ही जिवाला आस आहे

0
0

जेवणाच्या पंगतीला , मोदकाचा घास आहे
आणखी तो मठ्ठ्या संगे , मसालेदार भात आहे

भजी होत , कांद्याची ती, श्रीखंड वाटी सवे गं
केळीच्या पानात या , आणि जिल्बीची रास आहे

मीठ,चटणी ,लोणचे, कुरडया ,कोशिंबीरी
डाळ वांगे नी फोडणीची , ही तर्रीही खास आहे.

चवीचवीने जेव जरा , बेत आज खास आहे
पाहिले नसे कधी असा ;आतिथ्याचा स्वर्ग आहे

चंदनाचा मोगर्‍याचा , केवड्याचा वास आहे
पानासवे उदबत्तीचा, हा मराठी बाज आहे.

शेवटी घे विडा कपुरी , वेलदोडा मुखवास आहे
तृप्त व्हावा जीव तुझा; ही जिवाला आस आहे

आमची प्रेरणा

{मालक}

तुमची प्रेरणा ही गैरमुरद्दिफ गज़ल आहे. तुम्ही तर पहिल्या मत्ल्यातच काफियाचा खून पाडला सायबा. 'भात आहे' हा काफिया गंडला की हो. हीच गोष्ट 'स्वर्ग आहे' ची देखील.

अवांतरः एवढं जेवल्यानंतर अखेरचा शेर 'वास आहे' या काफियाने संपेल असे उगाचच वाटून गेले. Evil


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{नाय बॉ. भज्यांची टेस्ट ही}

नाय बॉ. भज्यांची टेस्ट ही त्यातील कांड्या मुळे आली की बेसनामुळे हा प्रश्न खवय्याला पडत नाही तद्वत....


--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते

{पण}

न आवडलेली भजी मीठ कमी पडल्याने आवडली नाहीत की तिखट की पीठच नीट भिजवले गेले नाही हे अस्सल खवय्या लगेच ओळखतो मालक.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)