रेज

0
0

दर आठवड्याला दोन दा तज्ञांकडुन तपासणी.
शाळेच्या जाहिरातीतील एक वाक्य.
कुतुहल वाढले.
बघुया काय प्रकार आहे ते.
फोन लावला.
समोर ज्या कुणी अधिकारी होत्या त्याना प्रश्न विचारला.
"कसली तपासणी हो? ती सुद्धा आठ्वड्यातुन दोन दा"
We talk to students to find out any presence of uncontrolled rage, dent in personality not noticed by parents.
कुठल्या यत्तेतील?
From first standard onwards, बाई म्हणाल्या.
कसले प्रश्न? उदाहरण म्हणुन एखादा सांगा.
Like Who is your favourite actor.?
एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर?
We conclude that the child is having tilt towards violence.
कोण आहेत हो ट्रस्टीज. चरणामृत घेईन म्हणतो.
............................................................................................................................
"काय हो रेज म्हणजे काय"?
मनासारखे झाले नाही की होणार्‍या संतापाचा स्फोट. हा शब्द तुला का सुचला?
"अहो, ती सातव्या माळ्याची आली होती. तिच्या मुलाला काहीतरी रेज नावाचा मानसिक रोग आहे असे शाळेत सांगितलय."
हे निदान कशावरुन झाले.?
"अहो, तो आणलेली खेळणे दोन दिवसात मोडतो असे तीने शाळेतल्या पालक सभेत सांगितले. तेंव्हापासुन दर आठवड्यात त्या लहानग्या मुलाची दोन दा तपासणी होते. हे बरोबर आहे का"?
मला विचारु नकोस. नाहीतर मी वायोलंट होईन

ते काय ते

1

पोकल बांबू का काय ते कुठे ठेवले आहेत? हास्य

असो संपुर्ण चित्र बाहेर आले असे वाटत नाही पण तुमच्या ठाण्यात एकंदर कठीण आहे.

चित्र

2

संपुर्ण चित्र नको रे बाबा.
फुकटचा जाळ वाढतो.
एडीटेड वर्जन.

तिच्यायला...

3

एकेकाच्या अकलेची रेंज... दुसरं काय?
बरं, शाळांनी ह्या डाक्टरांना/समुपदेशकांना ठेवण्याचे पैसे देण्यासाठी फीमध्ये किती वाढ केली?

बरं, शाळांनी ह्या

4

बरं, शाळांनी ह्या डाक्टरांना/समुपदेशकांना ठेवण्याचे पैसे देण्यासाठी फीमध्ये किती वाढ केली?
जबरा प्रश्न...
चला अँगर मॅनेजमेंट च्या ट्रेनिंगला जावे...


-निखिल

अरेरे...

5

असे झाले तर भविष्यात 'राडेबाज' कसे तयार होणार?

(खिन्न) शांताराम

ह्ह्म्म्म.....

6

ह्ह्म्म्म्म......

Oups

आयला ही तर एक

7

नविनच भनगड. रेज हा शब्द या संस्थाळावर प्रथम वाचला तो "रेज कुत्रे" या संदर्भात पण हे प्रकरण तर त्याही पेक्षा भयानक वाटते आहे

"एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर?
We conclude that the child is having tilt towards violence."

आया आया आय्य्य्य्य्या धमु त्यांनी आपली टेस्ट घेतली तर रे......


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

हा हा हा...

8

दाद्या...मग ठाणा हॉस्पिटल फिक्सच....आपल्यासाठी नाय...त्यांच्यासाठी wink

-(राजशेखरचा फ्यान) ध.

कठीण आहे! असल्या शाळांमधे

9

कठीण आहे!

असल्या शाळांमधे पालक आपल्या पोरांना घालतातच का आणि घातलं तर पुढे शाळा बदलत का नाहीत? Outrageous!

अदिती

उत्तरः फ्याशन!

10

मिरवायला मिळतं....आमचं लेकरु 'अमुक अमुक' शाळेत जातं!

आपले स्नेही

11

सुहासजी यांची प्रतीक्रीया वाचायला आवडेल.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

फेटिश

12

काही लोकांना शिस्त, अभ्यास वगैरेंचं फेटिश असतं.

मी प्राथमिक शाळेत असताना (मागच्या शतकातली गोष्ट) मधली सुट्टी हा मुलांचा हक्काचा खेळण्याचा तास. त्या काळी पी टी वगैरे प्राथमिक शाळेत नसे. त्यामुळे मधली सुट्टीच खेळण्याची. आम्ही सारे खेळ खेळत असू. पण आमच्या शाळेत गोखले बाई म्हणून एक बाई होत्या (त्यांचे टोपणनाव मुलांनी पठाण ठेवलेले होते.) त्या आपल्या वर्गातील मुलांना मधल्या सुट्टीत खेळायला सोडत नसत. आणि मधल्यासुट्टीत सोडवायला फळ्यावर गणिते Sad वगैरे देऊन जात. आम्ही कळण्याच्या वयातले नसूनही तेव्हा त्या वर्गातल्या मुलांची दया येत असे.

सांगण्याचा मुद्दा हा की या गोखले बाई 'चांगल्या' व 'शिस्तीच्या' म्हणून प्रसिद्ध होत्या आणि त्यांच्या वर्गात आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून पालक विशेष प्रयत्न करीत.

नितिन थत्ते

_/\_

13

जमलं तर आमचा साष्टांग पोचवा त्या बाईंनाही आणि त्या पालकांनाही!!

तिच्यायला...काय एकेक प्राणी असतात राव Sad

सुदैवाने माझ्या पालकांना

14

सुदैवाने माझ्या पालकांना असल्या गोष्टींचा गंध नव्हता. मी त्यांच्या वर्गात नव्हतो.

मधल्या सुट्टीत गणितं?!

15

आम्हाला दोन सुट्ट्या असायच्या छोट्या १० मिनिटाच्या सुट्टीत आम्ही निम्मा डबा खाऊन बसायचो आणि मोठ्या ४० मिनिटाच्या सुट्टीतल्या पहिल्या ५ मिनिटात उरलेला डब्बा संपवून खेळायला बाहेर! आम्ही आपापसातली सगळी गणितं थेट मैदानावरच सोडवली!! Big smile

एक काम करा म्हणावे..

16

एक काम करा म्हणावे.. त्यांना... मुले नको पैदा करु त्यापेक्षा मशीन करा ना पैदा. उगाच डोक्याला ताप नाही Sad


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

च्युत्यांचा बाजार आहे आणि

17

च्युत्यांचा बाजार आहे आणि असल्या च्युत्यांकडुन पैसे कमवतो मास्तर ? अरेरे मास्तरची दया येते मला ... जगायला काय काय करावं लागतं त्याला

पैसे आणि दया

18

अव्लियाजी यु हॅव बीन वेरी अनफेअर वीथ मी इन युअर कॉमेंट.

जाउ द्या हो गुर्जी ! नान्याला

19

जाउ द्या हो गुर्जी ! नान्याला 'रेज' झाला आहे.

+१

20

लक्ष नका देवु त्याच्याकडे... बहीसटलाय त्यो... Big smile

हे म्हणजे kalashnikov च्या

21

हे म्हणजे kalashnikov च्या licence application मध्ये 'घरांत कदाचित झुरळ होण्याची शक्यता' अस नमुद करण्यासारख आहे...


पुष्करिणी

>>>>>Like Who is your

22

>>>>>Like Who is your favourite actor.?
एखाद्या मुलाने मोगँबो म्हटले तर?
We conclude that the child is having tilt towards violence<<<<

मुलांचे व्यक्तिमत्व तपासण्याची सोपी पध्द्त खुप आवडली
माझ्या मुलाला सलमान खान आवडतो तर कनक्लुजन काय असेल बरे?

>>>>>तिच्या मुलाला काहीतरी रेज नावाचा मानसिक रोग आहे असे शाळेत सांगितलय <<<<<

हल्ली मेडीकल सायंस मधे खुप नवनवीन चिकित्सा पध्दती आलेल्या आहेत. मास्तर अद्ययावत नसल्यामुळेच
त्यांना आश्चर्य वाटत असावे.

संजा, ठाणे