गाजर आणि गाढव

0
0

एक होता व्यापारी.
खुप हुशार होता तो.
त्याच्या दिमतीला अनेक गाढवे.
त्याची पद्धत एकच.
प्रत्येक गाढवाच्या पाठीवर एक काठी बांधायची.
टोकाला एक रसरशीत गाजर बांधायचे.
गाढवे धावायची गाजराच्या आशेने.
कधी कधी काही गाढवे खुप धावायची.
काही मधेच थांबायची.
एक दिवस व्यापार्‍याच्या कानावर बाजारातील एक सुप्रसिद्ध गाढवाचे नाव आले.
त्याने त्या गाढवाला बोलवले.
त्याने त्या गाढवाला आणखीन मोठे गाजर दाखवले.
गाढव हो म्हणाला.
धावायला लागला.
तो काही थांबेचना.
व्यापार्‍याला कुतुहल.
एक दिवस त्याने त्या गाढवाला विचारले.
" काय रे, तुला एवढे सुद्धा कळत नाही. ते गाजर तुला कधीच मिळणार नाही'
गाढव हसले.
" अरे व्यापार्‍या सारखे गाढवात राहुन तुला गाढव आणि घोड्यातला तुला फरक कळत नाही रे. तुला कुणी सांगितले की मी गाजरासाठी धावतोय. माझे आयुष्य धावणे. मी धावलो नाही तर संपुन जाईन. आता सांग गाढव कोण आणि गाजरासाठी धावतोय कोण? मी किती धावतो हे बघता बघता तु पण धावलास. व्यापारी तु. तु धावल्यामुळे किती लोकांचा फायदा हे तुला कळले सुद्धा नाही"

डोक्यावरुन गेले, असो, घोडा व

1

डोक्यावरुन गेले,
असो,

घोडा व गाढवावरुन अ व ब आठवले.... क / ख कुठे राहिले काय माहीत....


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

व्यापारी

2

अहो राजे व्यापारी म्हटले आहे मी.
अ आणि ब व्यापारी होते काय?
आता तुम्हाला पण विचारवंताचे मत द्यायला लागेल हो.

क्रि प्टि क!!! जल्ला काय

3

क्रि प्टि क!!!

जल्ला काय कल्लाच नाय! उद्या सांगा आता. मी चाल्लो घरला.

काय बी समजलं नाय

4

काय बी समजलं नाय Sad

मला लेख वाचण्या

5

पुर्वी जाणिव नव्हती की मी गाढव आहे. मला समुपदेशन समजल नाही.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

गाढव

6

गाढवाच्या आत्मकथेत कसले समुपदेशन शोधताय?

हॅ हॅ हॅ ! एक साधू होता... तो

7

हॅ हॅ हॅ !

एक साधू होता...

तो रोज प्रत्येक सामान्य / असामान्य गोष्टि मध्ये शिष्यांना उपदेश करायचा.
एक दिवस सकाळ सकाळी तो अत्यंत महत्वाच्या मिटिंगसाठी चालला होता तोच काही शिष्य समोर आले तो म्हणाला.. आलोच.. थोडे थांबा !

शिष्यांना वाटले ह्यात पण काहीतरी उपदेश आहे... गेले मागे.. !
सुवास घेऊन परत आले... व म्हणाले ह्यात पण उपदेश होता.... wink

काय समज्ले Laughing out loud

*

ह्या गोष्टीचा जनक मी आहे व आताच तयार केली आहे कॉपीराईट लागू.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

हॅ हॅ हॅ. जित्याची खोड

8

आणि त्यात परंपरा दुसरे काय

हाहा

9

Laughing out loud

हॅहॅहॅ .. म्हणूनच मी आज

10

हॅहॅहॅ .. म्हणूनच मी आज डब्ब्याला चहा खारी नेली होती हास्य

मास्तर

11

तुमच्या कथेत गाढव काय ? घोड काय? मधे काही नाही का हो?


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

घोडा आणि गाढवांच्या मधे खेचर

12

घोडा आणि गाढवांच्या मधे खेचर येतं ना हो काका?

हॅहॅहॅ

13

हॅहॅहॅ आपण तस काय बोल्लो नाय हा!
नाय तर नियोजित जाल टवाळ संन्यास लवकरच चालु व्ह्यायचा. आम्हाला आता कोदा व्हायचय.


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

आम्हाला आता कोदा व्हायचय.

14
आम्हाला आता कोदा व्हायचय.

जमणार नाही ... तुम्हाला जमणार नाय! मोठी ध्येयं वगैरे असावीत पण न जमण्याएवढ्या मोठ्या अपेक्षा नका हो ठेऊ स्वतःकडून!! ;-)

सहमत

15

सहमत!

हॅहॅहॅ

16

स्वप्ण बघायाला काय हरकत आहे. कोदत्वाच्या प्रवासातील परतीचे दरवाजे बंद झाले की काय? कोदन्ति मम गात्राणी | टंकं च परिरक्षति||


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

मला तरी एवढच कळ्ल की, कोणी

17

मला तरी एवढच कळ्ल की,
कोणी काही म्हणो मास्तर लिवण थांबणार नाहीत.
लिवण हाच मास्तरांच प्राण हाय.

अशीच दोन गाढवे गाजराच्या मागे

18

अशीच दोन गाढवे गाजराच्या मागे धावत होती. धावून धावून भूक लागली होती.
दोघेही एकमेकाना भेटले.
थोड्या गप्पांनन्तर पहिल्या गाढवाने दुसर्‍या गाढवाच्या काठीला बांधलेले गाजर खाऊन टाकले दुसर्‍याने पहिल्याच्या काठीला बांधलेले गाजर खाल्ले.
दोघांची भूक भागली.
आता व्यापारी मात्र "त्याने गाढवाना दुसर्‍या गाढवांच्या काठीला बांधलेली गाजरी दिसू नयेत" या साठी काय करावे या विचारात पडलाय


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

;)

19

लय भारी. या गाढवांकडून सहकार शिकण्यासारखा आहे!

सल्ला

20

>>आता व्यापारी मात्र "त्याने गाढवाना दुसर्‍या गाढवांच्या काठीला बांधलेली गाजरी दिसू नयेत" या साठी काय करावे या >>विचारात पडलाय
एखाद्या समुपदेशकाचा सल्ला घ्यायला सांगा.

उत्तम कथा. आता तुम्ही गाढव,

21

उत्तम कथा.
आता तुम्ही गाढव, घोडा की व्यापारी एवढा खुलासा करुन टाका.

आय शप्पथ का लिहिलय? काय

22

आय शप्पथ का लिहिलय? काय लिहिलय? कुणाला उद्देशुन लिहिलय?
का ही ही समजल नाही.

-- नं.१ अडाणी


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

असो अत्यंत क्रिप्टीक भाषेत

23

असो अत्यंत क्रिप्टीक भाषेत स्वतःची लाल करणे कसे ते मलाही लवकरच जमेलसे वाटते.


-पुण्याचे पेशवे

आय शप्पथ का लिहिलय? काय

24

आय शप्पथ का लिहिलय? काय लिहिलय? कुणाला उद्देशुन लिहिलय?
का ही ही समजल नाही.
-नं.२ अडणी