.आईचं छप्पर.
(महिला दिनाच्या निमित्ताने...)
.आईचं छप्पर.
कडाक्यात भांडतात,
मेघ गडगड करुन,
भरुन येते नभाला,
अश्रु ढाळते वरुन ...!
अश्रु बनती गारा,
वादळ तांडव करी,
गारठल्या हवेसवे,
विजेस हिव भरी ...!
हिव भरल्या विजेस,
ताप चढवी गारा,
तिला पांघराया,
छप्पर नेतो वारा ...!
छप्पर उडल्या संसारात,
ब्रम्हपुत्रा वाहते,
तेल मिरची शिदकुट,
पाण्यावरती पोहते ....!
पोहतांना पुस्तक वही,
सरस्वती भिजते,
माती करुन जिवाची,
चुल उल्हे निजते ....!
गरजत्या पावसात,
चोळी झबले न्हाती,
पदराखाली लेकरं,
कवटाळती छाती ....!
...गंगाधर मुटे..
.
( शिदकूट = स्वयंपाकासाठी लागणारे अनाजासहीत सर्व साहित्य.)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचुल.)
*जालावर पुर्वप्रकाशित.
.jpg)
छान.
छान.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
छान कविता.
छान कविता.
छान ...
छान ...
छान
छान
-निखिल
आभारी आहे
सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
छान आहे.
छान आहे.
कविता मस्तच... ही वाचताना एक
कविता मस्तच...
ही वाचताना एक कविता आठवली.. प्रतिमा इंगोले लिहितात -(बहुधा अहिराणी बोली असावी ती)-त्या भाषेतली कविता आहे... घर गळत असताना इथे पातेले ठेवलं.. तिथें गडवा ठेवला..पण छत गळतच होते.. नि नुसत्या वार्यानेही झोपडी गदागदा हलते असे काहीसे चित्रण आहे तीमध्ये!!! तीतल्या वेगळ्या शब्दांमुळे तीचे वेगळेपण लक्षात येते!!!