मार्गदर्शन

5
-3

तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले असतील...
विश्वासघाताचे.. किंवा लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतल्याचे...

तुम्ही त्यांना कसं तोंड दिलंत??
काय केल अश्या वेळी??
कसे बाहेर पडलात यातून??

{उगाच नवरा सोडुन दुसर्‍या}

उगाच नवरा सोडुन दुसर्‍या कोणावर विश्वास का ठेवलात?
असो, दंगा करण्यासाठीच धागा काढलाय अशी शंका आहे.

{श्या !!!}

का?? नवरा सोडून कोणी मित्र मैत्रीण नसते का आपल्याला??
दंगा करायला धागा काढला असता तर "चर्चास्थळ" ह्या सदरात प्रसिद्ध नसता केला...

ज्यांना दंगा करण्यासाठी हा धागा काढला आहे असे वाटत असेल त्यांनी प्रतिसाद नाही दिला तरी चालेल...
ज्यांना धागा जेन्युईन वाटतो आहे त्यांनी प्लीज आपले अनुभव किंवा अश्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर कसे पडलात हे सांगा...

{तारतम्य}

कोणाकडे बोलावं याचं तारतम्य बाळगल्यास हा प्रश्न उद्भवणार नाही. जे झालं त्याला इलाज नाही. जवळच्याच
माणसाने फायदा घेतला तर जास्त वाईट वाटतं. म्ह्णून अनोळखी माणसाला काही सांगितल्यास सहसा असा प्रश्न
निर्माण होणार नाही. त्याला तुमच्याबद्दल कोणताही पूर्वग्रह नसतो. निदान असं मला तरी वाटतं. जे झालय ते
पूर्ण होईपर्यंत स्वस्थ बसा. जमल्यास ज्याला सांगितलय त्याला त्याची जाणीव करून देण्यास हरकत नाही. कोणत्याही
कारवाई नंतर ठीक झाल्यास बरं , नाहीतर निष्पन्न होणारे भोग भोगण्याची तयारी ठेवावी. मला तरी दुसरा मार्ग दिसत
नाही. असो. माझं म्हणणं कदाचित पटण्यासारखं नसेल.


अरूण कोर्डे.

{कोणाकडे बोलावं याचं तारतम्य}

कोणाकडे बोलावं याचं तारतम्य बाळगल्यास हा प्रश्न उद्भवणार नाही. >> हे शहाणपण कमावलं या अनुभवातून....
अनोळखी माणसाला काही सांगितल्यास सहसा असा प्रश्न निर्माण होणार नाही. >> उलट माझा अनुभव असा आहे की अनोळखी माणूस काय कारणाने तुम्हाला अप्रोच झालाय हे तुम्हाला गेस करता येत नाही.. त्यापेक्षा अनोळखी लोकांना आपल्याविषयी काहीही सांगू नये.. (अर्थात तो ओळखीचा झाल्यावरही विश्वासघात करणार नाही याची काहीएक खात्री नाही)
आपला काही अनुभव आहे का या बाबतीत?
मार्गदर्शनाबद्दल आभारी आहे...

{अरूण कोर्डे काकांशी सहमत}

अरूण कोर्डे काकांशी सहमत


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{इतरांजवळ रहस्यभेद करू नये अशी}

इतरांजवळ रहस्यभेद करू नये अशी संस्कृत म्हण आहे त्याची आठवण झाली.
शक्यतो अशी वेळ मी येऊ देत नाही पण आलीच चूकून तर त्याचे वाईट वाटून घेत नाही, झालेला तोटा ( आर्थिक/मानसिक) दोन्ही अक्कल खात्यात जमा करून गप्प बसतो.


Hope is a good thing...

{इतरांजवळ रहस्यभेद करू नये अशी}

इतरांजवळ रहस्यभेद करू नये अशी संस्कृत म्हण आहे त्याची आठवण झाली.>> कोणती म्हण?? मी आधी वाचली असती तर बरे झाले असते...
शक्यतो अशी वेळ मी येऊ देत नाही पण आलीच चूकून तर त्याचे वाईट वाटून घेत नाही, झालेला तोटा ( आर्थिक/मानसिक) दोन्ही अक्कल खात्यात जमा करून गप्प बसतो. >> दुसरा पर्यायाच काय असतो?? असो.. आलेला अनुभव बराच काही शिकवून गेला...

{आपले उत्तर वाचून त्यावर प्रतिसाद देत आहे. }

अनोळखी माणसाने ओळखीचा झाल्यावर जर तुमचा फायदा घेतला असेल तर याचा अर्थ तो तुमच्या रोजच्या
संपर्कात येऊ शकणारा माणूस आहे, त्याशिवाय विश्वासघात होणार नाही. त्याचप्रमाणे तुमचा प्रश्न नक्की काय आहे हे
पाहिल्याशिवाय योग्य सल्ला देता येणार नाही. अनोळखी माणसाचा माझा चांगला अनुभव आहे , पण इथे लिहिणं शक्य होणार नाही. तसेच मी स्वतः जेव्हा लोकांना सल्ला देतो तेव्ह मी त्यांच्यासाठी अनोळखीच असतो व राहतोही , असे मात्र माझे अनुभव बरेच आहेत. ते प्रत्यक्षात भेटल्याशिवाय सांगता येणार नाहीत. माणसाला आतला ताण जास्त झाला की कोणालातरी सांगून कमी करावासा वाटतोच. फक्त माणूस पारखावा लागतो. अशा कितीतरी गोष्टी माझ्या जवळ आहेत त्या मी वाटू शकत नाही. त्याला इलाजही नाही. आशा न वाटता येणार्‍या प्रश्नातील वास्तवता मनाला वारंवार समजावून सांगावी लागते इतकेच.. अशी कोंडी करणारी अवस्था पुष्कळांची होते. पाहा पटतय का .


अरूण कोर्डे.

{माणसाला आतला ताण जास्त झाला}

माणसाला आतला ताण जास्त झाला की कोणालातरी सांगून कमी करावासा वाटतोच. >> असेच माझेही झाले

फक्त माणूस पारखावा लागतो.>> इथे मी चुकले

आशा न वाटता येणार्‍या प्रश्नातील वास्तवता मनाला वारंवार समजावून सांगावी लागते इतकेच.. अशी कोंडी करणारी अवस्था पुष्कळांची होते. पाहा पटतय का . >> हो पटतंय... मला वास्तवतेची जाणीवही आहे.. पण... कोणीतरी आपला किंवा आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतो तेव्हा चांगुलपणावरचा विश्वास उडत नाही का??

असो.. मी माझ्यापुरते तरी ठरवलेय... यापुढे सावधपणे वागायचे... आणि जमल्यास स्वार्थीपणे.. तुसडेपणाने... इत्यादी...

{आपले कोणतेही गुह्य गुप्त}

आपले कोणतेही गुह्य गुप्त गोष्ट इतकेच काय आपली माहिती उगाचच अनावश्यकरित्या चारचौघांमधे जाहीर करु नये. गेल्या काही दिवसांपासून म्हणा किंवा वर्षांपासून फेसबुक, ओर्कुट इत्यादी ठिकाणी आपली असलेली नसलेली माहिती टिमक्या वाजवत सांगण्याची फ्याशन आलेली आहे. नोकरी देणार्‍या साईटस वर क्लिक करुन दिसेल त्याला रिज्युम पाठवणे हा सुद्धा असल्याच बिनडोकपणाचा भाग आहे. मुळात आपल्या समस्या, आपली माहिती दुसर्यांशी तथाकथित शेअर करणे आणि सहानुभुती मिळवणे असल्या सिनेमास्टाईल मैत्रीमुळे अनेक समस्या अजूनच वाढत आहेत. या जगात कुणी कुणाचा मित्र नसतो वा शत्रु नसतो, मित्रत्व शत्रुत्व हे केवळ परिस्थितीनुसार ठरते असे आमचे गुरु (अनेक गुरु आहेत आमचे) चाणक्य उर्फ कौटिल्य सांगतो. त्यामुळे आपल्या अडचणी, आपली बलस्थाने, कमकुवत स्थाने, आपल्या योजना कधीही कुणालाही सांगू नका. असो

जे झाले तो एक आयुष्याने दिलेला धडा होता त्याचे मुल्य तुम्ही चुकवले. परत अशी चूक करु नका.
(त्यातही तुम्हाला असा असा मनस्ताप झाला आहे हे गुह्य तुम्ही लोकांसमोर उघडे केलेच. शहाणपण अजूनही येत नाही असेच दिसते.)

{सहमत}

नानाशी सहमत.

...त्याचे मुल्य तुम्ही चुकवले.
आँ. काय हे (मूल्य चुकाया?) यू टू ब्रूटस्? हास्य देन सीजर मस्ट डाय. (हल्ली मटा वाचताय काय? wink )


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{असेच म्हणते }

नानाशी सहमती!
अन् मुळात कोणाला जास्त जवळ करु नयेच मग विश्वासघाताचा प्रश्नच येत नाही!!
हास्य

{मनापासून आभार...}

प्रतिसाद वाचून सुरुवातीला थोडा राग आला पण मी प्रतिसाद पुन्हा पुन्हा माझ्या सद्यस्थितीशी पडताळून पाहिल्यावर मला माझी चूक कळली...
अश्याच कानउघाडणिची गरज होती कदाचित मला...
तुमच्या परखड पण उत्तम मार्गदर्शनासाठी मनापासून आभार...

{तुम्ही काय अगदी १४-१५}

तुम्ही काय अगदी १४-१५ वर्षाच्या आहात का अशा सामान्य गोष्टी न कळायला? कैच्या कै!!

{काही गोष्टी अशा असतात की,}

काही गोष्टी अशा असतात की, लहान मुलं, वृद्ध माणसं, नोकर किंवा हाताखाली काम करणारी माणसं यांच्यासमोर त्या बोलू नयेत.

लहान मुलांना खरे आणि खोटे या संकल्पना माहिती असतात.पण माणूस अमुकच एखादी गोष्ट का करतो? त्यापाठीमागे इतरही काही कारणे असू शकतात याची जाणीव नसते. म्हणुन अशा गोष्टी त्यांच्यासमोर बोलणे टाळावे.

वृद्ध माणसं जेव्हा हळवी बनलेली असतात अशा वेळी कोणाच्या गंभीर आजाराबाबत, अकाली मृत्युबाबत, आपल्या परिसरात झालेल्या चोर्‍यामार्‍यांबद्दल त्यांच्याशी बोलू नये.

नोकर किंवा आपल्या हाताखाली काम करणार्‍या माणसांदेखत आपल्या पैशांबाबत बोलू नये.

अनोळखी माणसाची नीट पारख झाल्याशिवाय त्यालाही आपल्या अडचणी सांगू नयेत.

इंटरनेटवर उगीचच आपली सर्व माहिती देऊ नये.

आपला मोबाईल किंवा आपल्या मोबाईलचे सिमकार्ड दुसर्‍या कोणाला वापरायला देऊ नये. मोबाईल टॉकटईम देणार्‍या कंपनीची स्कीम बंद करतांना त्या कंपनीतले आपले खाते पूर्णपणे बंद झाले आहे याची खात्री झाल्यावरच त्याचे सिमकार्ड डिस्कार्ड करावे. चुकून जर बंद न झालेले सिमकार्ड एखाद्या व्यक्तीच्या हाती पडलेतरआणि त्याचा दुरूपयोग झाला तर आपले काही खरे नाही, हे ध्यानात असू द्यावे.

{विश्वासघात कोणीही करु शकतो}

पियू,

अगदी १०-१५ वर्षे संबंध असलेल्या आणि अगदी घनिष्ट घरोबा असलेल्या लोकांनी विश्वासघात केल्याचे अनुभव माझ्याही गाठीशी आहेत.

मुळात विश्वासघात करणारे लोक हे २ प्रकारचे असतात असे मी मानतो
१- काहीतरी अडचण निर्माण झाल्यामुळे नाईलाजापोटी जे विश्वासघात करतात ते ( अशांचे प्रमाण क्वचितच आढळते)
२- ज्यांच्या प्रवृत्तीतच संधीसाधूपणा असतो ज्यामुळे ते संधी मिळताच विश्वासघात करतात (अशांचे प्रमाण आजकाल दुर्दैवाने भरपूर प्रमाणात पहावयास मिळते.)

पहिल्या प्रकारच्य लोकांना मी माफ करतो - कारण कोणत्यातरी नाईलाजापोटी त्यांनी हे कृत्य केले असते. बहुतेक वेळा त्यांना केल्या प्रकाराची खंतही वाटते व माफीही मागतात. मी त्यांच्याशी थेट बोलूनच हा मुद्दा कित्येकदा सोडवतो. व त्यांच्या अडचणीत मदत करण्याचा प्रयत्नही करतो.

दुसर्‍या प्रकारच्या लोकांशी कायमचे संबंध तोडून टाकतो. नंतर त्यांच्यापैकी काहींना पश्चाताप होऊन माझी माफी मागितलेले लोकही आहेत. पण मी अशांशी संपर्क ठेवत नाही कारण हे लोक केव्हाही उलटून आपल्याला मोठा फटका देऊ शकतात.

तेव्हा दुसर्‍या प्रकारच्या अशा लोकांपासून चार हात लांब राहणे हाच एकमेव उपाय आहे.

बाकी विश्वासघाताच्या अनुभवातून मिळालेला धडा आपल्याला खूप काही शिकवून जातोच.
सूड घ्यायचा की नाही हे व्यक्तीसापेक्ष असते, त्यामुळे ज्याचे त्याने ठरवावे की सूड घ्यायचा की त्या व्यक्तीचे नाव आपल्या आयुष्यातून पुसून टाकायचे ते...


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{आवडले... (पटले)}

दुसर्‍या प्रकारच्या लोकांशी कायमचे संबंध तोडून टाकतो. नंतर त्यांच्यापैकी काहींना पश्चाताप होऊन माझी माफी मागितलेले लोकही आहेत. पण मी अशांशी संपर्क ठेवत नाही कारण हे लोक केव्हाही उलटून आपल्याला मोठा फटका देऊ शकतात.

तेव्हा दुसर्‍या प्रकारच्या अशा लोकांपासून चार हात लांब राहणे हाच एकमेव उपाय आहे.

बाकी विश्वासघाताच्या अनुभवातून मिळालेला धडा आपल्याला खूप काही शिकवून जातोच.>> हे खूप आवडले...

आवर्जून इतकी सविस्तर आणि वास्तव प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप आभार..

{पण समजा विश्वासघात करणारी}

<<दुसर्‍या प्रकारच्या लोकांशी कायमचे संबंध तोडून टाकतो. नंतर त्यांच्यापैकी काहींना पश्चाताप होऊन माझी माफी मागितलेले लोकही आहेत. पण मी अशांशी संपर्क ठेवत नाही कारण हे लोक केव्हाही उलटून आपल्याला मोठा फटका देऊ शकतात. तेव्हा दुसर्‍या प्रकारच्या अशा लोकांपासून चार हात लांब राहणे हाच एकमेव उपाय आहे.>>

पण समजा विश्वासघात करणारी व्यक्ति तुमच्या इतक्या जवळची आहे की तीला स्वतःपासून तोडुन टाकणच जर तुम्हाला शक्य नसेल तर? तुम्ही तीचा ना सूड घेऊ शकत ना तीला आयुष्यातून पुसून टाकू शकत अशी असेल तर?
तर काय करायचं? काय शिकायचं ह्या अनुभवातून? होऊ शकतं ना असही?

काय वाटतं तुम्हाला? काय करायचं अश्यावेळी?


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{पण समजा विश्वासघात करणारी व्यक्ति तुमच्या इतक्या जवळची आहे की ती}

पण समजा विश्वासघात करणारी व्यक्ति तुमच्या इतक्या जवळची आहे की तीला स्वतःपासून तोडुन टाकणच जर तुम्हाला शक्य नसेल तर?

परिजा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर -

०) हे थोडेसे स्टॉकहोम सिंड्रोम चे लक्षण आहे का ते तपासून पहा. तुम्हास इतका त्रास देणारी व्यक्ती तुमची इतकी जवळची कशी बनली ? जर ती व्यक्ती तुम्हास इतका त्रास देते व विश्वासघात करते तर त्या व्यक्तीला तुम्ही जवळचे नसून "फक्त तुम्हास ती व्यक्ती जवळची आहे असे वाटते" असे म्हणायला वाव आहे. हे निकोप नाते नव्हे. ही मानसिक डिपेंडन्सी असावी. तसे असल्यास अत्यंत थंड पणे तोडून टाका. अर्थात याची तुम्हास काही किंमत मोजावी लागेल पण ती मिळणार्‍या फायद्यांपेक्षा कमी असेल. हे लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे की अ, ब, क हे तुमच्याशी कसे वागतात त्यावर तुमच्याशी कसा वागतो हे काही प्रमाणावर अवलंबून असते.

१) त्या व्यक्तीस धमकी द्या की त्या व्यक्तीने जर आपली वर्तणूक बदलली नाही तर संबंध तोडून टाकण्यात येतील.
व वेळ पडल्यास धमकी खरी करून दाखवा.

२) त्या व्यक्तीला दुसरा एखादा शत्रू निर्माण करता येईल का ते पहा. म्हंजे दुसरी (विशेषतः बलाढ्य) व्यक्ती त्या व्यक्तीची शत्रू "बनवता येते का" ते पहा.

बाकी प्रतिसादावर अवलंबून...


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{+१ सहमत आहे}

गब्बर भौंशी सहमत आहे...

जर ती व्यक्ती तुम्हास इतका त्रास देते व विश्वासघात करते तर त्या व्यक्तीला तुम्ही जवळचे नसून "फक्त तुम्हास ती व्यक्ती जवळची आहे असे वाटते" असे म्हणायला वाव आहे. हे निकोप नाते नव्हे.

रक्ताचे नाते किंवा जवळची व्यक्ती जेव्हा विश्वासघात करते, तेव्हा त्या व्यक्तीला पूर्ण कल्पना असते की पकडले गेलो तर नाती तुटू शकतील तरी सुद्धा ती व्यक्ती हे पाऊल उचलते याचाच अर्थ मायेचा ओलावा फक्त एकतर्फी असतो... हास्य

बहुतेक सर्व जवळच्या व्यक्ती मी माझ्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे पहिल्या प्रकारात मोडतात. नाईलाजास्तव हे विश्वासघात करतात. मजबूर को और क्या मजबूर करना? wink


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{पण समजा विश्वासघात करणारी}

पण समजा विश्वासघात करणारी व्यक्ति तुमच्या इतक्या जवळची आहे की तीला स्वतःपासून तोडुन टाकणच जर तुम्हाला शक्य नसेल तर? तुम्ही तीचा ना सूड घेऊ शकत ना तीला आयुष्यातून पुसून टाकू शकत अशी असेल तर?

>>मग अश्या वेळी संपूर्ण संबंध तोडून न तक्ता जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा...
पण त्या व्यक्तीला याची जाणीव करून द्या कि तिच्या अश्या वागण्याने/ घडलेल्या प्रसंगाने तुम्हाला मोठाच मानसिक त्रास झाला आहे...
त्याहूनही ती अशी व्यक्ती असेल जिच्याशी जेवढ्यास तेवढे संबंध ठेवणे शक्य नाहीये आणि तुम्हाला तिच्यासोबत त्या नात्यात दीर्घकाळ राहायचे आहे उदा. नवरा/ बायको (माझ्या मते मन खंबीर केल्यास इतर सर्व नातेवाईकांशी उदा. भाऊ, बहिण सासू, सासरे अगदी आई वडील सुद्धा जेवढ्यास तेवढे संबंध ठेवणे शक्य आहे) तर अश्या व्यक्तीला समोर बसवून स्पष्टपणे बोला.. तो/ती अशी का वागली याची कारणे तिला खडसावून विचारा... तिचे वागणे योग्य आहे/होते असे तिला वाटते का हेही विचारा.. त्या व्यक्तीने दिलेल्या उत्तरावरून ठरवा की त्या व्यक्तीला माफ करायचे की नाही..
आणि जे काही कराल ते त्या व्यक्तीला स्पष्ट सांगा- मी तुला या वेळेपुरते माफ केले आहे पण यापुढे असं वागू नकोस..किंवा मी तुला या गोष्टीसाठी कधीही माफ करणार नाहीये...

काय शिकायचं ह्या अनुभवातून? >>

व. पुंच एक वाक्य आहे.. "सर्वात जवळची माणसच जास्त तरहेवाईकपणे वागतात. त्याचं आपण मुळी मनाला लावून घेऊ नये. परक्या माणसाकडून कशाचीही अपेक्षा करू नये ह्याचा धडा आपल्याला घरबसल्या मिळावा हा त्यांचा सद्हेतू असतो. एकदा हा धडा गिरवला म्हणजे अपेक्षाभंगाच दु:ख निर्माणच होत नाही".

{मनापासून क्षमा करायची त्यांना}

मनापासून क्षमा करायची त्यांना ... जखम ताजी असताना हे अवघड वाटतं... पण कालांतराने हे खात्रीनं लागू पडणारं औषध आहे याचा अनुभव येतो.

{+१ सहमत आहे}

मनापासून क्षमा करायची त्यांना ... जखम ताजी असताना हे अवघड वाटतं... पण कालांतराने हे खात्रीनं लागू पडणारं औषध आहे याचा अनुभव येतो.

सविता ताईंशी अगदी सहमत आहे हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{नाना आणि सविताताईंशी सहमत....}

नाना आणि सविताताईंशी सहमत.... हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{नमस्कार}

मामला गंभीर आहे. पण झाल्या प्रकाराचा शांतपणे विचार करा. अत्यंत थंड पणे.

१) तुम्ही त्या व्यक्तीवर जो विश्वास ठेवलात ते जजमेंट कसे डेव्हलप झाले (की ही व्यक्ती थोडीशी का होईना विश्वसनीय आहे)? असे कोणते Behavioral cues and clues मिळाले त्या व्यक्तीकडून की जेणेकरून तुम्हास तसे वाटले ?

२) यातून तुमचे नुकसान झालेले असेल तर नुकसानाचा अंदाज घ्या. नुकसान मानसिक, आर्थिक व सामाजिक (Loss of reputation, loss of relationship ) ही असू शकते. महत्त्वाचा प्रश्न हा की - तुमच्याकडून जर चूक झालेली असेल तर झालेल्या चुकीच्या प्रमाणात तुमचे नुकसान किती आहे ? ते जर फार जास्त असेल तर ते भरून काढणे शक्य आहे का ? जर नसेल तर ?

३) अनेकदा , , हे तुमच्याशी कसे वागतात याच्या निरिक्षणावरून हे ठरते की तुमच्याशी कसे वागेल. (Sort of Information Cascade). व हे च्या नकळत घडते. तुम्हास भेटणारे शंभरापैकी एकशेदहा लोक हे सहिष्णूतेचा सल्ला देतील. मी मात्र तुम्हास (Unsolicited) सल्ला देईन की स्वतःचे (व हितसंबंधांचे) रक्षण करणे हे व्यक्तीचे कर्तव्य असते. त्यामुळे तुमच्याशी विश्वासघात करणार्‍या व्यक्तीस व इतरांनाही हा संदेश जाणे गरजेचे असते की तुम्ही हा प्रकार हलकेच घेत नाही. तेव्हा काही काळ जाऊ द्या. या मामल्यातून रिकव्हर व्हा. शत्रू कोण आहे ते ठरवा. शत्रूच्या शक्तीचा अंदाज घ्या. बलस्थाने (प्रकट व अप्रकट) ओळखा. जर शत्रू आवाक्यात असेल तर - जेव्हा संधी मिळेल तेव्हा अत्यंत थंडपणे पलटवार करा.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{( मी हा धागा वाचेपर्यंत तरी}

( मी हा धागा वाचेपर्यंत तरी झालेल्या घटनेचे विवरण काढून टाकण्यात आलेले होते, त्यामुळे नेमका त्यावर मी प्रतिसाद देत नाहीये. हा प्रतिसाद generic ग्रुहित धरावा)
>> १) तुम्ही त्या व्यक्तीवर जो विश्वास ठेवलात ते जजमेंट कसे डेव्हलप झाले (की ही व्यक्ती थोडीशी का होईना विश्वसनीय आहे)? असे कोणते Behavioral cues and clues मिळाले त्या व्यक्तीकडून की जेणेकरून तुम्हास तसे वाटले ?
जर व्यक्ती विश्वसनीय नव्हती. तर तिला एखादी गोष्ट सांगणं हि एक रिस्क असते, जी माणूस कुठे ना कुठे, कधी ना कधी, छोट्या-मोठ्या प्रमाणात घेतंच असतो. आता जेव्हा ती आधीच घेतलेली रिस्क असते, तर तेव्हा त्यावर जास्त विचार किंवा पश्चाताप तरी करू नये असं मला तरी वाटतं. परत रिस्क घ्यायची कि नाही, हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न.
जर व्यक्ती विश्वसनीय होती. तेव्हा तिने विश्वास तोडला. तर तो जाणून बुजून तोडला कि जे झालं ते अजाणतेपणात झालं ह्याचा विचार करायला हवा. मोस्ट ऑफ द टाईम्स तरी त्या मागे त्या व्यक्तीचा 'वयक्तिक लाभ' हा हेतू नसतो. (इथे जवळची व्यक्ती आणि विश्वसनीय व्यक्ती ह्यात गफलत नको. अगदी जवळची व्यक्ती विश्वसनीयचं असेल असे गृहीत धरता येत नाही.) बरेचदा परिस्थिती सुद्धा बऱ्याच अंशी जबाबदार असते. असे असेल तर, आणि त्या व्यक्तीला झालेल्या गोष्टीबद्दल वाईट वाटत असेल तर, त्या व्यक्तीला 'सेकंड चान्स' देता येऊ शकतो. (मी मुळात 'सेकंड चान्सेस' वर विश्वास ठेवणारा आहे. तो द्यावा कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.) आणि जर ह्या पैकी काहीच नसेल, आणि व्यक्तीने स्व-लाभासाठी तुमचा विश्वासघात केला असेल, नि ते करून त्याला काडीचाही पश्चाताप होतं नसेल, तर त्याला तोंड देऊन त्याला झालं त्याचा जाब विचारावा. रोष व्यक्त करावा. पण झालं तेव्हढ पुरे, नि प्रकरणाला अजून तरी वाढवू नये. अनुभव समजून पुढे बघावे. ( इथेही 'सेकंड चान्स' देता येतो. त्यानंतरही परत 'येरे माझ्या मागल्या' चं होत असेल तर मग मात्र दंड अथवा थेट भेद करण्यात सुध्धा काही गैर नाही. लेकीन 'साम' का एक चान्स तो बनता हैं!)

>>२) यातून तुमचे नुकसान झालेले असेल तर नुकसानाचा अंदाज घ्या. नुकसान मानसिक, आर्थिक व सामाजिक (Loss of reputation, loss of relationship ) ही असू शकते. महत्त्वाचा प्रश्न हा की - तुमच्याकडून जर चूक झालेली असेल तर झालेल्या चुकीच्या प्रमाणात तुमचे नुकसान किती आहे ? ते जर फार जास्त असेल तर ते भरून काढणे शक्य आहे का ? जर नसेल तर ?
सहसा भौतिक स्वरूपावर झालेले नुकसान भरून काढताच येतं. तसंही जे होतं ती एक घटना असते. जिचं भौतिक पातळीवर अस्तित्व नसतं. अस्तित्व असतं केवळ मेंदूत, जिथून आपल्याला त्या घटनेची आठवण होतं राहते, आणि तीच सर्वात जास्त त्रास देते. आता नुकसान जर दुसऱ्याने माझं केलं असेल तर .. उदा. (माझ्या एका मित्राने माझ्या नि माझ्या दुसऱ्या मित्रासोबत असलेल्या लहानश्या वादाचा फायदा उचलून माझे नि त्याचं नातं कायमचं तोडलं. ... तर अश्या प्रसंगात गोष्ट हि बघायला हवी कि मुळात माझी नि माझ्या मित्राची मैत्री हि तुटणारी होतीच. ती असल्या धक्क्यांसाठी तयार नव्हतीच. तिथे माझं मित्र नसून अजून कुणी असतं तरी कदाचित तेच झालं असतं. ) आता हे असलं (Loss of reputation, loss of relationship ) कसं भरून काढता येतं? माझ्या मते तरी इथे टाईम हाच महत्वाचा फ्याक्टर असतो. वेळे सोबतच हे असले Loss भरून काढणं शक्य असतं. हा ज्या व्यक्तीमुळे हा Loss झाला आहे, त्याचं काही नुकसान करून मानसिक शांती मिळू शकते. पण तो destructive way झाला. तसंही 'Justice is about harmony. Revenge is about you making yourself feel better.' ..... आता आपण स्वतः constructive कि destructive हे ज्याचं त्याला ठाऊक असतं. त्याने तो तो मार्ग निवडावा. तेव्हाच मानसिक शांती मिळेल.

>>३) अनेकदा अ, ब, क हे तुमच्याशी कसे वागतात याच्या निरिक्षणावरून हे ठरते की ड तुमच्याशी कसे वागेल. (Sort of Information Cascade). व हे ड च्या नकळत घडते. तुम्हास भेटणारे शंभरापैकी एकशेदहा लोक हे सहिष्णूतेचा सल्ला देतील. मी मात्र तुम्हास (Unsolicited) सल्ला देईन की स्वतःचे (व हितसंबंधांचे) रक्षण करणे हे व्यक्तीचे कर्तव्य असते. त्यामुळे तुमच्याशी विश्वासघात करणार्‍या व्यक्तीस व इतरांनाही हा संदेश जाणे गरजेचे असते की तुम्ही हा प्रकार हलकेच घेत नाही. तेव्हा काही काळ जाऊ द्या. या मामल्यातून रिकव्हर व्हा. शत्रू कोण आहे ते ठरवा. शत्रूच्या शक्तीचा अंदाज घ्या. बलस्थाने (प्रकट व अप्रकट) ओळखा. जर शत्रू आवाक्यात असेल तर - जेव्हा संधी मिळेल तेव्हा अत्यंत थंडपणे पलटवार करा.
रिकव्हर होणं - शत्रू नेमकं कोण हे ठरवणं - त्याच्या शक्तीचा अंदाज घेणं(पण कधीपर्यंत?) हे बरोबर. पण हे समजल्यावर त्यावर पालटून वार करण्यापेक्षा(त्यावर वेळ घालवण्यापेक्षा), असला वार परत झाला तरी काही होणार नाही इतका स्वतःला (स्वतःच्या Relations ला) ठोस करण्यात काय हरकत आहे. तसंही मानसिक पातळीवर तुम्ही मजबूत असले तर भौतिक पातळीवर कितीही काहीही झालं तुमच्या सोबत, तरी तुम्हाला काहीच फरक पडत नाही. पलटून वार करणं माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. जे करायचे ते तेव्हाच. त्यासाठी धागाही काढला होता. असो.
मुळात आपल्यासोबत काही वाईट होणं, नि आपल्याकडून दुसऱ्याचं वाईट होणं, हा निसर्गाचा नियम आहे. तो जीवनाचा एक भाग आहे, ज्यातून सुटका नाहीये. आणि नसणारये. पण प्रत्येक वेळी तुमच्या कडे एक विकल्प असतो 'to be at peace or at resistance' .

तुम्हाला काय वाटत?


मी इथेही असतो -- साधं-सरळ

{( मी हा धागा वाचेपर्यंत तरी}

( मी हा धागा वाचेपर्यंत तरी झालेल्या घटनेचे विवरण काढून टाकण्यात आलेले होते, त्यामुळे त्यावर मी प्रतिसाद देत नाहीये.)>>

हम्म.. मला झालेल्या घटनेचे विवरण सार्वजनिक करणे योग्य नाही असे अनेकांनी सांगितले.. त्यामुळे मी ते काढून टाकून हा धागा कॉमन केला...

जर व्यक्ती विश्वसनीय होती. तेव्हा तिने विश्वास तोडला. तर तो जाणून बुजून तोडला कि जे झालं ते अजाणतेपणात झालं ह्याचा विचार करायला हवा. मोस्ट ऑफ द टाईम्स तरी त्या मागे त्या व्यक्तीचा 'वयक्तिक लाभ' हा हेतू नसतो. >>

हम्म.. माहित नाही.. निस्वार्थी विश्वासघाताचे असे उदाहरण अजून तरी पाहण्यात नाही...

असला वार परत झाला तरी काही होणार नाही इतका स्वतःला (स्वतःच्या Relations ला) ठोस करण्यात काय हरकत आहे.>> हे १००% पटले.. स्वत:ला ठोस.. म्हणजेच खंबीर/ बलवान करणे गरजेचे आहे.. रादर तुमच्यासोबत असे काही आधी घडले असेल किंवा नसेल.. तुम्ही खंबीर असणे कोणत्याही परिस्थितीत गरजेचे आहे हे आता पटले आहे...

पलटून वार करणं माझ्या बुद्धीला तरी पटत नाही. जे करायचे ते तेव्हाच. त्यासाठी धागाही काढला होता. असो.>> दुवादान कराल का??

मुळात आपल्यासोबत काही वाईट होणं, नि आपल्याकडून दुसऱ्याचं वाईट होणं, हा निसर्गाचा नियम आहे. तो जीवनाचा एक भाग आहे, ज्यातून सुटका नाहीये. आणि नसणारये. >> खरंच?? पण म्हणून त्यातून आपली सुटका नाही असे म्हणून गप्प बसून कसे चालेल??

{बरेच मुद्दे आहेत. तुम्ही}

बरेच मुद्दे आहेत.
तुम्ही विवरण काढले ते योग्यच आहे. वयक्तिक गोष्टी वयक्तिकचं ठेवाव्यात. खासकरून समस्या. सोडवणं सोपं जातं.

प्रत्येक व्यक्ती हि स्वार्थी असतेच हो थोड्या फार प्रमाणात. 'मला इतरांना मदत केल्यावर आनंद मिळतो. म्हणून मी नेहमी इतरांना मदत करीत असतो.' ह्यात स्वार्थ नाही का?
पण आपल्या स्वार्थामुळे दुसऱ्याचं वाईट होणार नाही ह्याची काळजी घेणे, हि नैतिकता झाली.
बरेचदा परिस्थिती अशी असते कि आपण चुकलो हे उमजेपर्यंत पाऊल उचलल्या गेलं असतं. नंतर पश्चाताप होतो बऱ्याच लोक्कांना. अशी बरीच उदाहरणे बघितली आहेत. जे झालं, ते असलं काही असेल तर ते बघावं.

>> खरंच?? पण म्हणून त्यातून आपली सुटका नाही असे म्हणून गप्प बसून कसे चालेल??
>>खरंच??
हे मला समजलं नाही. तुमच्यासोबत वाईट झालंय हे तर समजतंय मला. मग तुमचं म्हणण असं आहे का कि आजवर तुमच्याकडून कधीच कुणाचंच वाईट झालेलं नाहीये?
>>पण म्हणून त्यातून आपली सुटका नाही असे म्हणून गप्प बसून कसे चालेल??
गप्प कशाला बसायचं?? पण त्या चुकांबद्दल मनात राग/द्वेष/कलह घेऊन नाही राहायचं. तुमची चूक असेल तर, परत ती चूक होणार नाही हे मनाशी बांधून पुढे चालावं. दुसऱ्याची असेल तर एकदा तरी सोडून द्यावं. फारच त्रास होत असेल तर संपर्क तोडावा त्या माणसाशी. तसंही आयुष्यात आपल्याला लोकांना 'फिल्टर आऊट' करावंच लागतं. त्यात काहीच गैर नाही. आणि तुम्हालाही कळतंच असतं कि कोण तुमच्या 'टाईप' चे लोकं आणि कोण 'नॉन टाईप' आहेत ते. आणि करून बघितले तर हे पण कळेल कि तुमच्या 'टाईप' च्या लोकांचा आणि तुमचा 'नॉन टाईप' चा गट सारखाच असतो. (म्हणूनच पुरातन काळी लोकांना दोनच गटांमध्ये विभागलं होतं. नंतर कधी सांगेल... ) ती व्यक्ती सुद्धा जर ह्या 'नॉन टाईप' मध्ये येत असेल तर तिच्यापासून दूर राहिलेला कधीही बरं. पण मनात त्या बद्दल राग/द्वेष नको. माफ करावं त्याला पण. आणि हे सारं शक्य आहे. बरं का? विचार करून बघा.

हा त्रास देतात .. त्या आठवणी! त्यांना 'डिलीट' नाही करता येत!!

पण त्यांचा त्रास नाही होणार. ह्यावर उपाय आहे. आणि ते अवलंबून आहे तुम्ही त्या घटनेकडे बघता कसे? तुमचा दृष्टीकोन काय आहे. तुम्हाला खरंच झालं, गेलं, गंगेला मिळालं म्हणून पुढे जायचंय कि तिथेच थांबायचय.

फारंच होतं असेल तर कन्सल्ट करायला हरकत नाही. एन. एल. पी. (न्युरो -लिंग्वीस्टिक प्रोग्रामिंग) बद्दल वाचलंय का? ती पण एक फास्ट टेकनिक आहे डिप्रेशन/भीती/ अन काय काय घालवायला.

पण बघ पियू ताई, शेवटी सगळं आपल्यावर असतं गं. आपला दृष्टीकोन महत्वाचा!


मी इथेही असतो -- साधं-सरळ

{पटले.. आभार...}

पटले.. आभार...

{कृपया सोप्या भाषेत सांगा..}

३) अनेकदा अ, ब, क हे तुमच्याशी कसे वागतात याच्या निरिक्षणावरून हे ठरते की ड तुमच्याशी कसे वागेल. (Sort of Information Cascade). व हे ड च्या नकळत घडते. >> हे मला नीटसे समजले नाहीये.. कृपया सोप्या भाषेत सांगा..

{संस्कार व पुस्तके}

मध्यमवर्गीय कुटुंबात संस्कारांचा उदोउदो होतो. व त्याचा परिणामस्वरूप - मुले अतिरेकी मवाळ, आदर्शवादी, "मी नैतिकता जपतो" हे सिद्ध करण्यास उतावळी, पडतं घ्यायला अधीर, स्वतःचे हितसंबंध जपायला उत्सुक नसलेली अशी होतात.

नाती (रिलेशन्स) कशी वाढवावी/टिकवावी याची शेकडो पुस्तके आहेत. पण नाठाळ लोकांना कसे वागवावे. त्यांच्यापासून आपले रक्षण कसे करावे, त्यांना धडा कसा शिकवावा याची खूप कमी पुस्तके आहेत.


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.

{अशीही पुस्तके आहेत??}

नाठाळ लोकांना कसे वागवावे. त्यांच्यापासून आपले रक्षण कसे करावे, त्यांना धडा कसा शिकवावा याची खूप कमी पुस्तके आहेत.>>
अशीही पुस्तके आहेत?? तुम्हाला नाव माहिती आहेत का अश्या पुस्तकांची??

{व्य नि केलेला आहे.}

व्य नि केलेला आहे.

---

विकल्प विकल्प विकल्प.

नेगोशिएशन हे अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. व्यावसायिक जीवनातच नव्हे तर व्यक्तीगत जीवनातही. व्यक्ती सदैव नेगोशिएशन करत असते ... प्रत्येकाशी.

स्वस्त व मस्त पुस्तक -

Getting to Yes: Negotiating Agreement Without Giving In by Roger Fisher, William L. Ury


----------------------------------------------------------------------------------------
Unconditionally committed to arguing gracefully and respectfully.