चांदनी - अंतिम

0
0

आधी नन्नाचा पाढा लावणारी चांदनी काही दिवसातच चिकाटीनं शिकायला लागली. अवघ्या महिन्याभरात तिनं मराठी मुळाक्षरं अन अंक पाठ तर केलेच पण ती सफाईदारपणे लिहायला पण लागली. माझ्या सुट्ट्या अजुन सुरुच असल्यानं मला वेळ होता. रोज आठ आठ तास शिकवणी चालायची आणि त्यानंतरही शक्य तेव्हढा वेळ ती अभ्यास करायची. तिचं पाहुन इतरही दोन चार बायकांना आपल्या मुलांनी शिकावं असं वाटायला लागलं अन त्या पण मुलांना शिकवणीला पाटवायला लागल्या. मग सरांच्या सल्ल्यानं बोलीभाषा सफाईदार करण्यासाठी कविता म्हणणं, धडे वाचणं, गणिताच्या तयारीसाठी पाढे म्हणणं वगैरे सुरु झालं. एकंदरीतच चांदनी आदर्श विद्यार्थिनी होती.

दरम्यान मी रोज दिवसभर कुठे असतो याची चुगली कुणीतरी माझ्या घरी केली होती. परंतु मी तिथे नक्की काय करतोय हे कळल्यावर घरुन कुठलाच विरोध झाला नाही. पुन्हा तो विषय घरात चर्चेला पण आला नाही. इतर मित्रांशी तर माझा संपर्क जणु तुटलाच होता. एक दोन जण कुतुहलापोटी माझ्याबरोबर `तिकडे' आले पण नंतर कुणीच रस दाखवला नाही.

दीड एक महिन्यानंतर माझे कॉलेज सुरु होईपर्यंत चांदनीची वाचणे, लिहीणे, सोपी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारासारखी गणिते सोडवणे वगैरे तयारी झाली होती. त्यामुळे कॉलेज सुरु झाल्यावर आमच्या शिकवणीच्या वेळा बदलल्या. रोज सकाळी लवकर मी घरातुन निघे अन शिकवणी घ्यायला जाई. कॉलेज संपल्यावर परत शिकवणी होई. अनेकदा रात्री उशीरापर्यंत मी वाड्यातच असे. एकाबाजुला `धंदा' सुरु असे तर खाली चौकात एका कोपर्‍यात आमची शिकवणी. धंद्यातल्या भानगडींमुळे अनेकदा शिकवणीत व्यत्यय येई. पोलिसांच्या रेड पडल्या तर त्या दिवशी शिकवणी बंद ठेवण्याची वेळ येई. सुदैवाने पोलिस मला ओळखु लागले होते आणि त्यांनी मला कधीच त्रास दिला नाही. एकदोनदा तर चौकीच्या फौजदारानं मला बोलवुन काही आर्थिक मदत वगैरे हवी का असे पण विचारले. मी कुठल्याच संघटनेचा नसल्यानं अन शिकवणीखेरीज कुठल्याच भानगडीत पडत नसल्यानं असा दृष्टीकोण असावा त्यांचा बहुतेक.

पण काही घटना मात्र मला बेचैन करत. एकदा अशीच शिकवणी सुरु असताना एका मुलीचं जोरजोरात किंचाळणं ऐकु आलं. माझ्या मित्राचा भाऊ तिथच चौकात तीनपानी खेळत बसला होता तो अन त्याच्याबरोबरची दोन तीन मुलं उठुन धावत घरात गेली. चांदनी अन शिकवणीची इतर मुलं मात्र शांत होती. तेव्हढ्यात एका घरातुन मुलांनी एका दारु पीलेल्या माणसाला मारत मारत बाहेर चौकात आणलं. मागं रीटा नावाची मुलगी रडत ओरडत येत होती. तिच्या अंगावर कपडे जवळपास नव्हतेच अन ठिकठिकाणी चटके दिल्याच्या खुणा होत्या. तो माणुस जमीनीवर पडला तरी त्याच्यावर लाथा बुक्क्यांचा वर्षाव सुरुच होता. शेवटी तो बेशुद्ध पडला अन मग त्याला उचलुन एका जिन्याखाली आडोशाला ठेवलं. मी धपापणारं काळीज घेऊन ते सगळं बघत होतो तर चांदनी शांतपणे म्हणाली. "खतम हुआ तमाशा. चलो भैया आगे पढे." मी विचारलं, "का मारलं त्याला एव्हढं? तुला बघताना भीती नाही वाटली?" तर थंडपणे म्हणाली, "ये हमेशाही होता है. लोगोंको लगता है वो चार पैसे फेकते है तो लडकी के साथ कुछ भी कर सकते है. लेकीन औरत भी कितना सहेगी? जब गिर्‍हाईक जादाही परेशान करता है तब उसे ऐसा सबक सिखाते है. अब रातको देरीसे उसे बाहर रास्तेपर रख देंगे. फिर कभी नही आएगा वो यहां."

कधी आमची चांदनी शिकल्यावर पुढे काय करु शकेल, कशी बाहेर नोकरी करुन जगु शकेल यावर बोलणी व्हायची. मी उत्साहाने बोलायचो पण ती थंडपणे म्हणायची, "बाहर जाकर भी अलग क्या करना है. हम यहां जो करते है वहीं तो सब औरते करती है. फर्क सिर्फ इतना है कि यहा कई मर्द आते है और वहां एक. वही लोग तो यहां आते है." तुला वेश्याव्यवसायाची किळस येत नाही का असं एकदा विचारलं. त्यावर म्हणाली, "उसमे क्या है. जैसे कोई डॉक्टरी करता है वैसे यहां लोग धंदा करते है. ये औरते तो प्रेशर कुकर की सीटीयां है. बहोत गंद भरी है लोगोमें. वो यहां निकल जाती है. अच्छाही है. नही तो सब गंदा हो जाएगा." धक्काच बसला हे ऐकुन. कुणी सांगीतलं हे असं विचारलं तर म्हणाली, "किसीने बोलनेकी जरुरत क्या है? ये तो सीधी बात है. यहां किसीसेभी पुछो, यही कहेगा धंदे के बारे मे."

पण एका अर्थानं ती अथांग होती. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी शिकवणी झाल्यावर उद्या सुट्टी असं सांगुन मी निघालो तर तिनं मला थांबवलं अन आत गेली. परत आली ती हातात एक रेशमी गोंड्याची राखी घेऊन. माझ्या हातावर तिनं राखी बांधली तेव्हा माझ्या डोळ्यातुन धारा वहात होत्या. खरतर भाउ रक्षण करणारा, समर्थ असतो. माझ्यात यातले कुठले गुण तिनं पाहिले होते कुणाला ठाऊक?

चांदनी खरच झपाट्यानं शिकली. ती झोपायची कधी माहिती नाही पण कायम अभ्यास करायची अन दोन शिकवण्यांच्या मधल्या वेळात पुढचा धडा तयार असायचा तिचा. मनाचं रितेपण घालवण्यासाठी बहुतेक ती एव्हढा झपाटल्यासारखा अभ्यास करत होती. शिकवणी सुरु केल्यापासुन पाच वर्षात तिनं दहावीची परिक्षा दिली अन ४० टक्के मार्क मिळवुन पास पण झाली. दुरशिक्षण शाळेला तिचा सत्कार करायचा होता पण तिनं ठाम नकार दिला.

चांदनीची धडपड पाहुन असेल किंवा सतत दारु पिऊन ढासळलेल्या तब्ब्येतीनं असेल, पण आंटीपण चांदनीला खुपच पाठिंबा देत होती. नेहमी तिचं कौतुक करायची. मित्राच्या भावाला आता तिच्याकडुन कमाई हवी होती पण आंटीनं ठाम नकार दिला. "सीख रही है बच्ची. सीखने दे," एव्हढच बोलली.

चांदनीच्या परिक्षेचा निकाल लागल्यावर मात्र आंटीनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. तिनं कुठल्याशा ओळखीच्या नर्सशी बोलुन चांदनीसाठी नर्सिंगच्या कोर्सला अ‍ॅडमिशन मिळवली. फीचे पैसे पण भरले अन हॉस्टेलवर पाठवुन दिलं. चांदनी आईला सोडुन जायला तयार नव्हती पण आंटीनं जबरदस्ती केली अन ती रडत रडत गेली.

चांदनीचा नर्सिंगचा कोर्स संपल्यावर ती परत आली अन भेटली तेव्हा एकदम सुरवंटाचं फुलपाखरु झाल्यासारखं वाटलं. "तुमने सही कहा था भैय्या. मुझे दिल्लीके एक हॉस्पीटलमे नौकरी मिली है," तिनं सांगीतलं. दुसर्‍याच दिवशी ती दिल्लीला निघुन गेली. तिची आई मात्र वाड्यातच राहिली. बहुतेक मुलीच्या नवीन आयुष्यात आपली अडचण नको असा विचार केला तिनं.

पण दोनच वर्षांनी चांदनी परत वाड्यात आली. यावेळी तिच्याबरोबर एक माणुस होता. "भैय्या हम शादी कर रहे है," तिनं सांगितलं अन आईला बरोबर न्यायचं आहे असं सांगुन मध्यस्थी करावी अशी गळ घातली. आंटीला आता पैलतीर दिसायला लागले होते, मित्राचा भाऊ पण एचआयव्ही इन्फेक्टेड निघाल्याने खचला होता. त्यांनीही जोर दिला अन चांदनी आईला घेऊन परत गेली.

ती जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री आम्ही बराच वेळ बोलत बसलो होतो. मी विचारलं, "एक बात बता यहां तो सब गालिया देते है. लेकिन मैने तुझे कभी गालीयां देते नहि सुना. ऐसा क्यु?" ती उत्तरली, "भैय्या कोई गाली देता है किसीका दिल तोडने के लिये. किसीभी भाषामें जो सबसे गंदी गालीयां होती है वो तो हम लोग है ही. फिर हम क्या किसी और को उससे बडी गाली दे?"

चांदनीच्या इच्छाशक्ती आणी

1

चांदनीच्या इच्छाशक्ती आणी मेहनतीला सलाम!!!

+ १ असेच म्हणतो. साहेब

2

+ १

असेच म्हणतो.

साहेब तुमच्या कष्टाचे चीज झाले !
सलाम तुम्हाला पण... !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

+२

3

तुमच्या कष्टाचे चीज झाले !
सलाम तुम्हाला पण... ! आणी चांदनीलाही !!

...

4

...

+१ पम्या... भेटू तेव्हा बोलू.

5

+१

पम्या... भेटू तेव्हा बोलू.

नक्कीच बिपिनदा!

6

हास्य


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

चांदनीच्या मेहेनतीला,

7

चांदनीच्या मेहेनतीला, इच्छाशक्तीला सलाम तर निश्चितच! प्रसनदा, गाणी गाऊन आणि लेक्चर्स ऐकून 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' काय साजरा करायचा? तो साजरा करायचा चांदनीला सलाम ठोकूनच!
आणि प्रसनदा, सुरवंटाचं फुलपाखरूही होऊ शकतं हे सांगणार्‍याला तुम्हालाही सलामच, आज महिला दिनाच्या दिवशीच!!

गाणी गाऊन आणि लेक्चर्स ऐकून

8

गाणी गाऊन आणि लेक्चर्स ऐकून 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' काय साजरा करायचा? तो साजरा करायचा चांदनीला सलाम ठोकूनच!

अगदी खरे गं..!!!
चांदनी ला सलाम... नि तिला शिकवणार्‍या प्रसन्नदांनाही!!!

+१

9

सलाम ....

+२

10

असेच म्हणतो.

सलाम सलाम सलाम

11

अश्या परिस्थितीतही विचार करू शकणार्‍या त्या सगळ्या स्त्रियांना सलाम
त्या शिकणार्‍या चांदनीला सलाम
शिकु देणार्‍या आंटीला सलाम
शिकवणार्‍या पुणेरींना सलाम
शिकवू देणार्‍या पुणेरींच्या घरच्यांनाहि सलाम!!!

लेख वाचून काय बोलू.. फक्त सलाम सलाम सलाम!!


-ऋ

असेच म्हणतो. हा लेख जर प्रिंट

12

असेच म्हणतो. हा लेख जर प्रिंट मिडियात आजच्या महिला दिनी आला असता तर काय झाल असतं असा विचार मनात डोकावुन गेला.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

पुणेरी

13

ऋषिकेशला जे वाटत आहे आगदी तेच मला देखिल वाटत आहे. तुम्हां सर्वांना क ड क सलाम


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

!

14

!

सलाम!!! ही एक ज्योत पेटवली

15

सलाम!!! हास्य

ही एक ज्योत पेटवली तुम्ही. तिने पुढे अनेक ज्योती पेटवल्या असतीलच.

सही!

16

सलाम!

क्या बात है! एक्दम मस्त! आणि

17

क्या बात है! एकदम मस्त! आणि असं आशादायक वाचायलाही मिळाल्याचा खूप आनंद आहे हास्य तुमच्या दृष्टीला आणि मनोवृत्तीलाही सलाम!

वरच्या सर्व प्रतिसादांशी

18

वरच्या सर्व प्रतिसादांशी सहमत.

भाग्यवान

19

>>मी तिथे नक्की काय करतोय हे कळल्यावर घरुन कुठलाच विरोध झाला नाही. पुन्हा तो
>> विषय घरात चर्चेला पण आला नाही.

भाग्यवान आहात. मागची पिढी इतकी सुसंस्कृत असणे फार दुर्मिळ. (अलिकडे एकदा ऑफिसमध्ये बडे गुलाम अलींची एक ठुमरी गुणगुणत होतो, तर मागून आलेल्या - आणि माझ्याहून सुमारे दहा वर्षांनी लहान असलेल्या - एका सहकारी कन्येने (पेठ वगैरे अधिक तपशील सांगत नाही, सुज्ञास सांगणे न लगे) अशा तीव्र नजरेने पाहिले की मी आत्ताच बनारस किंवा लखनौच्या एखाद्या कोठ्यावरून बाहेर पडलोय असे वाटले, चटकन मनगटावर गजरा वगैरे माही ना म्हणून मीच खात्री करून घेतली.)

आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळाले हे ही भाग्यच.

अभिनंदन आणि पुलेशु.

स ला म !!

20

स ला म !!

पुन्हा एकदा सलाम प्रसनदा!

21

सुरवंटाचं फुलपाखरु केलंत असं तरी कसं म्हणू? ती अथांग होतीच, महान होतीच, तिचा पिंजरा खोलायला मदत केलीत, तिला तिचं आकाश शोधून दिलंत.
ह्यासगळ्यात तुमच्या घरच्या लोकांचंही मला कौतुक वाटतं. आपला मुलगा कुठे जातो हे माहीत असूनही तो वावगं काही करणार नाही ह्याची खात्री असणं आणि तसा विश्वास त्या मुलाला देणं ह्यामुळे तुम्ही हतोत्साहित झाला नाहीत. तुमच्यासह तुमच्या पालकांसमोरही मी नतमस्तक आहे!

स ला म!

22

>>> सुरवंटाचं फुलपाखरु केलंत असं तरी कसं म्हणू? ती अथांग होतीच, महान होतीच, तिचा पिंजरा खोलायला मदत केलीत, तिला तिचं आकाश शोधून दिलंत
--- सहमत आहे. बाकी सुरेख लेखन, मस्त इ. विशेषणं अपुरी वाटतात.

उत्तम लेख

23

लेख तर उत्तम झालाच आहे, वरच्या काही इष्ट्मित्रांच्या प्रतिसादावरुन असे वाटते आहे की ही सत्यकथा असावी. 'आदर्श' अजून समाजात शिल्लक आहेत हे बघून आनंदित झालो.

तुम्ही इतक्या लहान वयात

24

तुम्ही इतक्या लहान वयात इतक्या मॅचुअरली निर्णय घेउन तो सर्वोतोपरी तडिस नेलात...एका जीवनाला पूर्ण्पणे कलाट्णी, उमेद दिलित...सलाम, अर्थातच तुमच्या इतक्च तुमच्या घरच्यांनाही ह्याच श्रेय जात..


पुष्करिणी

नि:शब्द....

25

नि:शब्द....


-पुण्याचे पेशवे

सर्व वाचक, प्रतिसादकांना धन्यवाद.....

26

आपण मी खरडलं ते वाचलं, कौतुक केलं. आभारी आहे.

माझं नका कौतुक करु. मी सामान्य माणुस आहे. मी गेलो जग पहायला, दिसलं ते पाहिलं, त्याला मला योग्य वाटलं त्या प्रकारे प्रतिक्रिया दिली संपलं! सुरवंटाचं फुलपाखरु होणारचं होतं, मी फक्त ती प्रक्रिया जवळुन पाहिली. अशी काही सुरवंट फुलपाखरं झालेली मी पाहिली तसेच काही सुरवंट फुलपाखरु होण्याआधीच चिरडले गेलेले पाण पाहिले, मनातल्या मनात जळत, चरफडत, चिडचिडत. मी समाजातुनच आलोय अन समाजाबरोबर नाळ जोडुन रहायला मला आवडतं. पण मी समाजसेवक, समाज सुधारक वगैरे नाहीये. खुप मोठेमोठे, वंद्य समाजसेवक मी पाहिलेत आणि त्यांच्या पायाशी बसण्याचीही माझी लायकी नाही. कौतुक आहे ते चांदनीचं, माझ्या मित्राच्या आईचं, त्याच्या भावाचं. माझं नाही.

घरच्यांबद्दल काय बोलावं. पुर्वी अनेकदा म्हणलोय तेच परत म्हणतो मला असे लोक घरी अन बाहेरही भेटले हे कदाचित पुर्वसंचित असेल. त्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.

ही कथा लिहिताना बर्‍याच मित्र मैत्रीणिंनी मदत केली. मस्त कलंदर, निखिल देशपांडे, राजे, छोटा डॉन, धमाल मुलगा, सुहास, श्रावण मोडक यांच्यासारखे लोक नसते तर ही कथा मी कदाचित कधीच लिहिली नसती. माझं मनच होत नव्हतं हे लिहायला खरं तर. पण या सगळ्यांनी लकडा लावला म्हणुन मी लिहिलं अन अश्या संवेदनाक्षम विषयावर लिहिताना जे भान जपावं लागतं ते रहावं यासाठी पण त्यांनी मदत केली.

ही कथा लिहिताना पुढचा भाग लवकर येऊ दे असा प्रेमळ आग्रह अनेकांनी केला. पण मी तिकडं कानाडोळा केला. कारण सोपं होतं. मला या कथेचा अंतिम भाग आजच प्रसिद्ध करायचा होता. आजवर अनेक ठिकाणी मी स्त्रीशक्तीचा वेगवेगळ्या रुपात अविष्कार पाहिला पण त्या बदनाम गल्लीत जी स्त्रीत्वातली ताकद, जिद्द मी पाहिली त्यामुळेच मला त्या शक्तीची खर्‍या अर्थाने ओळख झाली. माझी ही कथा त्या स्त्रीशक्तीला अर्पण.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

>>आजवर अनेक ठिकाणी मी

27

>>आजवर अनेक ठिकाणी मी स्त्रीशक्तीचा वेगवेगळ्या रुपात अविष्कार पाहिला पण त्या बदनाम गल्लीत जी स्त्रीत्वातली ताकद, जिद्द मी पाहिली त्यामुळेच मला त्या शक्तीची खर्‍या अर्थाने ओळख झाली. माझी ही कथा त्या स्त्रीशक्तीला अर्पण.

सलाम मालक !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

सलाम

28

सलाम

सलाम

29

सलाम!!!

काही कारणास्तव ह्या भागाला

30

काही कारणास्तव ह्या भागाला प्रतिसाद द्यायचा राहुन गेलेला...
प्रसन्नदा तु जे काही केलेस त्या बद्दल तुला सलाम तर आहेच..
पण ज्या संयत पणे तु तुझे लिखाण मांडलेस ते जास्त आवडले


-निखिल

क्या बात है! एकदम मस्त!

31

क्या बात है! एकदम मस्त!

(विषय दिलेला नाही)

32

Grade


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य