दमलेल्या बाबाची कहाणी ~ निल्या

0
0

दोस्तहो तुमच्यासाठी खास एक विडंबन सादर करत आहे ! "दमलेल्या बाबाची कहाणी". मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे गाणं ठौक असेल ! हास्य नसेल तर पयले एक काम करुचा. पयले तो मूळ विडो बघाचा.
दुवा मी इथे देतंय!
दुवा

मूळ शब्दांकन हवे असेल तर ते पण देतंय दुवा
घाई करु नका बे ! खालील क्रमाने गोष्टी करा
१. पयले शांत चित्ताने ते मूळ गाणं ऐका !
२. भावना समजून घ्या
३. आमच्या विडंबनाचा विडो पहा. लय मेहनत घेतली आहेल तवा बघाच ! दुवा खालील विडंबन वाचण्यापरीस व्हिडोची मजा अनुभवा.
४. आवाजाला माफ करा. आम्ही काही अजून गायक बनलेलो नाही.
५. आमच्या विडंबनाचे शब्द येथे वाचा
६. माझा व्हिडो पाहिल्या शिवाय प्रतिक्रिया देण्यास मनाई आहे.
७. व्हिडो पहा प्रतिक्रिया लिव्हा !

नोंद* आमच्या विडंबनालाही एक पूर्णत्व यावे म्हणून आमुची सवताची काही कडवी भरीस टाकली आहेत. तेवढी गोड मानून घ्यावीत.

दमलेल्या बाबाची कहाणी ~ निल्या

मार खाऊन निजलेला एक मी हा प्राणी
सुजलेले तोंड डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागु बापा मला तोंड नाही

झोपेतच बाप मारी लाथ पेकाटात
उठ भाड्या कर अभ्यास म्हणे तो घुश्श्यात
सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

आटपाट नगरात पोरी होत्या भारी
घामाघूम बाबा करी गल्ल्यांची वारी
रोज सकाळीस बाप निघताना बोले
चार विषय तुझे का राहुनिया गेले
जमलेच नाही पास होणे मला जरी
बाप म्हणे पाय ठेवू देणार नाही घरी

स्वप्नातल्या गावामध्ये पटवल्या लय पोरी
खर्या खुर्‍या पोरी साठी गेलो तिच्या घरी
पोरीच्या भावांनी लय मारीले मला
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

कधी कुठे सुत आमचे जुळलेच नाही
पटव पोरगी असं मन बोंबलत राही
दिले फूल एकीला तिने घेतलेच नाही
अपमान केला इज्जत ठेवलीच नाही
झाला पचका कॉलेज मध्ये आमुचा उगीच
आलं पीक गव्हावानी कॉंमेंट्सचं सुगीचं
दोस्तांनी पण आमचा उडवला फज्जा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला

पोरीच्या नादात कॅंपस गेला हो निघून
नोकरीची आशा सारी गेली ती संपून
कंपन्यांनी घेतली होती कवाडे मिटून
टेस्टिंग कोर्स केला शेवटी पैशे भरुन
लावले लग्गे जिथे तिथे दोस्तांनी मिळून
लढविला किल्ला सा-या बाजू सांभाळून
तवा कुठे लागला जॉब हा मला
दमलेल्या बाबाचीही कहाणी तुला

बॉस म्हणे कर काम वा प्रमोशन नाही
केले जरी काम तरी न मिळते हो काही
ऑनसाईट सुद्धा बॉस जाऊ देत नाही
कान भरी कलीग त्याचे सांगून काहीबाही
अंगाचीया माझ्या होतसे हो लाही लाही
"गोड बोला" मंत्र जपला मी हा बारमाही
बटर संगे स्कॉच त्याले मारिले पुन्हा
दमलेल्या बाबाचीही कहाणी तुला

तुझ्यासाठी बाळा मी शोधतोय आई
धुंडाळले मॅट्रिमॉनी हाती काही नाही
तुज्यासाठी फिरे आजा तुझा दिशा दाही
तुझा रंग गोरा व्हावा सो गोरी हवी आई
अशी पोरगी त्याले तरी गवसत नाही
मिळे कन्या लग्ना जरी उभी न ती राही
कधी येते नाड एक कधी मंगळ आडवा
दमलेल्या बाबाची ही कहाणी ऐक गाढवा
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

ऑफीसात उशिरा मी असतो बसून

भंडावले डोके जाड पोरी या बघून
तास तास जातो चांगली पोरगी शोधून
एक एक स्थळ जाते हळूच निघून
अशावेळी काय सांगु काय काय वाटे
तिचा फोटो बघून पाणी डोळ्यातून दाटे

वाटते की उठुनिया भारतात जावे
शोधून कन्या एक पुन्हा प्रेमात पडावे
गुंतुन एकीत लग्न करावे दुजिशी
जीवघेणे खेळ काही मांडावे आपुल्या देशी

गोष्ट माझी सांगताहे ऐक बाळा काही
जोडीदार महत्त्वाचा करिअर होत राही

कॉलेज मध्ये जास्त नखरे करु नको रे मुला
मिळेल त्या पोरीशी सेटिंग करुन टाक रे पोरा

कुणा एकी साठी नको होवू रे खु्ळा
एक जाता दुसरी शोधून काढ तू बाळा

बाबा सांगे चांगल्या पोरीवर असो डोळा
भाळी तुझ्या योग्य वेळी लागेल हा टिळा
हनिमूनला बाबा तुला आठवेल का रे?
बाबासाठी येताना काही आणशील का रे?

सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला

तरुणपणी बाबा तुझा होता आंधळा
दिसले न प्रेम त्याला आले किती वेळा

बाबापरी नको करु माती आयुष्याची
काढ डोळ्यातून तुझ्या गाठ अहि-याची
सोड भीती जाईल हे आयुष्य मजेत
हवी कोणी तरी संगे येशील खुशीत

सांगायची आहे माझ्या होणा-या पोरा
दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला
ला ला ला ला ला, ला ला ला ला ला
ला ला ला ला ला, ला ला ला ला

~निल्या

सही जमलेय विडंबन... मिळेल रे

1

सही जमलेय विडंबन...
मिळेल रे मिळेल.. तुझ्या होणार्‍या बाळाला आई मिळेल!!!
व्हिडिओ अजून पाहिला नाही.. पाहून नंतर त्यावर प्रतिक्रिया देईन !!!

आई

2

वाह अचूक ओळ पकडलीस ! बाळाला आई मिळेल तेव्हा मिळेल ! Big smile
पण हीच ओळ या विडंबनाची जननी आहे ! सर्वात पहिल्यांदा तीच सुचली होती, चित्रफीत जरूर पहा न आवडल्यास ९ मिनीटे परत करण्यात येतील !

भन्नाट ! * खरचं खुप कष्ट

3

भन्नाट !

* खरचं खुप कष्ट घेतले आहेस रे... आवडले प्रचंड !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कष्ट

4

पहिल्यांदा मला वाटले होतो त्यापेक्षा जास्तच कष्ट पडले. एक आठवडा खल्लान आमचा.

निल्या... लै म्हणजे लै म्हणजे

5

निल्या... लै म्हणजे लै म्हणजे लै भारी..
व्हिडिओ न पाहिल्या मुळे एव्हढीच प्रतिक्रिया...


-निखिल

लै भारी.....

6

लै भारी.....

निल्या

7

राजे, निदे आणि नानाजींशी १०,००० % सहमत. तो आवाज तुझाच असेल तर खरच छान आवाज आहे तुझा, तु चांगला गायक देखिल होऊ शकतोस. पुढील गाण्यासाठी शुभेच्छा.
गाण्याच्या तालमीसाठी पैशांची काळजी करु नकोस, मी नानाशी या विषयी लवकर बोलुन त्याच्या कढील काही नमुने पाठवीन तुझ्यासाठी.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आवाज

8

हो आवाज माझाच आहे तो ! विडंबन गाऊन द्यायला चांगला गायक कुठे भेटणार !

तालीम: त्यावर काम चालू आहे. सध्या "पाया"वर काम करतोय. गायक वगैरे बनायला अजून येळ आहे. हास्य
नाना म्हणजे नक्की कोण?

निल्या

9

हे आहेत आमचे श्री.रा.रा. आवलियाजी उर्फ नानाजी
दुवा


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आँ!

10

नाना ला टकल्या म्हणतोस काय रे जपयाल??


-Nile

'बाबा' पार्ट सोडला तर माझीच

11

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud 'बाबा' पार्ट सोडला तर माझीच कहाणी वाटली रे, लै धमाल! ह. ह. पुवा. विशेषतः ते ला ला चे फोटु तर लै आवडले! माझ्या नावाचं सार्थक केलंस रे. wink


-Nile

'बाबा' पार्ट

12

धन्यवाद !
आज न उद्या 'बाबा' पार्ट वर पण येशील हळू हळू (अपवादः निल्याबाबानी आपल्या भावी पोराला दिलेला सल्ला तू आमलात आणलास तर !)

:-)

13

मस्त रे!!!

हास्य

लै भारी!!!

14

लै भारी!!!

दमदार रे निल्या !!

15

दमदार रे निल्या !!

वीडिओ पाहिला रे.. नुसतं गाणं

16

वीडिओ पाहिला रे.. नुसतं गाणं वाचण्यापेक्षा फीत आवडली...
सगळे फोटू अगदी क्लास...
अवांतरः तो बीचवर मोठ्या दगडापाशी झोपलेला बाबा तू तर नाहीस ना??

मोठ्या दगडावर झोपलेला बाबा

17

मक,
धन्यवाद. सगळे फोटू जमवून ते करत बसायला लय वेळ लागला हास्य !

गो-या आई साठी घेतलेला सोनाली कुलकर्णीचा फोटो सोडला तर एकाही ज्ञात, प्रसिद्ध वा अप्रसिद्ध व्यक्तीचा फोटो घेतला नाही त्यात. तो मोठ्या दगडावर झोपलेला बाबा मी नव्हे ! तो असाच महाजालावर सापडला.

...

18

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
लय भारी.

आभार

19

निखिल देशपांडे, अवलिया, सहज, विवेक मोडक, सुहास, सुमीत भातखंडे प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !

महत्वाचे नाव विसरला आहेस

20

महत्वाचे नाव विसरला आहेस म्हणून तुला चुकीचे टाचण दिले आहे, असो.

बदलीन.

टाचण टोचणेवाले.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

विसरलो नव्हतो काही !

21

म.क., राजे,जयपाल प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे !
(नाव विसरलो नव्हतो. वर आभार मानायचे विसरलो. Big smile )

अतिशय भारी

22

निल्या,
अतिशय भारी जमलंय विडंबन. संदीप-सलील पण खुश होतील बघुन. गाणं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी किती अफाट कष्ट पडले असतील ते दिसतंय. तुला पोरगी शोधण्यासाठी आणि गायकीसाठी शुभेच्छा. तुझ्या पोराला व्हिडिओ बघुन मजा येणार आहे हे नक्की हास्य

शुभेच्छा.

23

धन्यवाद. या दोन्हीसाठी मला शुभेच्छांची नितांत आवश्यकता आहे ! ­­कष्टतर पडलेच बाबा. एक दिवस लिहायला, २ दिवस गायला व ५ दिवस चित्रं जमवून त्यावर शब्द पेरायला. मजा आली पण एकंदरीत.८ दिवस मी स्वतःशीच हसत होतो !

एक नंबर रे निल्या

24

एक नंबर रे निल्या भाऊ....ज्याम आवडलं..

धन्यवाद

25

धन्यवाद प्रभो !

निल्या लेका.. काय व्हिडिओ

26

निल्या लेका.. काय व्हिडिओ पाहिला रे..
लै मेहनत घेतलीस की रे....
मस्तच झाला आहे...


-निखिल

धन्यवाद

27

निदे,चित्रफीत पाहिल्याबद्दल धन्यवाद !

लै लै भारी

28

Laughing out loud Laughing out loud
खूप जबरा जमलय रे ..
व्हिडीओ पाहून परत प्रतिक्रिया देतो ...

व्हिडो

29

नक्की कळवा.

झ का स!

30

जबरदस्त निल्याभौ. बरेच परिश्रम करून व्हिडिओ तयार केलेला दिसतोय.
ला ला ला ला ची चित्रं आणि टिप्पणी लै भारी!

परिश्रम

31

नंदन, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. हे श्रम एखाद्या ’परी’ साठी पडले असते तर एक वेळ चालले असते पण आमच्या नशिबी ’बरी’ सुद्धा दिसत नाही !!

मी स्वत: लालालाला गाऊन कंटाळलो होतो. त्यामुळे ते सुचले

लै भारी भाऊ !!

32

मग बाळाची आई गवसली की नाही ??
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
शुभेच्छा !!
~ वाहीदा

आभार

33

वहिदा, प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. गवसेल गवसेल. जातेय कुठे मला सोडून. Big smile
एक ना एक दिवस ती माझा दरवाजा ठोठावेल मला कोणी तरी सांगेल. "बरका(खा) बहार आई !" Big smile

बरका(खा)......

34

एक बरका(खा) तर मुंड्यांची झाली, दुसरी ती दत्तांची !! लय डोक्यात जाते राव. तुला भेटेल ती तिच्या सारखी नसु दे रे देवा.

लै भारी

35

आपण फारच दूssssssssssरदृष्टीचे (एक दोन अवग्रह कमीच पडले असतील) आहात. होणार्‍या पोराच्या 'सेटिंगची' चिंता आतापासून. व्वा भौ. पण तुला मुलगी झाली तर काय बे? तिलापण हाच सल्ला की तिच्यासाठी वेगळे विडंबन लिहिणार?

मुलगी झाली तर

36

रमताराम,
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. मुलगी झाली तर तिची आई तिला सल्ला देईल ! चांगला नवरा कसा मिळवावा, अरेंज मॅरेजच्या फुफाट्यात पडून उगाच कोणालाही गळ्यात पाडून घेवू नये, वगैरे वगैरे!

ज ह ब र्‍या !!! बाकी हा

37

Laughing out loud Laughing out loud

ज ह ब र्‍या !!!

बाकी हा निळ्या अभ्यासु आणी कष्टकरी दिसतो. त्यातुन तो अनिवासी नसल्याने प्रतिक्रीया द्यायचा मोह आवरला नाही Laughing out loud

अभ्यासु आणी कष्टकरी

38

परिकथेतील राजकुमार,
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
मीम वर पहिल्यांदाच कोणीतरी माझा अभ्यासू म्हणून पाण उतारा केला आहे ! तुमचा असा गैरसमज होण्यासारखे कोणते वर्तन मजकडून घडले ते कळू द्या.
अनिवासी नसल्यान? म्हणजे काय? "अनिवासी असल्याने" म्हणायचं होतं का तुम्हाला?

ठो ठो ठो ...

39

निळूभौ ... आता पाहिला व्हिडो ...
Grade Grade Grade
ला(लै) ला(लै) ला(लै) भारी .....

अवांतर - लै कवळा आवाज हाय की रे

लै कवळा आवाज हाय की

40
लै कवळा आवाज हाय की रे

दमल्यामुळे असेल कदाचित. wink


-Nile

कवळा

41

संग्राम,
प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
माझे वदन कवळाप्रमाणे असल्याने कवळा आवाज येत असेल कदाचित !

मानला ब्वॉ निळ्या....

42

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud
Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

मानला ब्वॉ निळ्या.... दंडवत!!!

हा अत्युत्तम टुकारपणा पाहून आम्हाला आमचे एक स्नेही श्री. जृंभणश्वान उर्फ यॉडॉ यांच्या ब्लॉग्जची आठवण आली....

बिका, व्हिडो पाहिल्यबद्दल

43

बिका,
व्हिडो पाहिल्यबद्दल आभार ! सर्वांचे आशीर्वाद असल्यास अशा टुकारक्या करत राहू !

मस्त विदिओ , ओफ्फिसात ट्युबा

44

Big smile मस्त विदिओ , ओफ्फिसात ट्युबा ब्यान अस्ल्याने आज घरुन पाहिला, सलिल सन्दिप पेक्शा मस्त wink

लै झ्याक....

45

जिंकलस मित्रा...

२० सहस्त्र व्ह्यूजचा टप्पा पार

46

मित्रहो,

सहज जाता जाता आज दमलेल्या बाबाचे स्टॅट्स बघितले. व्हिडिओ ने २० सहस्त्र व्ह्यूज चा आकडा पार केला आहे. आकडा पाहून मन प्रसन्न झालं. मीमराठीवर पहिल्यांदा हा व्हिडिओ प्रकाशित केला होता.
भारतातून ६७.८% म्हणजे १५,९९४ वेळा तर अमेरिकेतून २१७४ वेळा व्हिडो पाहिला गेला. मी मराठीहून ४३ वेळा हा व्हिडो पाहिला गेला. या आकड्यांवरून दिसते की अजून किती तरी मराठी जाणणारे लोक आपल्या नेटवर्क बाहेर आहेत.

Photobucket

अभिनंदन रे मित्रा >>या

47

अभिनंदन रे मित्रा हास्य

>>या आकड्यांवरून दिसते की अजून किती तरी मराठी जाणणारे लोक आपल्या नेटवर्क बाहेर आहेत.

खरं आहे Sad

बाकी लोकांनी मीमची लिंक न देता सरळ युटुबची लिंक दिली असावी wink कारण धाग्याचे वाचन आकडे काहीतरी वेगळेच सांगत आहेत Big smile


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

धन्यवाद

48

धन्यवाद राजे ! हास्य
बरोबर आहे मिमची लिंक न देता यूट्य़ुबची लिंक दिली आहे. ऑरकुट५००, फेसबुक ३००, मिम ४३ व ब्लॉग ४० एवढाच हिशेब लागतो बाकी सगळे इमेल मधून फॉरवर्ड. एवढं असूनही मला नाही ना आला फॉरवर्ड, त्याचंच दु:ख वाटतं ! Sad

फारच मस्त!!!! बाबा दमतो ! आणि

49

फारच मस्त!!!! बाबा दमतो ! आणि मान मोडुन "कामा"च्या आशेने फिरतो आणि पोरगंही त्याच वाटेन जातयं !!! सारं कसं भन्नाट आहे राव!!!!

आभार.

50

पवन,
व्हिडिओ पाहिल्याबद्दल व प्रतिक्रियेबद्दल आभार. मला पण मजा आलेली मस्त व्हिडिओ बनवताना !

मस्त जमलय !!!

51

Grade Grade मस्त जमलय !!!
अभिनंदन. भारी झालाय व्हिडीयो. आवाज, चित्रे आणि त्याच्या वरताण तुझी ट्टिपण्णी सगळच जमलय भारी. गाणं आणि व्हिडिओ बनवण्यासाठी खुप श्रम घेतालेले दिसतात.
बाकी ते "ला ला ला ला" चे अस्तित्व मुळ गाण्यात पण जाणवले होते, ते मस्त अधोरेखीत केले आहेत

धन्यवाद.

आभार

52

राजाभाऊ,
कौतुकाबद्दल आभारी आहे. मला वाटतं चित्रांनी खूप परिणाम साधला. माझं काम फक्त ते गोळा करणॆ इतकचं होत. सात दिवस घालवले व्हिडो बनवण्यासाठी पण ते वर्थ होते ! पुन्हा एकदा आभार.

~
निल्या

मी चुकून

53

व्यर्थ असं वाचलं.

किती जवळचे शब्द आहेत.
वर्थ आणि व्यर्थ.
आता अजून एक किडा टाकतो.
"व्यर्थ हे सारेच टाहो" वर "वर्थ हे सारेच टाहो"
असं काही तरी विडंबन कर ;-)

अगदी असेच म्हणतो, कष्ट

54

अगदी असेच म्हणतो, कष्ट जाणवतात व्हिडिओ पाहताना.

एकदम सुरेख झालेले आहे विडंबन व व्हिडीओ.


___________________________________
योगेश नाईक

>हनिमूनला बाबा तुला आठवेल का

55

>हनिमूनला बाबा तुला आठवेल का रे?

ट्याहॅ..ट्याहॅ..ट्याहॅ..हॅ हॅ हॅ Big smile

आंय.

56

आंय.

निल्या सायबा मस्त जमलय तुला

57

निल्या सायबा मस्त जमलय तुला ........ काटा किर

असा प्रयोग अजून कोणी केला

58

असा प्रयोग अजून कोणी केला नाही याचा खेद वाटत आहे.
एवढे हुषार (?), विद्वान (??) मीमकर असताना फक्त असा एकच प्रयोग wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."