
या पेक्षा स्त्रीला नेहमीच चांगली वागणुक देणं हे तितकं कठीण नसावं!!
>>असल्या फालतु 'इव्हेंट्स'ला
>>असल्या फालतु 'इव्हेंट्स'ला असणारा विरोध समोर आला तरी पुढच्या वेळी सदर इव्हेंट घडवताना निदान थोडा विचार होईल.
हो पण त्या विरोधामुळे कुठेतरी त्या इव्हेंट ला फुकट प्रसिध्दी मिळ्तेय ना.
>>भारतामध्ये सर्वाधिक डेज् हे मध्यमवर्गिय समाजामध्येच जास्त साजरे केले जातात
भारतामध्ये नाही तर काही अंशी सर्व जगातच, त्याच कारण म्हणजे, मध्यमवर्ग हा कुठेतरी कारण शोधत असतो सेलिब्रेशनसाठी अथवा क्षणिक आनंदासाठी. आणि त्याचा फायदा हे कॉर्पोरेट जग, मिडिया, हॉलमार्क सारख्या कपंन्या, राजकारणी नेते हे घेउन आपल्या भाकर्या भाजुन घेतात.
बाईलपोळा
अशा दिनानिमित्त महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या महिला असण्याचा फायदा आपल्या मार्केटिंग मधे कसा करता येईल हा विचार असतो.
बैलपोळ्याच्या दिवशी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यात परंपरा वा अंधानुकरणाचा भाग जास्त असतो. त्याला सण उत्सव म्हणु यात फारतर. त्यानिमित्त का होईना बैलाला विश्रांती मिळते. हा महिला दिन म्हणजे काही महिलांसाठी बाईलपोळा ठरतो. समस्त महिला वर्ग एका मापाने तोलता येणार नाही.
हा दिन कर्मकांड म्हणुन जरी मार्गक्रमणा करीत असला तरी सध्या त्या निमित्ताने स्त्री ही देखील माणुस आहे व तिचा माणुस म्हणुन विचार झाला पाहिजे असा संदेश ज्या वर्तुळा तिच्यावर अन्याय होतो तिथपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी कारणीभुत ठरेल असे वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
निर्विवाद इव्हेंट
हा इव्हेंट झाला आहे हे नक्कीच
आज आम्ही आमच्या भांडीवाल्या बाईंन सुट्टी देऊन महिला दिन साजरा केल्याची बातमी आईकडून नुकतीच समजली
-ऋ
-ऋ
चांगला लेख चांगली चर्चा
चांगला लेख चांगली चर्चा
भारतात
भारतात सावित्रीबाई फुले जन्मदिनाच्या दिवशी महिला दिन असायला हवा.
काल लोकसत्ता मध्ये एक छान
काल लोकसत्ता मध्ये एक छान कविता वाचली.. आपल्या सर्वांच्या विचारांशी मिळती-जुळती होती म्हणून ती कविता ईथे देण्याचा मोह आवरत नाही..
दुवा
पुन्हा एकदा
(आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाल्यानंतर..!)
पुन्हा एकदा
आम्ही एकत्र येऊ एका विशाल सभागृहात
भाडोत्री गर्दीमध्ये
पुन्हा एकदा
अर्धीकापली ब्लाऊज घालणाऱ्या उच्चभ्रू स्त्रिया
करतील आमच्या मोर्चाचं नेतृत्व
आणि आमच्या प्रतिनिधी म्हणून
स्थानापन्न होतील समोर व्यासपीठावर
पुन्हा एकदा
कुणा विशाल बॅनरखाली
मंचावरील माइकमधून त्या किंचाळतील
व्यवस्थेच्या विरोधात
आणि आमच्या टाळ्या गोळा करीत
हात उंचावून देतील सोबत असल्याचा भ्रम
पुन्हा एकदा
शब्दांच्या उडत्या गालिचावर बसवून
त्या घेऊन जातील आम्हाला संसदेच्या बोळकांडीतून
जिथं पुरुषांच्या अहंला धडकतील आमचे मुद्दे
आणि चक्काचूर होतील त्यात
वसणारी आमची स्वप्नं.
पुन्हा एकदा
आमच्या सभेला उद्देशून बोलतील
माननीय मुख्यमंत्रीबाई
आणि गौरवास्पद वाटेल आम्हाला
त्या आमच्या सभेमध्ये उपस्थित आहेत म्हणून
पुन्हा एकदा
वादंगाच्या तीव्र जाळावर शिजतील नपुंसक विचार
आणि केले जातील कितीतरी संकल्प
लैंगिक शोषण
वेश्यावृत्ती यांच्या विरोधात संघटित होऊन लढण्याचे
पुन्हा एकदा
आपल्या बळाचं सामूहिक प्रदर्शन करीत
आम्ही चालत जाऊ शहरातल्या रस्त्यांवरून
पुरुषसत्तेच्या विरोधात
हवेत मुठी आवळलेले हात उंचावत
आणि आमच्या जोमदार घोषणांच्या उष्णतेनं
गरम होईल शहरातली हवा
पुन्हा एकदा
रस्त्याच्या बाजूला उभे असलेले रसिक
शेकतील आपले डोळे
आणि रोमांचित होत
बोलतील आपापसात की
यार, शहरात वसंतऋतू आलाय
जिथे शहरातल्या गजबजलेल्या चौकात
एकत्र येऊन आम्ही देऊ जोमदार घोषणा
तिथल्या भिंतींवर चिकटवलेल्या पोस्टर्सवरच्या
स्वीमिंगसुटवाल्या सिनेतारका
निर्लज्जपणे नायकाच्या मिठीत झुलत
दाखवतील आम्हाला ठेंगा
हळूहळू थंड होईल आतली आग
आणि मग पुन्हा एकदा-
विखुरल्या जाऊ आम्ही चौकातून
आमचा नवरा आणि मुलं
ऑफिस आणि शाळांमधून परतले असतील याची काळजी करत.
निर्मला पुतुल
झारखंड येथील संथाळी आदिवासी कवयित्री
अनुवाद : कविता महाजन
मस्त ...
एकदम छान वास्तववादी कविता वाटली असे म्हणतो.
हं
एकंदर महिलादिन हा तळमळ दाखवायच्या इव्हेंटसाठी असलेला दिवस आहे असे बहुतेकांचे मत दिसते.
एका सुस्तावलेल्या पांढरपेश्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकायचे काम ह्या लेखाने केले याबाबत माझ्या मनात आता कोणतीच शंका उरली नाही.
अजुन येउ द्या. पुढल्या महिलादिनाच्या आढाव्याच्या प्रतिक्षेत.
काल कुकर लावला. कान्दा चिरला.
काल कुकर लावला. कान्दा चिरला. भाजी केली. कणिक मळली....(हिला ऑफिसातुन यायला उशिर झाल्यामुळे)
उपास होता.
महिला दिन साजरा झाला.
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
आपली 'ही' ही सगळी कामं न
आपली 'ही' ही सगळी कामं न चुकता ऑफिसातून आल्यावर रोज करत असेल नाही?
पण ह्यांनी एक दिवस केला हि पण
पण ह्यांनी एक दिवस केला हि पण बदलाची सुरुवातच नाही का
आज
आज काय झालं/केलं हे जरा लिहा की राव इथं.
नाही जमणार.
नाही जमणार.
अपेक्षीतच...
अपेक्षीतच...!!!
अरे, पण अजून याच्याशी एकानंही सहमती दर्शवली नाही. एकानंही +१ म्हटलेलं नाही. मराठी संकेतस्थळांच्या परंपरेला फाट्यावर मारलं की काय सगळ्यांनी?
याचा अर्थ कळतो का मंडळी: "जमणार नाही" असं लिहिण्याचं धाडस फक्त एकातच आहे.
काय बिका, सहमत?
&%$#^& या सगळ्या
&%$#^& या सगळ्या शेपूटघालूंच्या... असो.
श्रामोशी बाय डिफॉल्ट सहमत असतोच.
अरेच्चा!
शेपूटघालू वगैरे झालं तरी सारेच गप्प!
एकामध्येही हिंमत नाही आणि निघाले "समाज बदलायला"!
हाण्ण!!!!!!!!!!!
हाण्ण!!!!!!!!!!!
बरं ...
बरं, काय मग बिपिनदा, झाली का भांडी घासुन ... हे आपलं झालं का जेवण ?
स्वारी हां, मला वाटलं आज पण महिला दिन आहे म्हणुन आधी गल्तीने चुकीचा प्रश्न विचारला ...
बाकी काल तुम्हाला मी फोन केल्यावर कपडे धोपटण्याचा आवाज कुठुन येत होता हो ?
च्यायला नेटवर्क आहे की धोबीघाट ?
हा बघा...
... गुडघ्याला बाशींग!!!
चाललाय विषय कुणाचा, बोलतंय कोण!!!
कसला विषय ?
मला नाही कळालं तुम्हाला काय म्हणायचे आहे ते ! कशाबद्दल बोलत आहात तुम्ही (काका)लोक ?
मी तर सिंपल चौकशी केली जेवण झालं का वगैरे.
ह्यात कसला 'विषय' आला अजुन
http://www.mimarathi.net/node
http://www.mimarathi.net/node/827#comment-13708
येथे उत्तर दिले आहे ह्याच रे... !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
म्हणूनच
ह्यात कसला 'विषय' आला अजुन
म्हणूनच म्हटलं, उतावळेपणा नको. आधी 'विषय' समजून घ्या.
बाय द वे, मूळ लेख वाचला आणि तो तुमचाच आहे हे कळलं.
जाऊ द्या हो श्रामो... 'मोठे
जाऊ द्या हो श्रामो... 'मोठे व्हा'च्या यादीत अजून एक नाव अॅड करा. काय म्हणता?
अगदी, अगदी
अगदी, अगदी. नाव अॅड केलं.
+१-१=०
+१-१=०
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
गपे... तुला वेळ आहे अजून
गपे... तुला वेळ आहे अजून 'जमणार नाही' लिहायला...
एखादी गोष्ट एकाच विशिष्ठ
एखादी गोष्ट एकाच विशिष्ठ कंपुकडे ठेवण्याचा पुरातन कल पाहून मला अतिव दुखः झाले. असो,
समाज नक्की बदलेल व आमच्या सारख्यानां ही " जमणार नाही" असे मृदु स्वरात सांगने शक्य होईल. आमीन.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
+१
आयला लय धुरळा उडलाय
आयला लय धुरळा उडलाय की.....
आज सडा घालावा का????
पी आर ए--->प्यारे(खर्याच तर नावानी लिहितो.)
लालू यादवाने महिलाआरक्षणबद्दल
लालू यादवाने महिलाआरक्षणबद्दल काय तारे तोडलेत ते वाचले का?
म्हणे हे विधेयक निरुपयोगी आहे...समजा राबडीला कोणाला मत द्यायचे असेल तर ती ते मी सांगेन त्याच्या विरोधात करेल का कधी?
ही बिहारी वृत्ती......
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
मुळात महिला दिनाचं उद्दीष्ट
मुळात महिला दिनाचं उद्दीष्ट चांगलं असेलही पण 'येईल तो दिन माझा' असं म्हणायला आपण (फक्त महिलाच नव्हे) कधी शिकणार? चांगलं काम करायला, चांगलं दिसायला, चांगलं असायला एका दिवसाच्या उत्सवाची गरजच काय? मी स्वतः अनेक सण साजरे करत नाही
+१,
असेच म्हणते.
चित्रपट :: सातच्या आत घरात
"ऊठसुठ कसले रे हगलेमुतले डे साजरे करता? आज काय मदर्स डे, आज काय फादर्स डे... आपण आईबापाचे दिवस कधी घालतो? ते मेल्यावर! तुम्हीतर जिवंतपणीच त्यांचे दिवस घालु र्हायलायत की!"
-युवराज साहेबराव डोणजे-पाटील.
मतितार्थः कळाला असेलच...नसेल तर श्रामोंच्या 'मोठे व्हा' यादीत ताबडतोब नावनोंदणी करुन घ्यावी ही णम्र इनंती.
ये म्मारा
सहमत. साहेबराव आणि धमालराव पाटील यांच्याशी सहमत.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ