V for Vendetta - भाग १
चित्रपट विषयक
चित्रपट चित्र![]() |
वर्ष :5th of November 2006
गीतकार / संगीतकार :दिग्दर्शक:James McTeigue
कथाकार / लेखक:Andy Wachowski (screenplay), Lana Wachowski (screenplay)
कलाकार:Hugo Weaving, Natalie Portman and Rupert Graves
|
परिक्षण :
एखाद्या चित्रपटातील एखादं वाक्य, संवाद आपल्या मनात घरं करून राहतं. काही केल्या ते मनातून हटत नाही व जेथे जेथे वाक्या संदर्भातील परिस्थिती असते तेव्हा आपल्याला हमखास ते वाक्य तो संवाद आठवतो. मग आपण हलकेच स्मित करतो व पुढील कामाला लागतो. तसेच काहीसे सध्या माझे होत आहे. मागील अनेक दिवस माझ्या सहीमध्ये, गुगल/फेसबुकच्या स्टेट्स मॅसेजमध्ये "remember remember the fifth of november" हे वाक्य होते. अनेकांनी विचारले या वाक्याचा संदर्भ काय आहे तर, आता सांगतो काय संदर्भ आहे ते.
२००५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका चित्रपटातील नायकाच्या तोंडी असलेले ते वाक्य आहे. चित्रपटाचे नाव आहे V for Vendetta. चित्रपटाची सुरवातच या वाक्याने होते "remember remember the fifth of november" आधी तुम्हाला दोन गोष्टी कळायला हव्यात, एक Vendetta म्हणजे काय ? वेंडेटा म्हणजे एखाद्याच्या विरुद्ध आघाडी उघडणे अथवा निर्णायक लढाईचा बिगुल वाजवणे. व व्ही म्हणजे ? व्ही म्हणजे चित्रपटाचा नायक. जो स्वतःला व्ही म्हणून घेतो, चित्रपटात त्याचे नावच व्ही आहे.मी नायक म्हणालो का? व्ही खरंच नायक आहे का चित्रपटाचा ? रुढ अर्थाने तो नायक नाही. त्याला चेहरा नाही आहे. तो पुर्ण चित्रपटभर मुखवटा घालून वावरतो. त्याला स्वतःचे असे नाव नाही ना त्याला ते सांगायची इच्छा. का असावा चेहरा? का असावे नाव? नाव चेहरा आला की वर्ण येतो, जात नाव?, देश येतो, या सर्वाच्या पलिकडे असलेला हा नायक.
चित्रपटामध्ये सुरवातीला ४०० वर्षापुर्वी घडलेली एक छोटी घटना दाखवली आहे, ज्याचा संदर्भ पार्श्वभुमीवर पुढील वाक्य येत जातात "Remember, remember the 5th of November. The gunpowder, treason, and plot. I know of no reason why the gunpowder treason should ever be forgot." एका दुष्ट राजशक्ती विरुद्ध बंड करू पाहणार्या क्रांतिवीराला राज शक्तीचे प्रतिक विस्फोटाद्वारे उडवून देण्याच्या प्रयत्न केला म्हणून फाशीची शिक्षा दिली जाते व दिवस असतो......5th of November.
आता चित्रपट ज्या काळामध्ये आपल्याला घेऊन जातो तो काळ म्हणजे ४ नोव्हेंबर २०३०, परिस्थिती अशी आहे की इंग्लंडमध्ये सत्तापालट होऊन फॅसिस्ट पक्षाचा नेता हुकुमशहा म्हणून उदयास आला आहे. जसे एका हुकुमशहा च्या देशात चालायला हवे तसे सगळे तेथे चालत आहे. सामान्य जनतेला घराबाहेर राहण्याचे वेळापत्रक आहे, कला संगीत यावर बंदी आहे, हुकुमशहा विरुद्ध बोलायला विरोध आहे. बेबंदशाही माजलेली आहे. शक्ती व भिती या जोरावर जनतेवर अत्याचार नियमित चालू आहेत. मिडियापासून सर्व सुरक्षा यंत्रणादेखील त्या हुकुमशहाच्या पुर्णतः ताब्यात आहे. विरुद्ध आवाज दाबण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा त्यांने उभी करून ठेवली आहे. ज्यावेळी घरातून बाहेर पडणे गुन्हा आहे, अशावेळी बाहेर पडलेल्या एका स्त्रीला (Evey Hammond) गुप्त पोलिस त्रास देत असताना व्ही तेथे येऊन तिला वाचवतो, व तिला व सर्व शहराला एक आश्चर्याचा धक्का देतो.
जनतेला संदेश, चेतावनी देता यावी म्हणून शहरात सर्वत्र मोठ मोठे स्पिकर लावले आहेत, ज्यातून रुक्ष आवाजात संदेश व चेतावनी ऐकण्याची सवय जनतेला आहे व व्ही त्यातून स्वातंत्र्य गीत वाजवता वाजवता राजशक्तीचे प्रतिक म्हणता येईल अशी एक इमारत विस्फोटाद्वारे नष्ट करतो, ती इमारत असते "Old Bailey" मुख्य क्रिमनल कोर्ट. "Remember, remember the 5th of November. The gunpowder, treason, and plot. I know of no reason why the gunpowder treason should ever be forgot." एका युद्धाची सुरवात. एक व्यक्ती विरुद्ध एक पुर्ण व्यवस्था, सिस्टम! दुषीत, दुष्ट अशी सिस्टम!!!
हादरा! एका बलदंड राजसत्तेला आव्हान देण्यात व्ही यशस्वी होतो. लढाईची सुरवात होते हुकूमशाही विरुद्ध व्हीची लढाई!!! Old Bailey सारखी एखादी पुरातन इमारत कोणीतरी हल्ला करून उडवली तर त्यात हुकूमशाहीला घाबरण्यासारखं काय आहे? हा प्रश्न मला पडला. चित्रपट तेथेच थांबवून विचार करताना एक गोष्टी लक्ष्यात आली. एखादा हुकूमशहा जनतेवर वर्षानुवर्ष आपला दरारा कश्याच्या जीवावर ठेऊ शकतो ? तर त्याची शक्ती त्याचे सैनिक, त्याची स्वतःची पोलिस व न्याय व्यवस्था हे आहेत. व्ही पहिला हल्लाच त्याच्या या शक्तीवर करतो. मुख्य क्रिमनल कोर्टाची इमारत तो विस्फोटाच्या द्वारे नष्ट करतो. चेतनाहीन जनतेत थोडेफार का होई ना नवचेतना जागृत होते. हुकूमशहा म्हणजे काही देव नाही आहे, यांना पण धक्का देतो येतो हे जनतेला हलकसं कळून येतं.
सर्वात प्रथम प्रश्न समोर येतो तो एकच हा व्ही कोण? कोणालाच माहिती नाही, हुकूमशहा गोंधळून गेला आहे, हा अचानक नवा शत्रु कोण निर्माण झाला हे शोधण्यासाठी तो आपली सर्व शक्ती लावतो. येथे थोडी वेगळी खेळी हुकूमशाही कडून खेळली जाते. तत्काळ हुकुमशाहीकडून सांगितले जाते की इमारत धोकादायक झाली होती म्हणून आम्हीच ती पाडली, व टिव्हीवर ते या संबधीत बातमी प्रसारित करून संभाव्य विद्रोहाचा धोकाला टाळण्याचा प्रयत्न करतात, पण तोच व्ही जनतेच्या समोर येतो. हुकुमशाहाच्या ताब्यात असलेल्या एका प्रसिद्ध टिव्ही चॅनलवर हल्ला करून ते ताब्यात घेऊन टिव्हीवर सर्व जनतेसमोर तो पहिली घोषणा करतो " Old Bailey इमारत मी उडवली, ही मदमस्त सत्तेत चूर असलेल्यांना माझी चेतावनी आहे. आज, पाच नोव्हेंबर मी पुढील वर्षी याच दिवशी पाच नोव्हेंबर ला ही सत्ता नष्ट करून हुकुमशहाला ठार मारेन.... remember remember the fifth of november!"
तो काय म्हणतो टिव्हीवर हे पुर्ण वाचणेच इष्ट ठरेल.
"Good evening, London. Allow me first to apologize for this interruption. I do, like many of you, appreciate the comforts of every day routine- the security of the familiar, the tranquility of repetition. I enjoy them as much as any bloke. But in the spirit of commemoration, thereby those important events of the past usually associated with someone's death or the end of some awful bloody struggle, a celebration of a nice holiday, I thought we could mark this November the 5th, a day that is sadly no longer remembered, by taking some time out of our daily lives to sit down and have a little chat. There are of course those who do not want us to speak. I suspect even now, orders are being shouted into telephones, and men with guns will soon be on their way. Why? Because while the truncheon may be used in lieu of conversation, words will always retain their power. Words offer the means to meaning, and for those who will listen, the enunciation of truth. And the truth is, there is something terribly wrong with this country, isn't there? Cruelty and injustice, intolerance and oppression. And where once you had the freedom to object, to think and speak as you saw fit, you now have censors and systems of surveillance coercing your conformity and soliciting your submission. How did this happen? Who's to blame? Well certainly there are those more responsible than others, and they will be held accountable, but again truth be told, if you're looking for the guilty, you need only look into a mirror. I know why you did it. I know you were afraid. Who wouldn't be? War, terror, disease. There were a myriad of problems which conspired to corrupt your reason and rob you of your common sense. Fear got the best of you, and in your panic you turned to the now high chancellor, Adam Sutler. He promised you order, he promised you peace, and all he demanded in return was your silent, obedient consent. Last night I sought to end that silence. Last night I destroyed the Old Bailey, to remind this country of what it has forgotten. More than four hundred years ago a great citizen wished to embed the fifth of November forever in our memory. His hope was to remind the world that fairness, justice, and freedom are more than words, they are perspectives. So if you've seen nothing, if the crimes of this government remain unknown to you then I would suggest you allow the fifth of November to pass unmarked. But if you see what I see, if you feel as I feel, and if you would seek as I seek, then I ask you to stand beside me one year from tonight, outside the gates of Parliament, and together we shall give them a fifth of November that shall never, ever be forgot."
ज्या स्त्रीला, म्हणजे (Evey Hammond) इव्हला व्हीने सुरवातीला वाचवले असते ती त्याच टिव्ही चॅनल मध्ये काम करत असते, ती स्वतःचा जीव धोक्यात घालून व्हीचा जीव पोलिसांपासून वाचवते व या प्रयत्नात ती बेशुद्ध पडते, व्ही तेथून निसटण्यात यशस्वी ठरतो.
व्ही ला आतंकवादी म्हणून जाहीर केले जाते. त्याने केलेले कृत्य हे आतंकवादी कृत्य आहे हे जनतेच्या मनावर बिंबवले जाते. व व्ही मारला गेला आहे अशी ब्रेकिंग न्युज दाखवली जाते. सत्तेवर झालेल्या पहिल्या हल्लामुळे, व्हीच्या भाषणामुळे निर्माण होऊ शकणारी चेतना, स्वातंत्र्याची ललक तेथेच शांत होईल या आशेपोटी.. काही अंशी ती खरी देखील ठरते.
आपला जीव वाचवण्याच्या नादात बेशुद्ध पडलेल्या इव्ह ला व्ही आपल्या घरी घेऊन येतो. इव्हचे आई-वडिल देखील हुकुमशाहीचा अहिंसमार्गाने विरोध करता करता गेले असतात. आता व्ही हुकुमशहा बरोबर तन, मन धन लावून त्याच्यासाठी काम करणार्या त्याच्या टिमच्या सदस्यांना मारण्यास सुरवात करतो.
इकडे इव्हला व्हीची भिती देखील वाटत आहे व एक प्रकारचा आदर देखील. व्ही क्रुरपणे माणसांना मारतो आहे व त्याचे तो समर्थन या वाक्यात करतो "Violence can be used for good." त्यामुळे नेमकं काय करावे हे तिला कळत नाही आहे, अपर्हायपणे तीला व्ही सोबत रहावे लागत आहे व पण त्यामुळे तीला हळू हळू व्हीचा मानवी चेहरा दिसू लागतो. तो कोण आहे हे जाणून घ्याची उत्सुकता तिला आहे व ती त्याला विचारते " तु मुस्लिम आहेस?" व्ही उत्तर देतो "No. I'm in television."
खरं पाहीले तर या चित्रपटाचे तीन भाग आहेत.
एक> व्ही, जो हुकुमशहा विरुद्ध लढतो आहे, एकटा.
दोन> व्ही, जो इव्हला (म्हणजेच सर्वसामान्य जनतेला) अन्याया विरुद्ध उभे राहण्यास प्रवृत्त करतो आहे.
तीन > व्ही, स्वतः.
हा चित्रपट तुम्हाला अतिरंजित पासून ते काहीतरी काय.. कसे कसे घडेल असे काही वाटायला लावू शकतो. पण तुम्ही हा चित्रपट पाहताना एक ही व्हीची फ्रेम चुकवू नका. कारण प्रत्येक व्हीची फ्रेम हा एक संदेश, एक अर्थ देतो असतो तुमच्या पहाण्याला. व्हीला चेहरा नाही आहे त्यामुळे तो आपल्या भावना, आपले विचार तुमच्या पर्यंत हाताद्वारे, कृतीद्वारे पोहचवतो. नेमका हा चित्रपट काय आहे? एका क्रांतीवीराची गाथा, एक तिरसट व्यक्तीचा वेडा प्रयत्न की अजून काही हे प्रश्न तुम्हाला येथे पर्यंत पडतातच.
क्रमशः

.jpg)

{..}
पाहणार!
{लै भारी पिक्चर! :)}
चित्रपट अनेकदा पाहिल्या गेलेला आहे.. पण इतरांनाही तो आवडला गेलेला आहे हे पाहुन समसुखी भेटल्याचा आनंद होतोच
-ऋ
{मागच्या वर्षी शेवटाला (}
मागच्या वर्षी शेवटाला ( नोव्हेंबर) निपोंनी दाखवला होता हा चित्रपट... त्यानंतर आता पर्यंत तरी १७ वेळा चित्रपट पाहून झाला आहे
Hope is a good thing...
{चित्रपरिचय आवडला! नक्कीच}
चित्रपरिचय आवडला!
नक्कीच पाहणार.
{नक्की पहा, तुम्हाला आवडेल}
नक्की पहा, तुम्हाला आवडेल चित्रपट. एकदम बोझड शब्दांचा मारा नाही, एकदम एका लयीमध्ये चालणारं कथानक आहे.
Hope is a good thing...
{पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत}
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
@ऋषिकेश;
चित्रपट अनेकदा पाहिल्या गेलेला आहे.. पण इतरांनाही तो आवडला गेलेला आहे हे पाहुन समसुखी भेटल्याचा आनंद होतोच
ही काय भानगड आहे? हे मी मराठी संकेतस्थळांवर असंख्य ठीकाणी वाचतो आहे. पण ही वाक्यरचना यापूर्वी (आंतरजालावर येण्यापूर्वी) कुठेही कधीही वाचलेली आठवत नाही. (वाचल्या गेलेली नाही
)
This is imperfect universe
{नक्की आठवत नाही}
मलाही याचा उगम आता आठवत नाहि पण बहुदा कुठेतरी अशा प्रकारच्या पाट्या असतात, त्यावरून ही रचना आंतरजालावर आली आणि स्थिरावली आहे
-ऋ
{पुढच्या भागाच्या}
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.... सगळे परिक्षण वाचल्यावर मगच बघेन चित्रपट!
नीलपक्षी
{वाट}
वाट बघा....................... लवकरच भाग दोन प्रकाशित करतो
Hope is a good thing...
{सुंदर परिक्षण}
व्वा राजे.. परिक्षण आवडले.. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
या चित्रपटाबद्दल खूपदा वाचले आणि ऐकले आहे. कदाचित घरी डिस्कमध्ये असेलसुद्धा ! ह्या विकेंडला बघतोच.
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{नक्की बघ, नसेल तर माझ्याकडून}
नक्की बघ, नसेल तर माझ्याकडून घेऊन जा. एचडी क्वालिटी फाईल आहे माझ्याकडे
Hope is a good thing...
{मी ब्लूरेच बघतो.. }
माझी ब्लूरे रिप नसेल तर तुझ्याकडून घेऊन येईन.
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{आरामात बघता येतो...}
आरामात बघता येतो...
Hope is a good thing...
{उत्तम परिक्षण, टोरंटवर}
उत्तम परिक्षण, टोरंटवर शोधावाच लागेल आता.
{माताय आता चित्रपट}
माताय आता चित्रपट परिचय्/परिक्षणं ही क्रमशः येउ लागली. घोर कलीयुग आहे हेच खरे.
आवांतर : चित्रपट पाहिला नसल्याने आनंद झाला. सुट्टी सत्कारणी लावायला तेवढच एक कारण मिळालं.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{+१००}
+१००
{विषयाचा आवाकच एवढा मोठा आहे}
विषयाचा आवाकच एवढा मोठा आहे की एका भागात तो बसला नसता. या बाबतीत आपले हिंदी चित्रपट फारच बाळबोध असतात त्यांचे एका-दोन ओळीत परिक्षण संपू शकते कधी कधी
Hope is a good thing...
{गणपाभौ... तुम्ही पण आता एखादी}
गणपाभौ... तुम्ही पण आता एखादी पाककृती क्रमशः तीन भागात टाका.
मीऽच तो...
{अरे गरजेमुळे कधी कधी १-२ भाग}
अरे गरजेमुळे कधी कधी १-२ भाग करावे लागतातच रे...!
आजच्या आज दुसरा भाग नाही आला तर मी माझ्या मिश्या उडवेन - राजे
Hope is a good thing...
{हॅ हॅ हॅ....}
हॅ हॅ हॅ....
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{चित्रपट परिचय आवडला! पहावा}
चित्रपट परिचय आवडला!
पहावा असे वाटू लागले आहे,पुढील भागाची वाट पाहत आहे.
{विषमतेविरोधी उद्रेक}
राजेंच्या या प्रभावी परिक्षणापूर्वीच हा चित्रपट पाहिला होता, पण आता परत एकदा पाहिन. एका इंग्रजी संकेतस्थळावर Utopian and Dystopian Fictions and Movies बद्दल झालेली एक प्रदीर्घ चर्चा वाचनात आली होती. त्यामध्ये 'अॅटलास श्रग्ड', 'फॅरेनहिट ४५१', 'ब्लेड रनर', 'मायनॉरिटी रीपोर्ट' आदी चित्रपटासोबत 'व्ही फॉर व्हेन्डेटा' याचाही काही सदस्यांनी खास उल्लेख केला होता. सामाजिक आणि राजकीय विषमतेमुळे खदखदत आणि उद्वेगाने वाढत जाणारी जनसामान्यांची मनःस्थिती यावर लिहिल्या गेलेल्या कादंबर्या आणि त्या कथानकावर आधारित निर्माण होणारे चित्रपट हे डायस्टोपिअन या संवर्गात येतात आणि गाजतातही.
आपल्याकडील दिलीपकुमारचा 'गंगा जमुना', अमिताभचा 'दीवार', राजेश खन्नाचा 'शहर और सपना', विनोद खन्नाचा 'मेरे अपने' आदी अशा धाटणीतील विद्रोही म्हटले जाणारे चित्रपट.
[व्ही फॉर व्हेन्डेटाचा दुसरा भाग वाचल्यानंतर परत लिहितो.]
अशोक पाटील
{लई भारी..... डालो करायला}
लई भारी..... डालो करायला ठेवायला पाहिजे.
सुंदर ओळख करून दिलीस....
आणि हो क्रमश: लवकर संपवणे...
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{नक्की पहा, तुला आवडेल}
नक्की पहा, तुला आवडेल चित्रपट.
Hope is a good thing...
{पुढील भाग?}
पुढील भाग?
{लिहतो आहे}
लिहतो आहे
Hope is a good thing...
{सुरेख}
परीक्षण आवडल्या गेलेले आहे. घरी गेल्या गेल्या टॉरेंट लावल्या जाईल.
{मॅट्रिक्स हा माझा आवडता}
मॅट्रिक्स हा माझा आवडता चित्रपट.मॅट्रिक्सच्याच वाचोस्की ब्रदर्सची पटकथा.मॅट्रिक्सच्या वेळी वाचोस्की बंधूचा सहाय्यकच परत चित्रपटाचा दिद्गर्शक! … हा त्यामूळे व्ही फ़ॉर वेन्डेटा हा जास्त अपेक्षेने पाहीला.
पाहिल्यावर मात्र हा चित्रपट अलिस्टर मॅक्लिनच्या एखाद्या कादंबरीवरून घेतलाय की काय, असे वाटण्या इतपत चित्रपटात अलिस्टर मॅक्लिनच्या लिखाणशैलीतील साम्यस्थळे सापडली.
एखादी कडेकोट व्यवस्था. आणि त्या व्यवस्थेचा एकहाती भेद करणारा एकाकी नायक!नायकाने जोपासलेले, नेहमीच्या नितीमूल्याशी मेळ न खाणारे,हिंसाचाराचे समर्थन करणारे,खास त्याचेच असणारे तत्वड्यान ,नायकाचा काहीसा गूढ भूतकाळ आणि संवादात आढळणारा फ़िलॉसॉफ़िकल टच हा सगळा अलिस्टर मॅक्लिन चा मालमसाला ह्या चित्रपटात आहे.
मॅट्रिक्स मध्ये एजंट स्मिथ ची भुमिका करणारा ह्यूगो व्हेविंग आवडला होता.इथे पण हुगो व्हेविंग चा अभिनय म्हणजे ह्या चित्रपटाची जान आहे. महाशय दोन चार सेकंदाचा अपवाद वगळता संपुर्ण चित्रपटात मु्खवटा घालून वावरले आहेत.त्यामूळे मुद्राअभिनयाला अजिबातच वाव नाही.पण वाचा अभिनय आणि शारिरीक हालचाली एवढ्या भांडवलावर ह्युगो व्हेविंग ने V च्या भूमिकेत जीव ओतला आहे.,मला तरी ह्युगो व्हेविंग साठी हा चित्रपट आवडला.
राजेंना हा चित्रपट का आवडला ते राजे पुढच्या भागात सांगतीलच.त्या भागाच्या प्रतिक्षेत!
.
..............................................................
क्या फर्क पडता है?
{बघ्या मैने होर आवड्याभी}
बघ्या मैने होर आवड्याभी
धन्यु
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"