आमंत्रण

0
0

प्रिय मी मराठी सदस्य आणि वाचक
येत्या पाच मार्च रोजी http://thinkmaharashtra.in/ या संस्थळाचे उदघाटन आहे.
मी आणि तात्या याप्रसंगी होणार्‍या चर्चेत सहभागी होणार आहोत.
मला मिळालेले हे आमंत्रण मी तुमच्या समोर ठेवत आहे.
सध्या हे संस्थळ प्रायोगीक तत्वावर सुरु झाले आहे.
समस्त सदस्य आणि वाचक आणि मराठी अनुदिनीकारांना एक नम्र विनंती.
आपल्या आणि आपल्याला माहीती असलेल्या मराठी ब्लॉगर्सची माहीती कृपया द्यावी.(म्हणजे मला गृहपाठ करून जाता येईल.)
आमंत्रणाची प्रत देत आहे.
धन्यवाद.
************************************************************************

मा. रामदास ,स.न.
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम
५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी ६.०० वाजता
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्यगृहाचे शेजारी, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केला आहे.
ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र.
विषय आहे - ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी

चर्चेत सहभागी होताहेत - संजीव लाटकर, तात्या अभ्यंकर, रामदास आणि अतुल तुळशीबागवाले
चर्चासत्राचे संचालन करतील - माधव शिरवळकर
ह्या चर्चासत्रात सहभागी होण्यास संमती दिल्याबद्दल थिंक महाराष्ट्र च्या वतीने आपले आभारी आहोत.
धन्यवाद.
आपले,
माधव शिरवळकर आदिनाथ हरवंदे
(९९८७६४२७९१) (९७५७१०४५६०)

व्वा !!! साईट भारीये

व्वा !!! साईट भारीये wink
टेष्टींग करतो थांबा wink

- सुरदास

असेच

टारुसारखेच म्हणते, साइट भारी आहे..
स्वाती

निमंत्रण

मदत करायला नक्कीच आवडलं असतं,

मदत करायला नक्कीच आवडलं असतं, पण मी ब्लॉग्जकडे कधी फिरकतच नाही. म्हणजे..तशी कधी वेळच येत नाही...ना वेळ मिळतो. नाहीतर नक्की माहिती दिली असती.

मी पण रे, ब्लॉग म्हणजे

मी पण रे,

ब्लॉग म्हणजे माझासाठी मनातील विचार जसे येतील तसे व्यक्त करण्याचे ठीकाण ना तेथे कोणी प्रशासक ना कोणी मालक ना कोणी व्यवस्थापक ! ह्या कामामध्ये जो योग्य व्यक्ती आहे तो तुमच्या बरोबर आहे व आम्ही येऊ शकतो श्रोते म्हणून पण तुम्ही युटुब वर याहुवर अथवा महाजालावर जे मोठे व्यक्ती आहेत ( उदा. सर्किट / मिभो, ईत्यादी ) ह्यांच्या मदतीने दृष्य / श्रवण सुविधा दिली तर खुप काही गाळीव ईतिहास सामान्य मराठी लोकांना समजेल व कार्यक्रम यशस्वी होईल !

*

बाकी संकेत स्थळ उत्तमच !
एक राहवत नाही म्हणून सुचना फ्लॅश चा वापर टाळावा आजच्या घडीला युवकांना सर्व काही जलद हवे व फ्लॅश मुळे साईट उघडण्यासाठी वेळ लागत आहे, पण शक्यतो आम्हा गरिबांच्या ई-नेट च्या स्पिड मुळे असे होत असावे.

असो,

शुभेच्छा.



"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

ब्लॉग म्हणजे ...

अगदी मनातलं बोललात राजे ... ब्लॉग म्हणजे मनातील विचार व्यक्त करण्याचे ठिकाण ...
मी ब्लॉग असे कधी वाचत नाही/फॉलो करत नाही .... याचे एक महत्वाचे कारण म्हणजे जे कोणी ब्लॉग लिहतात त्यापैकी बरेचसे साहित्य ते विविध संकेतस्थळांवर प्रसिद्ध करतात ... म्हणून मदत करू शकत नाही क्षमस्व...
>> म्हणून सुचना फ्लॅश चा वापर टाळावा आजच्या घडीला युवकांना सर्व काही जलद हवे व फ्लॅश मुळे साईट उघडण्यासाठी वेळ लागत आहे, पण शक्यतो आम्हा गरिबांच्या ई-नेट च्या स्पिड मुळे असे होत असावे.
१०० % अनुमोदन ...

छान

छान. बाकी संजीव लाटकर पुण्यातले का ? मिल्कोट्रॉनिक्स वाले ?

मी जास्त ब्लॉग्ज वाचत नाही पण

तूर्तास मला आवडणारे दोन उत्तम ब्लॉग्ज तुम्हाला सांगतो

१) जगभरच्या विविध विषयांवर मराठी मधे छान माहीती असलेला उपक्रमवरचे सदस्य श्री चंद्रशेखर यांचा - http://chandrashekhara.wordpress.com/

२) युवा लेखक जृंभ्रणश्वान (?? चुकले बहुतेक) यांचा निखळ विनोदी मार्मीक
http://bashkalbadbad.blogspot.com/

अतिशय उत्तम ब्लॉग्ज आहेत.

बाकी नंदन सांगेलच.