हौसमेट्स

0
0

गेल्या नोव्हेंबर मध्ये कामानिमित्त एका एकदम छोट्या खेड्यात जाव लागल, काम वाढल आणि वाढतच गेल. किती दिवस हॉटेल मध्ये राहायच म्हणून घर / खोली पहावी म्हणून इंटरनेट वर जाहिराती पहाण सुरू केल, पण २-३ दिवस आजिबातच 'नो लक' ..४ थ्या दिवशी एका घरातली १ खोली रिकामी असल्याची जाहिरात सापडली. भाषेची अड्चण असल्यान ऑफिसमधल्या एका बाईंना दिलेल्या फोन वर बोलून appointment घेण्याची विनंती केली, वेळ ठरली पण परत भाषेची अड्चण, पण त्यांनीच उदारपणे माझ्याबरोबर येण्याची तयारी दाखवली.
ठरल्याप्रमाण आमची वरात घरमालकांना भेटायला निघाली, माझ्या बरोबरच्या बाईना अस घर share करता येत ही माहिती जरा नविन च होती, अन ठरल्याप्रमाण घरमालक भेट्ले. घरमालक ७०-७२ वर्षाचे उंच, गोरे आणि 'राणी मुखर्जी' डोळे असणारे इराणी आजोबा. एकदम गोड बोलून स्वागत केल, पिस्ते-बिस्ते खायला दिले ( मी लगेच थोडे घेतले ), बाई आजोबांवर कमालीच्या खूष, आजोबांना थोडे इंग्रजी शब्द येत होते त्यामुळे माझ्याद्रुष्टीनंही प्लस पॉइंट होता. घर दाखवण्याचा कार्यक्रम यथासांग पार पडला, ३ मजली ठीक ठाक घर ( २ मजले आणि १ तळमजला ) राहणारे ६ जण आणि कार्लो ( शेजार्‍यांच गुबगुबीत मांजर ), घरभर आजोबांचे आणि त्यान्च्या मुलान्चे फोटो टांगलेले. मीही लगेच जास्त नखरे न करता (पूर्वानूभावामुळं) लगेच घर पसंत करून टाकल. माझ्याबरोबर आलेल्या बाईंनी भाडं वगैरे ठरवून contract फायनल केल. माझ्या मजल्यावर ३ खोल्या + १ स्वयंपाकघर त्यात आजोबा , एक रूमेनियन काका , मी आणि कार्लो अस सेटिंग झाल.
मी हॉटेल ला कंटाळल्यामुळ लगेच संध्याकाळीच घरी मूव्ह केल, आजोबांनी माझ स्वागत १ किलो बासमती च पाकिट देऊन केल. थोड स्थिरस्थावर झाल्यावर आजोबा आले गप्पा मारायला , माझ्या इतर ठिकाण्च्या नेहमीच्या अनुभवाप्रमाण त्यांनीही भारतातील हत्ती, घोडे, नाग, साप इ. महत्वाच्या गोष्टींवर मोर्चा वळवला..मी ही लगेहात 'तुमचा उंटावरचा फोटो कुठे दिसत नाही' अस म्हणून आमच्या भाडेकरू-घरमालक या नात्याचा श्रीगणेशा केला. आजोबांची बरीच चिड्चिड ( मला तेच हवं होत ) . त्यांनी मग मला आता इराण मध्ये लोक उंटावर बसत नाही, इराण किती मॉडर्न आहे हे सांगितल. मी ही मिष्किल पणे हसत हो का, मला माहितच नाही अस म्हट्ल, तेव्ह्ड्यात रूमेनिअन काका कामावरून आले, माझ्याशिवाय त्यांना अजून २ भारतीय माहित आहेत अस म्हणाले: इंदिरा गांधी आणि राज कपूर; हया लोकांच्या पंक्तीला मला बसवल्यामुळे अर्थातच माझा स्वतः बद्द्लचा आदर अचानक द्विगुणीत झाला, त्यांच सर्वात आवड्त गाण म्हण्जे 'आवारा हू' लगेच त्यांनी गुणगुणून दाखवल. आत्तापर्यंत च्या त्यांच्या माहितीनुसार इंदिरा गांधी ही एक बॉलेवूड्ची नटी आहे असा त्यांचा समज आहे , मी त्यांना तस नाही हे सांगायचा जीव तोडून प्रयत्न केला ( अजूनही चालू आहे ) पण प्रकरण जरा अवघड आहे, ते मान्य करायला तयारच नाहीत.
दुसर्‍यादिवशी मी कंपनीत जाताना स्वयंपाकघरात एक अगदी हुबेहूब घरमालकासारख्या दिसणार्‍या पण निळ्या डोळ्याच्या व्यक्तीला पाहिल्..थोड विचित्र वाट्ल कारण आजोबांनी या माणसाबद्दल काही सांगितल नव्हत्..मी हॅलो म्हणून पुढे निघतेय तर मला नावान हाक मारली, आवाज घरमालकाचाच्..मी चमकले पण म्हट्ल काल मला त्यांचे डोळे उगाचच 'राणी मुखर्जी' वाटले, निळेच असतिल्...पण तिसर्‍या दिवशी निळ्याचे घारे नंतर काळे असा सारखा डोळ्यांचा रंग वेगवेगाळा दिसायला लागला..भिती वाट्ली थोडी..मला भिती वाट्ली की लगेच हॉरर पिक्चर आठवतात...मी शेवटी त्यांना मनाचा हिय्या करून विचारल तर भुताट्की वगैरे सोडा पण आजोबा फारच फॅशनेबल निघाले ..ते रोज वेग्वेगळ्या रंगांच्या लेन्सेस वापरतात.
या सुरूवातीच्या १-२ दिवसांत मी कार्लोला भरपूर दूध्-दही-चीज्-लोणी अस खाऊ घालत होते, कार्लो पण खूश होता..पण शेजारीण चिडली, कार्लो डाएटिंग वर होता..आणि माझ्यामुळ त्याची वाट लागली होती..मला घरमालक आजोंबांकडून कार्लो ला फक्त सोयामिल्क च देण्याची सक्त ताकिद मिळाली..त्यांच्या आख्ख्या आयुष्यांत शेजार्‍याकडून आलेली ही पहिलीच तक्रार होती. पण नंतर थोड थोड वातावरण निवळल आणि परत आमच हत्ती-घोडे-उंट चालू झाल.
आजोबांची दिनचर्या ठरलेली आहे, त्यांना स्वतःच वय ७०+ आहे हे माहित अहे पण ते accept करवत नाहिये..म्हणून a टू z सगळी व्हिटामिन्स , कसली कसली चूर्ण , काढे वगैरे खात असतात. डोळ्यांवर, चेहर्‍यावर, हातावर कसले कसले लेप लावतात. कार्लो सारखच फक्त ओरगॅनिक आणि उकडलेल अन्नच खातात् नंतर तब्येतिला चांगली म्हणून वाइन पितात ..मलाही वेळोवेळी कमी खाण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न करतात. रूमेनियन काका मात्र पुस्तक वाचून केक वगैरे करतात आणि मुद्दाम आजोबांसमोर बसून खातात..
आमच्या तिघांचा बोलण्याचा पॅटर्न ठरलेला आहे , मूळ विषय कोणताही असो आजोबा एक्दातरी माझे हत्ती-घोडे काढ्तात, मग मी त्यान्चा उंट. त्यांनी आक्रोड म्हटल की मी काजू...मग रूमेनियन काकांची एन्ट्री आणि कधितरी मध्येच इंदिरा गांधी आणि राजकपूर. आणि गप्पांचा शेवट 'साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण' सारख 'आवारा हू' या गाण्यान ..
गेल्या ४ दिवसांपासून त्यांनी मयूर सिंहासन कस ग्रेट आहे ते सांगायला सुरूवात केलीय्..मी ही ते आमचच आहे हे पटवण्यासाठी लहानपणी वाचलेल्या / न वाचलेल्या 'सिंहासन बत्तीशी' त ल्या गोष्टी सांगतेय्..तसा त्यांनी गोष्टी ऐकून सिंहासनावरचा १०-१५% ताबा सोडल्याच माझ्या लक्षात आलय...

तर असे हे माझे हौसमेट्स्...माहित नाही किती दिवस इथ राहिन, पण काहिही कॉमन दुवा नसताना या हॅपनिंग हौसमेट्स मुळे सध्या इथ रहाण सुकर झालय, मी त्यांची याबद्द्ल नेहमीच ॠणी राहिन.

आणि हो सध्या आजोबांकडे नवरोझ ची जय्यत तयारी चालू आहे, त्यांच्या बहिणी सुट्टी घेऊन इराणहून आल्यात. त्यांना मी असच काल बोलवल गप्पा मारायला.. मला त्यांच आणि त्यांना माझ ओ की ठो कळ्त नाही पण त्या आल्या, रूमकडे बघून बाहेर जाऊन काहितरी घेऊन आल्या आणि ते ५-६ वेळा माझ्या डोक्यावरून फिरवल्..तेव्हड्यात आजोबा आले, मी हे काय चललेय अस विचारल तर हे केल्यामुळ आळस आणि डोक्याचा ताप जातो अस सांगून एकदम माझा घोर पाणउतारा घाबरगुंडी केला(माझी रूम माझ्यामते चांगली आवरलेली आहे )...पण मला नंतर एक 'ब्लेसिंग्ज फ्रॉम इराण' अस लिहिलेल एक पार्सल मिळाल , बघते तर त्यांत नवरोझ ची भेट म्हणून केशर आहे. आत्तापर्यंत विचार करत होते आजोबांना नवरोझ ला काय द्याव आणि हुर्रे ..सापडल ..रामदेव बाबांचा DVD सेट्..या विकांत ची खरेदी...

हा हा हा.....

1

मस्त! मस्त!! मस्त!!!

मजा आली वाचायला. एकदम हलकफुलकं आणि छान!

काय सही अनुभव आहे हा हास्य

अवांतरः रामदेव बाबांची DVD पचनी पडल्यावर इराणी आजोबांचा स्वतःच्या डोक्यावर स्वतःचे पाय ठेवलेला वगैरे फोटो टाक इकडे Big smile

लय भारी

2

तुम्हा सगळ्यांचा एक व्हिडिओ तयार करा एखाद्या दिवशीच्या मैफिलीचा. गाजेल तो...
पुलेशु.

आयडिया छान आहे, बघते जमता का

3

आयडिया छान आहे, बघते जमता का ते..


पुष्करिणी

हा हा! झक्कास अनुभव!!

4

हत्ती, घोडे आणि साप - अजूनही??? काय भारी लोकं असतात!!

अवांतर - आजोबांना ते अजूनही तरुण आहेत असं वाटत असेल तर 'रामदेवबाबा' काय उपयोगी? 'कामदेवबाबा'चा विडीओ असेल तर बघावा लागेल! (ह्.घ्या)wink

-चतुरंग

हो, ऑफिस मध्येही विचारतात्,

5

हो, ऑफिस मध्येही विचारतात्, पण खूप छोट गांव आहे...ती लोकं कधी २०० मैलापेक्षा जास्त अंतरावर कुठे गेली असतील अस वाटत नाही...मी ही आता कधिकधी आमचा हत्ती आम्ही पार्किंग स्पेस मधे कसा पार्क करतो अस
Sarcastically सांगते...


पुष्करिणी

हा हा हा ... मी एका ब्रिटीश

6

हा हा हा ... मी एका ब्रिटीश मुलीला एकदा (असंच वैतागून) सांगितलं होतं:
आमच्याकडे हत्ती-पब्लिक-ट्रान्सपोर्ट असतो म्हणून! पाणी-बिणी साठतं, मग शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर ... पण हत्तींवर चढायचं तर हत्ती बसावावा लागेल, आणि या उठाबशांमधे फारच वेळ जाईल. म्हणून मग आयडीया केली, मोठ्ठे, उंच प्लॅटफॉर्म बांधले आहेत हत्तीसाठी!

तिला हे सगळे थोडा वेळ खरं वाटलं!

आता सांगते आहे तर हिचाच एक अवांतर किस्सा:
जेनी: श्रीमंत लोकं माशांची अंडी सकाळी न्याहरीला खातात.
मी: मग उंदरांची अंडी का नाही खात?
जेनी: माहित नाही, उंदीर घाणीत असतात म्हणून असेल ...
मी: ... (हसण्याची एक फेरी संपल्यावर) उंदीर अंडी घालत नाहीत, ते सस्तन प्राणी आहेत.

सही..एक्दम 'वरचा मजला रिकामा'

7

सही..एक्दम 'वरचा मजला रिकामा' लूक आल असेल नाही ...


पुष्करिणी

च्यायला .. अनपेक्षित पणे झकास

8

च्यायला .. अनपेक्षित पणे झकास लिखाण वाचायला मिळालं हास्य
लै भारी

-मस्करिणी

लै खुष

9

झालो तुमचा खुसखुशीत लेख वाचुन. भट्टी मस्तच जमलीय.

हत्ती, घोडे, नाग विरुध्द उंट

हे केल्यामुळ आळस आणि डोक्याचा ताप जातो अस सांगून एकदम माझा घोर पाणउतारा

जब-याच लिहीता तुम्ही आणि कळस म्हणजे ".रामदेव बाबांचा DVD सेट्"

पुढील वास्त्व्यास माझ्याकडुन शुभेच्छा ...........तुमच्या हौसमेटसना


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

मस्त..

10

एकदम खुसखुशीत.. मजा आया!
स्वाती

+१

11

हेच म्हणतो. मजा आया!
हास्य

+२

12

हेच म्हणतो. मजा आया!

छान झालायं लेख! माझा टर्कीचा

13

छान झालायं लेख!
माझा टर्कीचा लॅबमेटही राज कपूरला ओळखायचा आणि आवरा हूं ची धूनही मस्तंपैकी गुणगुणायचा.

-अनामिक

हा हा हा मस्तच !

14

हा हा हा मस्तच !


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

चोक्कस ... श्रामोंची सूचना

15

चोक्कस ... श्रामोंची सूचना मनावर घ्या आणि एक व्हीडीओ बनवाच!

मला माझा एक इराणी सहाध्यायी आठवला. पर्शियनमधे संहिता हा शब्द नाही त्यामुळे माझं नाव सॉन्या (उच्चारी सोनियाच्या जवळ) असंच आहे असं त्याचं मत होतं. एक दिवस त्याला हग्या दम भरला; त्याने नाद सोडला पण माझ्या हौसमेट्सनी मला जे सॉन्या, सॉन्या करून चिडवायला सुरूवात केली ती संपलीच नाही!

नावाच्या उच्चाराच ट्रेनिंग तर

16

नावाच्या उच्चाराच ट्रेनिंग तर मला पहिल्या अर्धा तासात द्याव च लागत्...२ वेगवेगळी ट्रेनिंग मटेरियल्स तयार केलीत ...श्रोत्रूवर्गानुसार वापरते..


पुष्करिणी

मस्त आणि खुसखुशीत लिखाण.. आता

17

मस्त आणि खुसखुशीत लिखाण..
आता लवकरच रामदेवबाबाचे आसने ते आजोबाच तुम्हाला शिकवणार बघा


-निखिल

>> मी ही लगेहात 'तुमचा

18

>> मी ही लगेहात 'तुमचा उंटावरचा फोटो कुठे दिसत नाही' अस म्हणून आमच्या
>> भाडेकरू-घरमालक या नात्याचा श्रीगणेशा केला.

ये ब्बात है. सही मारा.

>>कार्लो डाएटिंग वर होता.

Laughing out loud

>>रामदेव बाबांचा DVD सेट्...

याईक्स्. म्हातारबुवा कुठल्या आसनात अडकून बसले तर त्या झरतुष्ट्रालाच खाली यावे लागेल सोडवायला... तो ही येणार नाही कदाचित्. त्याचे 'सिंहासन' गेल्याने रुसला असेल.

आजोबा 'अल्ला के बंदे आहेत'

19

आजोबा 'अल्ला के बंदे आहेत' नावापुरते तरी..इराणच्या राज्यक्रांतीत पळून आलेत


पुष्करिणी

म्हणून तर

20

>>आजोबा 'अल्ला के बंदे आहेत' नावापुरते तरी..
म्हणून तर म्हटले "त्याचे (झरतुष्ट्राचे) 'सिंहासन' गेल्याने रुसला असेल." Big smile

खु खु, खि खि, खो खो, हा हा हा!

21

सगळ्या प्रकारे हसलो वाचताना.
सुंदर लिखाण. आवडलं.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

एक नंबर

22

>>मी ही लगेहात 'तुमचा उंटावरचा फोटो कुठे दिसत नाही' अस म्हणून आमच्या भाडेकरू-घरमालक या नात्याचा श्रीगणेशा केला
एक नंबर ... जियो Grade
>>कार्लो डाएटिंग वर होता
Laughing out loud
>> रामदेव बाबा ....
त्यापेक्षा शिल्पा किंवा बिपाशा ची योगा DVD द्या हास्य
लै भारी खुसखुशीत लेख ...

नको..

23

>>त्यापेक्षा शिल्पा किंवा बिपाशा ची योगा DVD द्या
संग्राम, आजोबांचं वय बघ रे ! उगा कशाला फट म्हणता इराणीहत्या?

नको..फारच सिरियस्ली घेतल तर

24

नको..फारच सिरियस्ली घेतल तर अम्ब्युल्न्स वगैरे बोलवावी लगेल


पुष्करिणी

हे हाईट्ट!!!!

25

Laughing out loud
हे हाईट्ट!!!!

सही !!१

26

Laughing out loud

Laughing out loud

सही !!१


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

उगीच कशला?

27

उगीच ते जमत नाही, तरी उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका कशाला घ्यायचा म्हणतो मी............


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

अन वीडीओ बघुन योगा करता करता....

28

अडकल्या तंगड्या गळ्यात म्हणजे?


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

गुरू

29

अहो पण ते चांगल्य गुरू-गिरूचे पाय धरतंय की, नीट बशिवतील ते सगळं.

चांगल लिहिलय

30

चांगल लिहिलय हास्य

मस्त लिहीले आहे.

31

मस्त लिहीले आहे.

मस्त लिहीले आहे.

32

मस्त लिहीले आहे. हास्य

छान लिखाण.

33

छान लिखाण.


-पुण्याचे पेशवे

मस्त

34

लै भारी.. मोकळं लिखाण.. मजा आली

-ऋ


-ऋ

मजा आली वाचायला. एकदम

35

मजा आली वाचायला. एकदम हलकफुलकं आणि छान!!!!

वाटत नाही पहिलांदाच मराठीत लिहील असेल ते,

लिहीत रहा !!