तंदूरी खेकडे / क्रॅब्स्
काय, तोंडाला पाणी सुटलं की नाही नाव वाचुनच? 
माझंही असच होतं खेकड्याचं नाव काढलं की. काल मस्त मोठ्ठे खेकडे मिळाले. म्हटल नेहमीच्या कालवणापेक्षा आज काही वेगळं करुन पहावं. मागे एका जालीय मैत्रीणीच्या जालनीशीवर तंदूर खेकड्याचे फोटो पाहिले होते. म्हटलं चला हेच करुन पहावं.
मंडळी तस ही पाककृती करायला एकदम सोप्पी कमी वेळ काढू आहे. पण तरी तुमच्याकडे वेळ मुबलक हवा. अहो चवीने खायचं तर तेवढी फुरसत हवीच. 
चला तर लागुया तयारीला......
साहित्यः
मोठे खेकडे. जेवढी माणसं असतील त्या प्रमाणात.
४ मोठे चमचे ताजं घट्ट दही.
३ मोठे चमचे तंदूर मसाला.
२ मोठे चमचे काश्मीरी लाल तिखटं. (वस्त्रगाळ केलं असल्यास उत्तम रंग येतो.)
मीठ चवीनुसार. (खेकडे गोडुस असतात त्या प्रमाणे कमी जास्त प्रमाण ठरवावे.)
२ चमचे तेल. (ऑलिव्हचं त्यातल्या त्यात हृदयासाठी बरं.)
कृती:
खेकड्याचं कवच काढुन त्याचे कल्ले (गिल्स्) काढुन टाकावे.वहात्या पाण्याखाली स्वछ धुवून घ्यावे.
फांगडे / नांग्या तोडून वेगळ्या कराव्या. खेकडे मोठे असतील तर मधो मध कापून २ तुकडे करावे.
खलबत्त्याच्या दांड्याने फांगडे किंचींत ठेचावे म्हणजे मीठ मसाला आत शिरू शकेल.
दही, मीठ, तेल, मसाला, लाल तीखट एकत्र करुन घ्यावं.
खेकड्याच्या प्रेत्येक तुकड्याला त्यात घोळवून नंतर फ्रीज (फ्रीजर्मध्ये नाही) मध्ये ३० मिनीटे मुरत ठेवावं.
अर्ध्या तासानंतर बेकिंग ट्रेला अॅल्युमिनियमची फॉईल लावुन त्यावर सर्व तुकडे पसरवून ठेवावे.
ओव्हन १८०° C वर तापमान ठेवून खेकडे अॅल्युमिनियमच्या फॉईलने झाकून १०-१५ मिनीटे शिजवावे
१०-१५ मिनीटांनंतर वरुन ठेवलेली अॅल्युमिनियम फॉईल काढुन टाकावी. आणि अजुन १०-१५ मिनीटे शिजवावे. मध्येच एकदा तुकडे वर खाली करुन बाजू बदलावी.
वरुन कोथिंबीर पेरुन आणि लिंबाच्या फोडींनी सजवून गरमा-गरम सर्व्ह करावं.
.jpg)
{रावणाची दहा तोंडे}
आज प्रथमच 'रावणा' चा हेवा वाटला. कारण त्याच्याप्रमाणेच मलाही दहा तोंड असावीत खाण्यासाठी असे हा खमंग, रसरशीत, ताज्या टवटवीत खेकड्यांचा ढीग पाहिल्यावर वाटत आहे.
आज कसलेतरी ग्रहण आहे असे म्हणतात त्यामुळे घरात 'बायकांनी हे खाऊ नये ते खाऊ नये' अशी चर्चा चालू असेल, त्या स्त्रियांच्या समोर ग्रहणाच्या मुदतीतही अशी चमचमीत डिश आली तर त्यादेखील 'गेले जहन्नममे ग्रहण !" असे उद्गारतील आणि तुटून पडतील त्या या प्लेटवर.
व्वा, गणपाभौ, जियो !
अशोक पाटील
{आर्रर्र तिच्या.... आज ग्रहण}
आर्रर्र तिच्या.... आज ग्रहण आहे होय.
असो खेकड्याला माझ्या विशाल उदरात स्थान देउ त्याची सर्व दुष्टचक्रातुन मुकतता केल्याचे पुण्य ही मिळेलच की.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{मस्त रेसिपी पण मला खेकडे}
मस्त रेसिपी
पण मला खेकडे अवडत नाहित
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{खेकडे आणि राजे}
रीअली ?
पण गोव्यात आमच्याबरोबर असताना श्री.राजे खेकड्याशिवाय काहीच खात नव्हते. ते कसे काय चालते तुला, मुली ?
अशोक पाटील
{हॅ हॅ हॅ.... पदरी पडलं}
हॅ हॅ हॅ....
पदरी पडलं पवित्रं झालं अशी गत असावी, हो की नै हो वैनी?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
{tyat kay mazya vadilana pan}
tyat kay mazya vadilana pan khekade avadtat
Rajenaa avadat astil tar me banvun dein tyana khayala
Mala khekade avadat nahi hyacha artha rajeni pan te khau naye ase thodich ahe
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{राजेंची आवड}
"Rajenaa avadat astil tar me banvun dein tyana khayala"
~ नको नको मुली, तसे काही करू नको. उगाच त्या बिच्चार्या खेकड्यांचे हाल नकोत ! त्या खेकड्यांना गणपाच्याच अंगणात बागडू देत.
आम्ही चालू ठेवतो इकडे राजेना खेकड्याने आंघोळ घालायचे काम.
अशोक पाटील
{नको नको मुली, तसे काही करू}
नको नको मुली, तसे काही करू नको. उगाच त्या बिच्चार्या खेकड्यांचे हाल नकोत ! त्या खेकड्यांना गणपाच्याच अंगणात बागडू देत. >>>> तसंही माझ्या सासुबाई शुद्ध शाकाहारी आहेत त्यामुळे असे प्रकार फार क्वचित होतात आणि होणार
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{ऊगी ऊगी.... गणपाच्या}
ऊगी ऊगी....
गणपाच्या धाग्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दकोश अपुरा पडेल असं वाटतंय... जिओ मेरे यार
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
{वॉव दादांना खेकडे खुप आवडतात}
वॉव दादांना खेकडे खुप आवडतात त्यांना हि रेसिपी दाखवायला हवी
बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!
{मी धागा पाहिला नाही, मी}
मी धागा पाहिला नाही, मी प्रतिसाद देणार नाही
Hope is a good thing...