एप्रिल फळ.......... हो एप्रिल फळ च
हे कळ फलकामुळे झाले नाही
मला एप्रिल फळ असेच म्हणायचे आहे
एप्रिल महीना म्हणजे वसंत आगमन........सर्वत्र फुलांचे सडे असतात्.नुकत्याच आलेल्या कोवळ्या पालवीमुळे झाडे रंगीबेरंगी झालेली असतात. प्रत्येक झाड जणु यजमान होउन वसंताचे स्वागत करतोय अशा मूड मधे असते. कोठे कोठे कोकीळा मजेत गात असते. अंब्याच्या मोहोराचे आता कैर्या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे.
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच.
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.
आंब्याचे जेवढे लाड होत नसतील तेवढे कैरीचे होतात......
शिवरात्रीलाच त्या कैरी बाळांची चाहुल लागते.....मोहोराच्या मधी दडलेली ती छोटीछोटी बाळे टपोरी मोत्यापेक्षाही गोड दिसतात............. ...आंब्याच्या झाडाचेही पहिलटकरीणी सारखी डोहाळे पुरवले जातात.
खते दिली जातात .....मग फवारणी केली जाते...गारा लागु नयेत म्हणुन पानांचा आडोसा केला जातो...द्रुष्ट लागु नये म्हणुन काळ्या बाहुल्या बान्ध्ल्या जतात्.....लिम्बु उतरले जाते.... कोणी धटिंगणाने दगड मारु नये म्हणुम जागता पहरा बसतो.....
दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावात एकच विषय्........कैरी....
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावात एकच विषय्........कैरी....
कोणाच्या घरी जा..........रस्त्यात कोणाला भेटा. वनवासानन्तर रामाच्या च्या आगमना बद्दल अयोध्येत उत्सुकता असेल त्या उत्सुकतेशी तुलना होउ शकेल तशी उत्सुकता कैरी च्या येण्याची असते. वर्तमान पत्रात रकने च्या रकने भरुन येउ लागतात्....एखादी वळवाची सर आली की भिजलेले डोके पुसल्यानन्तरचा डोक्यात येणारा पहिला विचार असतो कैरी आणि आंब्यांचाच्..एरवी आंब्याच्या झाडाकडे मुलाना फिरकु न देणारे मोठे एकदम उदार होतात आणि पडलेल्या कैर्या धुंडाळण्याच्या मोहीमेवर छोट्याना पाठवतात.
छोटे सुद्धा नाचत नाचत या मोहीमेवर येतात्.....अगदी तोरणा सर केल्याच्या आवेशात आणलेला तुट्क्या फुट्क्या कैर्यांचा ढीगारा मिरवत आणतात्....या कैर्यांवर हक्क फक्त त्यांचा असतो....त्यांचे काय करायचे हे सर्वस्वी त्यानी ठरवायचे असते....
कधी नव्हे ते मिळालेले स्वातन्त्र्य भरपुर उपभोगुन घेतले जाते. फुट्क्या कैर्यांचे फुटीच्या प्रमाणानुसार वाटे केले जातात...
चांगल्या कमी फूटलेल्या कैर्या मोठ्या ताई कडे जातात्...ती कैर्या धुते. त्यांचे बारीक बारीक चौकोनी तुकडे करते....त्याना बर्यापैकी मोठ्या पातेल्यात किंवा तांब्यात घेउन त्यात मीठ साखर टाकली जाते....त्यावर मेतकूट आणि नक्षी पेरावी तशी कोथिम्बीर पेरली जाते....
पातेले ताटलीने झाकुन मग ते नवरात्रात घागर फुंकताना झेलावी तसे हलवले जाते......आतापर्यन्त मोठ्यांच्या ही तोंडाला पाणी सुटलेले असते.......
आई मग छान चिवडा करते.....फुटलेल्या छोट्या कैर्या थेट चिवड्यात रवाना होतात्....पातळ पोह्यांच्या चिवड्याबरोबर चाखत माखत
खाल्लेल्या करीची चव्..............आहाहा अगदी स्वर्गातला इन्द्राला दुर्लभ्...........एखाद्याना त्यावेळी विचारले की अम्रुताच्या बदल्यात हे कैरी वाले पोहे देतोस का? तर १०००% सांगतो तो " अजिबात नाही "असेच सांगेल.
थोड्या लहान कैर्यांचा ताबा आइ घेते..मिक्सर मधे वाटुन ती त्याची फर्मास चटणी बनवते.....ती उद्याच्या हळदीकुंकुवासाठी खास राखुन ठेवते..........फिकट हिरव्या रंगाच्या चटणी ने भरलेले काचेचा वाडगा पाहुन आई उगाचच क्रुतक्रुत्य होते.... त्याच रंगाचा शालु ती उद्यासाठी काढुन ठेवते. पडलेल्या कैर्यांसोबत आंब्याच्या डहाळ्या आलेल्या असतातच...... आई घरातल्या छोट्याना मग आंब्याचे तोरण करायचे मोठ्या जबाबदारीची काम देते.....फडताळतुन सुतळ्या चे तुकडे निघतात....आंब्याची पाने स्वच्छ पुसली जातात्.. एकसारखी पाने घेउन त्यांचे देठ दुमडुन तो पानातुन आरपार केला जातो...मोठ्या ऐटीत आंब्याचे पान न पान तोरणात विराजमान होते....
संध्याकाळी घरातले सगळे जेवताना एकत्र येतात्.....दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महाराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो
दुपारी मीठ मेतकुट वापरुन केलीली कैर्यांची आंबोळी आता थोडी रस्सेदार झालेली असते.....पानापानात ती पंचपक्वनाच्या दिमाखात स्थानापन्न होते.....बाबा एका बोटानेच त्याची चव बघतात्....सगळे एकमेकांकडे पहात असतात्....बाबा थोडावेळ काहीच बोलत नाहीत्...शांतता पसरते आणि बाबा तोंडने एकदम फास्टर फेणीच्या ष्टाईलमध्य टॉsssक्क
करतात्..........महराज गडावर पोहोचल्याच्या तोफांचा तो इशारा असतो....छोटे एकदम खुशीत येतात. कैर्यांचा गड सर झालेला असतो.
कैरी चे लाड इथेच संपत नाहीत. गवताच्या मौ दुलई वर पहुडलेल्या कैर्या आता दिसामासाने रंगरूप पालटु लागलेल्या असतात्.सम्राटाने जसे सिंहासन रिकामे करुन युवराजाला गादीवर बसवावे तसे हिरवा सिंहासनावरुन उतरुन लाल रंग त्याची जागा घेउ लागतो हळद आणि गुलाल आकाशात एकदम उडवले आहेत असा भास होत असतो. कर्यांच्या गालावर लाली येत असते.आता त्यांच्यावरचा पहारा ही कडक होतो. कैरी बाळाना वाईट मुलांची संगत लागु नये म्हणुन त्यांची रोज उलट सुलट तपासणी होत रहाते. वाईट मुलाना बाजुला केले जाते. हळू हळू अंगावर हळदी केसरी रंगाचा साज चढतो . कैर्या आता मोठ्या झालेल्या असतात. अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे ग अजुन ..तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे ग .हे गाणे त्या गाउ लागतात. मोठ्याना ही कुणकुण असतेच.त्यातल्याच एका धमकपिवळ्या सुवर्णवर्खी कैरीला अलगद उचलले जाते. आळीतल्या रामाच्या पायाशी नैवेद्य ठेवला जातो. घरातले सगळे या क्षणाची केंव्हाची वाट बघत असतात्.कैरीचे हे कौतुक पाहुन झाड्सुद्धा आनन्दाने डोलत असते.
आंब्याचे दिवस आले तरी कैर्यांचा थाट ओसरलेला नसतो .पिकलेल्या आंब्यात हापूस, पायरी, मलगोवा , केसर , रत्ना , रायवळ असा मोठ्यांच्या दुनियेत असतो तसा पंक्तीप्रपंच / जातीभेद असतो तसा कैर्यांच्या दुनियेत नसतो. तिथे सगळे भीडु आपलेच असा मामला असतो.
कैर्यांचे बालपण षोडशत्व आता सम्पुन त्या प्रौढ परिपक्व झालेल्या असतात. हा परिपक्वता पणा त्यांच्या रसाळ गोडवा होउन येतो.
प्रत्येकाचा थाट आगळाच असतो. हापुस तसा ईतरांशी थोडा फटकुन वागणारा. बरोबर आहे राजाचा पोर तो उगाच कशाला एखाद्या फाटक्यापाशी बसेल. मंडई मधे सुद्धा हापुस विकणारे चेहेर्यावर वेगळेच राजेशाही भाव आणुन बसलेले असतात. हापुस आंबा दाखवताना एखाद्या हीर्याच्या थाटात दाखवला जातो. घेणारे गिर्हाईक ही तेवढ्यात टेचात हापुस ची करंडी मिरवत घेउन जाते.
पायरी हा तसा राजकारणी लहान थोरात सारख्याच सलगीने वागणारा. याला हापुस चा दर्जा मिळत नाही आणि रायवळ च्या पंक्तीला बसावे की नाही हा प्रश्न याच्या डोक्यात सतत असतो.त्यामुळेच की काय "आपल्यापायरी ने वागावे" असे कोणि म्हणताना पाहीला की मला जिन्याच्या पायरीपेक्षा पायरी आंब्याची च पटकन आठवण होते. म्हण्टले तर फोडी करा म्हंटले तर घोळुन खा असा दोन्ही डगरीवर पाय ठेवणारा तो पायरी.
हापुस आंबा हा फक्त तबकातुन छान फोडी करुन नजराणा पेष केल्यासरखा पेष करायचा असतो.तो त्याचा मान आहे. हापुस आंबा घोळुन द्या असे कोणी म्हंटले की त्याचा अपमान होतो. आणि म्हणणार्याची जागा दिसुन येते.घोळुन आलेला हापुस आंबा हा मला नेहमीच नळदमयन्ती आख्यानातल्याघोड्याच्या तबेल्यात काम करणार्या मनातल्या मनात चरफडणार्या नळ राजा सारखा वाटतो.
सम्राटाला आणखी कीती लाजवायचे?
देवाच्या प्रसाद होण्याचा मान एक तर हापुस ला मिळतो किंवा त्या तोतया तोतापुरी ला.
पण हापुसच्या प्रसादावर जी झड पडते ती तोतापुरी वर पडत नाही . तो केवळ नगा ला नग वाटतो. हापुस चा प्रसाद हा आपला वाटतो.तोतापुरी कोणीतरी परका वाटतो.
हापुस चा रुबाब तोतापुरी मधे नाही. केवळ कापता येतो म्हनुन त्याला तो मान मिळतो. हे म्हणजे केवल सम्राटासरख्या मिशाआहेत म्हणुन एखाद्याला नाटकात सम्राटाची भूमिका देतात तसे.
एप्रिल शेवटच्या तप्प्यात असतो. "उन "मी वरुन आता "आम्ही" म्हणत असते. घरातले छोटे आता बैठे खेळ खेळुन खेळुन सूट्टी ला पण कंटाळलेले असतात.
अचानक घराबाहेर रिक्षा वाजते. घरातले छोटे उत्सुकतने बाहेर पळतात. आत्या रिक्षातुन उतरते. तिच्या सोबत एक मोठ्ठी पिशवी असते. दोघे जण मिळुन एक एक बंद धरत ती पिशवी आत नेतात.
"आत्या तू कशी आहेस विचारायच्या आतच पिशवी स्वैपाक घरात रिकामी होते. पिशवीतुन घरंगळत गोल गोलरायवळ आंब्यांची फौजच बाहेर पडते. अंगात एकच उत्साह संचारतो. आतापर्यन्त एक दोन फोडींवर समाधान करावे लागत होते म्हणुन नाराज असणार्या छोट्यांच्या हातात खाण्यासाठी आख्खा आंबा आलेला असतो.......
आंबे चिरुन ,तुकडे करुन फोडी करुन , घोळुन चोखुन, रस काढुन, आटवुन , उन्हात वाळवुन, बर्फी करुन, दुधात मिसळून, वाफवुन, उकडुन,कच्चे , पिकलेले, ड्राय करुन, पाकात मुरवुन, मसाल्यात मुरवुन असे अनेक प्रकारे खाल्ले जातात. पण् इतर आंब्याला भाजी मधे टाकण्याचा अगोचर् पणा कोणी कधी केला नाही. सिकंदर् समोर इभ्या राहीलेल्या पोरस् राजाच्या भाषेत म्हणायचे झाले तर् सम्राटाला सम्राटासारखेच् वागवले जाते. नाही म्हणायला गुजराती लोकांत् "फ़जितो" नामक् आंब्याचे कढी सारखे पेय केले जाते. नावावरुन् कल्पना करायला गेलो तर फ़जिती च् होते. आंब्या च्या रसा त थोडे ताक् घालुन् त्याला मोहोरी,जिरे/ओव्याची फ़ोडणी दिलेली असते. आमरस् जर् थोडा आंबट् असेल् तर काही विचारायला नकोच "अम्रुता ते पैजा जिंके" अशी चव. जेवणा अगोदर् प्यायला दिले तर पोटभर जेवलेल्या माणसाला सुद्धा पुन्हा कडकडुन् भूक् लागेल. या दिवसात् सगळे घरच् "आंबा" मय झालेले असते. स्वयंपाक् घरात् तर आंब्या ला मध्या भागी ठेउनच् सगळे पदार्थ् केलेले असतात्.
पांढरा शुभ्र भात् त्यावर् पिवळे धमक् वरण् , पुदिन्याचीहिरवी चटणी , शेवाळी रंगाची भरपूर शेंगदाणे खोबरे घालुन् केलेली अळूची पातळ् भाजी,लालसर् बदामी कुरडया, पिवळा जर्द् ढोकळा ,मधुनच मोरपंखी झाक दाखवणारा लालभडक् तर्रीदार् बटाट्याचा रस्सा, गरम् गरम् फ़ुगलेली पुरी आणि या नवरत्नांच्या मधोमध् सरताज् असलेली आंब्याच्या रसाची केशरी वाटी हे सगळे जर् केळीच्या हिरव्या गार् पानावर् वाढलेले असेल् तर् ..........अहाहा केवळ् रसनेलाच नव्हे तर् डोळ्याना सुद्धा तृप्त् करण्याची किमया घडते.
घरात् अशी एखादी पंगत बसलेली असते. मुले लेकी सुना जावई नातवंडे सगळे हसत् खिदळत् थट्ट मस्करी करत् गप्पा मारत् आमरसावर् ताव मारत् असतात. आमरसाने माखलेला नातवाचा मुखचन्द्र कौतुकाने न्याहाळणारे आजोबा अचानक् हळवे अबोल् होतात्. त्यांच्या कानात् कोठुन् तरी दुरून् मालकंसाचे सनईचे सूर् ऐकु येतात्.लग्नात् करकरीत् शालु नेसुन् बोरमाळ नथ् मिरवणारी नववधु आजीची ठेंगणी मूर्ती आठवते.आजोबा आजी कडे पहातात् त्यावेळी कदाचीत् तिलाही तेच् क्श्ण् आठवत् असतात्. आजी गालातल्या गालात् हसते.मोहोरते. सुरकुतलेल्या गालावरही किंचीत लाली येते.
नातवंडे आमरस चापण्यात मग्न असतात्. ती दुपार नातवंडाना नाही पण आजी आजोबांसाठी आठवणींच्या पुस्तकात् एक् सुखद पान लिहुन जाते.
आंब्यांच्या आठवणीबरोबर् ही आठवण् प्रत्येकवेळी ताजी होऊन येते. बाजारात आता आंबा महोत्सव् चालु असतो. प्रत्येक जण् आंब्यांचे काही ना काही करत असतो पिकलेल्या हापुसआंब्याचा मोरांबा ही खास पाककृती वर्तमान पत्रात् झळकते. घरात् घरात् त्यावर् प्रयोग् होतात साखर् आंबा गुळांबा केला बरण्यात् भरला जातो.
आंबे असतात् तरी कैर्या येतच् असतात्. आता मात्र त्या खास लोणच्या साठी येत् असतात्. एकदम कडक् आणि बिन वासाच्या ही त्यांची पहीली पारख. घरात माळावर् अडगळीत पडलेले खास कैरी फ़ोडण्यासाठी बनवलेले अडकित्त्ते घासून् पुसून् लखलखत बाहेर येतात्.खड्डा असलेल्या पाटावर् सोललेली पांढरी कैरी व्यवस्थित् बसते. एका घावात् दोन तुकडे होतात. बघता बघता कैरी च्या तुकड्यांचा ढीग् होतो. त्याना बरणीत् हळद् मिठाचे स्नान् घालुन् मुरवत ठेवतात. अंगाला चांगली हळद लागली की त्यावर् फ़ेणलेली मोहोरी ,तेल् मसाला, फ़ोडणी, यांचा अभिशेक केला जातो. एवढे सगळे झाले की फ़क्त् कैरीच्या लोणच्याच् हक्क असलेल्या केवळ् त्याच एका कारणासाठी बनवलेल्या चिनी मातीच्या पांढर्या तपकिरी गोल बरण्या जमिनीवर् येतात्.आणि हळदी , मसाल्याचा साज चढविलेल्या कैर्या पडदानशीन् होतात.कैरी च्या या देखण्या खानदानी तुकड्याना दृष्ट् लागु नये. बाहेरचे असंस्कृत् वारेसुद्धा लागु नये म्हणुन् बरण्या फ़डकी लाउन् पुरेपुर् बंदोबस्तात् पुन्हा फ़डताळात् रवाना होतात. या खजिन्यावर् मुलांचा डोळा असतोच्. आजी ते ओळखुन् असते. ती हळुच् मुलाना एकेक् फ़ोड् देते. बाठीच्या जवळचा कडक तुकडा ज्याला मिळतो तो आपल्याला स्पेश्यल् ट्रीटमेन्ट मिळाली आपण् आजीचे लाडके या आनन्दात् असतो. या फ़ोडीवरचा मसाला नळाखाली धुवुन् नुसत्या हळदी मिठात् मुरलेल्या फ़ोडी खाणे यात स्वर्गीय आनन्द्. ज्याने चाखले त्यालाच हे ब्रम्हरहस्य ठाउक..
एरवी खास असणारा आमरस् आता अगदीच् आम झालेला असतो. मुबलक् झाला तरी तो आपला आब राखुन असतो. आंबा पोळी , आंबा वडी हे प्रयोग् चालुच् असतात्. ताटलीला तूपाचा हात् लावुन् त्यावर् आमरसाचा पातळ् थर या रोपात् आमरस् उन्हात् बसतो. मुलांच्या तावडीतुन् सुटलेली आंबा पोळी हे आंब्याचे आणखी लोभस रूप्. गोल तलम गुळगुळीत् आंबापोळी आंब्याचे सारे गुण् घेउन् पुन्हा अवतरते.आंब्याच्या रसाचे आटवण हे आंब्याची वर्षभर आठवण् ताजी करायची गुप्त् युक्ती. सुंभ जळला तरी पीळ जळत् नाही तसे मोसम संपला तरी आम्र पुराण् काही संपत येत् नाही. बर्फ़ी आईस् क्रीम् सरबत् अशा नाना प्रकाराने आंबा भेटीला येतच् रहातो.
आंब्याचे होणारे हे कौतुक् बघुन् साक्षात भगवंताला ही "मासानाम मार्गशीर्षोहम्" च्या पुढे जावुन् "फ़लानाम आम्रोस्मीन " असेच् म्हणावेसे वाटेल.
........क्रमशः
अहाहा ...
टॉsssक्क !!!
अगदी बहारदार
येऊद्यात अजुन ..
एप्रिलफळ म्हणजे विजुभाऊंची स्पेशॅलिटी.
उत्तम आहे, अजुन येऊद्यात.
- (शेंडेफळ) छोटा डॉन
अगदी सही जमलंय हो
अगदी सही जमलंय हो कैरी-आंबापुराण...
आंबा तसाही फळांचा राजा... नि कैरी म्हणजे युवराज्ञीच!!! त्यामुळे तिच्यावर आमचा भारी जीव..
आजच आंबा-डाळ केली होती.. मस्त चाखत माखत खाल्ली!!!
विजुभाऊ +आंबा हे एक जमलेलं
विजुभाऊ +आंबा हे एक जमलेलं समीकरण आहे.
येस्स !! विजुभाऊ इज ब्याक इन
येस्स !! विजुभाऊ इज ब्याक इन ओल्ड फॉर्म !!! पुर्वीही त्यांनी एप्रिलफळं लिहीली होती.
ही देखील तितकीच दमदार !! आणि सुंदर !
विजुभाऊ .... विजुभाऊ ........ \m/
लेख झकास! दुर्दैवाने आंबा न
लेख झकास!
दुर्दैवाने आंबा न आवडणारया काही दुर्मीळ वक्तींमधे आमचा समावेश होत असल्याने आम्ही काठावर बसुनच पोहोणारयांची मजा बघतोय!!
लै भारी !
लै भारी !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लाळेरं कुठं गेलं?
गरज असते तेव्हा नेमक्या गोष्टी मिळत नाहीत. अजागळपणा कमी करायला हवाय.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
आंबा...
आंबा आणि तत्सम त्याची रुपे आठवुन...आत्ताच तोंडाला पाणी सुटत आहे..
राधा
||मी इ-मेल फॉरवर्ड करतो,याचा अर्थ असा नाही,मला काही काम नाही;
कामात फोन करुन व्यत्यय टाळण्यासाठी, इ-मेलसारखे दुसरे साधन नाही||
बेष्ट लिखाण
माझे लिखाण