मेथी डाळ !!
ही आधी केलेली स्वयंपाक घरातील लुडबुड
http://www.mimarathi.net/node/3284
http://www.mimarathi.net/node/3452
http://www.mimarathi.net/node/3377
http://www.mimarathi.net/node/4920
आणि दिपालीदेवी आणि गणपाशेफ यांच्या प्रेरणेवरून.
विनंती : पाकृ करताना फोटो काढण्याच्या त्रेधा-तिरपटी साठी लेखकांस क्षमा असावी
भारतीय आहारपध्दतीत डाळी ला अन्यनसाधारण महत्व आहे, (लोक घर की मुर्गी दाल बराबर म्हणत असले तरी जर का दाल परफेक्ट असेल तर बाहेरची मुर्गी देखील...हॅ हॅ हॅ
) साधं रेस्टारंट मध्ये जेवायला गेलेल्या व्यक्तीचा डाल फ्राय /डाल तडका यांच्याशिवाय मेनु पुर्ण होत नाही. डाळ ही सहजा-सहजी कूठे ही मिळत असली तरी बनवणे म्हणजे महा कर्म कठीण काम असते. जरा तेलाच,पाण्याच प्रमाण, कूकर ची शिट्टी, जिरे-मोहरी चा तडका हिकडचा तिकडं झाला की डाळीची वाट लागलीच म्हणुन समजा. (वर आमच्या सारख्या आय टी नवर्यांना " साधी डाळ करता येत नाही " हे एकावे लागेल ते बोनसमध्ये
)...असो ...
अश्याच काही डाळींमध्ये मेथी डाळ हा एक अजुन अवघड प्रकार, स्वताचा 'कूकींग सेन्स' चा कस पहायचा असेल तर ही पाकृ चॅलेंज म्हणुन करायला हरकत नाही, कारण मेथी चा कडवट पणा आणि डाळी ची चव, जिर्याचा तडका, हिरव्या-लाल मिरच्या, ह्या सर्व जिन्नसांची योग्य त्या प्रमाणात शिजवण झाली नाही तर जिभेवर ठेवल्या-ठेवल्या बनवणार्याच्या प्रयत्नांची बोळवण होते. (मी जेव्हा पहिल्यांदा केली तेव्हा कूकर उघडला तशी माझी शेजारिण घावत येवुन म्हणाली की घरात 'वायर' जळाली आहे बहुधा
) आणि याच मुळे ही पाकृ लिहीताना मी प्रमाण देण्याचे टाळतो आहे.
१ ) मेथी खुडून घ्या. (सुचना : बाजारात हल्ली कलर केलेल्या मेथीच्या गड्ड्या असतात, आधी घेताना भाजीवाल्याच्या नकळत एक भिजलेले पान खुडून जरा चिमटीत घासुन घ्या , हाताला कलर लागला तर सरळ दुकान बदला.)
२ ) डाळ निवडुन भिजवुन घ्या. ( सुचना : इथे ही कलर्ड, प्रोसेस्ड भानगडी आहेतच, मी माझ्या च शेतातली वापरतो
)
३ ) ट्माटे कापुन घ्या, मिरच्यांचे देठ खुडून घ्या (ज्यांना तिखट हवे असेल त्यांनी कापुन घ्या ! मी नंतर तडका देताना लाल मिरच्या टाकल्या आहेत.)
(पुढे सर्व काही मंद आचेवर )
४ ) थोड तेल, थोड हिंग (ही आमची चॉईस ) टमाटे आणि मिरच्या कूकर मध्ये परतावुन घ्या.
५ ) डाळ आणि मेथी नीट पणे मिक्स करुन घ्या. ( इथे पाणी घालण्याचे प्रमाण सांगत नाही, मेथीला पाणी लागत नाही, मात्र डाळ शिजण्यासाठी लागते , स्वता ठरवायचे आहे . )
६ ) कूकर ला शिट्ट्या दोवु द्यात ( मी एकच दिली
) मध्यंतरात , लसुन सोलुन घ्या, पेस्ट बनवा वा आमच्या पध्दतीने चिरडुन घ्या
७ ) ईकडे कुकर थंड झाल्यावर (कडवट सुगंध आला पाहिजे मेथीचा पण जरा व्यवस्थित
)
७ ) मग तडका एके तडका !!
८ ) वर शिजवलेली डाळ टाका ..एक उकळी येवु द्यात
९ ) गरमा-गरम मेथी डाळ तयार !! ( मी काही सोबत चपात्या बनविल्या, वाटाणा-बटाटा पुलाव सकाळीच केला होता)
या मंडळी जेवायला
.jpg)
{फटु तरी चांगले दिसत आहेत. चव}
फटु तरी चांगले दिसत आहेत.
चव पण चांगली असावी असे म्हणतो
{सही !!! }
शेवटच्या फोटोमधले ताट त्वरित धाडून देणे....
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{रिकाम्या ताटाचे काय करणार आहात?}
"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.
{वहिनींची मज्जा आहे ब्वॉ. बाकी}
वहिनींची मज्जा आहे ब्वॉ. बाकी तू घेतलेले लसूण जरा जास्त वाटतात. अर्थात ते फोटोसाठी असावेत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{मेथी थोडावेळ पाण्यात भिजवून}
मेथी थोडावेळ पाण्यात भिजवून घ्यावी, छान लागते.
{यात मीठ, मसाला काही नाही का}
यात मीठ, मसाला काही नाही का लागत?? कुठेच तसा उल्लेख नाहीये म्हणून आपली शंका आली.
फोटो छान आला अहे. त्या पोळ्या जर तूच केल्या असशील तर .... मानलं तुला!
- प्राजु
{>>> त्या पोळ्या जर तूच केल्या}
>>> त्या पोळ्या जर तूच केल्या असशील तर ....
अहो पोळ्याच काय सगळा सैपाक सुहासच तर करतो...तेही दररोज च्या दररोज...पाहिजे तर वहिनींना विचारा.
म्हणूनच तर वर म्हटले आहे की, वहिनींची मज्जा आहे ब्वॉ.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{सुहासला पोळ्या व जेवण करता}
सुहासला पोळ्या व जेवण करता येतात याचा जिवंत पुरावा अजून जिवंत आहे या भुतलावर
Hope is a good thing...
{लै भारी}
पुण्यात आल्यावर तुझ्या घरी एकदा जेवायला येतो..
कधी येऊ बोल. २८ जानेवारी नंतरची एखादी तारीख सांग.. नाहीतर कट्ट्याला तु बनवलेलं जेवन घेऊन ये. तेही चालेलं.
कधी एखादी मांसाहारे पाकृपण येवू दे रे..
{क्या बात है!}
क्या बात है! फटु मस्त आहेत.. पाकृदेखील सोपी आहे.. माझ्यासारख्याला करून बघता यावी.. आभार
बाकी, मीठ राहिलेलं दिसतंय त्यामुळे चव कशी असेल ते सांगणम कठीण आहे
-ऋ