एका पुस्तकात हिंदी कवी चंद्रकांत देवताले यांच्या हिंदी कवितेचा अनुवाद वाचला. इतक्या वर्षांच्या वाचनानंतर सुद्धा काहीतरी स्पर्शून गेले. आपल्या मित्रांनाही हे कळावे म्हणून इथे उधृत करतो.
"थोडीशी मुलं आणि बाकीची मुलं"
थोड्याशा मुलांसाठी
एक बाग आहे
त्यांची पावले हिरवळीवरून धावताहेत
असंख्य मुलांसाठी
चिखलमातीने आणि घाणीने बरबटलेल्या
गल्ल्या आहेत ज्यांत ते
आपले भविष्य वेचताहेत
एक मेज आहे
फक्त सहा मुलांसाठी
आणि त्यांच्यासमोर
तितकीच अंडी आणि तितकीच सफरचंदं आहेत
एक भाकरीचे टोपले आहे शंभर मुलांसाठी
आणि हजारो मुले
एका हातात ठेवलेली अर्धी भाकरी
दुसर्या हातानं तोडताहेत
फक्त काही मुलांसाठीच
एक आकर्षक शाळा
आणि प्रसन्न पोषाख आहे
बाकी मुलांची गर्दी
झोपड्यांच्या नशीबात अडकून पडली आहे.
त्यांच्या फाटक्या चड्ड्या
त्यांना सरळ उभे राहू देत नाहीत
ढीगभर मुलं बिड्यांची थोटकं शोधताहेत
ढीगभर मुलं हॉटेलात कपबशा घासताहेत
त्यांचे चेहरे कोकरासारखे करुण आहेत
आणि त्यांच्या हातापायांचे कातडे
हातापायांची सोबत सोडत आहे.
वर्तमानपत्राच्या चेहर्यावर ज्यावेळी
तीन मुले आईस्क्रीम खात हसताहेत
त्याच वेळी
वीस पैशांत सामान वाहून नेण्यासाठी
लपंडाव करणार्या मुलांच्या ढुंगणांवर
पोलिसांच्या वेताच्या छड्या आदळताहेत.
देव असता तर एवढ्या वेळात त्याचे शरीर कोडाने
झडू लागले असते. सत्य असते तर त्याने आपल्या
न्यायासनातून उतरून जळत्या सळ्या डोळ्यांत
खूपसून घेतल्या असत्या. सौंदर्य असते तर त्या सौंदर्याने
चेहर्यावर तेजाब ओतून घेऊन ते अंधार्या आडात बुडाले असते.
इथे दृष्यात फक्त काही छापलेले शब्द आहेत
चमचेगिरीच्या घमेल्यात वळवळणार्या जिभा
आणि डोक्यात काळ्या गणिताची पुरवणी आहे
कठीण चेहरे आहेत चौरस्त्यावर ताणलेले
दगडांवर कोरलेली सुभाषिते आहेत
आणि पाच मुले तबला वाजवत आहेत ,
दोन मुले सतार शिकत आहेत,
एक मुलगी कथ्थक करताना नाचत-ठुमकत आहे.
आणि भाराभर मुली
शेण-लीद शोधून झाल्यावर
अंधारात
दबून बसल्या आहेत
मुली नदी-तळी-विहीरी
घासतेल-काड्याची पेटी-गळफास
शोधताहेत
आणि नेमक्या याच वेळी
एक मुलगी चेहर्याच्या कोमलतेबाबतचे
उपाय सांगते आहे आकाशवाणीवर
आणि असंख्य मुले
काळोखाच्या बोगद्याकडे
धावत सुटली आहेत
त्यांच्या आठवणीत या वेळी
आक्रोश , रडणे
आणि गयावया करणे यातून आलेली हिंसा आहे
त्यांच्या डोळ्यांत
कालच्या ओढाताणीचा आणि धावपळीचा
पुरवणी इतिहास आहे
त्यांच्यात शब्दहीन भीती
आणि फक्त जखमी आज आहे
पण कदाचित त्यांना अजून माहिती नाही
ते करोडो निवासी आहेत या पृथ्वीचे
आणि त्यांच्याजवळ आवाजांचा महासागर आहे
जो एखाद्या लहानशा फुग्यासारखा
फोडू शकतो कुठल्याही वेळी
काळोखाचा सगळ्यात मोठा बोगदा.
(अनुवाद : श्री. चंद्रकांत पाटील; तिची स्वप्ने; पॉप्युलर प्रकाशन)
सलाम
सलाम. नेमके टिपले आहे. आजचे(ही) वास्तव हेच आहे.
रसग्रहण कराच
फारसे काही वेगळे वाटले नाही. आता याला गोठलेल्या संवेदना इ इ म्हणु नका हां.
विदारक !!
विदारक !!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
असेच म्हणतो ...
विदारक सत्य !!!
छान
अनुवाद
मुक्तसुनीतजी
आमच्या झापडलेल्या डोळ्यांसमोर दाहक वास्तव आणलत..........
खुपसुंदर अनुवाद (मुळकाव्य वाचायलाही आवडेल). मुळ कवी, अनुवादक तसेच आपले पण कौतुक आणि आभार.
वर्षानुवर्ष बंद झापडलेल्या,

आमच्या बधीर डोळ्यांना,
अशि कविता जागवेल का?
खाडकन उघडण्याची सवय नाही त्यांना.
फार तर किलकिले करुन पाहु,
आणि परत ओढुन घेउ कातडी... सवयी प्रमाणे.
नशेबाज आम्ही, जगु आमच्याच धुंदीत,
पहाट,सकाळ वगैरे,
व्ह्ययचे तेंव्हा होउद्या............ जयॅद्र पाटील (जयपाल)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
भयानक वास्तव.
ह्म्म्म आयुष्याची एक वेगळीच
ह्म्म्म
आयुष्याची एक वेगळीच बाजु.
आयुष्याची एक वेगळीच बाजु.
आयुष्याची एक वेगळीच बाजु.
-निखिल
!
!
मी माझ्या आयूष्याला होळीच
मी माझ्या आयूष्याला होळीच म्हणत असतो
धडाडून पेटलेल्या वर्तमानाच्या धगीला ऊब म्हणत असतो
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
चंद्रकांत देवतालेंच्या कविता
चंद्रकांत देवतालेंच्या कविता खरोखरच 'त्रासदायक' असतात. फारच छान लिहितात ते. इथे त्यांच्या दोन महत्त्वाच्या कवितांचा दुवा आहे. त्याही नक्की वाचा.
हा आमचा स्वभाव
भोचक साहेब, दुव्यासाठी
भोचक साहेब,
दुव्यासाठी धन्यवाद राव.
माँ जब खाना परोसती थी हे वाचले होते आधी कधीतर ! तुमच्या मुळे परत वाचावयास मिळाली... धन्यु !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
त्रास होतो आणि झालाच ...
त्रास होतो आणि झालाच ...
असेच
त्रास होतो आणि झालाच ..
स्वाती
त्रास
एकदा दुवा उघडला आणि उगा त्रास कशाला म्हणून न वचताच बंद केला.. परत उघडून वाचला.. आणि त्रास झाला
-ऋ