मागे एकदा संस्थळावरचे दोन जिवलग मित्र मला भेटायला आले होते.
त्यातल्या एका जुन्याला मी एक प्रश्न विचारला.
"तु एवढ्या पोटतिडीकेने लिहीतोस. ह्या क्षेत्रात तुला पुढे काय करायचे आहे का नुस्तीच "संस्थळी 'वातुळ बड्बड्'"
त्याने त्याचे विजन सांगितले.
"काय बाटते सर, करु शकेन"?
डोळे सांगतायत 'हो'. फक्त आजपासुन सुमारे १५ वर्षानी जे तुला व्हायचे आहे ते रोज उघड्या डोळ्याने विझ्युअलाईज कर.
नक्की होशील. And I sincerely hope that I will be around to see you make the difference.
..............................................................................................................................
"तुम्ही अगदी सोप्प्या शब्दात सांगितलेत. किती मुलांपर्यंत पोचले असेल हो सर" मॅडम
शंबरात दोन
"पालक सभा घेतली तर'?
शंबरात चार.
"अगदीच कमी की हो सर"
छे. भरपुर आहे ही संख्या.
"वाढवायला उपाय काय"?
'मोरी गेली मोर्याकडे' किंवा 'मोर्या गेला मोरीकडे' ह्या विषयावर मुले आणि पालकां बरोबर एक मिटींग ठेवा परिक्षा झाल्यावर. कळले ना?
"हो हो. तुम्ही औषध न लगे मजला बद्दल बोलताय"
मागे एकदा संस्थळावरील लेखामधे वरील वाक्याचा उल्लेख झाला होता. त्यावर एका सदस्याने ल चा ळ करुन प्रतिसाद दिला होता.
मॅडम चा संताप झाला होता.
त्यानी-तुम्हाला मुलगी असती तर तुम्ही असे बोलला असतात का असा प्रश्न विचारला होता. टीपिकल मेल चुवानिस्ट पिग, मुर्ख म्हातारा वगैरे वगैरे शिव्या घातल्या होत्या.
त्यांच्या व्य. नी ला मी शांतपणे उत्तर दिले होते.
ज्या दिवशी तुम्हाला जवळपास 'दमयंती' दिसेल त्या दिवशी तुमचे मत बदलेल. ज्या दिवशी दिसेल तेंव्हा मला हाक मारा.
मी पिग आहे की नाही ते बघु. त्या दिवशी तुमच्या हो ला हो मिळवणार्या तुमच्या संस्थळी मैत्रीणी काय करतात आणि काय म्हणतात ते बघु.
एखादा सन्माननिय अपवाद सोडला तर कोणीही पुढे येणार नाही ह्याची खात्री बाळगा.
मॅडम १ मधली 'आई' ही मॅडमच्या ओळखी पैकी.
जवळचे संबंध
घरात येणे जाणे.
मॅडम सासरी आल्यावर संपर्क तुटला.
मुलाने जबाबदारी नाकारल्यावर मुलीने चिडुन त्याच्या वर हल्ला केला.
अगदी घरात घुसुन त्याच्या आई वडीलासमक्ष गुड्घ्याने 'लक्ष्यवेध' करुन त्या मुलाला जायबंदी केला.
केस झाली.
घरातील लोकांनी अव्हेरल्यामुळे मुलीचे "सुधार गृहात"(?) रवानघी झाली.
आणि मुलगी कायमची 'सुधारली'.
अशीच एकदा मॅडमना मॉल मधे भेटली.
आणि मॅडमना संपुर्ण कहाणी कळली.
.............................................................................................................................
दुसर्या दिवशी मॅडम चा फोन आला.
पालक सभेला आमंत्रण होते रविवारी.
सर्व पालकांनी यावे म्हणुन रविवार निवडला होता.
भारताततल्या एका मोठ्या वृत्तपत्रात करियर गायडन्स वर लिहीण्यार्या कॉलमिस्ट्ना बोलवले होते.
मला पाच वाजताची वेळ होती.
मी बरोबर पाच वाजता पोचलो.
मॅडम गेटवर वाट बघत होत्या.
"सर, जरा घोळ झालाय. जवळ जवळ १०० पालक आहेत. त्या पैकी ७० महीला आहेत. त्या पैकी सुमारे १५ जणी त्या वक्त्यांना बोलुच देत नाहीत. विषय करियर गायडन्स चा. पण चर्चा पुरष प्रधान संस्कृती,स्त्री मुक्ती, अत्याचार ह्या कडे भरकटली आहे".
चालायचेच. बघु काय करायचे ते.
क्रमश:
..............................................................................................................................
जाता जाता:
एक प्रश्न आज अनुत्तरीत आहे.
मॅडम देतील उत्तर कधी तरी.
ही मुलगी ओळखीची नसती तर एवढा पुढाकार त्यानी घेतला असता का?
फक्त एका स्त्री ची स्त्री ला मदत म्हणुन.
का ' कॉल गर्ल' म्हणुन "नको ते आपल्याला लफडे" असे म्हणुन दुर्लक्ष केले असते.?
वाचतोय..
वाचतोय..
वाचतोय !!
वाचतोय !!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मॅडम उत्तर देतील ते देतील
पण काहीही कारण असुन जे काही त्यांनी केले पॉसीटिव्ह ते कौतुकास्पद!
त्यांना स्त्रीमुक्ती- पुरुषमुक्तीच्या निमित्ताने कोंडीत पकडण्यात काय सेन्स?
तसेही प्रत्येक "शिक्षीत" व्यक्ती जेंडर बेस्ड पेक्षा इश्यु बेस्ड युक्तिवाद करत असते. कधी एकमत होते कधी वेगळे मत असते.
वेगळा स्त्री-पुरुष वाद करायची गरज नाही.
वाचतोय
वाचतोय
-ऋ
वाचतो आहे.
मास्तर, वाचतो आहे.
तुर्तास तरी त्यांनी जे काही केले त्याचे कौतुक वाटते असे म्हण्तो, बाकी लिंगभेद हा सनातन हा, ते पाहुनच बर्याच वेळा 'उपकार करावा की नाही' हे ठरत असते.
अहो शिंपल बसमध्येसुद्धा बर्याच वेळा एखादी जागा देताना वयस्क माणुस आणि एखादी मुलगी ह्यात तुलना केली असता फेव्हरिझम कुठे असते ते माहित आहेच.
असो, ते आम्ही वैयक्तिकरित्या डोळ्याने पाहिलेल्या उदाहरणामुळे लिहलेले आहे, जेंडर बायस्ड वगैरे आरोप साफ नाकारतो आहे.
बाकी मास्तर लेखातले काही 'संदर्भ' लागत आहेत.
ह्म्म्म.. पुढे काय गुर्जी ???
ह्म्म्म..
पुढे काय गुर्जी ???
छान लिहले आहे. तुमचे लेख मी
छान लिहले आहे.
तुमचे लेख मी नियमित वाचत असते.
ह्ह्म्म्म..... प्रश्न अवघडच
ह्ह्म्म्म.....
प्रश्न अवघडच आहे खरा!
कदाचित मदत केलीही असती...कदाचित चौकटींना घाबरुन केलीही नसती.
एक मात्र आहे, मदत केली असती तर त्यामध्ये कुठेतरी कणव्/सहानुभुती ही भावना जास्त असती, तर ह्या घटनेत माझ्यामते आपलेपणा जास्त असावा.
शेवटी, रक्ताच्या असो, की मानलेल्या, नातेसंबंधांवरच तर जग जास्त तग धरुन असते ना.
अनुत्तरीत
अनुत्तरीत प्रश्न हा हायपोथेटीकल असल्यानी त्याच उत्तर अज्ञातातच राहू द्या. तर्क क्रिडा असेल तर प्रत्येक उत्तरे ही आपापल्या परीने योग्यच असतील.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
खरंय
तेही खरंच म्हणा!
वाचतोय
पुढचा भाग कधी?