वांगे अमर रहे !
वांगे अमर रहे !
कॉलेज संपवुन शेती करायला गेलो तेव्हा गावातील इतरांकडे नाही ते ज्ञान आपल्याकडे आहे असा माझा द्रुढ समज होता आणि त्याच अविर्भावात मी शेतीची सुरुवात केली. या सर्व जगाच्या लेखी मुर्ख असलेल्या शेतकर्यांना स्वानुभावाने शहाने करण्यासाठी भरघोस उत्पन्न घ्यायचे ठरविले. दोन महिण्यात नगदी पैसा मिळ्वुन देणारे पिक म्हणुन वांगीची निवड केली आणि ५ एकरात वांगीची लागवड केली. मेहनत्,जिद्द सर्वस्व पणाला लावलं. मेहनत फळा आली. भरघोस पिक आलं.अन्य शेतकरी घेतात त्याच्या १-२ नव्हे चक्क ५-६ पट उत्पादन मिळालं. आणि इथेच माझे ग्रह फिरले.
माझी वांगी बाजारात गेली आणि स्थानिक बाजारात वांगीचे भाव गडगडले.५ रुपयाला पोतं कुणी घेइना. वाहतुक,हमाली,दलाली वजा जाता जो चुकारा मिळाला ते पैसे बसच्या तिकीटालाही पुरले नाहीत. शेतात घेतलेली मेहनत आणी वांगी फुकटात गेली. असे काय झाले ? काहीच कळत नव्हते.प्रारंभीच म्हटल्याप्रमाणे माझ्या नजरेत इतर शेतकरी अडाणी,मुर्ख असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचा प्रश्नच नव्हता.शेवटी निष्कर्श निघाला की मार्केट्मध्ये गरजेपेक्षा जास्त माल गेल्यामुळे भाव पडले.कारण ग्राहकाला जेवढी गरज असेल तेव्हढीच तो खरेदी करेल.माझी वांगी खपावी म्हनुन ग्राहक पोळी,भात,भाकरीऐवजी नुसतीच वांग्याची भाजी खावुन पोट थोडीच भरनार आहे? स्थानिक बाजारात गरज ,मागणीपेक्षा जास्त माल गेल्याने ही स्थिती झाली त्याला जबाबदार मीच होतो. इतर शेतकर्यांनी सायकलवर आणलेली अर्धा पोतं वांगी सुद्धा माझ्या मुळे बेभाव गेली होती. सायकलवर अर्धा पोतं वांगी आणुन उदर्निर्वाह करणारे माझ्यामुळे अडचणीत आले.
झाली चुक पुन्हा करायची नाही म्हणुन दुसर्या खेपेस वांगी आदिलाबादला न्यायचे ठरवले. माझ्या गावाहुन १५० किमी अंतरावर मोट्ठी बाजारपेठ असलेले आंध्रप्रदेश मधिल आदिलाबाद शहर. ६० पोती वांगी न्यायची कशी? स्पेशल वाहनाचा खर्च परवडणार नव्हता म्हनुन माल बैलबंडीने हायवे पर्यंत नेला.रायपुर - हैद्राबाद जाणार्या ट्रकला थांबवुन माल भरला.तिथे हमाल किंवा कुली नव्हताच त्यामुळे मीच ट्रकड्रायव्हरच्या मदतिने माल चढविला.६० पोती प्रत्येकी वजन ५०-५५ किलो. अनुभव नवा होता.मजा वाटली (?) शेतकरीcumहमाल.Two in One.
आदिलाबाद गाठले.
तिथल्या मार्केटची गोष्टच न्यारी.मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती.
वांगेच वांगे.
अत्र तत्र सर्वत्र वांगेच वांगे.
जिकडे तिकडे चोहीकडे,वांगेच वांगे गडे,आनंदी आनंद गडे.
मार्केट वांग्यांनी भरलं होतं.त्या सन्दर्भात एका शेतकर्याला विचार विचारले.
"यंदा हवामान वांगी साठी फारच अनुकुल असल्याने वांगीच भरघोस उत्पादन आलयं." तो शेतकरी.
"भाव काय चाललाय?" माझा प्रश्ऩ.
"सकाळच्या लिलावात ५-६ रुपये भाव मिळाला." तो शेतकरी.
"किलोला कि मणाला?" माझा प्रश्ऩ.
" किलोला? अरे यंदा किलोला विचारतोकोण ?.पोत्याचा हिशेब चालतो." तो शेतकरी.
"म्हंजे? पोतंभर वांगीला ५-६ रुपये?" माझा प्रश्ऩ.
"पोतंभर वांगीला नाही,पोत्यासहीत पोतंभर वांगीला." तो शेतकरी.
"रिकाम्या पोत्याची किंमत बाजारात १५ रुपये असतांना पोत्यासहीत पोतंभर वांगीला ५-६ रुपये?" मी मलाच प्रश्न विचारीत होतो.हे कसं शक्य आहे? विश्वास बसत नव्हता पण सामोर वास्तव होतं.
"आता लिलाव केंव्हा होइल?" माझा प्रश्ऩ.
"इथे नंबरवार काम चालतं,मी काल आलो,माझा नम्बर उद्द्या येइल कदाचित." तो शेतकरी.
"तोपर्यंत वांगी नाही का सडनार?" माझा प्रश्ऩ.
यावर तो काहीच बोलला नाही.मुक होता.डोळे पाणावले होते,एवढ्या मेहनती पिकविलेलं वांग सडणार म्हटल्यावर त्याचा जिव कासाविस झाला होता.
आता माझ्याही मनात कालवाकालव व्हायला लागली.
आपला नंबर तिन दिवस लागला नाही तर अर्धी वांगी नक्कीच सडणार. डोळ्यादेखत वांगी सडतांना पाहणं मानसिकद्रुष्ट्या पिडादायक ठरणार होतं. मी मनातल्या मनात गणित मांडायला सुरुवात केली. तिन दिवसात किमान अर्धी वांगी नक्कीच सडणार. उरलेली ३० पोती गुणिला ५ वजा तिन दिवस जेवणाचा,निवासाचा खर्च बरोबर उणे पंधरा ( - १५) म्हनजे वांगी विकण्यासाठी मला जवळुन १५ रुपये खर्च करावे लागनार होते.
काय करावे मला सुचत नव्हतं, डोकं काम करीत नव्हतं, माझं सर्व पुस्तकी ज्ञान उताणं झोपलं होतं.
आता पुढे काय?
निर्णय घेतला. एकदा डोळेभरुन त्या वांगीकडे पाहिलं. गुलाबी-गुलाबी,तजेलं आणि टवटवित. कुणाचीही द्रुष्ठ लागावे अशी. ते द्रुष्य डोळ्यात साठवलं, वांगीकडे पाठ फिरविली आणि गावाचा रस्ता धरला. गावाजवळ आलो तेव्हा दिवस उतरणीला आला होता.आणि आता मला एका नव्या समस्येने ग्रासले होते. गावांतील शेतकरी मला यासंदर्भात विचारतील त्याला उत्तर काय द्यायचे? मुर्ख शेतकर्यांच्या नजरेला नजर भिडविण्याचे धाडस विद्याविभुषीत शहाण्याकडे उरले नव्हते. मग एका चिंचेच्या झाडाखाली विसावलो.तेथेच टाइमपास केला. गावातील सर्व लोक झोपी गेले असतील याची खात्री झाल्यानंतरच गुपचिप चोरपावलाने गावात प्रवेश केला.
आजही मला दिसतात.
..ते ..वांगे..
गुलाबी-गुलाबी,तजेलं आणि टवटवित. कुणाचीही द्रुष्ठ लागावे असे,अजुनही न सडलेले.
आणी माझ्या द्रुष्टिपटलावर अमर झालेले.
गंगाधर मुटे
(पुर्वप्रकाशीत)
.....................................................
(मी "शेतकरी आत्महत्त्यांवर तज्ञांची मुक्ताफळे" - दुवा हा लेख लिहीला आहे. त्यावर आलेल्या एका प्रतिक्रियेवर खुलासा करतांना मी स्वतःचा अनुभव विषद केला. नंतर लक्षात आले की हा अनुभव म्हणजे एक स्वतंत्र लेखच तयार झालेला आहे.)
.....................................................
.jpg)
आईग्गं..........
असाच एक प्रसंग....
मित्रानं कोल्हापुरला शेतात मटार केली अन भरपुर पीक आलं. दोनशे टन मटार झाली. पहिला फेरा टेंपोत भरुन पुण्याला आणला, चारशे रुपये भाडं देऊन अन इथं भाव काय मिळाला तर दोनशे रुपये टन. तसाच सगळा माल कचर्यात टाकला वैतागुन त्यानं अन गेला परत. नंतर उस घेतला अन कागलला नेला तर गाडी तब्बल अकरा दिवस गेटावर उभी. आता शेती विकलीये अन पुण्यात येऊन पडेल ती कामं करतो.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
असाच किस्सा माझ्या मामाच्या
असाच किस्सा माझ्या मामाच्या बाबतीत घडला.
चांगला डब्ब्ल एम ए, पण शेती करायचा. नवीन प्रयोग म्हणुन कधी कुणी न घेणार दुध्याच पीक घेतल. पहिल्या खेपेला मस्त पीक आल. त्याच देख देखी मग बाकीच्या गावकर्यांनीही दुधी लावला. त्यामुळे आवक वाढली आणि बाजरभाव उतरला. जबरदस्त फटका पडला, पदरमोड करुन दुधी विकायची पाळी आली, तरी बाकी उरला तो शेवटी गायी-गुरांना घातला.
आता मामा शेतीसोडुन नोकरी करतोय.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
अरारारा..... अवघडाय सगळं! आन
अरारारा.....
अवघडाय सगळं! आन त्ये बाप्पूजी म्हणत्यात खेड्याकडं चला....
मटारला २००रु.टन? मायला...विकताना किलोला पस्तीसच्या खाली येत नव्हते कीरे
@गणपा, मामांना म्हणावं, आता परत घ्या दुधीभोपळा..आणि बाजारला नका जाऊ, आयुर्वेदिक वैद्य शोधा.... "मधुमेहावर अत्यंत गुणकारी भोपळा पावडर" कितक्याला विकतात माहितीये का? १२०/- ला १००ग्रॅमची पुडी!
नायतर दुर्बिटनेबाईंबरोबर पार्ट्नरशीप करायची.....
सकाळी युनिव्हर्सिटीत मॉर्निंग वॉकला आलेल्यांना ज्युस पाजायचा - १५ रुपये ग्लास.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
जोरदार धंदा!
तिथं आणि औंध वगैरे भागात अतिसुखामुळं जडत चालेल्या विकारांनी ग्रस्त अशी बक्कळ मंडळी आहेत. त्यांना 'आयुर्वेदिक' नावाखाली काहीही खपवता येतं. एक 'रक्तदाबावर गुणकारी' वगैरे बोर्ड लाऊन भोपळ्याचे घारगे (घारगेच म्हणतात ना? शब्द नीट आठवेना..) विकले तरी खपतील..
असो!
ए लेका
ते भोपळ्याचे घारगे लाल भोपळ्याचे असतात दुधीचे नव्हेत!
तरी गेला बाजार 'चार आण्यात दुधी हलवा!' चा प्रयोग करायला हरकत नाही!
हे आमचं पाककलेतलं ज्ञान आमचं
हे आमचं पाककलेतलं ज्ञान
आमचं इधान माघारी!
>>तरी गेला बाजार 'चार आण्यात दुधी हलवा!' चा प्रयोग करायला हरकत नाही!

त्यासाठी आधी आडोसा करावा लागेल.. नायतर एकाचा पोपट झाला की दुसरं गिर्हाइक नाही मिळायचं
उत्तम लेख अशी प्रतिक्रिया तरी
उत्तम लेख अशी प्रतिक्रिया तरी कशी देवू
..
यावरून "तांबडा चिखल" हा धडा आठवला ... तिथे टोमॅटो इथे वांगे ...
यावरून "तांबडा चिखल" हा धडा
यावरून "तांबडा चिखल" हा धडा आठवला ... तिथे टोमॅटो इथे वांगे ...
अगदी हिच आठवण आली..
-निखिल
मलापण हा लेख वाचतानाच त्या
मलापण हा लेख वाचतानाच त्या लेखाची आठवण झाली होती..
शेवट अगदी पिळवटून टाकणारा होता तिचा..
अवांतरः त्या धड्याचे नांव तांबडा चिखल होते की लाल चिखल??? मला लाल चिखल असावा असं वाटतंय!!!
लाल चिखल आहे... लेखक भास्कर
लाल चिखल आहे... लेखक भास्कर चंदनशिव बहुतेक
-निखिल
अगदी
तोच धडा आठवला.. हे सगळं भयाण आहे... एकीकडे लोकांना खायला नाहीये आणि एकीकडे एवढं सगळं वाया जातय....
काळीज चिरलं वाचताना.....
शेतकर्यांच्या व्यथा तो बळीराजाच समजु जाणे. पाऊस, ऊन, थंडी सगळेच दावेदारासारखे वागतात. हवे तेव्हा येत नाहीत अन नको तेव्हा नको तेव्हढे. उभं पीक कधी पिवळं पडतं, कधी सडतं, कधी करपतं तर कधी झोपतं. पीक हातात येईपर्यंत कर्ज काढुन पैसे उभे करायचे अन पीकाची अशी वाट लागली की परत नवं कर्ज काढायचं. पीक भरपुर आलं तर भाव नसतो. किरकोळ बाजारात भाव असतो तेव्हा शेतकरी उपाशीच असतो, गब्बर होत असतो तो अडता, दलाल. बियाण्याची हमी मागणं म्हणजे तर अशक्यच. अगदी बागायती शेती असली तरी पैसे सोडल्याशिवाय कॅनॉलला आवर्तनं होत नाहीत अन झाली तर आपल्या पाटाला पाणी येत नाही. वीज नसल्यानं मोटरी चालत नाहीत अन वीज आलीच तर एव्हढा दाब येतो की जळुनच जातात. शेतीशी जवळुन संबंध आल्यानं माझ्यासारख्याला हे थोडंफार तरी कळतं. बाकी सगळा आनंदी आनंदच.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अगदी अगदी!
हे सगळं आहेच, पुन्हा खतासाठी सरकारी गोदामावर वार्या आल्याच!
ज्याची बागायत जोरात, त्याला काळ्याबाजारातून खतं,बेनं सगळं मिळु शकतं.. पाटकर्याला कोंबडं-बाटली दिली की आपोआप दारीचा लंबर लागतो.. यमेशिबीवाले मीटर देता देत नाहीत, अन मग पाण्यासाठी आकडे टाकावे लागतात...मग मोटारी जळल्या की खर्च सोसता येतो तो बागायतदाराला!
प्रसन्नदा, ऊसाच्या राजकारणावर लिही की रे कधी!
उत्तम लेख
लेख आवडला. पुर्वी उत्तम शेती मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी होती. आता नेमक उलट झालय.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हा अनुभव
फारच विदारक अनुभव.
छोट्या शेतकर्यांना कुठले पीक घेणे फायद्याचे आहे किंवा मागणी असलेले पीक कुठले याबाबत काही मार्गदर्शन करणार्या संस्था, समित्या असतात की नाही?
माल विकण्यासाठी बाजार समित्या असतात की....
पण तिथं शेतकरी सोडुन बाकी सगळे दिसतात अन त्यांचाच फायदा करुन घेतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
असतात की!
पण ते सांगतात 'अमुक एक पीक घ्या ह्या वेळी' आणि मग जिकडं तिकडं तेच पीक...सगळ्यांच्याच उरावर!
तीच तर गेम असते....
तसं झालं की भाव पडतात. मग पडत्या भावानं माल घ्यायचा. जर दोन दिवस तो टिकला तर अचानक किरकोळीचे भाव वाढतात. मग नुस्त्या नोटा मोजायच्या. अन शहरी गिर्हाईकाला शेती वगैरे काही माहितीच नसतं. ते बसतं शेतकर्याला शिव्या घालत.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
:-(
थोडक्यात शेतीपेक्षा शेतमाल ट्रेडींग जास्त फायदेशीर.
शेतीत फायदा नसतोच हो......
सगळा तोटाच. ट्रेडिंग केव्हाही फायदेशीर.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
असं कोण म्हणतो?
ऊस घ्या ऊस!
आधी सेटींग करुन कारखान्याशी बांधुन घ्या, संचालक मंडळातले, शेक्रेटरी वगैरेपैकी कोणी खिशात घाला...मग बघा, उशीरा तोडणीचा ऊसही कसा फुल्ल भावानं जातो ते!
सगळ्यात भारी धंदा म्हणजे....
पहिल्या पेर्याचा उस जाईल त्या किमतीत जाऊ द्यायचा, पैसा वाड्या-चिपाड्यात काढायचा अन परत पंधरा दिवस दारं धरुन फुटवा टाकायचा बाजारात. कुणालाच खिशात घालायला नको. उसाचा पण पैसा, वाड्या चिपाडाचा पण पैसा अन फुटव्यात तर पैसाच पैसा - कुणाला कळतं इथं शहरात आपण पीतो तो रस उसाचा कि फुटव्याचा की शाळुताटाचा?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आयच्यान!!!! गप की! असं
आयच्यान!!!! गप की! असं चारचौघात बोलु नये ट्रेड शिक्रेट!
>>कुणाला कळतं इथं शहरात आपण पीतो तो रस उसाचा कि फुटव्याचा की शाळुताटाचा?
शाळुताटाचा रस.....
ह्ह्म्म...
हे नव्हतं ठाऊक!
असो, पुण्यात आल्यावर, 'एक पेरु रु.५/- फक्त' असं आमच्या पुणेकर कारभारनीनं सांगितल्यावर मी बेशुध्द पडायचाच बाकी होतो!
बाय द वे
असे किती शेतकरी आहेत व आता त्यांना जर सेझमधे जमीन देणे आले तर ते फायद्याचे म्हणायचे का?
अन एकदा जमिन दिल्यावर....
मग काय करायचं त्यांनी? युपी, बिहार, बंगाल, कर्नाटक, आंध्र मधे भीक मागायची? सेझ वगैरे सगळं आपल्याला बरं पण शेतकर्याला काय मिळतं त्यात? उलट जमीन असेल तर अडीनडीला गहाण ठेवुन, विकुन पैसे घेता येतात ती सोय पण रहात नाही. काय चाटायचं त्या सेझला?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हॅ हॅ हॅ.. करु द्या की मग
हॅ हॅ हॅ.. करु द्या की मग तोट्यातली शेती. अवांतर पुणे जिल्ह्यात १५००० एकरांवर सेझ होणार आहे असे ऐकले. सगळ्याच शेतकर्यांनी अक्कल गहाण टाकली का सगळ्यानाचा साहेबांनी विकत घेतले.
-पुण्याचे पेशवे
काय लिहू तेच कळत नाही आहे
काय लिहू तेच कळत नाही आहे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
तुम्ही कशाला काय लिवताय? मस
तुम्ही कशाला काय लिवताय?
मस तंबाक घेताय न्हवं? त्यवडं बंबाखू सांभाळा म्हंजे झालं!
अरं तंबाक लै भारी आला
अरं तंबाक लै भारी आला शेतात....
भाव पण नगद अगदि सोन्यावानी भाव हुता रं.. पण वरनं तो मुतला नव्हं... सगळा बट्ट्याबोळ झाला बघ.. काय बी सुधत नाय आजतर म्या चालतो एक चपटी मारुन झोपतू नाय तर झोप बी नाय येणार... - ईती गावातील एक शेतकरी. जानेवारी - फ्रेबुवारी मध्ये तंबाखू कापनी नंतरच अचानक संध्याकाळी पाऊस पडला मुसळधार ! सुकायला घातलेला तंबाखुचा लगदा झाला काही मिनिटामध्येच... बेभरश्याची शेती का म्हणतात ते त्या दिवशी कळाले.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
(विषय दिलेला नाही)
(विषय दिलेला नाही)
या सगळ्या समस्यांवर शेतमालावर
या सगळ्या समस्यांवर शेतमालावर प्रक्रिया करणं हा एक मार्ग आहे.
दुर्दैवाने भारतात असे प्रकल्प फक्त सरकारी अनुदान लाटण्यासाठी केले (कागदावर दाखवले जातात) अशाच एका प्रकल्पाचा (पंजाबमधे) मी साक्षीदार आहे.सरकारी खाती सुद्धा संपूर्ण निष्क्रीय आहेत या बाबतीत
मग शेतीमाल प्रक्रियेसाठी सेझ करायचे.....
संत्री पिकणार विदर्भात, त्यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग येणार कुठे पुणे-मुंबई-ठाणे-रायगडला. त्यासाठी स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी कवडीमोलानं घ्यायच्या. तिथं कामगार, तंत्रज्ञ बाहेरुनच येतील असं पहायचं. वर्षाला एक लाख रोजगार निर्मिती अशी ओरड करायची. वर्षाला एक लाख नोकर्यांसाठी तीन लाख लोक येतील त्यांना पुरेसं इफ्रास्टक्चर उभं करायचं नाही. अन भिकेला लागलेले स्थानिक शेतकरी आंदोलनं करायला लागले की वस्तुस्थिती कधीही न पाहिलेले अन शेती वगैरेमधलं शष्प काही कळत नसलेले विचारवंत ही झुंडशाहीच म्हणुन कोल्हेकुई करणार. यालाच विकास असं म्हणतात बरं?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
+१
विकेंद्रिकरण म्हणजे नक्की काय हा प्रश्न पडावा असा कारभार!
नाय भाऊ.....
शहरातच ज्यांच्या दहा पिढ्या गेला. ज्यांना माती चिखल म्हणजे घाण वाटते असे विचारवंत लेख लिहितील की यातच सर्वांगिण विकास अन शेतकर्यांचा फायदा आहे. अन मग आपण त्यावर इथे दिवसेंदिवस चर्चेचं गुर्हाळ पण लावु.
असो! भेट एकदा, समाज बदलण्याची चर्चा करु आपण.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अगदी!!
...
काय बोलू?
भारत हा
शेती प्रधन देश असुनही बळी(गेलेल्या)राजाचे हाल काही संपत नाहीत. वांग्या सारखे अनेक अनुभव माझ्या मामांनी देखिल घेतले आहेत. आता त्यांनी स्वतःच्या शेतात वैरण करुन जवळ पास १०/१२ म्हशी केल्या आहेत आणि गावच्या एस.टी. स्टॅड जवळचे एक जुने हाटेल परत चालु केले आहे.
साधारण १९९०/९१ ला तो मुंबईत आला आसताना म्हणाला होता-: "काय राव तुमची म्हुमइ हीत पाण्याला ८/१० रुपय मोजाय लागत्यात अन गावकड दुधाला दर इना म्हनुन लोकं बोबंल्त्यात"
सगळ्या उत्पादक कंपन्या आपापल्या उत्पादनाचा भाव ठरवतात पण दुर्दैवाने शेतक-याला त्याच्या मालाचा भाव ठरविण्याचा हक्क नाही. आडते /दलालच सगळे भाव ठरवतात (तेही ब-याच ठिकाणी बंद सैदा पध्द्तीने)
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
बीटी वांग्याचे वास्तव
बीटी वांग्याचे वैज्ञानिक वास्तव दुवा हा दैणीक सकाळ मधील गुरुचरण दास यांचा लेख वाचणीय आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
????? काय बोलु यावर....
????? काय बोलु यावर....
धन्यवाद.
सहृदय आभारी आहे सर्वांचा.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
त्रासदायक लेख.
त्रासदायक लेख.
हा आमचा स्वभाव