हां तर मी गोष्ट सांगणारे एका केळीची ! आमच्या हापिसातली केळी. तिचं नाव Kelly, पण आम्ही तिला केळीच म्हणायचो. तिला कुमारी, युवती, कन्या, बाई या पैकी काहीही ठामपणे म्हणता येत नाही ! अविवाहित असली तरी कुमारी म्हणता येत नाही, यौवनात नसल्याने युवती म्हणता येत नाही, तिला स्वत:ला दोन कन्या असल्याने कन्या म्हणता येत नाही व बाई सारखी वागत नाही म्हणून बाईदेखील म्हणता येत नाही !! साधारण तिशी पस्तिशीतली असेल, नाव केळी असलं तरी अंगापिंडानं अगदी कोबीचा गड्डा ! त्यामुळे "केळीचे हे बाग" काही सुकलेले नव्हते ! बुटकीशी कशी बशी ५ फूट असेल, डिझाईनर चष्मे घालणारी केळी जाता येता पहावं तेव्हा कोकच्या दीड लिटर बाटलीत तोंड घातलेलं ! नसलेली मान तिने वर काढून कध्धी कोणाकडे पाहिलं नाही ! कामाचं तर काही बोलूच नये. जेमतेम काम करुन रग्गड पैसे मिळवणा-यातलीच ती एक. तिला थोडं काम दिलं की माझंच काम कसं महत्त्वाचं आहे असा दर्प येणारे इमेल पाठवायची. असो.
तर त्या दिवशी सकाळी, रोजच्या प्रमाणे नको नको करत मन मारून हापिसात जाण्यासाठी तयार झालो. हापिसात जाण्यासाठी ८ म्हणता म्हणता ८:३० झालेच. माझ्या जागोवर आलो. चलसंगणक उघडून इसकाळ, जीमेल व लोकांच्या ब्लॉगवरच्या कालच्या प्रतिक्रियां मध्ये काही खुमासदार भर पडलीये का पहाव म्हणून पाहत बसलो होतो. इतक्यात धाडकन काही तरी पडल्याचा आवाज आला ! वजन वाढल्याने कोणाची तरी खुर्ची तुटली असणार म्हणून फिदिफिदी हसावे म्हणून मी जागचा उठलो ! काही दिसेना. तेवढ्यात एक क्षीण आवाज आला. "हेल्प !" इकडे तिकडे बघितले काही दिसेना म्हणून खाली बसलो. तेवढ्यात बाजुच्या खुराड्यातून पुन्हा आवाज आला "हेल्प प्लिज". मी तिकडे गेलो तर तिथलं दृष्य एकदम भयंकरच होतं ! केळीची सोलपटं कोणी तरी अर्धवट काढून ठेवल्यगत ही खरी केळी आवासून छताकडे बघत पडली होती. तोंडाला फेस. सा-या अंगाला घाम. मी मदतीसाठी पटकन जवळ गेलो. मला म्हणाली मला श्वास घेता येत नाहिए, प्लिज मदत कर. बहुतेक मला हार्ट अॅटॅक आलाय. माझी पण टारकन फाटली ! काय करावं काही कळेना.
८:३० एक ची मिटिंग असल्याने बहुतेक जण तिकडे गेले होते. आजूबाजूला कोणीच नाही. लगेच ९११ ला फोन केला. रुग्ण्वाहिका येई पर्यंत काय करायचं ते विचारुन घेतलं. मी तिला विचारलं आधी कधी आला होता का अॅटॅक ? तिने मानेनेच नकार दर्शवला. मी तिला मोठे मोठे श्वास घेऊन खोकायला सांगितले. "इथे श्वास घेता येत नाहिए खोकायला काय सांगतोस " असं माझ्यावर खेकसली. खरं तर ती व्यवस्थित श्वास घेत होती व बोलायला ही लागली होती. पण म्हटलं कशाला तिच्या नादाला लागा. पुन्हा एकदा सांगून पाहिलं. ती ऐकत नाही पाहून मीच तिच्यावर डाफरलो. म्हटलं मरायचं असेल तर मर, जर मरायचं नसेल तर सांगतो ते कर. मोठे श्वास घेत खोकायला लाग. फोन वर बोलणं चालूच होतं सी.पी.आर. बद्दल माहिती आहे का असं ९११ वाल्यांनी विचारलं. मी नाही म्हणून सांगितलं. त्यांच्या सांगण्या प्रमाणे आमच्या फर्स्ट एड खोक्यातून अस्पिरीन घेऊन आलो व तिला बळजबरी घ्यायला लावली. तेवढ्यात आमचा सँटा क्लॉज आला. पांढ-या झुपकेदार मिशा व पांढरे शुभ्र केस असल्याने त्याला आम्ही खाजगीत सँटा क्लॉजच म्हणायचो. तो आला व सगळं काही पाहून आपली अनुभवाचं गाठोडं सोडत म्हणाला "हा नक्कीच हार्ट ऍटॅक आहे. मला आला होता तेव्हा असंच झालं होतं मला". झालं ! कमीत कमी तिच्या समोर तरी हे सांगायला नको होतं, पण साहेब बोल्ले. पण घाबरलेले जीव म्हणजे आम्ही दोघेच. मी आणि सँटा क्लॉज ! बाकी ती आमच्या एवढी घाबरलेली दिसत नव्हती.
सी.पी.आर. चे विधी करायला सुरु करे पर्यंत म्हणजे फोन केल्या पासून पाचव्या मिनिटाला खाली रुग्णवाहिका आली. नेमके त्यांना वर कसे यायचे समजेना. मी जिने उतरुन पळत खाली गेलो व त्यांना वर घेऊन येण्यासाठी एलेव्हेटर चे बटण दाबले. १ मिनिट झाला तरी एलेव्हेटर काही येईना. मी अस्वस्थ झालो. हे लोक तोपर्यंत दुस-या गप्पा मारायला लागले. मी म्हटलं राजांनो प्रसंग काय गप्पा काय मारताय? तरीही काही फरक पडला नाही. मी म्हटलं जिने चढून जाऊया का? तेवढ्यात त्यांच्या पैकी एकाने "अजून कुणाला तरी अॅटॅक यायचा" असा बाष्कळ विनोद केला. शेवटी एकदाचे वर पोचलो. दोनच लोक आत आले. त्या दोघांच्याने केळी उचलेना म्हणून शेवटी मी हातभार लावला व तिला स्ट्रेचर वर घेतले. तिला खाली नेताना त्या लोकांचे विनोद चालूच होते. ती सुद्धा स्ट्रेचर वर पडल्या पडल्या आपल्या पोराला फोन करुन बोलू लागली. मी तिला म्हटलं मुलाला कशाला सांगतेस तो बिचारा लहान असेल तो काय करणार व दवाखान्यात कसा येणार? तशाही अवस्थेत हसत म्हणाली लहान नाही घोडमा १९ वर्षांचा आहे ! तिशी पस्तिशीच्या बाईला १९ वर्षांचा मुलगा कसा असेल असा विचार मी करायला लागलो ! मनातल्या मनात (३५-१९) ही आकडेमोड करुन झाली. तरिही माझ्या चह-यावरचे प्रश्नचिन्ह जाईना.
तिला खाली नेऊन एकदाचं रुग्ण्वाहिकेत टाकलं. हद्द म्हणजे बयेने आय फोन वर गाणी लावली. गाणी ऐकल्यावर मला बरं वाटेल म्हणाली. मग तिथे प्रश्नोत्तरे व प्राथमिक उपचार सुरु झाले. मी तेवढ्यात वर येऊन मिटिंग मध्ये घुसून सर्वांना सांगितले की असं असं झालं. तिचा घोडमा येणार असल्याने मला दवाखान्यात जाण्याची आवश्यकता नव्हती. आमची एक मॅनेजर बाई दवाखान्यात जाणार होती. तिला काय झालं व पुढे काय होणार हे सगळं आम्हाला नंतरच कळणार होतं.
दिवसाची सुरुवात अशी झाल्याने कामात लक्ष लागत नव्हतं. एरव्ही असंही लागत नसतं. आज कारण होतं. कसा बसा दिवस ढकलला. घरी आलो. नेहमी प्रमाणे पुढचा दिवस उगवला व आठाला आम्ही हापिसात हजर झालो. आमच्या मॅनेजरला काही कारणास्तव दवाखान्यात जाता आले नाही. त्यामुळे केळीबद्दल काही कळाले नाही.
थोडी कॉफी घ्यावी म्हणून मी ब्रेकरुम मध्ये गेलो. पाहतो तर काय कॉफीच्या रांगेत हसत खिदळत केळी उभी ! मी गारच झालो ! चपापलो व तिला काही झाले नाही हे पाहून बरं पण वाटलं व थोडा राग पण आला. मी म्हटलं काय गं काय झालं काल ? मला पाहून तिचा चेहराच उतरला. अगदी माझ्यामुळे तिचं लय नुकसान झाल्या सारखं माझ्या कडे बघायला लागली. मी पुन्हा एकदा प्रश्न केला. त्यावर बया उत्तरली "अरे जाऊ दे रे आठवण नको करुन देवूस. $४०० फक्त अँबुलन्स चे लागले. इमर्जन्सि असल्याने विम्यातून मिळात नाहीत ते पैसे. शिवाय तात्काळ सेवेचे वेगळेच. काल हजार दीड हजार $ गेले माझे ! आपण ९११ ला फोन करायला घाई केली!" ह्या तिच्या शेवटल्या वक्यावर तर मी उडालोच. मी मनात म्हटलं हे बरं आहे. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तिला उद्देशून मी म्हणालो "पण, खराच हार्ट ऍटॅक असता तर?" तिथे उभी असलेली तिची शहाणी मैत्रिण बरळली "तर ते पैसे सुद्धा वाचले असते !!" ह्यावर दोघी खदाखदा हसायला लागल्या. तेवढ्यात माझ्या मनात "शेळी जाते जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वात्तड" या म्हणीचे नवे स्वरुप समोर आले.
"केळी जात नाही जिवानिशी, वाचवणा-याच्या डोक्यावर खापर !" पण तिला काय भाषांतर करुन सांगणार म्हणून मी गप्प बसलो. पण तिला झाले काय होते हा प्रश्न मनातून जाईना. म्हणून न रहावून मी तिला विचारलं, "पण तुला झालं तरी काय होतं?"
..
..
"काही नाही रे डॉक्टर म्हणे की मी रेडबुल चे दोन टीन काल सकाळी प्याले त्यामुळे असं झालं. ह्या डॉक्टरांना ना काहीच कळत नाही. वेडेच असतात. त्यांना खरं कारण नाही सापडलं की उगाच आपल्या सवयींकडे बोट दाखवतात. रेडबुल तर मी रोज पिते. एखाद्या दिवशी दोन प्याले तर त्यात काय एवढं !"
संवादकर्त्यांचे ज्ञान पाहून जास्त काही न बोलता मी आपल्या खुराड्यात परत जाऊन संगणक उघडून इसकाळ, जीमेल व लोकांच्या ब्लॉगवरच्या कालच्याच प्रतिक्रिया पुन्हा वाचायला लागलो.

" />
{(विषय दिलेला नाही)}
लेखा मध्ये छायचित्र कसे हो टाकायचे? कुणी सांगेल काय?
{हा हा हा हा! लै भारी. यावरुन}
हा हा हा हा! लै भारी. यावरुन मी एकदा आमच्या एका मैत्रीणीकरता ९११ ला फोन लावला होता त्याची आठवण झाली! नकोच ब्वॉ त्या आठवणी!
)
(केळीचा फोटो टाकायला जमला की दाखवा हो.
-Nile
{फोटो }
केळीचे छायाचित्र उपलब्ध नाही ! तिचे छायाचित्र काढायला गेलो तर मला शिंगाव घ्यायची !
{यावरुन मी एकदा आमच्या एका}
यावरुन मी एकदा आमच्या एका मैत्रीणीकरता ९११ ला फोन लावला होता त्याची आठवण झाली
येउदे की त्या आठवणी
त्यांना खरं कारण नाही सापडलं की उगाच आपल्या सवयींकडे बोट दाखवतात
{हिरव्या तुसडेपणाचा माज चांगला}
हिरव्या तुसडेपणाचा माज चांगला वर्णन केलेला आहे. मस्त कथन.
अवांतर: वरील निल्या अन Nile या दोघांच्या प्रतिसादावरून हे दोघेही वेगळे असण्याची खात्री पटत चालली आहे.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{हिरव्या तुसडेपणाचा माज}
चक्क बाउन्सर ! काही कळले नाही बघा. हिरवा म्हणजे नेमका कोणाला उद्देशून?
{जबरी रे निल्या ... }
जबरी रे निल्या ...


स्पार्किंग लेख .. मजा आली भौ .. बरा बदला घेतल्या की रं तु .. १०००$ ला चुणा तसाही लागलाच की तिला
-केळ्या
{उत्तम लेखन ! एकून तिकडे}
उत्तम लेखन !
एकून तिकडे अवस्था चागली नाही असे दिसून आलं !
वर म्हणाल्या प्रमाणे खरोखर हिरवा माज दिसून आला
*
बाकी...
लै भारी !
Hope is a good thing...
{झकास वर्णन रे निळ्या.....}
सी.पी.आर. चा चान्स घालवलास की लेका ;-)
{चान्स }
तो चानस घालवलेलाच बरा होता ! आणि वेळ पडलीच असती तर मी अनुभवी अशी सबब पुढे करुन सँटा ला पुढे केला असता व म्हाता-याच्या जीवनात पुन्हा (गाजरगवती का होईना )हिरवळ आली असती !
{गाजरगवती हिरवळ... }
गाजरगवती हिरवळ...

क्काय क्काय शब्द सुचतात राव
एक नंबर!!!
{धन्यवाद भौ}
धन्यवाद भौ
{तिला सी.पी.आर देउन याला काही}
तिला सी.पी.आर देउन याला काही झालं असतं तर????
{वा छान लिहीले आहे.}
वा छान लिहीले आहे.
-पुण्याचे पेशवे
{मस्त आणि चुरचुरीत }
मस्त आणि चुरचुरीत लेख!!!!
अजून येऊदेत!!!
{हा हा }
लै भारी. सुरवातील टार्याच्या अफ्रीकन ऑफीसमधल्या बै आठवल्या.
{आमचाही अनुभव}
पहिल्या परिच्छेदातच ह. ह. पु. वा. काय बहारदार वर्णन हो तिच्या फुल्या फुल्या फुल्या (रावसाहेबांकडून उधार)
आमच्यावही अगदी असाच प्रसंग ओढवला होता. आमच्या परदेशी ऑफिसमधील एक ग्रँड ओल्ड मॅन (देशीच) असाच धाडकन चक्कर येऊन पडला. मी त्याची केबिन शेअर करत असल्याने माझ्यासमोरच हे घडले. ते काहीसे ऊर्ध्व लागल्यासारखे पडून होते. मी त्यांना उठवून खुर्चीवर बसवले, कॉफी देऊ का म्हणून विचारले, पण साहेब 'वर' कुणाशी संवाद साधत होते ते काही बाहेर यायला तयार नव्हते. मग मात्र ताबडतोब ऑफिस इन-चार्ज ला बोलावले. बरे हा ओल्ड मॅन अविवाहित, एकटा राहणारा आणि तिथे त्यांचे कोणि नातेवाईकही नव्हते. म्हणून त्यांचे मित्रच असलेल्या आमच्या सर्वात मोठ्या साहेबांना बोलावले, त्यांनी ओल्ड मॅन ला काही विचारले. ऑल्ड मॅन थोडासा सावरलेला होता, त्याने खोल आवाजात का होईना उत्तर दिले. पण एकंदर स्थिती बघता साहेबाने ९११ ला फोन करायला सांगितले. वट्ट दोन मिनिटात अँम्ब्युलन्स हजर झाली. त्यातील पॅरामेडिकलच्या तज्ञाने ओल्ड मॅनला एकच प्रश्न विचारला 'डिड यू टेक योर मेडिसिन एम्टी स्टमक?' ओल्ड मॅन हो म्हणाला. (ओल्ड मॅन ला पोटाचा बराच त्रास असल्याने सतत मेडिकशन वर तर असेच पण खाण्यावर अनेक बंधने असल्याने जवळजवळ बेचव अन्न त्यांना खावे लागे. त्यामुळे ते जेवणाचा अनेकदा कंटाळा करत.)
दुसर्या दिवशी महाराज ऑफिसमध्ये. आल्या आल्या माझ्यावर डाफरले. म्हणाले मला काय धाड झाली होती. पाच मिनिटात एक कॉफी मारली असती की ठीक झालो असतो. आता मला उगाच दीड हजाराचा फटका पडला. मी साहेबाला सांगणार आहे की तू भर आता ते. मी स्वतः ९११ ला फोन करण्याचा निर्णय न घेतल्याबद्दल मनातल्या मनात स्वतःलाच धन्यवाद दिले.
अवांतरः हा ओल्ड मॅन तसा एरवी राजा माणूस आहे. वयातील अंतर दूर ठेवून आम्ही अनेक विषयावर मनसोक्त गप्प मारल्या आहेत.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)
{अगदी जवळपास जाणारा अनुभव आहे}
अगदी जवळपास जाणारा अनुभव आहे ! धन्यवाद.
{निल्या भौ}
मस्त लिखाण सकाळी सकाळी वाचुन बॅटरी एकदम चार्ज
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{वाक्य}
काय वाक्य आहे!
अविवाहित असली तरी कुमारी म्हणता येत नाही, यौवनात नसल्याने युवती म्हणता येत नाही, तिला स्वत:ला दोन कन्या असल्याने कन्या म्हणता येत नाही व बाई सारखी वागत नाही म्हणून बाईदेखील म्हणता येत नाही !!
खल्लास!!!
बाय द वे, याच शैलीत 'बाईसारखं वागणं' यावरही होऊन जाऊ द्या...
{बाईसारखं वागणं}
बाई श्रेष्ठ की बुवा यावर आधीच काही ठिकाणी रणकंदन माजले आहे ! अजून नवे मुद्दे काढून कशाला रागाचे उष्णझोत अंगावर घ्या !
{मस्त लिखाण ...}
मस्त लिखाण हो ..
यावरून मला आमच्या हापिसमधला एक आठवला .. अगदीच "गलेलठ्ठ बंडू" आहे तो ... लंच म्हणून सॅलेड खातो ..पण बाकी सदा सर्वकाळ वेफर्स आणि कोक ...
{आभार }
सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार !
Nile छायाचित्राच्या मदतीबद्दल आभारी आहे.
विवेक व श्रावण मोडक,पाषाणभेद, राजे, टारझन, पेशवे, मस्त कलंदर, सहज, जयपाल व संग्राम उत्साहवर्धक प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ! नवं काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करेन.
{वा!}
निल्या लै भारी लिखाण!
अवांतर : हा निल्या सर्वद्वेष्टा निळ्या नव्हे ना?
{अवांतर}
आभार !
मी सर्वांवर प्रेम करतो ! अगदी लहानपणापासून !
{लै भारी लिखाण!}
लै भारी लिखाण!
{हाहाहा. भारी लिहिलय.}
हाहाहा. भारी लिहिलय.
हा आमचा स्वभाव
{ए निल्या जबरा लेखन.. आवडले}
ए निल्या जबरा लेखन..
आवडले अजुन असेच येवु दे....
-निखिल
{माताय!!!! कं लिवलंय कं लिवलंय}
माताय!!!! कं लिवलंय कं लिवलंय !!!!
{लय भारी!}
लय भारी केळी...
स्वाती
{चुटचुटीत लिखाण...}
मस्त लिहलय...
अजून येवू दे
{सही}
धमाल लेख!
>>> त्यामुळे "केळीचे हे बाग" काही सुकलेले नव्हते !
--- हा हा हा, संदर्भ मस्तच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{संदर्भ}
संदर्भ आवडाल्याचे नमूद केल्याबद्दल आभार !
{खुळ्यासारखा हसत बसलो}
खुळ्यासारखा हसत बसलो राव!!!
किस्सा काय रंगवुन सांगितलाय...एकदम हायकल्लास
{हा हा हा हा !! अजुन येऊ द्यात}
हा हा हा हा !!
अजुन येऊ द्यात किस्से...
{व्वा! मस्तं खुमासदार लेखन. }
व्वा! मस्तं खुमासदार लेखन. ह ह पु वा झाली.
अजून असेच लिहा.
-अनामिक
{कायदा}
विनोदाचा भाग सोडला तर, कधीकधी मदत करणार्यावरही खटला गुदरला जाण्याचे प्रसंग घडलेले आहेत. हा दुवा त्या संदर्भात वाचनीय ठरावा - http://knowledgebase.findlaw.com/kb/2009/Oct/32614.html
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
{बरं झालं दिलात तो दुवा !}
बरं झालं दिलात तो दुवा ! अजिबात माहित नव्हतं हे !
{कं लिवलंय रं तू बाला! तुमच्या}
कं लिवलंय रं तू बाला! तुमच्या केळीचा फोटो दाखवाच आम्हा सगळ्यांना एकदा!!
{केळीचा फोटो}
{आमच्या देशात हे नऊआकरा नाही}
आमच्या देशात हे नऊआकरा नाही ते बरंच म्हणायचं.
{एकदम चुरचुरित वर्णन. मजा आली}
एकदम चुरचुरित वर्णन. मजा आली वाचायला.
{अवलिया,भोचक,निखिल, बिपिन,}
अवलिया,भोचक,निखिल, बिपिन, स्वाती,स्नेहाराणी, धमु,सुहास,अनामिक,नितिन थत्ते,सुप्रिया
प्रतिसादांबद्दल शतश: आभारी आहे !
परवा पर्यंत आणखी एक "गोष्ट" येते आहे तेव्हा (मेहेर)नजर ठेवा !
{ज्याचं करावं भलं तो म्हणतो}
ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं...
{हॅ हॅ हॅ}
हॅ हॅ हॅ
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते