(तेंडुलकर आणि गांगुली फालतु क्रिकेटर -मायकेल कॅस्प्रोविचचे मत)

0
0

रावसाहेबांचा दुवा लेख वाचला आणि बाष्कळ चर्चा करणार्‍या फोर्थ अंपायरची आठवण झाली. (रण ही पाहिला होताच म्हणा)

असो...

इंडिया २४/७ वर राजपाल यादवांनी घेतलेल्या मुलाखतीत मायकेल कॅस्प्रोविचचे सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली या भारतातील दोन बुजुर्ग क्रिकेटरांविषयीचे सडेतोड विचार ऍकले/पाहिले त्यांच्या मते:

१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही. भारतीय खेळाडुला पाश्चात्य देशातिल अंपायर मुद्दामुन दंड करतात / आउट देतात असे ब्रेनवॉशिंग बीसीसीआयने केले, पण प्रत्यक्षात भारतीय खेळाडुंना पुढे आणण्यासाठी ठोस असे काहीही बीसीसीआयने, आणि विशेषतः सचिन तेंडुलकरनी केले नाही. ज्या आयपीएल मध्ये बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना उचलून धरल्याचा दावा केला, त्या स्पर्धेत अभारतीय खेळाडूंची आजची संख्या दोन वर्षांपूर्वीच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
२. गेल्या वीस वर्षात भारतातील खेळांच्या र्‍हासाचे प्रमुख कारण म्हणजे बीसीसीआय. बीसीसीआयने अर्वाच्च, गलिच्छ आणि शिवराळ स्लेजींगचे उदात्तीकरण केले. कायदा धाब्यावर बसवण्याचा राजरोसपणा बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट्मध्ये आणला. 'आयपीएल' मधील कित्येक चीअर गर्ल्सवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण सचिन तेंडुलकरला बाहेर करणारा माईका लाल अजून जन्माला यायचा आहे, ही मस्तवाल भाषा आणि गुर्मी बीसीसीआयने भारतात प्रथम सुरु केली.
३. बीसीसीआयचे भारतीय कैवाराचे धोरण स्वतःला सोयीस्कर आणि धरसोडीचे आहे. भारतात भारतीय माध्यमातून सुरु झालेल्या काही क्रिकेट स्पर्धांना (आयसीएल) पहिला विरोध बीसीसीआयचा होता.
४. सौरव गांगुली बीसीसीआयची ताकद ओळखण्यात अपयशी ठरला. बीसीसीआयला ताब्यात ठेवणे त्यांला शक्य असूनही त्यानी (कदाचित काही वेगळी राजकीय समीकरणे डोक्यात असल्याने) ते केले नाही. त्याच्या जेंव्हा ते ध्यानात आले, तेंव्हा फार उशीर झाला होता.
५. 'एक लढाउ संघनायक' ही सौरव गांगुलीची ओळख फारशी खरी नाही. इतर क्रिकेट संघनायकांच्या मानाने त्यातल्या त्यात आक्रमक भाषा व काही स्पर्धांमध्ये उठबस एवढा फरक सोडला तर सौरव गांगुली आणि इतर क्रिकेट खेळाडु यांच्यात काही फरक नाही. 'अजित वाडेकर नंतरचा भारताचा उत्तम कर्णधार' हे सौरव गांगुलीचे वर्णन निरर्थक आहे.
६. धोनीला मिळणारा प्रतिसाद ही वीस वर्षे क्रिकेट पाहून भ्रमनिरास झालेल्यांची प्रतिक्रिया आहे. धोनी देखील सचिन तेंडुलकरप्रमाणेच उथळ आणि सवंग खेळ या एकाच अस्त्रावर लोकप्रिय होताहेत. फरक इतकाच वाटतो, की त्यांच्या मागे जाणारे आता वीस वर्षे थांबणारा नाहीत. ते लवकर हिशेब मागतील.
बीसीसीआयने ज्यांची ज्यांची कल्हई केली त्यांना सोन्याचे दिवस आले, असे इतिहास सांगतो. जडेजा, अझरुद्दीनपासुन स्टीव बकनरपर्यंतची उदाहरणे आहेत. मायकेल कॅस्प्रोविच हा तर फार पूर्वीपासून बीसीसीआयच्या हिटलिस्टवर असणार्‍या. त्यांला सचिन तेंडुलकरनी ज्याला 'खास स्ट्रेट ड्राईव्ह' असे कौतुकाने म्हटले जाते त्या भाषेत 'झोडपुन' घेतले आहे. मायकेल कॅस्प्रोविचच्या या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचा राग (मला तरी) दिसला नाही. दिसली ती फक्त दया. मरणासन्न अवस्थेतल्या, दात आणि नखे झडून गेलेल्या आणि तरीही सोन्याचा पिंजरा सोडू न शकणार्‍या वाघाकडे बघताना वाटावी अशी दया.

डिस्क्लेमिअरः हे लिखाण काल्पनिक आहे. (पण फोर्थ अंपायर आणि निखील बगळे बघुन डोक फिरतं हे नक्की)

हा हा हा ! निशब्द ! ***

1

Laughing out loud

Laughing out loud

हा हा हा !

निशब्द !

wink

***

बाकी रन मी पण पाहिला बरं का wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मस्त रे ...

2

>>हे लिखाण काल्पनिक आहे.

काय सांगता ?
अहो आम्ही बहुतेक मुद्द्याशी सहमत आहोत त्याचे काय ?

+ १ डॉन्या काही तरी लिहतो..

3

+ १

डॉन्या काही तरी लिहतो.. म्हणजे त्याला आम्ही बाडिस !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

डान्रावांशी बाडीस! लिखाण एक

4

डान्रावांशी बाडीस!

लिखाण एक लंबर हुच्च!

एक लंबर

5

ट्ठो. लगे रहो.

मी पण पर

6

मी पण परत एकदा बडिस (म्हणजे काय पण....? कुठन शब्द शोधुन काढलाय?)

आयला ईतक्या लोकांच्या डोक्यात जातो हा बगळे

(बडिस) चेतन

:-)

7

मस्त विडंबन!

....तर तुम्ही का नाही केले?

8

१. सचिन तेंडुलकरने गेली २० वर्षे फक्त रेकॉर्ड बनवण्यापलीकडे काहीही केले नाही.

XXXXनो.... रेकॉर्ड करणे एवढे सोपे आहे तर तुम्ही का नाही केले?
जगातला क्र.१ चा सर्वकालीन फलंदाज म्हणून औस्ट्रेलियन खेळाडूचा लौकीक सचिन ने त्याच्या पराक्रमाने हिसकावून घेतला म्हणून हे दुखणे आहे. ही ऑस्ट्रेलियन नियत आहे, आणि कावळ्याच्या शापाने गाय काही मरत नाही ह्या उक्तीप्रमाणे आपण असल्या फालतू लोकांच्या फाजील बोलण्याला काडीचेही महत्त्व देऊ नये... त्यात सचिन ने वन-डे मधे २०० धावा करणारा पहिला फलंदाज म्हणून त्यांच्या दुखर्‍या जखमेला अजून हिरवेगार केले आहे

(सचिनप्रेमी) सागर
अवांतरः हा मायकेल कॅस्प्रोविच कोण माहिती आहे का?, याची गोलंदाजी सचिनने शारजाच्या सेमीफायनल आणि फायनल ला एवढी झोडपली की त्याचे करियरच संपले, म्हणून याचे दुखते एवढे. त्याच्यात दम होता तर सचिन ची विकेट का नाही घेऊ शकला हा हिरा? सचिनने २ शतके ठोकून कॅस्प्रोविचसकट सर्व कांगारु गोलंदाजांची पिसे काढली होती...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

कप्पाळ माझं

9

कप्पाळ माझं

||
__/ \__
Crazy

Grade

सागर साहेब जरा प्रेमानं वाचा

10

सागर साहेब जरा प्रेमानं वाचा की wink

वरचं सगळे विनोदाने लिहलेले आहे राव Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पहिली ओळ पाहूनच कवटी तडकली

11

Sad

हे विनोदाने लिहिले आहे एवढे वाचण्याएवढा दम कोणाकडे आहे राजे? हास्य

पहिली ओळ पाहूनच कवटी तडकली Big smile

'विनोदाने लिहिले आहे' असे ठळक अक्षरात सुरुवातीलाच लिहायचे नाही का?

उगीच रक्त आटले माझे
Laughing out loud =)) Laughing out loud


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

हा हा हा !

12

हा हा हा !

Laughing out loud

Laughing out loud


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

मायकेल कॅस्प्रोविच ला भारत

13

मायकेल कॅस्प्रोविच ला भारत रत्न देण्यात यावे अशी मी मागणी करत आहे

नोबेल

14

>>मायकेल कॅस्प्रोविच ला भारत रत्न देण्यात यावे अशी मी मागणी करत आहे

इन दॅट केस श्री. वागळे यांना ह्यावर्षीचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार दिला जावा अशी शिफारस मी करत आहे.

(विषय दिलेला नाही)

15

Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

बाडिस

16

डॉन्रावांशी बाडिस. जल्ला गेलाबाजार खेतवाडीभूषण वा डोंगरीरत्न तरी द्याच. लैच कचकच करतंय राव.

गेलाबाजार "महाराष्ट्रभुषण"

17

गेलाबाजार "महाराष्ट्रभुषण" तरी द्याच द्या , येवडी कळकळीची इनंती !


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

रावसाहेबांचा दुवा लेख

18
रावसाहेबांचा दुवा लेख वाचला

कोण रावसाहेब ?

धन्यवाद

नाना

(विषय दिलेला नाही)

19

अरे ते रे.... बर जाऊ दे..

20

अरे ते रे.... बर जाऊ दे.. असले काय नसले काय काही फरक पडत नाही.......... ते माहीत असणे म्हणतोय मी wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

लै भारी रे ..

21

Laughing out loud Laughing out loud

आणूंऑडाण !

22

आणूंऑडाण !

wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अग्गायायायाया........

23

चेत्या.. लेका _/\_ साष्टांग!

आणि त्यावर पब्लिकचं दणकुन रट्टा.... Laughing out loud Laughing out loud
सालं वर्षाभराचा दारुगोळा एकाच धाग्यात ठासुन भरलाय wink फक्त वात बरोब्बर कुठे आहे ते नीट शोधणं हे जाणत्या गोलंदाजाचं काम wink

धन्यवाद

24

सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद

लिहण्यामागचा एक उद्देश निव्वळ करमणुक असला तरी, मला काय वाटतं हे व्यक्त करण्याचा हा प्रयत्न होता.
आज कोणही उठतं आणि कोणाचिही मुलाखत घेतं. करायचं काय की एखादी प्रसिद्ध व्यक्ती निवडायची आनी थोडिशी चिखलफेक करवायला लावायची. मुलाखत घेणारा असतोचं आणखी रंगवुन दाखवायला आणि उपसायलां. लगेच अधुनिक विचारवंत लोक असतातचं चर्चाप्रस्ताव टाकायलां.

च्यायचा *****

(मवाली) चेतन

१०० % सहमत ..

25

>> आज कोणही उठतं आणि कोणाचिही मुलाखत घेतं
अगदी .. आणि मुलाखत देणार्‍यानं जरी वेगळ उत्तर दिलं तरी लगेच त्याला तोडून मोडून आपल्याला पाहिजे तसं करून घेतात
कहर म्हणजे, जरी एखाद्याने मुलाखत दिली, तर ती पूर्ण न दाखवता आपल्याला पाहिजे तेवढा भाग दाखवतात ..
उदा - जेव्हा राज ठाकरे "माय नेम इज खान" आणि "अमिताभ" यांवर बोलले , तेव्हा बर्‍याच न्यूज चॅनेलनी [स्टार माझा सोडून] ती अर्धीच दाखवली ..

लगेच अधुनिक विचारवंत लोक

26

लगेच अधुनिक विचारवंत लोक असतातचं चर्चाप्रस्ताव टाकायलां.

हा हा हा अहो पन्नाशीला आलेल्यांचे अरण्य रुदन असतं ते... लक्ष नका देवु तुम्ही wink

मस्त

27

मस्त

+१

28

+१

कोण हा मायकेल कॅस्प्रोविच ??

29

कोण हा??


आप्पा
जय हरि