राष्ट्रगीत..

0
0

सिनेमागृहात सिनेमा चालू होण्या आधी राष्ट्रगीत दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.... आपल्याकडे राष्ट्रगीताच्या वेगवेगळ्या विडिओजची कमी नाहीय.. त्यांतल्या काही विडिओज बद्दलची ही माझी काही मते.. अर्थात ही व्यक्तीगत मते आहेत.. मतांतरे असू शकतात.. किंबहुना असणारच!!!

हा विडिओ, यांत बरेचसे सिने कलाकार, गायक आहेत.. यात प्रत्येकाने एक-एक ओळ म्हटलीय, ते प्रकरण फारसे आवडले नाही.. एकतर ५२ सेकंदाचे गीत, त्यात पण ओळी अर्ध्यामुर्ध्या करून सगळ्यांत खिरापतींसारख्या वाटल्या आहेत.. हा एक भाग सोडला, तर चित्रीकरण उत्तम आहे.. निदान त्या परवाच्या फिर मिले सुर मेरा तुम्हारा मधल्या सारखे कुणीही आम्ही सेलेब्रिटी आहोत असे सतत दाखवत आहे असे वाटत नाही.

आणखी एक विडिओ दुवा आहे. ज्यात लतादिदी-आशा भोसले राष्ट्रगीत एक एक ओळ गातात. बर्‍याच लोकांची खिचडी नाहीय पण बहुधा रेकॉर्डिंग मध्ये काही तरी घोळ असावा.. कारण त्यात बहुतांश ठिकाणी मला त्यात लिप-सिंक आढळला नाही.. या सगळ्यांत अगदी काल-परवा पर्यंत मला सिनेमॅक्स मध्ये दाखवली जाणारी मराठी कलाकारांची चित्रफीत अधिक आवडायची (भूतकाळ का केला याचे कारण पुढे देतेय) सगळेजण छान स्वच्छ पांढर्‍या पोषाखात, उल्हासित चेहर्‍यांनी, सात्विक भाव चेहर्‍यावर घेऊन गातात.. तेव्हा खरेच आम्हांला आमच्या देशाचे गीत गाताना अभिमान वाटतोय अशा आवेशात त्यांना गाताना पाहून खरेच छान वाटायचे!!!

पण काल-परवा, एक नवीन (निदान माझ्यासाठीतरी) विडिओ पाह्यला... कुठेतरी लडाख किंवा तत्सम अतिथंड प्रदेशात जवानांनी झेंडा फडकवल्याच्या पार्श्वभूमीवर जन गन मनची धून वाजवली जात होती... रोंरावणारा वारा, त्यासोबत उडणारे बर्फाचे कण, थंड पडलेल्या बंदुका, त्यातही झेंडा फडकवत ठेवण्याची त्यांची जिद्द!!! एकही शब्द कुणी न बोलता.. मेक-अप, अभिनय काहीच नाही.. पण त्यांच्या चेहर्‍यावरचे बाणेदार भाव... कणखरपणा... इतक्या गारठलेल्या थंडीतही एका ओळीत उभे राहिलेले... त्या बर्फाच्या वादळाची तमा न बाळगता बाणवलेली कडक शिस्त..!!!!
त्या वेळी काय वाटले हे शब्दांत व्यक्त करणं केवळ अशक्य आहे!!!!

सर्व वीर जवानांना माझा सलाम!!!!!

>>पण काल-परवा, एक नवीन (निदान

1

>>पण काल-परवा, एक नवीन (निदान माझ्यासाठीतरी) विडिओ पाह्यला... कुठेतरी लडाख किंवा तत्सम अतिथंड प्रदेशात जवानांनी झेंडा फडकवल्याच्या पार्श्वभूमीवर जन गन मनची धून वाजवली जात होती...

ह्याची लिंक दे प्लीज.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

अरे थेटरात पाहिला.. सापडतो का

2

अरे थेटरात पाहिला.. सापडतो का पाहाते यू ट्यूब वर!!!

सापडला रे.. अद्ययावत केला

3

सापडला रे.. अद्ययावत केला आहे...

सुरेख आहे शेवटचा.

4

सुरेख आहे शेवटचा.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

स्फुट आवडले .. जण-गण-मण

5

स्फुट आवडले ..
जण-गण-मण ऐकायला नेहमी आवडते .. पण फ्याण्सी पणा नको वाटतो ..
अशीच एक साधी अ‍ॅड आहे .. "स्कुल चले हम " ची ... एकदम जबरा आहे हास्य

+१ सहमत!!! एकदम गोड अ‍ॅड आहे

6

+१ सहमत!!!
एकदम गोड अ‍ॅड आहे ती!!

+२

7

सहमत.


-पुण्याचे पेशवे

+३

8

सहमत.

मस्त आहे ती शेवटची चित्रफीत.

9

मस्त आहे ती शेवटची चित्रफीत.

म.क. जी सुंदर

10

व्हिडीओ आहे. तो माझ्या पी.सी. वर डाऊनलोड करता येइल का? कसा करायचा?


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

दुवा या दुव्यावरून यूट्यूब

11

दुवा

या दुव्यावरून यूट्यूब डाऊनलोडर उतरवून घ्या.. नंतर कोणताही यूट्यूबवरचा विडिओ डाउनलोड करता येईल.. अथवा तुमच्याकडे रिअल प्लेयर १०+ असेल तर तिथेच वरती डाउनलोड असा पर्याय येतो..

माहीती

12

बद्दल धन्यवाद हास्य


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

आता कुठे आहे?

13
सिनेमागृहात सिनेमा चालू होण्या आधी राष्ट्रगीत दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे....

राष्ट्र गीत चालु असताना त्याचा उभे राहुन त्याचा सन्मान करायचा असतो. सिनेमागृहात त्याचा अवमान होउ लागल्याने तो प्रकार बंद झाला.
(अपवाद वगळता )राष्ट्र गीत हे केवळ कर्मकांड झाले आहे. राजकारणात त्याचा उपयोग राष्ट्रभक्तीचे चलन म्हणुन होतो. एके काळी राष्ट्रगीताने राष्ट्रभक्तीचे रोमांच अंगावर उठत असत. गेले ते दिन गेले!
सरकारी कार्यालयात झेंडा फडकवणे हा कर्तव्याचा भाग असतो. शासकीय नोकराने झेंडावंदनाला उपस्थित राहिले नाही तर शिस्तभंगाची कारवाई होउ शकते.
कालानुसार राष्ट्रगीताचे महत्व टिकवुन ठेवण्यासाठी त्याल ग्लॅमरची जोड आवश्यक आहे. विश्वबंधुत्वाच्या वा जागतिकिकरणाच्या लाटेत राष्ट्र ही संकल्पनाच संकुचित होत चालली आहे.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

>>>सिनेमागृहात त्याचा अवमान

14

>>>सिनेमागृहात त्याचा अवमान होउ लागल्याने तो प्रकार बंद झाला.

नाही हो.. मी आता परवाच पाहिला सिनेमा.. प्रत्येक सिनेमाच्या आधी राष्ट्रगीत असते अजूनही!!

नाही ...

15

आम्ही बहुतेक दर आठवड्याला सिनेमा पाहतिओ.
इथल्या १-२ थेट्रात वगळता कुठेच राष्ट्रगीएत वाजवत नाहीत ( आय थिंक बिल सिनेमाज आणि आयनोक्स चेनमध्ये ते वाजवतात, बाकी ठिकाणी शंख आहे ).
मागच्या वेळी "फन सिनेमा" च्या मॅनेजमेंटपाशी आम्ही लेखी तक्रार देऊन आलो होतो, आता वाजते का ते माहित नाही.

नाय रे. इकडे बर्‍याच ठिकाणी

16

नाय रे. इकडे बर्‍याच ठिकाणी वाजवतात. आणि लोक उभे पण राहतात. मध्यंतरी नटरंग पहायला गेलो होतो. एक गुटरगू जोडपं राष्ट्रगीताला उभं राहीलं नाही म्हणून पब्लिक नी त्यांचा उद्धार केला. शेवटी वरमून ते जोडपं चित्रपट न पाहताच निघून गेलं हे आठवलं. (हां आता चालूद्यात अभिव्यक्तिच्या गप्पा)


-पुण्याचे पेशवे

राष्ट्र म्हणजे काय ?

17

राष्ट्र म्हणजे काय ?

आपण एकत्र राहिल्याने आपला

18

आपण एकत्र राहिल्याने आपला भरपुर विकास होईल आणि आपण एक महासत्ता होऊ ह्या भ्रमात असलेल्या माणसांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय.
राष्ट्र म्हणजेच 'आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे' अशी स्ट्रॅटेजी ठेऊन वेगवेगळ्य प्रातांनी "अखंडतेचा" नारा देणे होय.

बाकी नंतर ( जर हे पचनी पडत असेल तर )

हॅ हॅ हॅ पचनी ? दगडं पचवतो

19

हॅ हॅ हॅ

पचनी ? दगडं पचवतो आम्ही तिथे तुम्ही तर आमचे दोस्त... बोला बोला... मनात असेल ते बोला आणि मनात जे सांगायचे नसेल तेही बोला... बाकी पहिले दोन वाक्य सहमत.. पुढचं येवु द्या सवडीनुसार

हा पीयच डी चा ईषय आहे.

20

हा पीयच डी चा ईषय आहे. राष्ट्रापेक्षा महाराष्ट्र मोठे!


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

छ्या ...

21

अहो पकाकाका "इंदिरा इज इंडिया" वाले राष्ट्र आहे आपले, कुठे तुम्ही त्यासमोर महाराष्ट्राच्या बाता ( पक्षी : वार्ता ) करता ?

हा शेवटचा व्हिडिओ... जबरदस्त

22

हा शेवटचा व्हिडिओ...
जबरदस्त आहे...
बाकी मुंबईतल्या.. बिग सिनेमाज, सिनेमॅक्स, फेम सिनेमास... ईत्यादी चेन मधे तर चित्रपटाच्या सुरवातीला राष्ट्रगीत वाजवतात..

जागतिकिकरणाच्या लाटेत राष्ट्र ही संकल्पनाच संकुचित होत चालली आहे.
असहमत... The world is flat ही संपल्पनाच हळुहळु पटत नाहिए...


-निखिल

निख्याशी बदिस(बर्‍याच

23

निख्याशी बदिस(बर्‍याच दिवसांनी सहमत)
मला पण the world is flat हे आजकाल पटत नाहीये.


-पुण्याचे पेशवे

विश्वबंधुत्वाच्या वा

24

विश्वबंधुत्वाच्या वा जागतिकिकरणाच्या लाटेत राष्ट्र ही संकल्पनाच संकुचित होत चालली आहे.

विश्वबंधुत्व ? हॅ हॅ हॅ
जागतिकीकरण ? हे तर अ‍ॅग्लोसॅक्सनांनी केलेले तिस-या जगाचे अगतिकीकरण

बाकी सवडीने

+१

25

>>विश्वबंधुत्व ? हॅ हॅ हॅ
+१, नान्याबाशी सहमत ...

बाकी हे 'ग्बोबल व्हिलेज / वर्ल्ड इज फ्लॅट' वगैरे ऐकले की हसु येते.

एक आठवण सांगतो.
असा मी असामी मध्ये धोंडोपंतांचे वडिल त्यांना म्हणतात "अरे तो विश्वंभरकाका कोण, नातेवाईकच ना तुझा, कोणी फिरंगी तर नव्हता. घातली ना त्याने इस्टेट त्याने घशात. बंदा रुपाया हाच देव, काय समजलास बेंबट्या ? "

सर्व वीर जवानांना माझा सलाम!!!!!

26

सर्व वीर जवानांना माझा सलाम!!!!!

सर्व वीर जवानांना माझा

27

सर्व वीर जवानांना माझा सलाम!!!!!

कालानुसार राष्ट्रगीताचे महत्व टिकवुन ठेवण्यासाठी त्याल ग्लॅमरची जोड आवश्यक आहे>.
हे ही तितकेच सत्य ....

सिनेमागृहात सिनेमा चालू

28

सिनेमागृहात सिनेमा चालू होण्या आधी राष्ट्रगीत दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे....
मला तरी ही माहिती नवीनच आहे. गेल्या काही वर्षातच सुरू झाल्याची शक्यता वाटते.

नाही... उलट ही प्रथा फार जुनी

29

नाही... उलट ही प्रथा फार जुनी आहे आणि गेल्या काही वर्षात बंद पडली आहे... पण नुकताच पुण्यात ३ इडियट्स बघितला कोथरूड सिटी प्राईडला तेव्हा मात्र त्या मराठी कलाकारांनी म्हणलेले राष्ट्रगीत दाखवले. छान वाटले. राष्ट्रगीत सुरू होताच प्रत्येकजण आपोआप उठून उभा राहिला. माझी मुलगी आपण होऊन ते शब्द म्हणत होती. !!!

राष्ट्रगीत बरेच जण म्हणतात..

30

मी इक्बाल सिनेमा वांद्र्याला जी-७ च्या कुठल्या तरी थेटरात पाहिला.. तिथे 'केसरिया है रूप मारो' वाली सुनिथा पण सिनेमा पाहायला आली होती.. एक दोन चार मुला-मुलींचा ग्रुप होता, ते लोक राष्ट्रगीत चालू असताना खिदळत होते.. गाणं संपल्यासंपल्या या सुनिता बाईंनी त्यांना जाम झापलं होते.. इतकी रागावली होती की फक्त कानाखाली वाजवणंच बाकी होते..

असा किस्सा सायनच्या सिनेमॅक्स मध्ये झाल्याचंही वाचनात आलं होतं... थोडक्यात, अवमान करणारी मंडळी आहेत, पण त्यांना धडा शिकवणारे नि सामाजिक जाणीवा असलेले लोक पण आहेत!!!

>>नाही... उलट ही प्रथा फार

31

>>नाही... उलट ही प्रथा फार जुनी आहे
अच्छा, मला तरी कधीही बघण्यात/ऐकण्यात नाही. पण ह्या प्रथेमागचे कारण काही लक्षात येत नाहीये. आता एखादा देशभक्तीपर चित्रपट असेल तर हरकत नाही पण अगदी कुठल्याही सिनेमाला असेल तर जरा अवघड आहे.

राष्ट्रगीत

32

पण काल-परवा, एक नवीन (निदान माझ्यासाठीतरी) विडिओ पाह्यला... कुठेतरी लडाख किंवा तत्सम अतिथंड प्रदेशात जवानांनी झेंडा फडकवल्याच्या पार्श्वभूमीवर जन गन मनची धून वाजवली जात होती...

हा व्हिडिओ पाहताना अंगावर आणि मनावरही काटा आला..
स्वाती