नवीन कोण कोण आहे बरें
मीम वर लॉगिन केल्याकेल्या अनेक नवीन चेहरे (पक्षी: आय.डी.) दिसत आहेत.
सध्या लेखन स्पर्धा २०१२ चालू आहे त्यामुळेदेखील बरेच नवीन सदस्य आलेले दिसत आहेत.
तसेच काही दिग्गज लोकही सदस्य झालेले आहेत.
तर म्हटल जरा ओळख तरी करून घेउया, म्हणून हा धागा.
नवीन सदस्यांनी ओळखीत त्यांना जे हवय ते सांगाव ओळख म्हणून. गाव वगैरे सांगितल तर उत्तमच. म्हणजे मूळच गाव, पोटापाण्यासाठी कुठल्या गावात गेला असला तर तिथल गाव.
आवडी निवडी काय आहेत, मीम ची ओळख कशी झाली.
रिकाम्या वेळात काय करता, कामाच्या वेळात काय करता (का माझ्यासारख नेटवर चकाट्या पिटत बसता) वगैरे वगैरे.
जर संस्थळावर काही मदत हवी असेल तर मुरलेले सदस्य इथे मदतीला आहेतच, ते नसले तर मग शेवटी साइटीचे मालक आहेतच. (तेही नसतील तरी आता तक्रार करायची सोय उपलब्ध आहे.
)
तर कोण सुरुवात करतय सांगा पाहू?
(इथे गाव निवडीत महाराष्ट्र, भारत आणि जग असे ऑल इन्क्लुजीव पर्याय न दिल्याबद्द्ल मालकांचा निषेध.)

.jpg)
{(विषय दिलेला नाही)}
मीम सुरु झाल्या दिवसापासुन आहे खरं तर ! पण ज्या पद्धतीने मीममध्ये कंटीन्युअसली निरनिराळे चांगले बदल, सुविधा निर्माण होत असतात त्यावरून रोजचं लॉगीन नवंच वाटतं मला तरी
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{नमस्कार, मी राजे. मीमवर तसा}
नमस्कार,
मी राजे. मीमवर तसा नवीनच, फक्त ८०० एक दिवस झाले लॉगईन होऊन.
तसा मी मुळचा कोल्हापुरचा, पण जम्मु पासून कन्याकुमारी पर्यंत कुठल्या ही शहरी मी सापडण्याची ९९% शकता असायची आधी.. पण आता पुणे मध्ये मुरलो आहे
मी पोटापाण्याचा व्यवसाय नक्की काय करतो? हा प्रश्न गेली कित्येक वर्ष आमच्या मातोश्रींना पडला आहे, त्याचे उत्तर मिळाले की लगेच कळावतोच
Hope is a good thing...
{तसा मी मुळचा}
तसा मी मुळचा कोल्हापुरचा,>>>
आताच लग्नाचे फोटु पाहिले. ह्या राजेला द्या त्यांच्या त्यांच्या कर्नाटकात पाठवुन आणि आपला बेळगाव तेवढा परत घ्या.
मी क्वचित अधेमधे लॉगिन करुन येतो इकडे किंवा काहिवेळा लॉगैन न करताच वाचुन जात असतो.
मी मुळचा कोल्हापुरचा. २००१ पासुन पुण्यात.
पोटासाठी नोकरी करतो. राज्याला भेटेन भेटेन अस म्हणत अजुन काहि आमची भेट नाहिये झालेली.
आता बघु लवकरच भेटु.
{नवीन सदस्य }
आता मालकांनीच असा प्रतिसाद दिल्यावर खर्या नवीन सभासदांनी काय करावे बरे ?
- एक संभ्रमित नवीन सदस्य
{नवीन सदस्यांनी प्रतिसाद कसा}
नवीन सदस्यांनी प्रतिसाद कसा लिहावा याचे उदाहरण म्हणून दिले आहे हो ते
Hope is a good thing...
{Count down}
Count down सुरु करावे म्हणते, ८०० दिवस पूर्ण झाले कि परिचय देइन - नवीन सदस्य म्हणून
{मंजू, एकदम मस्त आयडिया आहे ही}
मंजू, एकदम मस्त आयडिया आहे ही
{मी पण तसा नवीनच. ८०० दिवस}
मी पण तसा नवीनच. ८०० दिवस झाले असतील..
पण इथे फक्त मुक वाचक असतो. राजेने मिम सुरु केलं, आणि पहिल्या दिवशीच सभासद झालो.
महेंद्र
http://kayvatelte.com
{नवीन म्हणजे किती नवीन}
नवीन म्हणजे किती नवीन पाहिजे?
)
तशी मी रोज नव्याने इथ येते म्हणा
आणि नव्या सभासदांना वेगळ काढून त्यांना काही त्रास द्यायचा तर बेत नाही ना तुमचा?
कारण जुने सभासद पण ते कसे नवेच आहेत ते सांगताहेत म्हणून मनात शंका आली
(स्मायली वापरल्या की वाक्य गंभीरपणाने घ्यायच नाही असा संकेत इथेही असेल अशी अपेक्षा!!)
{नवीन म्हणजे किती नवीन पाहिजे?}
नवीन म्हणजे किती नवीन पाहिजे?
-
नीलपक्षी
{किती नवीन}
@ आतिवास (ह्या नावाचा काय झोल आहे हो?), नीलपक्षी
नवीन म्हणजे स्वतःला नवीन समजणारे, उदाहरणार्थ खालील प्रतिसाद;
नवीन सदस्य
१. सगळेच लेख वाचायला जमतात
ज्यांना इथे प्रस्थापितांची ओळख नाही असे.
This is imperfect universe
{सातारकर, कळॅल नावाचा}
सातारकर, कळॅल नावाचा झोल(घोळ?) तुम्हाला लवकरच.
{मला माहितीये ! मला}
मला माहितीये !
मला माहितीये !!
मला माहितीये !!!
:party:
पण आम्ही नाही सांगणार !
---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय
{नवीन समजणारे !!!}
@सातारकर - नवीन समजानारे नाही हो मी खरोखरच नवीन आहे
नवीन समजानारे अजून वेगळे असतील
{अहो मग}
अहो मग तुमच्यासाठीच आहे हा धागा...
तुमची ओळख करुन द्या. आधीच्या सदस्यांची ओळख करुन घ्या
This is imperfect universe
{परिचय}
मालकांच्या प्रतिसादावर मी दिलेले उत्तर बघा
{काउंटडाउन झाल की कळवा}
काउंटडाउन झाल की कळवा.
This is imperfect universe
{तेव्हा १६०० दिवस जुने (म्हणजे}
तेव्हा १६०० दिवस जुने (म्हणजे नवे!)असलेल्यांनी काय करायचं?
{नव ठरवण्याची व्याख्या}
नव ठरवण्याची व्याख्या करायला घेउया काय
परत नव्याची व्याख्या बदलायची...
This is imperfect universe
{@ आतिवास (ह्या नावाचा काय झोल}
@ आतिवास (ह्या नावाचा काय झोल आहे हो?)>>>>
एक अंदाज...
आतिवास : Aativas : Savita A (?)
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{अंदाज ९९% बरोबर. savitaa चा}
अंदाज ९९% बरोबर. savitaa चा फक्त उलटा क्रम केलाय
{म्हणजे ज्यांना "ररा आजोबांचे}
म्हणजे ज्यांना "ररा आजोबांचे वय" सारख्या धाग्यांवर काय प्रतिसाद द्यायचा ते समजत नाही असे?
पण इथे तर सगळेच स्वतःला नवीन म्हणवून घेत आहेत.
(अगदी मालक सुद्धा!
)
नीलपक्षी
{नीलपक्षी, > किंबहुना आपण}
नीलपक्षी,
<< म्हणजे ज्यांना "ररा आजोबांचे वय" सारख्या धाग्यांवर काय प्रतिसाद द्यायचा ते समजत नाही असे >>
किंबहुना आपण प्रतिसाद देण अपेक्षित आहे का नाही हे समजत नाही असे?
{(विषय दिलेला नाही)}
नीलपक्षी
{प्रस्थापित असा काही प्रकार}
प्रस्थापित असा काही प्रकार नाही आहे, पण अनेककाळ एकत्र याच साईटवर वेळ घालवल्यावर ओळखी होतातच. व प्रत्यक्ष भेटीगाठी / फोनवर बोलणे इत्यादीतून ओळख वाढत जाते, मग तसे दंगा मस्तीचे धागे येतात येवढंच.
Hope is a good thing...
{मग एक सुचवू का....तुम्ही}
मग एक सुचवू का....तुम्ही एखादे गेटटुगेदर का घेत नाही???
----निवेदिता--------
{एका पायावर तयार आहे करू}
एका पायावर तयार आहे
करू प्लान एखादा असाच!
Hope is a good thing...
{१८ तारखेच्या नंतरचे ठरवा , जे}
१८ तारखेच्या नंतरचे ठरवा , जे काय ठरवाल ते
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{का बरं?? १८ नंतर असा कोणता}
का बरं??
१८ नंतर असा कोणता शुभ मुहूर्त असणार आहे??
{अॅट युवर सर्व्हीस !!}
अॅट युवर सर्व्हीस !!
{आम्ही इथे पडीक असतो....}
आम्ही इथे पडीक असतो....
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{हजर}
हजर
{इथे वयोवृद्ध सदस्यांना हजेरी}
इथे वयोवृद्ध सदस्यांना हजेरी लावायची परवानगी आहे का??
{हरकत नाही}
सदस्य वयोवृध्द असले तरी हरकत नाही (अवघे पाउणशे वयमान), फक्त सदस्यत्व नवीन असल म्हणजे झाल...
This is imperfect universe
{मी जुना आहे पण माझा आयडी नवा}
मी जुना आहे पण माझा आयडी नवा आहे.. नव्या बाटलीत जुनी दारु.
इथे मीमवर इतकं खेळीमेळीचं वातावरण आहे की जुन्यानव्याचा काही म्हणजे काही फरक पडत नाही. उखाळ्यापाखाळ्या न करता उत्तम मर्यादेत खेळकर चर्चा करणारं पण मौजमजेत कुठे कमी नसलेलं संतुलित संस्थळ म्हणून आमच्या मीमराठीचा मला अभिमान आहे.
हा संतुलितपणा आणि अगदी सहकुटुंब जिथे बिनदिक्कत सदस्य व्हावं इतका जिव्हाळा राजने जपला आहे. कसं जमवतो कोण जाणे, पण त्यासाठी त्याचं फार कौतुक वाटतं.
{च्यामारी}
नवीन लोकांच्या साठी धागा काढला नि जुनेच हलकट दंगा करताहेत.
चला नव्या लोकांसाठी आपुन शुरुआत करताय. तसा अगदी रामकृष्णांसकट अनेक पिढ्या पाहिलेला असून सध्याच्या पिढीबरोबर गणिती म्हणून वावरतो. पोटापाण्यासाठी कळफलक बडवतो. जमल्यास काम करतो एरवी आपल्याला काय झेपेल न झेपेल याचा विचार न करता वाट्टेल ते वाचतो नि सुचेल ते मत फेकून मारतो.
ऑन शीरीयस नोटः असले धागे काढून कृत्रिम ओळखी करण्यापेक्षा आवडेल त्या धाग्यावर मत द्यावे, खरडी, व्यनितून समान आवडनिवड असणार्यांशी गप्पा माराव्यात. जमतंय आपलं असं वाटलं तर भेटीगाठीतून मैत्री वाढवावी - वाढवाविशी वाटली तर - हे अधिक चांगले. अशाच मार्गाने आम्हाला जालावर युएसच्या ए पासून सातार्याच्या एस पर्यंत अनेक गावच्या मित्र-मैत्रिणी हितेच गावल्यात. पण मी ग्रेट लिहितो त्यामुळे मी लिहितो तुम्ही स्तुती करा पण मी कुणाला प्रतिसाद देणार नाही अशा नमुन्यांसाठी एस डबल ओ आर वाय (की डबल एस ओ आर वाय?
) स्वारी, आपले तुपले जमनार नाय हे पैलेच बजावतो.
जाताजाता महत्त्वाचे: 'प्रस्थापित' हा शब्द वापरल्याबद्दल सातारकराला सातारहून उचलून नेऊन सोमालियात फेकावे असा प्रस्ताव देतो आहे.
(म्हातारा असून नित्यनवीन असणारा) रमताराम
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{हा हा हा !! सर्व काका काकू}
हा हा हा !!
सर्व काका काकू आजी आजोबा दादा ताई वहिनी नमस्कार !!!
आम्ही तेच आपले हे हो.....म्हणजे जाह्नवी तै हो
{हायला आज्जीची तै कशी काय झाली}
हायला आज्जीची तै कशी काय झाली बाबा हिनं?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{का बे दाद्या ???}
का बे दाद्या ???
{ओ जाह्नवीबै, मला दाद्या}
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{ओ जाह्नवीबै, मला दाद्या}
ओ जाह्नवीबै, मला दाद्या म्हणलं म्हणून तुमचं वय ररांआजोबांपेक्षा फक्ते दिड महिन्याने कमी आहे हे कुणाला सांगणार नाही असे समजु नका?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{माझे दोन पैसे}
आता वर लिहिण्यार्या सदस्यापेक्षा माझं वय फक्त काही शतकांनी कमी जास्त असेल. बुद्धीचा आणि पर्यायाने शिक्षणाचा अभाव असल्याने पोटापाण्यासाठी लोखंडात खेळणे हा व्यवसाय.
मित्रमंडळीत बसुन टवाळक्या करणे,वाचन आणि गाणि ऐकणे हा छंद.
वास्तव्य पुण्यनगरी
{नमस्कार.. मी प्रसन्न.. मुळ}
नमस्कार.. मी प्रसन्न.. मुळ सातारा.. सध्या हैदराबाद येथे ... काम- जर्मन भाषा अनुवादक
(
अनेक आहेत त्यापैकी एक
)...
आवडः संगित ऐकणे आणी वाचन.. भ्रमंती करणे (जे सध्या शक्य नाही).
इथल्या मुरलेल्या लोकांना भेटण्याचा योग लवकर येवो ही ईच्छा
{देवा}
ररा आजोबा,
असले धागे काढून कृत्रिम ओळखी करण्यापेक्षा आवडेल त्या धाग्यावर मत द्यावे, खरडी, व्यनितून समान आवडनिवड असणार्यांशी गप्पा माराव्यात.
ह्याच्याशी सहमत आहेच. पण नव्या पब्लीकला जरा बोलत कराव हा उद्देश. कुंपणीत नाही का नवीन चार रंगरुट आले की नाही का इंडक्शन चालू असेस्तोवर ते एकमेकांचे मित्र बनतात. तस काहीस. नंतर यथावकाश ही मंडळी जुनी-जाणती होतायतच की.
ऑन डेंजरस नोटः सातारकर सोमालियात गेले तर सोमालियाकर पुण्यात येतील.
)
(बाय द वे, शांतीसेना जर सोमालियात असेल तर काही सातारकर नक्कीच त्यात असतील.
This is imperfect universe
{मी पण नविन आहे}
मी पण नविन आहे
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{हो}
हे नाव तरी नक्की नवीन आहे (आय डी. ?)
This is imperfect universe
{(विषय दिलेला नाही)}
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{नमस्कार...}
मी अश्विनी... मुळची अंबाजोगाईची (जिल्हा:-बीड)... शिक्षणासाठी पुण्यात राहाते. तसं शिक्षणाचं शेवटचं वर्ष चालू आहे त्यामूळे लवकरच परतण्याच्या तयारीत आहे...
मला वाचन अतिशय प्रिय आहे. वेळ कमी मिळतो पण तरीही नवनवीन साहीत्य वाचायला आवडतं. 'मी मराठी' बद्दल पहिल्यांदा लोकमत पेपरमध्ये वाचलं होतं, तेंव्हापासून जमेल तसं इथे फेरफटका मारते. पण अजून कोणासोबत फारशी ओळख झाली नाहीए. म्हणून ओळख करून घेण्याची ही संधी चांगली वाटते आहे. तरी ही एक अडचण मात्र आहे... आपण सगळे नव्या सदस्यांची ओळख करून घ्याल, पण माझ्यासारख्या नवागतांना आपली ओळख कशी होईल?... आम्हालाही आपल्याला भेटायला, आपली सगळ्यांची ओळख करुन घ्यायला आवडेल...
{सोप्प आहे}
मला वाचन अतिशय प्रिय आहे.
तरी ही एक अडचण मात्र आहे... आपण सगळे नव्या सदस्यांची ओळख करून घ्याल, पण माझ्यासारख्या नवागतांना आपली ओळख कशी होईल?
आपल्या आवडत्या विषयावर किंवा पुस्तकावर किंवा आपल्या क्षेत्रातल्या गोष्टींविषयी काही लिहायला घ्या.
This is imperfect universe
{नमस्कार...}
मी अश्विनी... मुळची अंबाजोगाईची (जिल्हा:-बीड)... शिक्षणासाठी पुण्यात राहाते. तसं शिक्षणाचं शेवटचं वर्ष चालू आहे त्यामूळे लवकरच परतण्याच्या तयारीत आहे...
मला वाचन अतिशय प्रिय आहे. वेळ कमी मिळतो पण तरीही नवनवीन साहीत्य वाचायला आवडतं. 'मी मराठी' बद्दल पहिल्यांदा लोकमत पेपरमध्ये वाचलं होतं, तेंव्हापासून जमेल तसं इथे फेरफटका मारते. पण अजून कोणासोबत फारशी ओळख झाली नाहीए. म्हणून ओळख करून घेण्याची ही संधी चांगली वाटते आहे. तरी ही एक अडचण मात्र आहे... आपण सगळे नव्या सदस्यांची ओळख करून घ्याल, पण माझ्यासारख्या नवागतांना आपली ओळख कशी होईल?... आम्हालाही आपल्याला भेटायला, आपल्या सगळ्यांची ओळख करुन घ्यायला आवडेल...
{अश्विनी ताई, (चला एक कोणीतरी}
अश्विनी ताई, (चला एक कोणीतरी मराठवाड्याच भेटल ब्वा )
ही घ्या माझी ओळख, मी सुहास, मुळचा औ.बाद , सिल्लोड
पुण्यात च असतो ! थोडफार लेखन करतो (पब्लीक उगा लेखक म्हणत्यात) आणि प्रचंड वाचतो, ईथे एक विशाल कुलकर्णी म्हणुन असतो त्याच अजिबात वाचत जावु नकोस
आणि अर्धवट या आयडी ने लिहीलेले तर अजिबात वाचु नकोस
{अजिबात वाचत जावु नकोस...}
अजिबात वाचत जावू नकोस... असं का?... एखादी गोष्ट करू नको म्हणल्यानंतर तीच करावीशी वाटते, तसा प्रकार वाटतोय...
{ही ही ही समजल तुला}
ही ही ही
समजल तुला
{आता अशा गोष्टी समजून}
अशा गोष्टी समजून घ्याव्याच लागतील ना... तस, मग मी कोणाचंच लेखन कधीच वाचणार नाही....
{नमस्कार देवा..मी अर्धवट..}
नमस्कार देवा..
मी अर्धवट.. बुद्धीनं, कर्तुत्वानं आणि वृत्तीनं ही
मूळ सातारकर, गेली काही वर्षे नोकरीसाठी पुण्यात असतो.
इथल्या सगळ्या लोकांच्या मानानं अजून खूप लहान माणूस आहे, 'उत्तम उदात्त ते ते घ्यावे, मिळमिळीत अवघेंची टाकावे' या संतवचनाला अनुसरून इथल्या दिग्गजांकडून शिकायचा प्रयत्न करतोय.
'सातारकर' यांच्या आग्रहामुळे मराठी आंतरजालावर आलो, त्यांच्याच शिफारसीमुळे इतर अनेक संस्थळांप्रमाणेच 'मीमराठी'वर वावरू लागलो...
इतर संस्थळांपेक्षा टेक्नीकली कितीतरी सरस असं मीम आहे हे निश्चीत..
{नमस्कार मन्डळी मी राजेन्द्र}
नमस्कार मन्डळी
..छन्द ट्रेकिन्ग
मी राजेन्द्र मेहेन्दळे ...मूळ गाव कल्याण ...सध्या पुणे...नोकरि ऐटित (IT)
केलेले छान ट्रेक (तरुण असताना
) राज्गड -तोरना ,अलन्ग् -कुलन्ग -मदन आणि बरेच..
मीम चा पन्खा आहे .. एखादा लेख लिहिन कधितरि..आत्ता फक्त तुम्हि लिहिलेले वाचतो
The hardest thing to understand in the world is the income tax.
Albert Einstein
{वाचनमात्र होते आज सदस्यत्व}
वाचनमात्र होते आज सदस्यत्व घेतले आहे.
{स्वागत आहे सर्वांचे}
स्वागत आहे सर्वांचे (जुन्यांचे नव्याने स्वागत
)
{धन्स}
धन्स
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{५ एक महिने झाले मीमराठीवर}
५ एक महिने झाले मीमराठीवर येऊन. फेसबुकवर मीमराठीचे पानं आहे तेथून लिंक मिळाली होती.
मला देखील आपल्या सगळ्यांची ओळख करुन घ्यायला आवडेल.
{मीमच्या कट्टाला येण्याची}
मीमच्या कट्टाला येण्याची इच्छा आहे.
कधी करणार असाल तर नक्की कळवा.
{बंध जुळण्याचा आनंद}
नमस्कार ~
काही वेळानेच हा धागा पाहिला. त्याला अन्य कोणतेही कारण नसून मीच गेले चारएक दिवस नेटच्या सलगीत नव्हतो. काही कौटुंबिक कार्यक्रमामुळे घर अगदी भरले होते आणि केजी ते इयत्ता ५ अबकड मध्ये शिकणारी वानरसेना घरात धुडगूस घालीत असल्याने पीसी बंद करून बसणे शहाणपणाचे होते.
असो. आत्ता काहीसे शांत वातावरण झाले आहे.
मराठी संस्थळांची ओळख "पक्का पुणेकर" होण्याच्या मार्गावर असणार्या आमच्या चिरंजिवांनी करून दिली आणि मलाही साहित्यावर चर्चा माध्यमातून विचाराचे आदानप्रदान करणे पसंत पडल्याने प्रथम पुस्तकविश्वचा सदस्य झालो होतो. तिथून पुस्तक सोडून अन्य विषयावरही मत/मते प्रकटन करणे (सागरमुळे) आवडू लागल्याने मग त्याच्याच शिफारशीने मीमराठीवर आलो आणि रमलो.
मी कोल्हापूरचा आणि कोल्हापूरातच राहणार हे नक्की. मीमराठीमुळे अनेक [कधीही प्रत्यक्ष पाहण्याची शक्यता नसलेल्या मित्रांशी समोरासमोर ओळख झाली आणि मग बंधही चांगलेच जमले आहेत. फक्त मी शाकाहारी आणि अपेयपान न करणारा असल्याने या नवीन मित्रांना माझी कंपनी रुचत नसल्याचे जाणवते. पण कान्ट हेल्प !]
मार्च २०१२ ला व्हीआरएस अंमलात येणार असल्याने त्यानंतर मग मी अधिक उत्साहाने येथील विविध विषयांवर भाग घेऊन तुम्हा सर्वाच्या "अमृतांजन" मासिक खर्चात वाढ होईल हे पाहीन.
अशोक पाटील
{>> मी शाकाहारी आणि अपेयपान न}
>> मी शाकाहारी आणि अपेयपान न करणारा
तो मी नव्हेच आठवलं
Hope is a good thing...