जालीय संन्यास घ्यावा असे आपल्याला वाटते का?

5
0
विषय: 

जालीय संन्यास घ्यावा असे आपल्याला वाटते का?
फक्त मत देऊ नका तर तो पर्याय का निवडला याचे तुम्हाला मनापासून पटलेले एक वा अनेक कारणे द्या.

या धाग्याचे प्रयोजन मुळात यासाठी आहे की ,
- ज्यांचे उत्तर हो हे आहे त्यांना नाही व माहिती नाही या पर्यायांची कारणे माहिती होऊन मत बदलण्यास मदत होईल
- ज्यांचे उत्तर नाही हे आहे त्यांना हो आणि माहिती नाही या पर्यायांची कारणे माहिती होऊन दृष्टिकोन विस्तारण्यास मदत होईल
- ज्यांचे उत्तर माहिती नाही हे आहे त्यांनाही त्यांच्या विचारांना स्पष्टता येण्यास मदत होईल.

मी सध्या माझे मत "हो" ला देऊन तात्पुरता जालीय संन्यास घेतोय. तुम्हा सर्वांचा प्रतिसाद पाहून माझे मत बदलले की येथेच उत्तर द्यायला परत येईल Big smile

{"नको" ला मत दिले आहे.}

"नको" ला मत दिले आहे. wink

{नकोलाच मत दिले आहे. येथे चार}

नकोलाच मत दिले आहे.
येथे चार क्षण आनंदाचे घ्यायला येतो.. ते का सोडा wink


Hope is a good thing...

{सोडा }

ह्या राजेला ज्यात त्यात सोडा घालायची सवय लागली आहे हास्य

{बेंगलोरच्या सोनेरी द्रव्याचा}

बेंगलोरच्या सोनेरी द्रव्याचा परिणाम अजून दिसतो आहे wink


Hope is a good thing...

{द्रव्याच नुसत नाव निघाल की}

द्रव्याच नुसत नाव निघाल की आलच धावत wink

{सोडा}

अजूनही सोडा लागतो म्हणजे अजून कच्चे लिंबू आहात.
सोडे(seafood) खाताना प्रॉब्लेम होत असेल, तर त्यातही लिंबूटिंबूच आहात..
सोडा आता. (विषय. इतर काही सोडल्यास झाकण्यात येतील)


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{मी नाही ला मत दिले}

मी नाही ला मत दिले आहे.

तुम्ही हो ला मत दिले आहे म्हणजे नाहीमाहिती नाही या पर्यायांची कारणे माहिती होऊन तुम्ही तुमचे मत आता बदलायला हरकत नाही!


..............................................................

क्या फर्क पडता है?

{मी "नाही"ला नव्हे "नको"लाच मत}

मी "नाही"ला नव्हे "नको"लाच मत दिले आहे.

"ऑफ मेन्यू" पर्याय आहे तो..

म्हणजे असा विचारच नको.. संन्यासाचा..

{कैच्याकै}

संन्यास घेतला तर गजाल्या करायला कुठे जाऊ? अजाबात नाय घेणार.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{नाही}

"नाही"
कारणच हवे असेल तर आतातरी दोन देतो :

१. आवडत्या विषयावर लिहायला आणि वाचायला मिळते, अन् तेही मुबलक प्रमाणात. दिवसभराच्या कामकाजाचा थकवा हटकून दूर होत आहे हा स्वानुभव फार कामी येत असल्याची उदाहरणे आहेत. विविध विषयात भाग घेण्याच्या सबबीवर विविध पुस्तकांची आयती खरेदीही होत आहे.

२. नवीन मित्र जोडले गेले आहेत, ज्याची किंमत करता येणे शक्य नाही. हा जालीय दुनियेचा मला झालेला एक मोठा फायदा आहे

अशोक पाटील

{विचार करतो आहे }

सर्व ज्येष्ठ सदस्यांच्या सूचनांचा मी सध्या तरी विचार करतो आहे thinking

४-५ दिवस अदृष्य राहतो आणि मग ठरवतो Big smile
सोमवारी मी ऑनलाईन आलो नाही तर खुशाल समजा की मी जालीय सन्यास घेतला आहे Evil


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{अच्छा}

म्हणजे तुझा संन्यास अर्जुनासारखा 'त्रिदंडी' आहे तर.... सुभद्रा भेटली की लगेच Revoked wink


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{सुभद्रा भेटली नाही अजून}

रराबुवा,
पण माझा संन्यास छुपा आहे, पुण्यनगरीत धावती भेट देण्याची शक्यता आहे. म्हणून जाता जाता हा प्रपंच Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हो}

हो.. कधी कधी वाटतं खरं असं
पण खुश होऊ नका सध्या असं वाटत नाहिये wink


-ऋ

{जाम आवडले }

पण खुश होऊ नका सध्या असं वाटत नाहिये

जाम आवडले हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{हा हा हा}

Laughing out loud हल्कत. (बरेच दिवसांनी हा शब्द वापरायचा चानस गावला.)


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{निरुपयोगी कौल आणि वांझोट्या}

निरुपयोगी कौल आणि वांझोट्या चर्चा वाचून संन्यास घ्यावा असं वाटतं कधीकधी हे खरं आहे. (कृ.ह.घे.) wink

{वाटते हे महत्त्वाचे}

चला माझ्या बाजूला कंडिशनल का होईना पण एक मत आहे wink
ऋ चे मत कंडिशनल असले तरी अशक्य कोटीतील आहे Evil सबब त्याचे मत कधी कधी गृहीत धरायला हरकत नाही wink

म्हातारबुवांना अजून शब्द वापरायची संधी द्या रे मित्रांनो...

हल्कत हा फार गोड शब्द वाटतोय...

म्हातारबुवा मला तुम्ही हवे तितके शब्द वापरु शकता
जसे
- धागा काढल्याबद्दल
- सन्यासाची घोषणा करुन सारखे परत येऊन प्रतिसाद दिल्याबद्दल... इ..इ.... wink


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{नको}

प्रत्यक्ष भेटीत तुझी 'षोडशोपचारे पूजा' करण्याचा प्लान बनवलाय. उगाच शब्द कशाला खर्च करू.
तू जालीय संन्यास घेतलास ना तर तुझी सुपारी देण्यात येईल. एक पूर्ण दिवस पुस्तकेच काय वर्तमानपत्र देखील नसलेल्या खोलीत तुला डांबून ठेवण्यात येईल. एक ल्यापटॉप देऊ ज्यावर मराठी संस्थळे सोडून अन्य सायटी ब्लॉक केलेल्या असतील. कदाचित तासाभरातच शरण येशील तू न् गुमान लॉगिन करशिला.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{सहज हातात येणार नाही}

हा हा हा... मी असा तसा सहज हातात सापडणार नाहीये wink

पुण्यातही मला शोधावे लागेल. नेमका मी कुठे असेल ते मलाच माहिती नाही Big smile

पण 'षोडशोपचारे पूजा' करण्याचा प्लान केलाय म्हटल्यावर माझी पाचावर धारण न बसता उलट गहिवरुन गेलोय...

एक पूर्ण दिवस पुस्तके नसलेल्या खोलीत ???

अबबब त्यापेक्षा एक पूर्ण वर्ष पुस्तके असलेल्या खोलीत डांबा.. ते उलट एन्जॉय करेन मी Big smile (होय सुभद्रा भेटणार असेल तरीही त्याऐवजी ही सजा (मेजवानी) मान्य असेल) wink


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{आय्ला!}

प्रत्यक्ष भेटीत तुझी 'षोडशोपचारे पूजा' करण्याचा प्लान बनवलाय.

ओ काका!
मी बी wink

षोडशे चे उपचार.. अहह! ठाऽर मेलो...

"एक से मेरा क्या होगा?"वाला- इब्लिस


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{इब्लिस!}

'हम कुश्श नै बोलेगा'. हम बोलेगा तो इब्लिस हमको फिर शब्दमे पकडेगा.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{बेत रद्द}

प्रत्यक्ष भेटीत तुझी 'षोडशोपचारे पूजा' करण्याचा प्लान बनवलाय.

पुण्यनगरीच्या माझ्या धावत्या भेटीत मी व्यग्र मनाने व्यथित असतानाही माझ्यासाठी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मला २ वेळा भेटून श्री. रमताराम यांनी माझी जी 'षोडशोपचारे पूजा' केली. (दिव्य उपदेशाची दिक्षा दिली) त्यामुळे माझ्या मनावरील जळमटे दूर झालीत आणि कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितल्यानंतर जसे अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय बदलला तद्वतच रराबुवांच्या कृपेने मी जालीय संन्यास घेण्याचा बेत कायमचा रद्द केला आहे हे जाहीर करतो आहे.

अवांतरः नाही पेक्षा हो ला जास्त मते आहेत. तेव्हा अशा सर्व लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी रमतारामबुवांची षोडशोपचार पूजेची दिक्षा घ्यावी, म्हणजे त्यांचेही मत बदलेल. Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{आम्हाला बोलवलं असते तर आम्ही}

आम्हाला बोलवलं असते तर आम्ही पण आलो असतो... angery


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{तेवढा वेळ नव्हता}

घाई घाईत जालीय संन्यास घेऊन आम्ही पुण्यभूमीकडे प्रयाण केले आणि तेव्हा वेळही कमीच होता. शिवाय नवविवाहित जोडप्याला तसदी द्यायचे नाही असे आधीच ठरवले होते. Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{अरे वा}

...कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितल्यानंतर जसे अर्जुनाने युद्ध न करण्याचा निर्णय बदलला तद्वतच...
वा वा चला आता सोळा षोडशांची.... आय मिन सोळा सहस्रांची काळजी घ्यायला मी मोकळा झालो.
अवांतरः बघा म्हटलं नव्हतं हा लेकाचा शरण येईल म्हणून. अरे मासळी दिसली नाय तंवर बगळ्याचा ध्यान, नुसतं पुस्तकाचं नाव काढलं नि सागरने शस्त्र टाकली. हाकानाका.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{हॅ हॅ हॅ}

मासळी दिसली नाय तंवर बगळ्याचा ध्यान, नुसतं पुस्तकाचं नाव काढलं नि सागरने शस्त्र टाकली.

पुस्तके मोलाची आहेतच माझ्यासाठी. पण त्यापेक्षा दुसर्‍या भेटीत दिलेला गुरुमंत्र जास्त मोलाचा मिळाला मला त्याचा इफेक्ट जबरदस्त आहे. अजूनही त्यांत झिंगतो आहे Big smile


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{विवेक मोडक मोड >>> सन्यास}

विवेक मोडक मोड >>> सन्यास म्हणजे काय ?? << मोड संपुच शकत नाही.

या वर टिंग्या मोड >> अश्लील अश्लील <<< धन्यवाद

{आंतरजालावर उगीच डोक्याला}

आंतरजालावर उगीच डोक्याला जास्त ताप देणार्‍या व्यक्ती भेटल्या, की वाटतं कधीकधी! wink
(कृ. ह. घे.)

{कधी कधी तो घेतलाच जातो .. मग}

कधी कधी तो घेतलाच जातो .. मग परत फिरून येणे होते Stare त्यामुळे कधी कधी 'हो' - वेळच नसतो किंवा कनेक्टिव्हिटी नसते तेव्हा!

{सन्यास.}

आजच ते चार आश्रम वै विचारमंथन करित होतो.
त्यात हा सन्यास दिसला.
च्या#@#@%# ला! मी काम्हून सन्यास घ्यू भो? माह्यामुळे कित्क्यांनी घ्येत्ला, ह्ये इच्चारा wink
अन हितं ह्या सायटिवर कुनाला घ्याची विच्छा आसन, तर म्या हाये गुरू! गंडा घालून घ्या, लग्गे दिक्षा द्येतो सन्यासाची. हाकानाका wink

(शिष्यांच्या प्रतिक्षेत) e-bliss

(त्ये सन्यास्वर्चं टिंब मुद्दाम्हून र्‍हाय्लंय)


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{तुम्ही गंडा घालण्याचा चार्ज}

तुम्ही गंडा घालण्याचा चार्ज घेता काय Big smile

{गंडे दोरे धुपारे अंगारे}

जे काय हवं ते घालून देण्याचा चार्ज घेतो wink
हावाय का घालून गंडा?
गुरू केला की गंडा बांधला असं म्हंतात ना राव? त्ये गुरु'शिप' घ्येतोय मागून.

आता 'मागून घेतो'ची चिर फाड करू नगा wink


"To feel superior to other humans, which I often do, I need a better reason than color of my skin." -Archie Goodwin.

{बर्‍याचदा वाटतं, आणि अधून}

बर्‍याचदा वाटतं, आणि अधून मधून थोड्या कालावधीसाठी घेतोही.
wink

{mi pan sadhya jaliy sanyas}

mi pan sadhya jaliy sanyas ghetala aahe adhun-madhun ugavate pratisaad denyasaathi wink


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{सध्या तरी वाटत नाहीये.. पण}

सध्या तरी वाटत नाहीये..
पण ३-४ महिन्यानंतर घ्यावे लागेल असे दिसत आहे.


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{अरे चोरा}

तीन-चार महिन्यांनंतर काही 'खास' प्लान आहे वाट्टं. Oups . लब्बाड.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{ठार झालो आहे}

Laughing out loud
ठार झालो आहे. मृत व्यक्तींनी जालीय सन्यास घ्यावा असे कोणी सुचवत आहे का?


-ऋ

{यूंकि ये कौन बोला ?}

यूंकि ये कौन बोला ? angery


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{काय राव}

जालीय मृत्यूंनंतर लगेच 'पुनर्जन्म' होतो हे काय मी तुम्हाला सांगायला हवे? wink


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{शॉलिड्ड मारा ;)}

Laughing out loud

हा ह हा हा हा!!


Hope is a good thing...

{एक्दम खासमखास आहे !}

wink

व्यनितून कळवतो. ( इमेजचा प्रश्न आहे ! ) Evil


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{जाल जाल में लिखा हैं सन्यास लेनेवाले का नाम }

Evil


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{अग्गाग!! ठार झाले}

अग्गाग!! ठार झाले Laughing out loud


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{नाय बौ... अजुन दंगा घालायचा}

नाय बौ... अजुन दंगा घालायचा आहे... मग बघू, ररांच्या वयाचा झाल्यावर विचार करण्यात येईल Big smile Evil


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{बरं पुढं काय झालं ?}

बरं पुढं काय झालं ?


Hope is a good thing...

{>>जालीय संन्यास घ्यावा असे}

>>जालीय संन्यास घ्यावा असे आपल्याला वाटते का?

हो.. खूप जणांनी जालीय संन्यास घ्यावा असे वाटते. लिस्ट क्रोनोलॉजीकली देउ, अल्फाबेटीकली देउ की इर्रीटेटीकली? wink

{हॅ हॅ हॅ}

नुसत्या लॉजिकली द्या.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{अल्फाबेटीकली नका देऊ प्लीज,}

अल्फाबेटीकली नका देऊ प्लीज, माझा नंबर फार लवकर लागेल मग तुमच्या यादीत Cool

{यादी दे}

@श्री अर्धवटराव,

लिस्ट क्रोनोलॉजीकली देउ, अल्फाबेटीकली देउ की इर्रीटेटीकली?

कशीपण द्या पण यादी लवकर द्या Big smile
बघू तर खरे कोण कोण दिग्गज फलंदाज आहेत त्यात Evil


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/