एगप्लांट + मोझ्झेरेला चीज (उर्फ वांग्याचे काप फ्राय)
आज जवळ जवळ शाकाहारी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केलाय. पण आता नावातच एग असल्याने अंड्याचा वापर अपरिहार्य आहे.
पण तुम्ही अंड खात नसाल तर त्यावरही उपाय आहे.
नेहमीसारखे वांग्याचे काप करण्या ऐवजी आज पाकृमें थोडा टिव्स्ट्.
साहित्यः
एक मोठं वांगं.
एक मोठा कांदा (जीतका शक्य असेल तितका बारीक चिरलेला.)
२ मध्यम टोमॅटो (.........................-॥-.........................)
२-३ चमचे टोमॅटोची पेस्ट.
चिमुटभर साखर (ऑप्शनल.)
१ चमचा लाल तिखटं / मसाला.
१/४ चमचा हळद.
मीठ चवीनुसार.
२-३ चमचे तेल.
१/४ वाटी ब्रेड क्रम्स्
१/४ वाटी मैदा + चवीनुसार मीठ.
१ अंडे.(फेटलेले.)
अंड्याला पर्याय हवा असल्यास २ चमचे मैदा + १ चमचा बेसन एकत्रं करुन थोडं पाणी टाकुन भजीच्या पीठा पेक्षा किंचीत पातळ भिजवावं.
कृती:
या पाककृतीसाठी आपल्याला थोडा सॉस / रस्सा लागणार आहे. तर सर्व प्रथम आपण तो बनवून घेऊ.
सॉस
एका कढईत ३-४ चमचे तेल कडकडीत तापवून घ्यावं. मग त्यात बारीक चिरलेला कांदा परतुन घ्यावा. चिमुट्भर मीठ टाकावं म्हणजे कांद्याला पाणी सुटुन तो लवकर शिजेल.
मग त्यात लाल तिखट / मसाला टाकून चांगलं परतुन घ्यावं.
मसाल्याचा कच्चा वास निघुन गेल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा. मध्यम ते मंद आचेवर सतत परतत रहावं. चवी नुसार मीठ टाकावं. २-३ चमचे टोमॅटोची पेस्ट टाकून चांगल ढवळुन घ्यावं. चीमुटभर साखर टाकावी.
वरून झाकण ठेउन पेस्टचा कच्चट वास जाई पर्यंत आणि कांद्या टोमॅटोचा पार लगदा होई पर्यंत शिजवावे. हा सॉस बनवताना शक्यतो पाण्याचा वापर टाळावा. (झाकण ठेवल्यावर आतल्या बाष्पाचं जितकं पाणी पडेल तितक पुरेसे आहे.)
वांग्याचे काप
एका बशीत ब्रेड क्रम्स, दुसर्यात मैदा + मीठ आणि तिसर्यात फेटललं अंडे ठेवुन हाताशी ठेवावं.
(ज्यांना अंडे चालत नाही त्यांनी २ चमचे मैदा + १ चमचा बेसन + पाणी एकत्र करुन भजी पेक्षा थोडं पातळ पीठ भिजवून घ्यावं.)
वांग्याचे साधारण १ ते दिड सेंमी जाड काप करुन घ्यावे.
लाल तिखट / मसाला + तेल + मीठ एकत्र करुन ते वांग्याच्या कापाना लावून किमान २० मिनीटे मुरत ठेवावं.
मुरवलेल कापांना पाणी सुटलेल असल्याने ते सर्वप्रथम मैद्यात घोळवून घ्यावे. मग ते फेटलेल्या अंड्यात घोळवून शेवटी ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यावे.
तव्यावर २ चमचे तेल सोडून ते कडकडीत तापल्यावर त्यात हे वांग्याचे काप खरपूस तळून घ्यावे.
हे तळलेल काप एखाद्या जाळी वर ठेवावे म्हणजे खालून वाफ धरुन ते मऊ पडणार नाहीत.
(इथले २-३ फोटो माझ्या धांदरट पणामुळे डिलीट झाले.
)
एका बेकिंग पेल्ट मध्ये खाली थोसा सॉस पसरवून घ्यावा त्यावर एक वांग्याचा काप ठेवावा. वरून परत थोडा सॉस लावून त्यावर अजुन एक काप असा थर रचावा. वर परत थोडा सॉस लावुन बचका भर तुमच्या आवडीचं चीज ठेवावं. (मी मोझ्झेरेला चीज वापरलय.)
नंतर ही बशी ओव्हनमध्ये ग्रील मोड वर चीज वितळे पर्यंत ठेवावी (अंदाजे १ ते दीड मिनीट.)
ओव्हन नसल्यास मायक्रॉवेव्हमध्येही चालेल.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
स्टार्टर म्हणुन वाढायला हरकत नाही.
पण हा पदार्थ गरम असतानाच खाण्यात मजा आहे. तेव्हा ताबडतोब लुत्फ घ्यावा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
वाटल्यास थोडासा पुलाव/ जीरा राईस सोबत साईड डिश म्हणुनही वाढू शकता.
.jpg)
{_/\_ _/\_ _/\_}
सोबत ईनो पण देत जा रे गणपा.... रेसीपी बघून बघून, प्रतिक्रिया देऊन देऊन आणि,कीबोर्ड पुसून पुसून थकलो रे
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{साल्या, तू त्या मास्टरशेफ़ला}
साल्या, तू त्या मास्टरशेफ़ला का जात नाय?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{अगदी हेच बोलतो... पण भारतीय}
अगदी हेच बोलतो... पण भारतीय मास्टरशेफ़ नको रे. ऑस्ट्रेलियनमध्ये जा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ़ एक}
ऑस्ट्रेलियन मास्टरशेफ़ एक भन्नाट कार्यक्रम आहे असं ऐकून आहे.
आमच कुठलं तेवढं भाग्य आणि पुण्य.
फार फार तर आफ्रिकन मास्टरशेफ़ चालु झालं तर घेऊ उडी.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{फार फार तर आफ्रिकन मास्टरशेफ़}
फार फार तर आफ्रिकन मास्टरशेफ़ चालु झालं तर घेऊ उडी. >>>> आता घ्या ! आणखी काय काय पाकृ टाकणार हा?
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{+१ असेच म्हणतो}
साल्या, तू त्या मास्टरशेफ़ला का जात नाय?
शाकाहार चांगला असतो तब्येतीला
मस्त पाककृती मस्त फोटू...
येथील महिला मंडळ हेवा वाटून जळून खाक झाले असेल एव्हाना
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{देवा या गणपाला बुद्धी दे रे}
देवा या गणपाला बुद्धी दे रे
Hope is a good thing...
{अप्रतिम पाककृती अश्या}
अप्रतिम पाककृती
अश्या प्रकारे वांग करून खायला दिल्यावर कोणी नको कसे म्हणेल.
{कधी करताय मग वैनी}
कधी करताय मग वैनी
Hope is a good thing...
{हे काय लगेचच करायला घेतले.}
हे काय लगेचच करायला घेतले. येताय ना टेस्ट करायला......

.
.
.
.
.
.
.
कधी करताय मग वैनी >>>>> पहिली लग्नाची पार्टी द्या, मग कधी करताय ते विचारा.
{एक प्रश्न}
इकडे रेठरे बु.|| मधे मोझरेला चीझ कुठे मिळेल? (मुळात चीजच कुठे मिळेल हा खरा प्रश्न आहे) आणि ते साठवायला फ्रीज नसल्याने (वीज नाही तर फ्रीज कसा वापरणार हो) थंड माठात किती दिवस चांगले राहिल हो? नाही म्हणजे आमच्या शेतात वांगी बक्कळ. त्यासाठी सतत वांग्याच्या नवीन पाकृ तरी कुठून आणायच्या हो. हे ब्येस झालं. आता दर तिसर्या दिवशी हेच करतो झालं सगळी वांगी संपेपर्यंत. तेल करडीचं चालंल का? तुमच्या आफ्रिकेत कस्सं काय जमवता बुआ तुम्ही, कमाल आहे ब्वा.
-रमताराम
अध्यक्ष
अखिल रेठरे बु.|| कृषी उत्पादक संघ (इंटरनॅशनल)
तिसरी गल्ली, काळूबाई देवळाच्या टेकाडावर,
बावजा धना बोहोरीहीकहरच्या घराच्या अलाल्ड्या अंगाला,
रेठरे बु.|| (पस्चिम), ता. हरणगाव पोस्ट किहिंकहवहडी.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{मस्त पाककृती}
मस्त पाककृती
{गणपा भाऊजी पाककृती एकदम जबरा!}
गणपा भाऊजी पाककृती एकदम जबरा!
पण मला त्रास होतो. राजे लगेच तुमच्या नविन रेसिपी साठी फर्माईश करतात हो
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{पुस्तक प्रकाशित करुन टाका}
राजे,
तुम्ही वैनींसाठी थोडी मेहनत घेऊन गणपाचे ई-पुस्तक प्रकाशित करा बरे
म्हणजे वैनींना सलग पाककृती बघता येतील.
म्हंजे कोनालाच प्रोब्लेम नाय
वैनींना पाककृती शोधायचा ... आनि तुम्हास्नि खायला
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{पण मला त्रास होतो. राजे लगेच}
पण मला त्रास होतो. राजे लगेच तुमच्या नविन रेसिपी साठी फर्माईश करतात हो
ओ वैनी चुकतंच तुमचं, उलट तुम्हीच त्याच्याकडे फर्माईश करा.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{ओ वैनी चुकतंच तुमचं, उलट}
ओ वैनी चुकतंच तुमचं, उलट तुम्हीच त्याच्याकडे फर्माईश करा >>>
दया करा हो असले सल्ले देऊ नका
चुकुन राजेंनी मनावर घेतले तर...........
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{चिंता नको}
चुकुन राजेंनी मनावर घेतले तर........
चिंता नको वैनी... राज छान स्वयंपाक करतो बर का?
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{तुम्ही वैनींसाठी थोडी मेहनत}
तुम्ही वैनींसाठी थोडी मेहनत घेऊन गणपाचे ई-पुस्तक प्रकाशित करा बरे >>>> ह्यावर मी स्वतः काम करतेय
लवकरच प्रकाशीत होईल
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{अरे वा छान}
म्हणजे समस्त महिला मंडळाची मस्त सोय झाली
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{चला इ-पुस्तकाला शीर्षक सुचवा}
चला इ-पुस्तकाला शीर्षक सुचवा
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{गणपाककृती}
१. 'गणपा'ककृती
२. 'गणपा'चे स्वयंपाकघर
३. 'गणपा'ची पाकशाला
४. 'गणपा'लाच विचारा ना?
मी एक पुस्तकवेडा
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{चला इ-पुस्तकाला शीर्षक}
चला इ-पुस्तकाला शीर्षक सुचवा>>>> गणोबाची खादगी
"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "
"ऐसी अक्षरे मेळविन !"
{गणपाखाद्यन्ति}
मला एक नाव सुचले "गणपाखाद्यन्ति" बघ पटतय का ??
{काहीतरी एरर आहे...फोटोच दिसत}
काहीतरी एरर आहे...फोटोच दिसत नाहीयेत..
पण पाककॄती मात्र जबरा......
----निवेदिता--------