माझा मराठवाडा : किल्ले अंतुर - १

0
0

गोविंदग्रजांच्या महाराष्ट्र गीतातील " कणखर देशा, राकट देशा, दगंडाच्या देशा " या ओळींची प्रचिती मला सदैव येत असते. मध्यंतरी औरंगाबादला काम निघाले होते, काम इतके अर्जेन्ट होते की मी ट्र्व्हल्स ने दीड तासाच्या पुणे-दर्शनाचा अलभ्य लाभ न घेता, डोक्यावर शिरस्त्राण धारण करुन सरळ बाईक ला किक मारली, दर दीड तासाच्या अंतरावर ब्रेक घेत-घेत औ.बाद ला पोचलो.काम संपले दुसर्‍या दिवशी, पण पुण्याकडे काही काम नव्हते. तिथुन कन्नड (हे माझे आजोळ) आणि तसच पुढे किल्ले अंतुर ला जायचे ही ठरले.

कन्नड ते नागापुरच्या रस्त्यावर एकदा सावरगांव सोडल की एक फाटा लागतो, त्या फाट्यावरुन आम्ही चौघै जण भिल्लांच्या वस्ती पाशी थबकलो. निर्जन रस्ता, शेजारी वन्य-प्राण्यांसाठी राखीव असलेले जंगल असल्यामुळे (येताना गौताळा अभयारण्यात, वरून दिसणार्‍या खोल दरीत रानडुकरांचा कळप पाहुन आलो होतो) मी उत्सुकतेपोटी विचारले. (लगे भाषा बदलत रहाती बरं का मयी , लगे औ.बाद ला पोचल्या-पोचल्या , लई ग्वाड, घ्या गुड !! )

" का रे भऊ, कही वाघ- बिघ दिसत रहात्या का इढं "

मला उत्तर आले .

" येव्ह्ढे नही रे भऊ, काल दुपारी एक बकरू मारलं तळ्यावर त्याहाने ! "

मी जिथे विचारले तिथुन तळं , पाच किमी लांब होते, आणि किल्ले अंतुर २५ किमी लांब , अर्थात त्या उत्तरात विनोदाचा भाग सोडला तर नवल नव्हतेच, नागापुरला आणि शेजारच्या ईतर गावांमध्ये ,कुटुंबातल्या प्रत्येकाने एकदा तरी वाघ पाहिला आहे, पाहिला तर मी पण आहे पण त्या वेळी एक तर तो तरी पिंजर्‍यात, किंवा मी पिंजर्‍यात किंवा कार मध्ये (याच गौताळा जंगलात आधी एक-दोनदा कार घेवुन गेलो होतो तेव्हा ही नजरेस पडला होता.)

त्याला नवल नव्हते हे मला नक्की होते, वाघ दिसो न दिसो , पण ते पुढचे २५ किमी पर्यंत बाईक मारावी की नाही या विचारात आम्ही पडलो, (येथे आम्हींची ओळख परेड देतोच आहे.) माझे ट्रेक/भटकंती चे काही नियम आहेत, पहिला म्हणजे स्वंय-सरक्षणासाठी शक्यतो नैसर्गीक संसाधने वापरायची, रॉकेल, गाडीसाठी पेट्रोल आणि पटदिशी मशाल पेटविता येईल अशी सर्व साधने बॅग मध्ये होतीच. येताना ३० किमी च्या घनदात जंगला ची वारी झालीच होती. मौसम पानझडी चा असला तरी, सागवान , चंदनाचा घमघमाट होता, जाताना काही चिंचा पाडल्या आणि खिशात आणि डिक्की त ही घातल्या.



त्या दिवशी आमचे नशीब जोरावर होते, कॅमेराचे सेल घ्यावेत म्हणुन नागापुरात शिरलो आणि नागापुर ला बाजार होता, बाजारात खादाडी केली.

na

.

तिथुन दुर्दम्य अश्या रस्त्यावर बाईक मारत-मारत गेलो !! अर्थात त्याची पण एक गंमत च आहे, रस्त्यावर , दुर-दुरपर्यंत चिटपाखरु नव्हते. जाताना एक खांब दिसला, त्यावर कोणती भाषा आहे ते कळेना च. ऊर्दु-सदृश्य आहे.
(जाणकार मिम-कर सांगतील अशी आशा आहे.)
.

.

.

.

.

आणि सरतेशेवटी किल्ला दिसला आणि त्या ही पुढे असे म्हणेन की अजुन खडतर प्रवासाला सुरुवात झाली. एका बाजुला खोल दरी, जंगल आणि नुसती पानांची सळ-सळ झाली तरी भिती वाटावी इतकी भयाण शांतता !!

.

.

.

.

.

क्रमश ::::::

{वाह सही रे... पण ते क्रमश:}

वाह सही रे... पण ते क्रमश: नाय बौ आवडलं, एकदम अधाशीपणे वाचायला आणि फोटो बघायला सुरुवात केली आणि शेवटी हे क्रमश: Sad

तीव्र निषेध... पुढचा भाग लवकर टाकणे, ह्या किल्ल्याची अजून माहिती वाचायला आवडेल हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{मस्त रे सुहास. सगळे फोटो}

मस्त रे सुहास.

सगळे फोटो बघताना किल्ला शोधत होतो... Sad

त्याची एकच झलक दिसली या सगळ्या फोटोंत

शेवटी क्रमशः बघून हायसे वाटले.
किल्ल्याचे भरपूर फोटू नाय टाकले तर धुडगूस घालेन Big smile

अवांतरः अशी भजी (आणि जिलेबी पण) दिसली की तोंड खवखवते... आज घरी रात्री बायकोला भजी करायला लावतो Evil


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{मस्तच रे... तो वठलेल्या}

मस्तच रे...
तो वठलेल्या झाडाचा फोटो कसला अल्टी आलाय यार...

फक्त एक फोटो अजिब्बात म्हणजे अजिब्बात म्हणजे अजिब्बात नाय आवाडला Evil
फुल्डा भाग लोकर यिवु द्या wink


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{सगळ एका दमात टाक की भावड्या}

सगळ एका दमात टाक की भावड्या



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{शक्य असेल तर पुढच्या भागात}

शक्य असेल तर पुढच्या भागात तिथल्या भाषेचे अजून काही नमुने येऊ द्या!

{कोण कोण होता रे, का एकटाच}

कोण कोण होता रे, का एकटाच गेला होतास उंडगायला? wink


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"