आपण भांडताना मोठ्याने का बोलतो? उत्तरा सहीत

0
0

विषय =संस्कृती

नमस्कार मंडळी,
काही दिवसंपुर्वी मला एक इमेल आला होता, त्यावरच आधारीत हा प्रश्न आहे"आपण भांडताना मोठ्याने का बोलतो?"
आपल्या पैकी जवळपास सगळ्यांनाचा हा अनुभव कधी ना कधी आला असेल. कुठल्यातरी (शुल्लक/महत्वाच्या) कारणावरुन प्रकरण हामरातुमरीवर येत आणि नकळत आपला आवाज वाढु लागतो, त्या क्षणी ते आपल्याला लक्षात देखिल येत नाही. तर अस का होत?

या उलट.......
फोनवर असुदे किंवा खेटुन बसलेले (मदन-बाणाने घायाळ झालेले) तो आणि ती कसे गुलुगुलु बोलत असतात.त्यांना का बर ओरडुन बोलाव लागत नाही?

याच उतर मला माहीत आहे आणि ते माहीत झाल्यापासुन माझ चिडण/रागावण लक्षणीय रीत्या कमी झाल आहे. त्यातुन कधी तसा प्रसंग आलाच तर आवाज मात्र वाढलेला नसतो.
तुमच काय म्हणन आहे ते वाचायला नक्कीच आवडेल आणि हो मला ठाउक असलेल उत्तर कधी सांगु?

हे उत्तर मला मनापासुन पटल आहे आणि म्हणुनच माझ चिडण आणि क्वचीत रागवलोच तर आवाज चढण ब-यापैकी ताब्यात आल आहे. पहा तुम्हाला पटत का?
चिडण/रागवण आणि त्याच पर्यवसन भांडणात होण म्हणजे काय? तर आपण शरीराने जरी जवळ अस्लो तरी मनाने खुप दुर गेलेले असतो आणि दुरवरच्या(दुरावलेल्या) मनाशी संपर्क साधावा लागतो तो मोठ्याने ओरडुनच कारण ते दुर आहे ना?,त्याला ऐकु जाईल ईतपत मोठ्याने. म्हणजेच भांडताना जेवढा मोठा आवाज तेवढा मनाचा दुरावा अधिक/लांब.
या उलट प्रेमीजनांची मनं एवढी जवळ आलेली असतात की हालकीशी कुजबुज(फोनच नेटवर्क कसही अस्ल तरी) सुध्दा सुस्पष्ट पणे ऐकु येते एकमेकांना. थोडक्यात फाईनली ट्युन्ड.
या पुढे या गोष्टीचा विचार आपाल्या जवळील व्यक्तींशी भांडताना तरी व्हावा. हे बोलण्या(लिहीण्या) एवढ सोप्प नाही पण सरावाने हळुहळु जमेल अशी मला खात्री आहे. निदान आपण चिडलो आहोत,आपला आवज वाढला आहे ही गोष्ट लक्षात येण्या इतपत तरी आपली संवेदनक्षमता आपण हारवायला नको.

आजच्या म.टा. मधिल, आजचे विचार सदर :- "मतभेद अनेकदा विचारांपेक्षा स्वभावावर अवलंबुन असतात" लो.टिळक. मग काय बदलणार ना स्वभाव?
मतभिनत्ता असुशकते असल्यास जाणुन घ्यायला आवडेल

{मजाच आहे की! माझा आवाज आपोआप}

मजाच आहे की! माझा आवाज आपोआप चढत जातो. माहिती नाही का J)

{धम्या तुझे काय आहे की तू}

धम्या तुझे काय आहे की तू हसायला लागलास ना की घसा मोकळा होतो. त्यामुळे स्वरयंत्रातून हवा जोरात वहायला लागते


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{जयपालजी ... तुमचे चित्र}

जयपालजी ... तुमचे चित्र बरेचसे बोलके आहे ह्याबाबद !!!
रागाने आपण जे बोलतो त्यात संबंध तुटू शकतात .. जे जोडणे पुन्हा अवघड आहे.

-(रागिट) ऋषी दुर्वासा

{मी}

काहीही बोलणार नाही. मी उत्तराची वाट पाहणार फक्त!

{मी पण!!!}

मी पण!!!

{आता सांगतोस उत्तर}

का ओरडू रे तुझ्यावर?

{+ १}

हेच म्हणतो .. सांगतो उत्तर का ओरडु तुझ्यावर ..?

Big smile

{मनाविरूद्ध काही घडले तर आवाज}

मनाविरूद्ध काही घडले तर आवाज वाढतो. आपण मनाविरूद्ध काही घडलेच नाही असा काहीतरी आपलाच समज करणे, काहीतरी आध्यात्मिक वैगेरे असला विचार करणे अशी शक्यता असू शकते की ज्यामुळे तुमचं चिडण/रागावण लक्षणीय रीत्या कमी झाल असाव.

काय असेल कारण ते आम्हालाही महित करून देवून हे कोडे सोडवा बुवा.



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

{सांग तुच. सांग की आता.. }

Star
thinking
सांग तुच.
pray
सांग की आता..
Crying
अरे ए सांगना भावड्या
Angry


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{गणपा, }

तिथं 'व' चुकून पडला का रे? wink

{हा हा हा समझने वालोंको बराबर}

हा हा हा समझने वालोंको बराबर समझता है wink


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{गणपा }

"भावड्या" मधे शब्दांचा क्रम चुकला का रे ? हास्य

- शब्द तोडक

{:?}

आता कारण सांगतोस का?..... Angry

जेव्हा जरा मोठ्याने चढवून बोलले जाते (सवयीने) तेव्हा नेहमीचं बोललो तरी लोक भांडतोय म्हणतात त्याच काय?


-ऋ

{च्यायला, कारण सांग कि}

च्यायला, कारण सांग कि बे!!!!
असो आवाज असाच वाढतो


-निखिल

{सांगा लवकर}

नाहीतर मात्र आवाज चडवायला लागेल बरं का!!!!

{कारणे ...}

१ - लवकर कारण न सांगने - जे तुम्ही सर्वांचे आता चालू आहे
२ - मनाविरूद्ध बोलणे
Angry

{हॅहॅहॅ}

ही तर मेंदुतील जैवरासायणीक प्रक्रिया आहे. छातीचे ठोके वाढतात. रक्तदाब वाढतो. शरीराचे तापमाण वाढते
टेलीफोण वर कधी कधी आपल्याला कमी ऐकू आले तरी आपले बोलणे त्याला व्यवस्थित जात असते तसे त्याणे सांगितले तरी आपण मोठ्याणे बोलतो. ही अपुर्णांकित प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्यातील प्रतिक्षिप्तांश व्यक्त करणारे छेदांक हे तीव्रतेनुसार/ गरजेणुसार बदलतात.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{आता हेच मराठीत सांगा की!}

आता हेच मराठीत सांगा की! Big smile

{(विषय दिलेला नाही)}

Laughing out loud Laughing out loud Laughing out loud

{मकजी}

या पुर्वी पण आणि आत्ताही " संस्कृति" हा विषय निवडला आहे पण इथे दिसत नाही.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{दाद्या... आता सांगतो का}

दाद्या...
आता सांगतो का उत्तर?
का आणु पोकल बांबू? Big smile

{गप्प बसून भांडण करणं ज्यांना}

गप्प बसून भांडण करणं ज्यांना जमत ते कधीच आवाज चढवत नाहीत.

(गप्प बसून भांडण करणं शिकण्यासाठी व्यनी करा)

संजा


{व्यनि करतोय}

व्यनि करतोय wink

{आवाज का चढतो याचं उत्तर}

आवाज का चढतो याचं उत्तर काहीसं पटलं.

ज्या लोकांमुळे आपल्याला फरक पडतो त्याच लोकांवर आपण चिडतो. रस्त्यातून जाणार्‍यावर आपण चिडत नाही. सगळ्यात जास्त जे जवळचे त्यांच्यावर राग निघतो.

पण भांडणाचं तसं नसावं. माझ्याबाबतीततरी, भांडण झालं, होतंय असं दिसलं की माझा आवाज अतिशय मऊ होतो, आणि बोलणं अति-आदबशीर असतं. दुसर्‍याला चुका करायला भाग पाडून आपण मॅच जिंकू शकतो, प्रत्येक वेळी आपण 'हल्ला' करण्याची गरज असते; फक्त यासाठी पेशन्स हवा. माझ्या दृष्टीने एखादी गोष्ट चुकीची असेल तर मी अगदी मनापासून भांडण करते. बर्‍याचदा भांडण मुद्द्यांवर असतं त्यामुळे मुद्दे पटले किंवा संपले की भांडणही संपतं. क्वचितच एखाद्या माणसाशी भांडण असतं, तेव्हा मात्र मला आमची मांजर आठवते ... उंदराशी खेळून खेळून त्याला मारणारी ... कावेबाज!

{अदिती}

"ज्या लोकांमुळे आपल्याला फरक पडतो त्याच लोकांवर आपण चिडतो. रस्त्यातून जाणार्‍यावर आपण चिडत नाही. सगळ्यात जास्त जे जवळचे त्यांच्यावर राग निघतो."
तुझ म्हणन काही अंशी सत्य आहे पण, बरेच लोक शुल्लक कारणावरुन जसे की :- सुट्टे पैसे, रेल्वेमधील धक्का, रिक्षावाला , बस कंडक्टर ई. यांच्याशी भांडताना पाहीले आहेत.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{नात}

भांडण्यासाठी सुद्धा एक नात लागत. ते नातच जे मान्य करीत नसतात त्यांच्याशी भांडणे म्हणजे दगडावर डोके आपटुन घेणे असते.
कितीही विवेकी माणुस असला तरी त्याचा एखादा अशक्त बिंदु जर छेडला तर तो सटकतो. त्याच स्वतःवरच नियंत्रण जात.
भांडणात त्रागा, राग,असहायता, अपेक्षभंग,चीड, प्रेम ,आदर सर्व भावनांच्या छटा असतात. कुणाशी आणी कसे भांडतो आहोत यावर ते अवलंबुन आहे.
विद्वज्जनांच्या भांडणाला वैचारिक मतभेद म्हणतात. मोठ्याने न बोलता केलेल्या भांडणाला मूक भांडण अथवा अबोला म्हणतात. तो कोणत्याही नात्यात असु शकतो. मी बिट्टु भुभुशी कट्टी घेतल्यावर तो मला नाकाने ढुसणी मारुन बोलायला भाग पाडत असे मग माझा राग कुठल्याकुठे पळून जात असे.
बिट्ट्या मी तुझ्याशी कधीच कट्टी घेणार नाही तु ये बाबा परत अस खिन्न होउन मी स्वतःशीच म्हणतो. पण तो कधीच परत येणार नाही इतक्या लांब गेलाय तो.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

{बिट्ट्या मी तुझ्याशी कधीच}

बिट्ट्या मी तुझ्याशी कधीच कट्टी घेणार नाही तु ये बाबा परत अस खिन्न होउन मी स्वतःशीच म्हणतो. पण तो कधीच परत येणार नाही इतक्या लांब गेलाय तो.

ओ काका, नका ना सारखं असं म्हणु...मला आमच्या राजाची आणि ब्राऊनीची मरणं डोळ्यासमोर दिसतात नेहमी तुम्ही बिट्टूचं नाव काढलं की! Sad

{खुप लहान पणी}

पाहीलेला "छोटाजवान" सिनमा अंधुक अंधुक आठवतोय.(मी हमसुन हमसुन रडल्याच मात्र स्पष्ट आठवतय)


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{पकाकाका + धमु, असल्या आठवणी}

पकाकाका + धमु,
असल्या आठवणी जागवुन कशाला आमच्या डोळ्यात पाणी आणता???

{तर्क बरोबर.}

तुमचं म्हणनं पटलं. हास्य


बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

{मलाही पटले.}

मलाही पटले.

{हं पटण्यासारखं उत्तर असलं तरी}

हं पटण्यासारखं उत्तर असलं तरी नेहमीच हे कारण योग्य असेल असं वाटत नाहि


-ऋ

{तुमच ही}

कारण येउद्या की, वाचायला आवडेल आम्हाला


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

{अबे.. ! सहसा मला राग येत नाही}

अबे.. !

सहसा मला राग येत नाही ( असे मला वाटतं) पण आला तर संवेदना कुठचे कुठे पळून जाते काय माहीत.. जयपाल उत्तर द्या मालक !

जरा कळू दे कसा कंन्ट्रोल करायचा राग ते.


Hope is a good thing...

{ते र्‍हदय लै भारी रे .काळजाचा}

ते र्‍हदय लै भारी रे .काळजाचा तुकडा अलगद काढून घेतलास......
काळजाचा तुकडा अलगद कापून घेणारे सारेच काही शायलॉक नसतात


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते