खरपूस आणि झणझणीत पेरी पेरी चिकन

3
0

नमस्कार मंडळी,

पुन्हा एकदा या दालनात पाऊल टाकतोय कारण हा पदार्थ सर्वांनी (मांसाहारी लोकांनी) एकदा चाखावा असा आहे म्हणून. या चिकनच्या विविध रेसिपी उपलब्ध आहेत.

गणपा सारख्या बल्लवाचार्‍यांच्या पाकृंसमोर ही पाकृ जरा प्रेझेंटेशन आणि तपशील मधे मार खाईल यात वाद नाही. हास्य

तर मग घ्या साहित्य.

२ टे.स्पून पेरी पेरी सॉस ( मी तयार आणला होता, घरी करावयाचा झाल्यास कृती ही इथे )
२ मोठे चमचे लिंबाचा रस
१ चमचा आलं पेस्ट
२ चमचे लसूण पेस्ट
१/२ कप लोणी
मीठ चवीनुसार
१/२ किलो चिकन . खाली दिलेल्या फोटोनुसार चिकन हे स्किन असलेलंहव आणि शक्यतो ब्रेस्ट पिसहवेत. (बोनलेस ब्रेस्ट फिलेट्स असतील तर उत्तम)

कृती

१. चिकन स्वच्छ धुवून घ्या.
२. चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्या.
३. चिकन गॅसवर १५ मिनिटे भाजा घ्या, साधारण अर्धवट शिजेल इतकं. (फ्लेम ग्रिल असल्यास उत्तम.)

४. एका मोठ्या भांड्यात लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, मीठ, वितळलेलं लोणी, पेरी पेरी सॉस, आणि चिली फ्लेक्स (तडका मिरची मिक्सर मधून काढली की तयार चिली फ्लेक्स.) हे सर्व एकत्र करून घ्या.

५. आता भाजलेल्या चिकनला सुरीने चरे करून घ्या, आणि वरील मिश्रणात चांगलं घोळवा.
६. २-३ तास मुरत ठेवा.
७. ओव्हन २०० डिग्रीवर प्री-हीट करा.
८. ओव्हन ट्रे वर अल्युमिनिअम फॉइल वर चिकनचे तुकडे व्यवस्थित पसरवून घ्या.
९. साधारण ४० मिनिटे २२० डिग्रीवर हीट करा.

ही झाली तुमची खमंग, खरपूस, जिभेला चटका लावणारी पेरी पेरी चिकन डिश तयार. हास्य

आपला,
मराठमोळा

{अरे !!! किती सोपं आहे रे}

अरे !!!
किती सोपं आहे रे हास्य


Hope is a good thing...

{एक नंबर रे , ममोशेफ !!}

एक नंबर रे , ममोशेफ !! wink

{निषेध }

जैनांच्या घरात आली आहे इकडे नॉन-वेज औषधाला पण मिळत नाही आणि तुम्ही असले धागे काढून जळवा !! angery


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{जळवा कशाला? तुमच्या धनींना}

जळवा कशाला?
तुमच्या धनींना सांगा, ते बनवून देतील तुम्हाला हवं तसं, त्यांना स्वयंपाकाचा दांडगा अनुभव आहे. हास्य

{छान!}

छान!