भुतं आहेत की नाहीत ?

0
0

या ना त्या कारणांनी अनेकदा मला या प्रश्नाचा सामना करावा लागला आहे. माझ्या थोड्याफार अभ्यासातही एकूणच याबद्दल स्पष्ट असं मत मिळालेलं नाही.
मला हे माहीत नाही की ही चर्चा यापूर्वी इथे झाली होती की नाही पण असेल तरी रिफ्रेशमेंट हास्य

भुतं किंवा आत्मे यांच्या अस्तित्वाबद्दल एक खरंच चांगली किंवा सुयोग्य चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.

{भुतं पाहण्यासाठी म्हणून}

भुतं पाहण्यासाठी म्हणून नावाजलेल्या ठिकाणी रात्री अपरात्री भटकून झाले आहे, पण कधी भुतांना ना मी दिसलो ना भुतं मला.. आमचं ठरलं आहे त्यांनी माझ्या समोर यायचे नाही मी त्यांच्या समोर! दॅट्स ईट Big smile

**

गंभीर प्रतिक्रिया :- भुतं नावाचा प्रकार अस्तित्वात फक्त मनोरंजन यासाठीच आहे, मग तो चित्रपटातील असतो वा पुस्तक / कथेतील. भुतं नाहीत असा माझा समज आहे, कारण प्रत्यक्षदर्शी पुरावा नाही आहे. ज्यांनी पाहिले आहे म्हणून सांगितले आहे अथवा ज्या घटना घडलेल्या आहेत भुतांच्या माझ्या माहितीत त्यात भिती हा फार मोठा फॅक्टर असल्यामुळे देवापासून भुतापर्यंत त्यांना काही दिसू शकणे शक्य आहे हे मला माहिती होते.


Hope is a good thing...

{तुम्हाला काही कामधंदा आहे की}

तुम्हाला काही कामधंदा आहे की नाही यावरही एक चर्चा होऊन जाउद्या. कसें?

{हॅ हॅ हॅ ! ते ते करतीलच..}

हॅ हॅ हॅ !
ते ते करतीलच.. तुम्ही भुत आहे की नाही यावर चर्चा करायला आला आहात ना, आधी ती संपवा


Hope is a good thing...

{तुम्हाला आम्ही चर्चा करायला}

तुम्हाला आम्ही चर्चा करायला आलोय हे कोणत्या पिशाच्च्याने सांगितलं?

{आपल्याला असं का बरं वाटावं ?}

आपल्याला असं का बरं वाटावं ?

{कधीकधी माणसं भुतासारखं}

कधीकधी माणसं भुतासारखं वागतात त्यामुळे भूत आहे असं वाटायला लागत खरं Evil

पण अखेर प्रत्यक्षात भूत मनात असत .. ज्याच्या मनात असतं त्याला दिसतं, ज्याचा विश्वास नाही त्याला दिसत नाही .. अस साध- सरळ तर्कशास्त्र आहे ते!

{>>अखेर प्रत्यक्षात भूत मनात}

>>अखेर प्रत्यक्षात भूत मनात असत .. ज्याच्या मनात असतं त्याला दिसतं, ज्याचा विश्वास नाही त्याला दिसत नाही .. अस साध- सरळ तर्कशास्त्र आहे ते!

सहमत.

मला हरयाणातील एक आजोबांनी सांगितलेला किस्सा आठवला (१९८०-८५) , आता ज्या जागी मारूती आपले कार उत्पादन करते तो आधी जंगलासारखा भाग होता, मानेसर. दिवसाढवळ्या लोक तिकडे जायला मागेपुढे बघायची.. १५ सोळा घरटी असलेले गाव सोडलं तर पुढे रेवाडीपर्यंत जंगलच जंगल. तर अश्या जंगलामध्ये लाकुडतोड्यांनी भुत पाहिल्याची अफवा पसरली... अगदी प्रशासन पातळीवर गोष्ट पोहचली... भुत पाहणार्‍या पैकी २-३ गचकले देखील होते. व जे वाचले होते त्यांनी भुताची जी रुपरेखा सांगितली होती त्यांचा प्रत्येकाशी काहीच मेळ होत नव्हता.. खूप गाजला होता किस्सा तो..! पण शेवटी सगळं थंड झाले कारण पहिल्यांदा भुत पाहिले म्हणून सांगणारा मानसिक रोगी होता असे दिसून आले... व त्यानंतर जे मेले ते फक्त भितीमुळे मेले होते.


Hope is a good thing...

{कोणत्याही शरीरात न घुसता}

कोणत्याही शरीरात न घुसता कीबोर्डवर टाईप करायला फार कष्ट होतात बुवा.. आज दिवसभरात एखादं शरीर मिळालं की त्यात घुसतो अन सविस्तर प्रतिसाद टंकतो..

.....

{आज मला सोड प्लि़ज तुला हवे}

आज मला सोड प्लि़ज
तुला हवे तर अवलिया पासून गब्बर पर्यंत कोणाला ही पकड wink


Hope is a good thing...

{एक भूत दुसर्‍या भुताच्या}

एक भूत दुसर्‍या भुताच्या शरिरात घुसु शकतं का???

{येप्प!! मल्टी भुत हा ऑप्शन}

येप्प!!

मल्टी भुत हा ऑप्शन असतो बॉ... मी अनेक हॉरर चित्रपटामध्ये पाहिले आहे Big smile

मग विमो आज कुठले झाड wink


Hope is a good thing...

{सध्या पिंपळाच्या झाडावरच}

सध्या पिंपळाच्या झाडावरच आहे.
येतोस काय भेटायला??

{नाही नाही, नदी काठच्या वडावर}

नाही नाही, नदी काठच्या वडावर आज हडळीणी बरोबर डेट आहे माझी.


Hope is a good thing...

{बघा.. मेले तरी नदीकाठची}

बघा.. मेले तरी नदीकाठची प्रकरणे चालूच... म्हणतात ना...

{(विषय दिलेला नाही)}

Laughing out loud


Hope is a good thing...

{तात्पर्य}

या सगळ्या चर्चेचं तात्पर्य असं आहे की भुतं असतात आणि त्यापैकि बहुतेक भुतं मिमचे सदस्य आहेत Big smile

{भूतं असतात... नक्की}

भूतं असतात... नक्की असतात.
मीमराठीवर याचे अनेक पुरावे (आणि भूतंसुद्धा) मिळतील तुम्हाला. Evil

या विषयावर अजून विकूमांत्रिकाचे मत आले नाही याचे मात्र आश्चर्य वाटते आहे.

{विकुमांत्रिक आताच झाडावरुन}

विकुमांत्रिक आताच झाडावरुन खाली उतरुन भुतलावर आलेले आहेत अशी पिशाच्चवाणी झाली आहे

{भुतं असतात की नाही? कठीण}

भुतं असतात की नाही?
कठीण प्रश्न आहे? मुळात भुत - पिशाच्च कशाला म्हणायचे? ते नक्की काय असते? आत्म्याचे अस्तित्व खरोखर आहे काय? गेली कित्येक युगे चवीने चघळला जाणारा विषय आहे हा. भुतं नक्की असतात की नाही हे माहीत नाही. पण मी ते आजवर बघीतले नाही म्हणून ते नसतेच असे म्हणण्याचा उद्दामपणा मी तरी करणार नाही.
मी ’बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ म्हणणार्‍यांपैकी आहे. पण त्यामुळेच मी ती नाहीत असेही ठामपणे म्हणू शकत नाही.
प्रत्येक गोष्टीला एक दुसरी बाजु असतेच. सत्य-असत्य, धर्म-अधर्म, प्रकाश-अंधार...............
हे ही तसंच काही असु शकेल. जशा सुष्ट शक्ती असतात तसेच दुष्ट शक्तीही असु शकतात. त्याचप्रमाणे अजुन एक कल्पना मागे कुठेतरी वाचली होती. आपल्यासारखेच दुसरे एखादे आपल्या विश्वाला समांतर विश्व असण्याची शक्यता नाकारता येत नाही हे मांडण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनीही खुप वेळा केलेला आहे. ज्याला आपण भुत - पिशाच्च म्हणतो ते त्या समांतर विश्वातले दुसरे जीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवकाशात होणार्‍या अनंत उलाढालींबाबत आपण अजुनही खुप अनभिज्ञ आहोत.

राहता राहीला भुत पाहीले, किंवा अनुभवले म्हणून सांगणार्‍यांचा प्रश्न !
यात चार प्रकारचे लोक येतात.
१. ज्यांना काहीतरी करुन लोकांचे लक्ष आकर्षित करुन घेण्यात स्वारस्य असते wink
२. मनातली कुठल्यातरी बाबतीतली भीती व्यक्त करण्याचा हा एक चांगला मार्ग असतो. मनात चाललेल्या भीतीला तिचा उद्रेक होवू नये म्हणून कुठेतरी वाट करुन देणे गरजेचे असते, मग त्यासाठी अशी कारणे शोधली जातात.
३. कुणीतरी एक जण सांगतो मी भुत पाहीलेय म्हणून. मग केवळ त्याची री ओढली जाते. माझा अनुभव आहे, अगदी छातीठोकपणे भुत नाही म्हणून सांगणारेही प्रत्यक्ष मनातुन याबाबतीत थोड्याफार प्रमाणात साशंक असतात. (अपवादाबद्दल क्षमस्व) पण आपण जर होकार दिला तर लोक आपल्याला काय म्हणतील? या भावनेतून भुत नाही म्हणणारेही पुष्कळ असतात & vice versa.
४. हा चौथा प्रकार मात्र सगळ्यात घातक असतो. उदा. मीममालक आणि त्यांची भुतावळ Evil

तरीही मी म्हणतो की असं काही नसतंच असं म्हणण्याचं धाडस मी कधीही करणार नाही. कारण बर्‍याच वेळा सर्वसामान्य माणसांचा सहजी विश्वास बसणार नाही असे अनेक अनुभव आपल्याला येत असतात, ज्याचे कुठलेही स्पष्टीकरण विज्ञानाकडेही नसते. अशा वेळी ज्याप्रमाणे आपण देव मानतो त्याप्रमाणे काही वाईट शक्तीही अस्तित्वात असु शकतात हे मानण्याला प्रत्यवाय नसावा.

अर्थात हे माझे वैयक्तीक मत आहे. ते सगळ्यांना पटावे किंवा कुणी मानावेच अशी अपेक्षा नाही हास्य
जागा राखुन ठेवतोय, पुढे अजुनही लिहीन सुचेल तसे.


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{तुझे मत पटलं बॉ!}

तुझे मत पटलं बॉ!


Hope is a good thing...

{खासकरुन चौथा मुद्दा, बरोबर}

खासकरुन चौथा मुद्दा, बरोबर ना? Laughing out loud


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{जालीय आयडी आणि भुते }

प्रत्यक्ष शरीर, विचार नसताना टायपु शकणारे जालीय आयडी आणि भुते यांच्यात फरक कसा करावा?


-ऋ

{याचे उत्तर बहुदा मालकच}

याचे उत्तर बहुदा मालकच समर्थपणे देवू शकतील Evil


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{गहन प्रश्न. सविस्तर चर्चा}

गहन प्रश्न.
सविस्तर चर्चा करूच आपण यावर.

जालीय आयडी - एकाच महाभुताचे अनेक रूपे असू शकतात त्यांनाच महाजालीय जगात आयडी असे संबोधतात. तसा हा प्रत्येकाकडे एक तरी असतोच पण तोच जर एकापेक्षा अनेक झाले तर मात्र हा ब्र्म्हराक्षस हो.. कधी कधी मुख्य आयडीलाच खाऊन टाकतो की मुळ रूपात परत येणे कधी कधी अशक्य होऊन जाते. मुख्य आयडी आपल्याच भुताच्या आहारी जाऊन मरण पावल्याच्या अनेक घटना मला माहिती आहेत.

बाकी सविस्तर चर्चा करूच पण सगळीच भुते काही वाइट नसतात याच चालीवर सगळेच आयडी काय वाईट नसतात wink


Hope is a good thing...

{सगळीच भुते काही वाइट नसतात}

सगळीच भुते काही वाइट नसतात याच चालीवर सगळेच आयडी काय वाईट नसतात

हा हा! सहमत आहे!

-(चांगले? भूत) ऋषिकेश


-ऋ

{माझ्या विषयी ची चर्चा वाचुन}

माझ्या विषयी ची चर्चा वाचुन आंनदित झालो आहे

{वोह कभी मिल जाये तो क्या किजिये}

वोह कभी मिल जाये तो क्या किजिये
रात दिन सूरत को देखा किजिये


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{अतिवास याचेशी सहमत.}

अतिवास याचेशी सहमत.


खलनायक

{भुते असतात, ती आपल्या आसपास}

भुते असतात, ती आपल्या आसपास असतात पण त्यांच्या समांतर विश्वामध्ये असतात.
सामान्यांना त्रास देत नाहीत. भुतांची योनी सर्वांना मिळत नाही. जिवंतपणी काही अपुर्ण इच्छा राहिल्या असतात म्हणून ते भुतयोनीत जातात.

{मला भेटलेल्या / ओळखणा-या}

मला भेटलेल्या / ओळखणा-या लोकांनी भूत पाहिले आहे असे मी सर्टीफाय करते

मजाक सोड्ल्यास...
भूत म्हणजे भटकणारा आत्मा असे मानल्यास आत्म्याचे अस्तित्व मी मानते. असे काही अनुभव वाचले आहेत, डिस्कव्हरीवर पाहिले आहेत. पण भूत माणसाला पकडू शकते हे मला मान्य नाही.

{नाईट शिफ्ट असतांना एके रात्री}

नाईट शिफ्ट असतांना एके रात्री मला एका चौकात एक स्त्री लाल साडी घातलेली दिसली. रस्ता छोटा, सुनसान होता. रात्री २, २:३० चा सुमार असावा. तिच्यात व माझ्यात दहा एक मिटर अंतर असतांना त्या स्त्री ने मला आडवा हात दिला. तिचा चेहेराच दिसला नाही. मी थरारून गेलो. मोटरसायकल ऑफिसपर्यंत दामटली.

नंतर काही रात्री मी रस्ता बदलून लांबच्या रस्त्याने ऑफिसला जात राहीलो. नंतर भिड चेपली अन पुन्हा त्याच रस्त्याने जात होतो. नंतर तसे काही आढळले नाही.

नंतर केव्हातरी तेथील गुरख्याला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला की, 'शाबजी, यहाँ तो वैसे नही दिखता मगर इस रास्ते के कोने में एक झाडी में एक कुवां है वहां एक औरत का हादसा हुवा था.'

पण मला तरी ती बाई भुत वैगेरे होती असे आतातरी वाटत नाही.

बाकी तुम्ही दररोज माझ्याशी बोलतात, माझ्या लेख कवितांना वाचून( हास्य) प्रतिसाद(??) देतात तो मी तरी कोण आहे हो?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{त्या रस्ताने जात जाऊ}

त्या रस्ताने जात जाऊ नकोस....

तुला मी एक भुत भगाओ तावीज देतो सदा सर्वदा गळ्यात बांध हो wink


Hope is a good thing...

{राजे, "तो मी तरी कोण आहे हो?"}

राजे, "तो मी तरी कोण आहे हो?" हे वाचा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{अरे भुतांना पण भुत लागते}

अरे भुतांना पण भुत लागते रे.... Sad
आताच काही महिन्यापुर्वी लागले.... मला पण Big smile


Hope is a good thing...

{मालक, हे भुत मात्र जालिम आहे,}

मालक, हे भुत मात्र जालिम आहे, त्यावर कसलाच इलाज चालत नाही Evil


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{उत्तरः}

(भुतं : म्हणजे इथेच टिकून राहिलेले मृतात्मे या अर्थी : )
भुतं नाहीत. नव्हती. नस्तात. असण्याची शक्यता नाही.


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{वोह के खुशबू की तरहा फैला था मेरे चारसू}

वोह के खुशबू की तरहा फैला था मेरे चारसू
मै उसे महसूस कर सकता था ... छू सकता न था

(फासले ऐसे भी होंगे ये कभी मालूम न था
सामने बैठा था मेरे पर वोह मेरा न था
)


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{क्या बात है गब्बर.... तुसी छा}

क्या बात है गब्बर....
तुसी छा गये प्राजी हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{चुकले आहे.}

फासले ऐसे भी होंगे ये कभी मालूम न था
सामने बैठा था मेरे पर वोह मेरा न था)

फांसले ऐसे भी होंगे
ये कभी 'सोचा' न था...
इथे पहा.

अन तो 'सामने' बैठा था. मृतात्मा नव्हता. कैच्या कै कॉन्टेक्स्ट
मग तसं गीताई मधे आहे:

कल्पांती नीजवी भूते
मी माझ्या प्रकृतीमधे
कल्पारंभी पुनः सारी
जागवी मी पुनः पुन्हा!


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{वाह}


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{ही चर्चा सुरू करण्याचं मुख्य कारण}

ही चर्चा सुरू करण्याचं मुख्य कारण म्हणजे हल्ली हल्ली पछाडलेल्या जागांना मिडीयाही फार प्रसिध्दी देत आहे त्यांनी मीम चा अपवाद करू नये ही अपेक्षा लोक इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरून शोध घेतात जसं थर्मल इमेजिंग, टेंपरेचर सेन्सर
बाकी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आपण त्या विशिष्ट प्रकाराला भूत असंच का म्हणतो अगदी व्यवहारातही भूत-भविष्य असलेच शब्द वापरले जातात. जर असा विचार केला की समांतर विश्वाचा विचार केला तर ही कल्पना आपल्या पूर्वजांना आधीच होती की काय ? कारण हे शब्द त्यांनीच रुढ केलेत.

बाकी मी भूत पाहिल्यावर त्याच्या अस्तित्वाचा विचार करू या विचाराचा आहे पण अजून तरी ती वेळ आली नाहीये हास्य

{भुतं आहेत}

ऑफिस मध्ये बॉस नावाचं भूत, जाम पिडतो मला. लग्न झालेल्यांना बायको नावाचं भूत. wink आंतरजालिय भुते तर काय, बोलायची सोयच नाही.


विरोचन

{"लग्न झालेल्यांना बायको}

"लग्न झालेल्यांना बायको नावाचं भूत. "

लेट्स होप, तुमच्या सौ. मीम वाचत नसतील... नाहीतर तुम्हाला ब्रम्हराक्षस देखील वाचवेल की नाही शंका आहे


Hope is a good thing...

{हि हि हि}

मी पण मुंजाच आहे अजून हास्य


विरोचन

{माझ्याकडे १०-१२ भूत आहेत.}

माझ्याकडे १०-१२ भूत आहेत. भाड्यावर देतो मी. दारु पिऊन झाली की त्याच बाटलीत एक भूत भरुन ठेऊन देतो. भूत नाही म्हणणार्‍यांनो एकदा खात्री करुन घ्या.
-----------------------------------------------------
प्रेम विवाहातील अडचणी, दिर्घ आजार,
भानामती, जारण मारण उच्चाटन, वशीकरण, भूत प्रेत, चांडाळ, हडळ वा कोणत्याही भूताचा नायनाट करायचा असल्यास
संपर्क साधा
निरंजन बाबा बंगाली


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{माझी चारपाच हरवलेली भुतं}

माझी चारपाच हरवलेली भुतं तुमच्याकडे आहेत का ओ


Hope is a good thing...

{काय हे राजे? साधी भुतं}

काय हे राजे? साधी भुतं सांभाळता येत नाहीत...मग.............. Evil


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{..}


Hope is a good thing...

{(विषय दिलेला नाही)}

हास्य


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{विचार करावा.}

छान विषय.पण लिहिण्यापेक्षा एकत्र जमून गप्पा मारल्या तर जास्त रंगणारा विषय. पाहा हे जमतय
का . मला वाटतं लेखन स्पर्धेचा बक्षिस समारंभ २० मार्चला ठाणे येथे होणार असल्याचं मी वाचलं होतं. तसं असल्यास भेटून बोलता येईल. किंवा एक स्वतंत्र कार्यक्रम भुतांवरच्या गप्पांसाठी ठेवावा. फक्त भुतांना कळणार नाही याची खबरदारी घ्यावी, हि विनंती.


अरूण कोर्डे.

{ठाण्यासारख्या शहरात यावर}

ठाण्यासारख्या शहरात यावर चर्चा करण्यात मजा नाही येणार. कुठे तरी लांब सुमसान ठिकाणी मिट्ट काळोख असताना या विषयावरच्या चर्च्या रंगतात.


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{३ विकल्प आहेत}

३ विकल्प आहेत

१) शिवप्रसाद हॉटेल
२) तलावपाळी
३) संजीवनी मेडिकल च्या समोर जे आईसक्रीमचे दुकान आहे (की होते ?) त्यात

हास्य


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{या तीनही ठिकाणापासून मा़ घर}

या तीनही ठिकाणापासून मा़झ घर जवळ आहे. माझ्याच घरी भेटू या.


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{राजे आहेत ह्यावर माझा पूर्ण}

राजे आहेत ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे !! Laughing out loud


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{जे दिसते तसे नसते म्हणून जग}

जे दिसते तसे नसते म्हणून जग फसते Oups


Hope is a good thing...

{ह्या चर्चा कोठेही रंगतात.}

भुतांवरच्या चर्चा कोठेही रंगतात, तसं वातावरण मिळालं तर फारच उत्तम. फक्त वेळेचा
मात्र प्रश्न असतो. शक्यतोवर रात्र फार चांगली असते. कोणाच्याही घरी सुद्धा चालेल. निरंजन आणि गब्बरसिंग आपण
ठाण्याला राहात असल्यास कोठे ते सांगावे. ह्या चर्चांमधे हिरीरीने भाग घेणारे बरेच सापडतील. प्रत्येकाजवळ एक तरी
भुताची गोष्ट असतेच असा माझा अनुभव आहे.


अरूण कोर्डे.

{जर सर्वांना सोईस्कर असेल तर}

जर सर्वांना सोईस्कर असेल तर माझ्या घरी चालेल. मी राम मारुती रोडवर राहतो. गब्बरसिंग कुठे राहतात ? आपला स्पर्धेचा बक्षिस समारंभ नक्की कुठे आहे ?


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{(१९९५ - १९९६)}

निरंजनभाई, मी खूप पूर्वी (१९९५ - १९९६) घंटाळीत मावशीकडे राहत होतो. त्या सावरकर रस्त्यावर (जो ३ पेट्रोल पंपांकडे जातो) लतिफ अंडेवाल्यांच्या मागच्या बाजूला. पूर्वी आरामबाग इस्टेट म्हणायचे त्या भागास. बहोत मौज मस्ती किया करते थे.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{काय हे}

काय हे निरंजन आहो राम मारूती रोडवर भुतांच्या गप्पा ?

{आता}

आता मला कस माहित असणार आजकाल भुत असतात की नाही ते. मला जाउन तर किती तरी वर्ष झाली. हा आता माणसं असतात हे मला ठाउक आहे. कालच आमचे ररा विचारत होते...

.. क्या तुम आदमीयो मे विश्वास करते हो?
मी म्हटल ....हा भाई उनसे तो मै बहुत डरता हू
.... जब भी शहर से गुजरता हू हनुमान चालीसा बोलता हू
..... महावीर जो नाम सुनाय आदमी कोई पास न आय !!..... हाय काय न नाय काय !!

{एकंदर या धाग्यामु़ळे 'मराठी}

एकंदर या धाग्यामु़ळे 'मराठी माणसांचे...' ही संकेतस्थळाची घोषणा बदलावी लागणार मालक तुम्हाला Evil

{चांगली आयडीया आहे}

Big smile

चांगली आयडीया आहे wink


Hope is a good thing...

{राजे एक चांगली घोषणा आठवली `}

राजे एक चांगली घोषणा आठवली ` भूता परस्परे जडो, मैत्र भूतांचे' Big smile

{शनिवार रात्रीचा एक किस्सा}

शनिवार रात्रीचा एक किस्सा शेअर करावासा वाटतो,

आमच्या इथला प्रोजेक्ट आता संपून त्याचं भागा भागाने ऑपरेशन्स डिपार्टमेंटकडे सोपवणं चालू आहे, हँडओवरच्या आधी काही शेवटच्या ट्रायल्स घेणं गरजेच असतं ज्यासाठी आम्ही प्रोजेक्ट टीमचे मेंबर उशीरापर्यंत कधी कधी सकाळपर्यंतही थांबलेले असतो.
हा भाग मुळ प्लांटपासून विरूध्द दिशेला जरा दूर आहे, पण म्हणजे तो ओसाड नाही एम आय डी सी चा रस्ता त्याला लागूनच जातो. ( ही झाली पार्श्वभूमी ) हास्य
शनिवारी रात्री नवीन ब्लोअर्सच्या ट्रायल चालू असल्यानं मी थांबलो होतो, नुसतंच रिकामटेकडं बसायचा कंटाळा आला म्हणून माझ्या ऑफीसात येऊन काही कामं उरकंत होतो मी म ही एका बाजूला चालू होतंच हास्य
सव्वाबारा वाजले आणि प्रोजेक्टकडे ठेवलेला सुपरवायझर धाडकन दरवाजा उघडून आला, घामाघूम होऊन धापा टाकत आलेला दिसत होता.
त्याला जरा शांत केलं विचारलं `काय झालं ?' तर म्हणे तिकडे भूत आहे, म्हंटल कशावरून ? तर सांगतो तिथे आधी बाईच्या रडण्याचा आवाज आला म्हणून तिथल्या लॅबमध्ये हा शिरून बसला आणि सहज बाहेर नजर टाकतो तर काय ! समोर रस्त्यावरच पांढरी साडी नेसलेली एक बाई हेल काढून रडत होती.
त्याची अवस्थाच इतकी बिकट दिसत होती की मी गाडी मागवून त्याला घरी पाठवून दिला. पण कुणीतरी प्रोजेक्ट एरीयात थांबायला हवं म्हणून मी थांबलो, आणि च्यायला खरंच रडायचा आवाज आला की ! साला सेकंदभर काळजाचा ठोका चुकवणाराच आवाज होता तो .
जरा लक्ष एकाग्र करत आवाजाची दिशा शोधली तर आवाजही बाहेर रस्त्याकडूनच येत होता, वरच्या मजल्यावर जाऊन पाहीलं तर, च्यायला रस्त्यावर खरंच कोणीतरी बसलेलं दिसलं. म्हटल सापडलं बुवा भूत बहुतेक. बरं मगं ते रडत का असावं ? त्याच्याकडे पहात मी विचार करत होतो आणि इतक्यात ते भूत जागचं हललं आणि ...
चार पायावर चालत थोडं पुढे जाऊन पुन्हा दोन पायावर बसून रडायला सुरुवात केली,
आणि उलगडा झाला.. प्रत्यक्षात ते एक पांढरं केसाळ कुत्रं होतं, आणि तेच मागचे दोन पाय दुमडून वर आकाशाकडे तोंड करून रडत होतं आणि त्या रात्रीच्या शांततेत ते काही वेगळंच ऐकायला येत होतं हास्य

सगळं प्रकरण कळलं मी ऑफीसमधून आमचा कॅमेरा मागवून त्याचे फोटोही घेतले आणि शूटिंगही घेतलं फक्त त्यावेळी मला इथे पोष्ट टाकायची आठवण राहिली नाही त्यामुळे प्रोजेक्टचा ही बराच भाग त्यात चित्रित झालाय म्हणून इथे शेअर करू शकत नाही.
हा भूताचा एक प्रकार, कित्येकदा असतं एक आणि दिसतं एक Big smile

{हा हा हा.. लै भारी किस्सा.}

हा हा हा..
लै भारी किस्सा.


Hope is a good thing...

{मी तर आहे येथे}

मी तर आहे येथे हास्य

{'माणंसं आहेत की नाहीत' अशी}

'माणंसं आहेत की नाहीत' अशी चर्चा भूतावळ.कॉमवर चालू असल्यांचं कळंलंय!


-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/