भुर्जपत्र ते वेबपेज
भुर्जपत्र ते वेबपेज हा साहित्यप्रवास उलगडणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात संमेलन पुर्व संमेलनात झाला. किरण ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. डॊ सतिश देसाई यांनी एकुण कार्यक्रमाची रुपरेषा व संकल्पना सांगितली. परिसंवादाला प्रसिद्ध लेखक अनिल अवचट, मराठी अंकाचे ई संपादक व कवि महेश घाटपांडे, साहित्यक व समन्वयक मिलिंद जोशी, पत्रकारिता क्षेत्रातील माजी संपादिका साप्ताहिक सकाळ श्रीमती संध्या टांकसाळे, वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्रमुख उज्वला बर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी ब्लॊगर व स्टार माझाचे सहा. निर्माते प्रसन्न जोशी यांनी केले. अनिल अवचटांनी आपला संगणक प्रवास सांगितला. ब्लॊगिंग च्या माध्यमातुन अनेक तरुण लोकांच्या पर्यंत पोहोचता आले. त्यांच्या पुस्तकाचे उत्तम परिचय ऒर्कुट कम्युनिटीवर झाले. ही नव्या युगाची देणगी असल्याचे त्यांनी नमुद केले. महेश घाटपांडे यांनी आम्ही म्रराठी हा अंक वेबसाईट स्वरुपात प्रथम आणल्यावर सुरवातीच्या काळात त्याला प्रतिसाद मिळाला नाही परंतु त्यानंतर जसा या तंत्रज्ञानाचा प्रसार झाला तसे संकेतस्थळाला भेट देणार्या लोकांची संख्या प्रचंड वाढल्याचे सांगितले. मिलिंद जोशींनी देहबोली ते भुर्जापत्राचा प्रवास कथन केला. पारंपारिक साहित्यातील जड शब्दांना कंटाळलेल्या लोकांना हा नवीन पर्याय मिळाल्याने साहित्यातील मक्तेदारी कमी होण्यात उपयोग झाल्याचे सांगितले. संध्या टांकसाळे यांनी या माध्यमामुळे वाचकांना आपले प्रतिसाद लगेच देता आले. यामुळे एखाद्या लेखावर प्रतिक्रिया एकदम शंभरात पोहोचल्याने हा लक्षणीय फरक दिसल्याचे सांगितले. उज्वला बर्वे यांनी आत्ताच्या पत्रकारितेतल्या माध्यमाला एक साचा असतो तो अभ्यासक्रमात शिकवला जातो. तशा प्रकारचे बंधन या इंटरनेटवरील माध्यमाला नसल्याने वेगळ्या प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटत नसल्याचे सांगितले.
कार्यक्रम रंगत दार झाला. इंटरनेटवरच्या मराठी जगतात मराठीची मोडतोड होते असे म्हटले तर ती आताच्या माध्यमात देखील होते वाहिन्यांच्या माध्यमातुन पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो हा किस्सा मिलिंद जोशींनी सांगितला. वर्तमान पत्रातील बातमीत 'भांगेत शेंदुर' भरला जातो. याचा किस्सा उज्वला बर्वे यांनी सांगितला. या नवीन माध्यमाच्या स्पर्धेत आशय व गुणवत्त्ता बाबत मापदंड लावायचे झाल्यास ते नवीनच ठरवावे लागतील. नेट वरील संगणकीय मराठीच्या प्रगतीसाठी लीना मेहेंदळे या प्रशासकीय अधिकारी असलेल्या ब्लॊगर नी बहुमोल कामगिरी केली आहे याची नोंद चर्चेत घेण्यात आली. उपक्रम सारख्या मराठी संकेतस्थळावर चांगले उपक्रम चालतात तसेच मायबोली या जुन्या मराठी संकेतस्थळाची दखल घेतली गेली. नवीन येणार्या तंत्रज्ञानासोबत लेखन कसे बदलत जाते याचाही परामर्श घेतला. ब्लॊगिंग कसे असावे याबाबत महेश घाट्पांडे म्हणाले कि अमुक शैली असावी अमुक असु नये असे म्हणता येणार नाही वाचकांनी आवडले नाही तर वाचु नये.
कार्यक्रमात माध्यमाईटस या पत्रकारांनी एकत्र येउन केलेल्या गटातर्फे श्री गणेश पुराणिक हे रानडे इनिस्टीट्युट चे माजी पत्रकार विद्यार्थी व सध्या मुंबई महापालिकेत जनसंपर्क अधिकारी म्हणुन काम करणारे ब्लॉगर यांनी ब्लॉगिंग मराठीसंकेतस्थळ यावर सदीप व सविस्तर माहिती दिली. अनिल अवचटांच्या हस्ते औरंगाबादचे दांपत्य अंजली कुलकर्णी व मकरंद कुलकर्णी यांच्या साहित्य संपदा डॊट कॊम दुवा या संकेत स्थळाचे उदघाटन झाले.लेखक, प्रकाशक यांनी या नवीन माध्यमाचा उपयोग करावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले मराठी मंडळी डॊट कॊम या मराठी ब्लॊगर्स कम्युनिटीच्या रात्री १० वाजुन ३ मिनिटांनी प्रस्थापित होणार्या संकेत स्थळाचे उदघाट्न पण याच कार्यक्रमात अनिल अवचटांच्या मुखी करण्यात आले. विक्रांत देशमुख यांनी पुण्यात झालेल्या ब्लॊगर्स मेळाव्याबद्दल माहिती दिली. नेहमी प्रमाणे जालमित्रांसाठी कार्यक्रमाचे ध्वनीमुद्रण आम्ही केले आहे. ऐका
.jpg)
{>>>> पाहुण्यांचे 'अंगवस्त्र'}
>>>> पाहुण्यांचे 'अंगवस्त्र' हार श्रीफळ देउन सत्कार होतो>>>>
हा हा हा
पाहूण्यांना त्यांची अंगवस्त्रे जड वाटत असतील तर ती आम्ही सांभाळू.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{पाहूण्यांना त्यांची}
पाहूण्यांना त्यांची अंगवस्त्रे जड वाटत असतील तर ती आम्ही सांभाळू.
अरे बापरे बरीच ताकद आहे की......
ती अंगवस्त्रे खूपच अवजड असली तरिही सम्भाळाल?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{विजुभौ फिकर नाट}
उसात खेळणारे तरबेज शेतकरी आहेत ते आणि एकदम पेश्श्श्श्श्शल खणावळीतला खुराक अस्तो त्यांचा
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{स्काय ड्राईव्ह}
प्रकाश राव
मायक्रोसॉफ्ट ने 'स्काय ड्राईव्ह' नावाची फाईल शेअरिंग सुविधा चालू केली आहे, ह्यात २५gb जागा मिळते आणि हॉट्मेल / लाईव्ह मेल चा आयडी लागतो, पण इथे फाईल चढवून दुसर्यांबरोबर शेअर करता येतात. (प्रत्येकी फाईल साईझ लिमिट मला वाटते २५mb असावे पण फाईल स्प्लिट करुन सुद्धा चढविता येईल. त्यासाठी audacity वापरावे)
गुगलही हीच सुविधा देते पण त्यांची क्षमता १gb एवढीच आहे पण तिथे २५०mb पर्यंतच्या फाईल्स ठेवता / शेअर करता येउ शकतात.
'रॅपिड शेअर' हाही पर्याय आहे...
अजून एक आहे www.ADrive.com नावाचे स्थळ - इथे तर तुम्हाला चक्क ५०gb जागा मिळते पण फाईल्स इतरांबरोबर शेअर करता येतात की नाही कल्पना नाही.
{इथे लिहलं आहे की ३०० एम्बी}
इथे लिहलं आहे की ३०० एम्बी पर्यंत अपलोड करु शकता, फुकट. मी वापरलेलं नाही पण काम होईल असे वाटते. त्याशिवाय अमर्यादित डाउनलोड करता येइल असेही लिहले आहे.
http://www.filefactory.com/
-Nile
{निळे, प्रमोद देवांनी हे}
निळे, प्रमोद देवांनी हे वापरले असल्याचे सांगितले व त्यानुसार फाईल फॅक्टरी वापरुन ऐकवत आहे.
आपल्या आत्मीयते बद्दल धन्यवाद
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{चांगले वार्तांकन}
चांगले वार्तांकन.. कार्यक्रमाची म्रुद्रिका ऐकण्यासाठी उत्सुक
-ऋ
{एक मुद्दा}
फाईल शेअर करणे आणी फाईल चे एम्पी ३ विजेट करुन सर्वांना खुले ऐकता येईल असे ठेवणे या गोष्टी भिन्न असाव्यात (चुभुदेघे) मी http://www.esnips.com/web/socialspeech या ठिकाणी आत्तापर्यंत ठेउन त्याचे विजेट वापरत आलो आहे. ईस्णीपवर ५ जीबी जागा आहे
कुणीही पाहुण्याने जरी संकेतस्थळाला भेट दिली तरी त्याला एका क्लिक वर कार्यक्रम ऐकता यावा हा हेतु आहे.
युसेंड इट किंवा ड्रॉप आय ओ मधे फाईल शेअर जरी करता आल्या तरी आठ दिवसांनी काढुन टाकल्या जातात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{मस्त वृत्तांत....}
अगदी सगळा कार्यक्रम छान कव्हर केलात. ब्लॉगर्सना संमेलनात समाविष्ट करुन छानच पायंडा पाडला जाईल. एकुणच हे संमेलन अनेक प्रकारे अनोखे ठरेल असे दिसते.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{+ १ असेच म्हणतो... !}
+ १
असेच म्हणतो... !
Hope is a good thing...
{+२}
असेच म्हणतो... !