(इतरत्र पुर्वप्रकाशित. )
काल रात्री ऑफिस संपवून घरी जायला निघालो. एक मित्र सोबत होता नेहमी प्रमाणे जेव्हा दोन एकाच टीम चे लोक सोबत भेटतात तेव्हा जश्या गप्पा चलू असतात त्याच चालू होत्या. थोडासा पाऊस पडत होता. ऑफिस मधून बाहेर पडताना मी मित्राला म्हणालो "कंटाळा आला यार उद्या शनिवार असून पण ऑफिसल यायचे". मित्राने त्या नंतर मस्त पैकी एक पाच दहा मिनिटे सगळ्यांना शिव्या घातल्या. ऑफिसच्या गेटच्या बाहेरच पोलिसांची नाकेबंदी होती. मी म्हणालो " हे लोक रोज नाकाबंदी करतात, कशासाठी दोन चार दुचाकीस्वारांना अडवून त्यांचा कडून पैसे काढण्यासाठी??? ह्यावर तो म्हणाला " यार याच मुंबई पोलिसांनीच अश्याच एका नाकेबंदीत कसाबला सुद्धा पकडले आहे हे विसरून चालणार नाही". असेच चालत चालत कांजुरमार्ग स्टेशनावर आलो. आसनगाव लोकल इंडिकेटर वर दाखवत होती. "ह्या नंतर दोन ठाणे आहेत ह्यातच चढू" मित्राला डोंबिवली पर्यंत जायचे होते म्हणून तो म्हणाला.
लोकल स्टेशनात आली, नेहमी प्रमाणेच गर्दीने भरलेली. कसे बसे आम्हीही चढलो. मध्ये उभे राहायची जागा मिळाली. बाहेर पाऊस पडत असला तरी लोकल मधले वातावरण नेहमी प्रमाणे कोंदलेलेच होते. भांडूप आणि नाहुर च्या मध्ये कोणीतरी ओरडले मोबाईल गेला. माझा आणि मित्राचा हात लगेचच मोबाईल आहे का नाही तपासण्यासाठी खिशाकडे गेला. माझा मोबाईल खिशात होता म्हणून हुश्श करत प्रश्नार्थक नजरेने मित्राकडे पाहिले त्याच्या कडे पाहताच लक्षात आले. त्याचा मोबाईल गेलेलाच होता. असेच इकडे तिकडे पाहिले तर डब्याचा दाराजवळ अजून दोन जणांचे फोन गेले होते. माझा मित्र व मी लोकांना सरकवत कसे बसे दरवाज्याजवळ पोहचलो. ऐकून चार लोक होते ज्यांचे मोबाईल चोरीला गेले होते. त्यातल्या एकाने सांगितले, त्याचा मोबाईल चोरणारा त्याने पाहिला आहे. गुलाबी शर्ट घातलेला आहे आताच नाहुर ला उतरून मागच्या दरवाज्यात चढला आहे. डब्यात तो पर्यंत सगळी कडे मोबाईल चोराचीच चर्चा होती. एकटा माणूस चार मोबाईल चोरूच शकणार नाही नक्की टोळी असेल. असे एक ना अनेक तर्क मांडणे चालू होते. त्यात आता मुख्य प्रश्न होता ते त्याला पकडायचे कसे?? कारण मुलुंडला तो उतरून पळून जाउ शकला असता. ज्याने मोबाईल चोराला बघितले होते तो म्हणाला गाडी प्लॅटफॉर्म ला लागली की उडी मारून मागच्या दरवाज्याकडे पळणार.
गाडी मुलुंड स्टेशनात शिरत होती दरवाजाच्या समोरच्या बाजूला आम्हाला चार पाच जणांना जागा लोकांनी स्वतः:हून करून दिली होती. गाडी चा वेग थोडा मंदावताच मी आणि मित्रा ने गाडीतून उड्या मारल्या पाठोपाठ मागच्या दोघा तिघांनेही उड्या मारल्या. सावरून ट्रेन कडे बघे पर्यंत तर डब्बा थोडासा पुढे गेला होता. त्यामुळे आम्ही तसेच पळायला लागलो. बाकीच्या दारातल्या लोकांना आणि प्लॅटफॉर्म वरच्या लोकांना काही तरी लफडं आहे लक्षात आले. त्यामुळे लोक कधी नव्हे तर पळणाऱ्या लोकांना जागा करून देत होते. अजून ट्रेन पूर्णं थांबायची होती तेव्हाच माझा मित्र आणि त्या चोराला ओळखणारा इसम (त्याला आपण आता य म्हणूया ) डब्यात चढले. मी जेव्हा दाराजवळ पोहचलो तर पाहातो मित्राने एका माणसाला कॉलरने धरले होते आणि पब्लिक ने त्याला मारायला सुरवात केली होती. मित्र जेव्हा बाहेर त्याला घेऊन आला तेव्हा बरीच गर्दी जमली होती. चोराला बघितल्यावर खरे तर वाटते नव्हते तो चोर असेल. आता आजूबाजुची गर्दी चोरावर हात चालवायच्या तयारीत होती. मित्राने त्याला धरून ठेवले होते व समोर मी, "य" आणि मोबाईल चोरीला गेलेले दोन लोक होते.
"य" ने त्याला विचारले "माझा मोबाईल कुठेय?? "
चोर म्हणाल " माझ्या कडे नाहीये माझ्या साथीदारा कडे आहे"
"य" ने एक जोरदार अशी त्याचा कानाखाली काढली. बघ्यांची गर्दी वाढतच चालली होती. तितक्यात य चा मोबाईल चोराच्या पायाजवळ सापडला. मोबाईल उचलताच य ने व इतर दोन लोकांनी त्याला मारायला सुरवात केली. मित्राने त्याला कसे तरी धरून ठेवले होते. माझ्या आजवरच्या गेलेल्या मोबाईलची आठवण काढून मी पण एक दोन त्याला ठेवून दिल्या. पण अचानक गर्दी इतकी वाढली जो उठेल तो त्याला मारायला लागला. त्याला वाचवणे सुद्धा आमच्या हाताबाहेर होवू लागले. काही लोक तर ट्रेन पकडायची सोडून ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहतं होते. काही लोक मारतही होते. नेहमी मुंबईच्या लोकांचे वर्णन करताना ट्रेन मधून उतरताना कोणी पडला तर त्याच्यावर पाय ठेवून जायला कमी करणार नाहीत असे केले जाते. इकडे तर वेगळाच अनुभव येत होता. लोक ट्रेन सोडून चोराला मारत होते. ह्या सगळ्या गोंधळात आमच्या मित्राने व "य" ने मिळून त्याला पोलिसात द्यायचे ठरवले. पोलिसांकडे घेऊन जायचे म्हणाले की अर्ध्या गर्दीचा उत्साह ओसरला आणि गर्दी पांगायला सुरवात झाली.
आमचा मोर्चा (म्हणजे मी, मित्र, य, दोन जण ज्यांचे मोबाईल चोरी गेले होते आणि चोर) ह्यांचा मोर्चा निघाला पोलिस स्टेशना कडे. सर्व प्रथम कोणा एका वाटाड्याने आम्हाला एका चौकी कडे नेले. तिथे एक हवालदार साहेब खुर्चीत आरामात बसले होते. त्यांना आमची कहाणी थोडक्यात सांगताच ते जागेवरून उठले व सगळ्यात आधी त्यांनी चोरच्या कानाखाली एक ठेवून दिली. मस्त पाच एक मिनिट आरामात त्याच्यावर हात साफ करून घेतल्यावर आम्हाला म्हणाले "पुढे जी आर पी एफ्" ची चौकी आहे तिकडे घेऊन जा ह्याला". आमचा मोर्चा आता त्या नव्या चौकी कडे निघाला. तेवढ्या वेळात चोराने कबुली दिली होतीच की त्याची एक टोळी होती आणि त्याचा साथीदारांनी चोरी केली आहे. जि आर पी एफ् च्या चौकीत आम्ही पोहचलो तर तिकडे एक फौजदार बाई आमच्या समोर आल्या. परत एकदा त्यांना पूर्णं कहाणी सांगण्यात आली. मग त्यांनी एका शिपायाला बोलावून चोराची झडती घ्यायला सांगितले. तो हवालदार चोराला एका कोपऱ्यात घेऊन गेला आणि बेदम मारायला सुरवात केली. थोडावेळाने शिपाई एका हातात काही सामान आणि दुसऱ्या हातात चोर अश्या अवस्थेत बाहेर आला. चोराच्या चेहऱ्यावर मार खाल्ल्याचा चांगल्याच खुणा दिसत होत्या. चोराला बाई समोर उभे करण्यात आले. त्यापुढील नाट्य काही देत आहे.
बाई:- " काय रे तू हिंदू आहेस की मुसलमान? "
(४४० वोल्टस चा झटका मला ह्या वाक्याचा वेळेस बसला)
चोर "हिंदू"
बाई: " चोरी तू केलीस का?? "
चोर: "नाही माझ्या सोबतच्या लोकांनी. "
बाई: " शिपाई, काय काय निघाले ह्याचा कडे"
शिपाई: " एक मोबाईल, काही कागदे व ३०२ रुपये"
बाई: "आण ते इकडे"
शिपायाने ते सामान बाईंसमोर ठेवले. बाईंनी त्यातले ३०२ रुपये उचलून आपल्या खिशात टाकले.
बाई (चोराला): " काय रे हा मोबाईल कुठे चोरलास?? "
चोर "नाही हा माझाच आहे"
बाई : "नंबर काय मग तुझा? "
चोर आपला नं सांगतो. बाई त्यांचा टेबलावरील फोन वरून तो नं फिरवतात तो नंबर लागत नाही.
बाई: " हा पण चोरीचाच असेल, नंबर लागत नाहीये"
चोर: " नाही हो हा माझाच आहे"
बाई: "छुपा बैस जास्त आवाज नको करू"
बाई (आमच्या कडे पाहून) : " तुमच्या पैकी कोणा कोणाचे मोबाईल गेले आहेत?? कोण कोण तक्रार करणार आहेत?? "
या "आमचे चार जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यातला माझा ह्याचा कडे सापडला. "
बाई: " ठीक आहे तक्रारी सोबत पुरावा म्हणून तुमचा मोबाईल जमा करावा लागेल.
आमच्या नशिबाने य त्याचा मोबाईल जमा करायला तयार झाला. पुढचा गोळा आमच्यावर फेकला गेला तो तुम्हाला तक्रार नोंदवायला कुर्ल्याला जावे लागेल. त्यासाठी कुर्ल्याचे दोन हवालदार इकडे येतील त्यांचा सोबत आम्ही चोराला पाठवू. कुर्ल्याचे हवालदार इतर काही कामासाठी इकडे यायला निघाले आहेतच त्यांचाच बरोबर ह्याला पाठवू. मग सुरू झाल्या ते पोलिस खात्याचा बढाया. त्याचा एक एक शौर्यकथा आम्ही ऐकतच होतो. त्या चोराला परत मधल्या खोलीत नेण्यात आले. त्याला तिकडे नेतानाच नागडा करायची तयारी सुरू होती. बाई इकडे आम्हाला त्यांचा शौर्यकथा सांगत होत्या आणि आत मधून चोराचे प्रत्येक फटक्या गणित चोराच्या व्हिवळण्याचे आवाज येत होते. त्यातच एका शिपायाला अजूनच जोर आला. कुठून तरी तो एक मोठा पट्टा घेऊन आला. पट्ट्याची जाडी पिठाच्या गिरणीच्या पट्ट्याचा जादी पेक्षा जास्त होती. आता पुढे एक हवालदार चोराच्या गुढघ्यावर उभा होता आणि दुसऱ्या ने त्याचा पायावर जोर जोरात फटके मारायला सुरवात केली. तिसऱ्या फटक्या नंतर चोर रडायलाच लागला. तो रडत रडत ओरडला मारू नका साहेब मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो. बाईने इकडून ओरडून शिपायाला चोराला बाहेर घेऊन यायला सांगितले. तितक्यात कुर्ल्याचे दोन हवालदार तिकडे पोहचलेच.
त्याच वेळेस चोराने एक एक कबुली जवाब द्यायला सुरवात केली. त्याच्या सोबत चार लोक होते चारही लोक मुंब्र्याला राहणारे होते त्यातल्या एकाचे नाव अफजल होते. ह्या अफजल चे नाव घेताच सगळ्या पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लकेर उमटली. कुर्ल्याचा पहिल्या हवालदाराने अफजल बद्दल माहिती द्यायला सुरू केली. अफजल कुठे राहतो, त्याचे आई वडील काय करतात??? त्याचे मामा मामी काय करतात??? हे सगळे आम्हाला पुढच्या पाच दहा मिनिटे ऐकवले. दुसऱ्या हवालदाराने बाईच्या परवानगीने मुब्र्याला कोणाला तरी फोन लावला. अफजल समोरच फिरत आहे आताच आला आहे हे पलीकडचा माणसाने सांगितले. ह्यानंतर त्या चोराला कुर्ल्याला न्यायचे ठरले त्यावेळेस हवालदार क्रमांक एक ने बाईंना विचारले चोरा जवळ काय काय मिळाले??? बाईंनी त्यांचा समोर काही कागदे व तो मोबाईल ठेवला. त्यानंतर कुर्ल्याचा हवालदाराने सगळ्यांना कुर्ल्याचा चौकीवर यायला सांगितले. पोलिसांची ऐकूनच वागण्याची पद्धत बघून मी तर परेशान झालो होतो.
त्याच वेळेस मित्राने आणि मी कुर्ल्याला जायचे आधी काही तरी खायचे ठरवले. स्टेशन बाहेर पडून एका ठिकाणी खायला बसलेले असताना सहजच मित्राला विचारले
"तुझा इतका मोबाईल चोरिला गेला पण तू एकदाही चोरावर हात नाही उचललास" ह्यावर मित्र उतरला
"कुठल्या चोराला मारायचे मोबाईल चोरणाऱ्याला का त्याचेही ३०२ रुपये चोरणाऱ्याला??? "
कुठल्या चोराला मारायचे मोबाईल
कुठल्या चोराला मारायचे मोबाईल चोरणाऱ्याला का त्याचेही ३०२ रुपये चोरणाऱ्याला???
चोराची जात विचारणं नि
चोराची जात विचारणं नि पोलीसांनी स्वतःच त्या भुरट्या चोराचे पैसे लुबाडणं म्हणजे अतिच!!!
दोन्ही गोष्टींचं पोलिसांच्या नजरेतुन स्पष्टीकरण देता येईल....
पण जाऊ दे!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
दोन्ही गोष्टींचं पोलिसांच्या
दोन्ही गोष्टींचं पोलिसांच्या नजरेतुन स्पष्टीकरण देता येईल....
तुमच्या कडुन तेच अपेक्षित होते...
-निखिल
पैसे लुबाडणं....
यासारख्या गोष्टींबाबत पुर्वी अन्यत्र लिहिलच आहे. पुनरावृत्ती करण्यात अर्थ वाटत नाही. शेवटी सडलेल्या सिस्टीमची फळं सडलेलीच असतात. जीवो जीवस्य जीवनम दुसरं काय?
धर्माबाबतचा प्रश्न अनेकांना धक्कादायक वाटेल पण ती भयाण वस्तुस्थिती आहे अंडरवर्ल्ड मधली. वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या गँग आहेत अन त्यामधे बर्याचदा गँगलीडर त्याच्याच धर्माच्या लोकांची प्राधान्यानं भरती करतात. (दाऊद गँगमधे फुट याच कारणानं पडली होती.) पकडलेले लोक साथीदारांची नावं सहज सांगत नाहीत पण अनेकदा धर्म विचारला की त्याला उत्तर येतं अन त्यातुन क्ल्यु मिळतो. काही वेळा मिसलीड होतं पण बर्याचदा अनुभवावर बांधलेले आडाखे खरे ठरतात.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
पण अनेकदा धर्म विचारला की
पण उपयोग होतो का?
किंवा अधिक योग्य प्रश्नः उपयोग केला जातो का?
अतिरेकी, ज्या टोळीचा वरदहस्त आहे त्याच्या विरुध्द टोळीचे लोक पकडण्यासाठी ह्या गोष्टी केलेल्या आहेतच, त्याबद्दल प्रश्न नाही...पण अशा भुरट्या चोरांबद्दल?
चोराची जात विचारली? मला तर
चोराची जात विचारली? मला तर तसे कुठे काही दिसले नाही. असो.
-पुण्याचे पेशवे
उघडा डोळे पहा नीट....
बाई:- " काय रे तू हिंदू आहेस की मुसलमान? "
(४४० वोल्टस चा झटका मला ह्या वाक्याचा वेळेस बसला)
चोर "हिंदू"
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
धर्म बे! स्लिप ऑफ
धर्म बे! स्लिप ऑफ किबोर्ड!
उगं हुप्पकर्मी होऊ नको लगेच.
मला एक कळत नाही धर्मांधतेचा
मला एक कळत नाही धर्मांधतेचा उल्लेख कायम जातीयता असा का केला जातो? त्याला सरळ सरळ धर्मांधता म्हणता येत नाही का? उगाच नसती धूळफेक कशाला.
म्हणजे शिमोग्यात मुसलमानांनी तस्लिमा नसरीनचा लेख छापून आला म्हणून दंगल केली तरी ती जातीयताच म्हणणार आणि खैरलांजीत दलिताना जाळलं तरी जातीयताच म्हणणार. वस्तुतः दोहोंमधे फरक आहेच.
हा लेख मी पूर्वीही वाचलेला होता. त्यामुळे नव्याने प्रतिक्रिया देत नाही. पोलिस बाइंनी पैसे खाल्ले याचे वाईट वाटले. बाकी असो.
-पुण्याचे पेशवे
त्यात काय वाईट वाटायचं......
तशीही शिक्षा होण्याची शक्यता कमीच. मग किमान पैसे तरी गेले ना त्याचे? दोन फटके तरी पडले ना? ग्लास अर्धा भरला आहे हे बघा, अर्धा रिकामा आह्हे हे बघु नका.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हॅ हॅ हॅ. अर्धा भरलेला ग्लास
हॅ हॅ हॅ. अर्धा भरलेला ग्लास पाहीला. अर्ध्या रिकाम्या ग्लासाबाबत हळहळलो. झाले. मॅटर खतम.
-पुण्याचे पेशवे
होय की!
बरोबर आहे तुझं!
पण मग 'चोराची जात विचारली? मला तर तसे कुठे काही दिसले नाही. असो.' हे अंमळ शब्दांच्या कोलांट्या मारुन विषयाला फाटे फोडुन रिकामे वाद घालण्याची एका दर्जेदार संस्थळाची आठवण करुन देते.
हम्म.....
हम्म.....
आताच पोलिस स्टेशन मध्ये चक्कर
आताच पोलिस स्टेशन मध्ये चक्कर मारुन आलो.. भयानक अनुभव !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
:| परिचित तरीही खिन्न करणारा
:|
परिचित तरीही खिन्न करणारा अनुभव
-ऋ
ह्म्म
अशी घटना बघितली की सुन्न व्हायला होत....
अनेक अश्या गोष्टी नेहमीच आजुबाजुला घडत असतात..
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
ह्म्म्म....
अटक बिटक केली असेल तर...
आनंदानं थयाथया नाचला असेल तो चोर. हो जेलमधे गेला की करीयरचा पुढचा मार्ग मोकळा. रिमांड होम म्हणजे गुन्हेगारांची शाळा अन जेल म्हणजे कॉलेजच. पार कॅम्पस रिक्रुटमेंट पण होते.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अगदी!
आमचा एकेकाळचा एक दोस्त असाच डॅडीच्या गळाला लागला...पुण्याच्या 'कॉलेजमध्ये' होता ६ महिने!
असो.
बाकी, मी तो प्रश्न विचारला ह्यासाठी, की पुढे काही हालचाल झाली, की त्या चोराकडुन काही लिंका लागल्यामुळं त्याला सोडला?
हालचाल करुन तरी काय होणार?
फारतर जाईल आत महिनाभर. सन्मान्य लोक मदत करणार नाहीत म्हणुन साक्षीदार नसणार अन पंचपण `सराईत' घ्यावे लागणार. फिर्यादी पण मुद्देमाल एकदा ताब्यात मिळाला की जाऊ दे, कश्याला कटकट म्हणणार. तपास करणारा पोलिस दोन पाच वर्षे कोर्टात तारखांना येत रहाणार अन एव्हढं करुन पुराव्याअभावी गुन्हेगार सुटणार. दरम्यान तो कुठल्या तरी कंपनीत जमा झालेला असणार नाहीतर निवडणुकीला उभं राहुन जिंकुन आलेला असणार म्हणजे परत त्यालाच सलाम मारणं आलं पोलिसाच्या नशीबी. उगीच नाही कन्व्हिक्शन रेट २०-३० टक्के एव्हढा कमी.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आऽल इज वेऽल...
म्हणुनच तर ना!
काही अपेक्षित प्रतिक्रिया
लेख जेव्हा पहिल्यांदा प्रकाशीत केला तेव्हा त्याला एक तळटीप होती... त्यावेळेस पोलिसांच्या मानसिकते बद्दल कोणीच बोलले नाही... कदाचीत तळटीपेमुळे असेल असे वाटले होते... तर ती तळटीप
"ह्या लेखात मला कुठेही पोलिसांबद्दल किंवा पोलिसखात्याबद्दल काही वाईट लिहायचे नाही. त्यांचे वागणे जसे माझ्या समोर आले तसे मांडायचा प्रयत्न करतोय. हे लिहिण्याचे कारण काय असा बर्याच जणांना प्रश्न पडेल त्यावर मी इतकेच सांगु शकतो लिहायचे कारण माझ्या मित्राचे शेवटचे वाक्य. बर्याच वेळा आपल्याला पोलिसांसोबत वेगवेगळे अनुभव येतात त्यात पोलिस लोक विचित्र वागतात. साधे दुचाकिवरुन जाताना पकडलेले असो किंवा पोलिसात तक्रार करायला गेलेले असो. कधी आपण जाणुन घ्यायचा प्रयत्नच करत नाही हे लोक असे का वागतात?? आता त्या फौजदार बाईंनी ते ३०२ रुपये परत का नाही केले ह्याचे कारण काय असु शकेल. कदाचित त्यांचा पगार त्यांना पुरत नसेल किंवा अजुन काहीतरी असेल. आपल्या ईथे पोलिसखात्यातिल किंवा पोलिसखात्याचा संबधातिल अनेक लोक आहेत तसेस काही पत्रकार मंडळी आहेत ज्यांना जवळुन पोलिस खात्याचा अनुभव आहे त्यांनी पोलिसांच्या मानसिकते बद्दल काही तरी प्रकाश टाकावा अशी विनंती मी त्यांना करतो. लहानपणी कधी तरी ऐकलेले समुहगीत आज आठवत आहे त्याचा ओळी "पोलिसांतिल माणुस तुम्ही जाणुन घ्या हो जरा" अश्या काहीतरी होत्या. बाकी तो पर्यंत चोराला आधी हिंदु का मुसलमान असे विचारण्यामागे काय कारणे असतिल ह्याचा मी विचार करतो.
-निखिल
कठीण आहे सगळं.
कठीण आहे सगळं.
हा आमचा स्वभाव
>>>बाकी तो पर्यंत चोराला आधी
>>>बाकी तो पर्यंत चोराला आधी हिंदु का मुसलमान असे विचारण्यामागे काय कारणे असतिल ह्याचा मी विचार करतो.
ह्याचे एक महत्त्वाचे कारण असे की, आपल्या भारतामध्ये अजूनही धर्म आणि जातीव्यवस्थेचा पगडा खूप भारी आहे. आता जर चोराने आडनाव देश्पांडे सांगितले असते तर साहजिकच पोलिस किंवा तुझ्या पण मनात आले असते की अरे चांगल्या घरचा चोर दिसतोय परिस्थितीने ओरबाडला दिसतोय. किंवा आड्नाव खन्ना/ओबेरॉय सागिंतले असते तर आपण विचार करतो की वाईट नादाला लागलेला दिसतोय चोर्या करायला शिकला आहे.
आता चोराचे नाव कशाला विचारायचे ह्याला कारण आपली मानसिकता. आणि हो, पोलिस हा पण आपल्यापेकीच कोणि एक असतो
आमाला आमच्या लायानीपरामानं जाऊ द्या
काही अंशी सहमत.
पोलिसांनी चोराचे नाव प्रथम न विचारता त्याचा धर्म विचारला. जर पोलीसांनी जर त्याचे नाव पहिले विचारले असते तर जास्त बरोबर झालं असतं. अर्थात, आपण काही बोलायला गेलो असतो तर त्यांनी "आमाला आमच्या लायानीपरामानं जाऊ द्या" असं डायलॉग मारला असता.
-----
काहीबाही http://kaaheebaahee.blogspot.com/
>>"आमाला आमच्या लायानीपरामानं
>>"आमाला आमच्या लायानीपरामानं जाऊ द्या" असं डायलॉग मारला असता.
अगदी अगदी!