कार्तिक कॉलिंग कार्तिक

0
0

एक वेगळा चित्रपट अथवा थरारक चित्रपट असे नाही म्हणता येणार पण "कार्तिक कॉलिंग कार्तिक" नक्कीच पाहण्यालायक चित्रपट आहे हे नक्की. शेवट पर्यंत काय घडत आहे हे पाहण्याची उत्सुकता टिकून राहते मध्येच काहीवेळ चित्रपट स्लो होतो पण ओके नियमीत वेग पुन्हा येतो.

हा चित्रपट कार्तिक नावाच्या एका व्यक्तीवर अवलंबून आहे हे नावावरुन समजतेच हा कर्तिक साधा सुधा, एका कंपनीत काम करत असलेला, शोनाली ( सोनाली - असावे) वर जिवापाड प्रेम करत असलेला व प्रचंड हुशार असलेला पण लहानपणी घडलेल्या एका घटनेमुळे आत्मविश्वास नसल्यासारखा. त्यामुळे त्याला कोणी मित्र नाहीत व कोणीच त्याला समजवून घेत नाही उलट त्याच्याकडून जमेल तेवढा फायदा उचलणे असे घडत असल्यामुळे तो निराश झालेला असतोच पण जेव्हा ज्या सोनालीव्रर तो प्रेम करत आहे एका प्रसंगात तीच्या एका वाक्यात त्याला कळते की गेली चार वर्ष जेथे हा काम करत आहे तेथे तीला त्याची उपस्थीती देखील जाणवलेली नाही व हा आत्महत्या करण्याचे ठरवतो... घरी झोपेच्या गोळ्या घेण्याच्या तयारीत असतानाच जेव्हा फोन वाजतो... व समोरच्या त्याला सांगतो की तो पण कार्तिकच आहे...... तो तोच आहे जो हा आहे... ह्याची खात्री पटवून देण्यासाठी तो काही गोष्टी ज्या फक्त कार्तिकलाच माहीत आहेत त्या सांगतो..

ह्या क्षणापासून चित्रपट वेगवान होतो व पाहण्यालायक होतो. तो कार्तिक ( फोनवाला) ह्याचा पुर्ण आत्मविश्वास परत उभारुन ह्याचे जिवन सुखकर बनवण्यासाठी फोन वरुनच ह्याला मदत करतो व त्याच्यामुळेच ह्याचे प्रेम देखील यशस्वी मार्गावर येतं. येथे पर्यंत चित्रपट एका नेहमीच्या मार्गावर चालू असतो व फोनवाल्या कार्तिक ने ह्याला सांगितले असते की कोणाला ही माझे अस्तित्व सागू नकोस... पण हा सोनालीला सांगतो व ती त्याला वेड्यात काढते... व चित्रपट एकदम बदलतो... सर्वकाही गोड गोड चाललेले एकदम वेगळे होऊन जाते... हे सर्व तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल की काय घडतं पण एकदा पाहण्यास काही हरकत नाही असा हा चित्रपट आहे हे नक्की.

फरहान अख्तर व दीपिका पादुकोण ह्यांचा अभिनय उत्तम आहे पण तरी ही पुर्ण चित्रपटामध्ये फरहानच नजरे समोर राहतो व चित्रपट देखील ह्याच्या भोवती फिरत असल्यामुळे हे २ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची अभिनय क्षमता हवी ती फरहानकडे नक्कीच दिसून येते त्यामुळे हा चित्रपट पाहणे देखील सुसह्य होते. चित्रपटातील काही दृश्य तर अतिशय उत्तम पध्दतीने साकारली गेली आहेत असे जेव्हा जेव्हा फोन वाजतो तेव्हा तेव्हा फरहान च्या वागण्यात, चेहर्‍यावर, डोळ्यात येणारे हाव भाव अतिशय योग्य पध्दतीने टिपलेले आहेत.

आपल्याकडील चित्रपटात हमखास छोट्या मोठ्या चुका राहतात मग तो ३ ईडियटस असो वा माय नेम ईज खान असो, पण हा चित्रपट पाहताना असे काही कच्चे दुवे सुटलेले आहेत असे वाटत नाही अथवा कुठली गोष्ट अशक्य कोटीतील वाटत नाही हेच ह्या चित्रपटाचे यश.

एकदा नक्की पाहू शकता ते ही सहकुटुंब बसून पाहता येईल असा चित्रपट आहे हा नक्कीच.. !

अजून पूर्ण पाहिला

1

अजून पूर्ण पाहिला नाही...
त्यामुळे चित्रपटाबद्दल काही जास्त बोलत नाही... पण फरहानचे सिनेमे चांगले असतात हे खरे!!!
पुढचा प्रतिसाद सिनेमा पूर्ण पाहिल्यानंतर देते...

बघतो रे पिच्चर...

2

बघतो रे पिच्चर...

बघायचाय हे नक्की.. फक्त

3

बघायचाय हे नक्की.. फक्त थेटरात जाऊन बघावा का? हा प्रश्न आहे


-ऋ

थेटरात जाऊन बघण्यास काही हरकत

4

थेटरात जाऊन बघण्यास काही हरकत नाही एक वेळ चित्रपट सुसह्य आहे wink

* इफेक्ट चांगले आहेत डार्क शेड मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट आहे व तो चांगलाच परिणाम दाखवतो त्यामुळे मोठ्या पडद्यावर पाहताना मज्जा येते.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ओक्के

5

धयु!, बघु आजच संध्याकाळी तिकेटे मिळाली तर


-ऋ

>>>डार्क शेड मध्ये

6

>>>डार्क शेड मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपट आहे

खरंय...
मला त्याचमुळे बोअर व्हायला झालं होतं...

बोअर करतो मध्ये मध्ये चित्रपट

7

बोअर करतो मध्ये मध्ये चित्रपट नाही असे नाही पण त्या डार्कशेड मुळे नक्कीच चांगला इफेक्ट पडतो काही दृष्यामध्ये.. जसे तो त्या लेडी डॉक्टर ला घरी घेउन येतो ... अथवा दिपिका व तो त्या फोनची वाट पाहत असतात ते दृष्य... अतिशय उत्तम साकारले गेले आहेत..


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

नको ...

8

नुसते "दिपीकाचे हॉट लुक्स" मोठ्ठ्या पडद्यावर पहायचे सतील तर थेट्रात जावा बाबा wink
अन्यथा काही गरज नाही, रामुच्या डार्क शेड्स टॅक्टिस आणि फरहानची चांगली अ‍ॅक्टिंग ह्यामुळे सिनेमाबर्‍यापैकी सुसह्य होतो मात्र तो फार भारी आहे असे नाही.
डायरेक्शन मात्र छान आहे.
अगदी प्रसंग रंगवणे आणि व्यक्तिरेखा बांधणे ह्या बाबी समाधानकारक आहेत.

मात्र आम्हाला धमालरावांचे एक वाक्य आवडते " अहो १ तास चक्कर मारायची म्हणुन आपण थोडीच घोडा विकत घेतो ? ".
तेव्हा थेट्रात जावे की नाही तुम्हीच ठरवा, मी नको असे सांगेन !

- (कार्तिकपायी चक्क १०६० रुपायांची फोडणी बसलेला ) डॉन्या रडिंग डॉन्या

हॅ हॅ हॅ ..... नेटबाबा की जय

9

हॅ हॅ हॅ ..... नेटबाबा की जय हो wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

फरहान..

10

फरहानचे सिनेमे थोडे हटके असतात,
कार्तिकला भेटायचे आहे, बघू कधी जमते ते..
स्वाती

ऑनलाईन आला पण असेल बॉ

11

ऑनलाईन आला पण असेल बॉ wink


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

कार्तिक..

12

आला आहे ऑनलाइन, पाहिला.. नेहमीपेक्षा वेगळा वाटला.
सुरुवात ग्रिपी आहे पण त्याचे फोनवर स्वतःच बोलून रेकॉर्ड करुन ठेवणे, त्याचे स्किझोफ्रेनिक असणे.. हे सगळे जरा गुंडाळलेले वाटले, ते थोडे जास्त परिणामकारकपणे मांडायला हवे होते असे वाटले.
पण चित्रपट एकंदरीत आवडला.
स्वाती

कार्तिक का कार्थिक डार्कशेड

13

कार्तिक का कार्थिक
डार्कशेड thinking ते काय अस्त आणि

कार्तिक बरोबर आहे... *

14

कार्तिक बरोबर आहे... हास्य

* डार्कशेड - व्यक्ती व वस्तू सोडून बाकी सगळा नेपथ्य हा काळ्या किंवा ग्रे कलर मध्ये ठेवणे जेणे करुन विष्य वस्तू वर लक्ष केंद्रित रहावे दर्शकाचे ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे रामगोपाल वर्माचे चित्रपट.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पाहायचा तर आहे...

15

पाहायचा तर आहे...


-निखिल

छान आहे !

16

छान आहे !

आवडला

17

पाहिला छान आहे. ह्या विषयावर मराठीत चित्रपट येऊन गेले आहेत. बाकी ’उफ तेरी अदा’ ह्या गाण्यात दिपिका ढासू दिसते.. हास्य

संयमीत परीक्षणाबद्दल

18

संयमीत परीक्षणाबद्दल आभार...........हास्य


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते