"कार्यक्रम संपल्यावर एक मॅडम तुम्हाला गेटवर भेटतील" मुख्याध्यापिका म्हणाल्या.
ठीक आहे. गेटवर भेटायचे काही खास कारण
"Please I donot want to be part of it"
मी गप्प राहीलो.
........................................................................................
गेटवर त्या मॅडम उभ्या होत्या.
का कुणास ठाउक पण त्यांच्या डोळ्यात ओळख दिसत होती.
"नमस्कार, मी................."
"तुमची परवानगी न घेता एका शाळेत कार्यक्रम ठेवला आहे.कृपया नाही म्हणु नका. इथुन जवळच आहे"
ठीक.
".नववी चा वर्ग आहे. त्यातली ठीणगी शोधुन दाखवा"
मी चपापलो.
म्हणजे तुम्ही...
"मी...........(संस्थळावरची आयडी)
अचानक माझ्याबद्दल मतपरिवर्तन कसे काय बॉ? तुम्ही तर व्य.नी, खरडी आणि प्रतिसादातुन तर माझी पार तंतरवली होती.
"अनुभव आला. अनुभवाबरोबर शहाणपण आलो. मी आयवरी टॉवर मधुन बाहेर आले आहे संपुर्णपणे"
पण नववीत असे कार्यक्रम मी करत नाही.
"आहे तसे खास कारण"
................................................................................................
पहील्या दहा मिनिटातच ठीणगी मिळाली.
मॅडम नी परिक्षा पास झाल्याचे सर्टीफिकेट नजरने दिले.
कार्यक्रम संपल्यावर मॅडम नी आभार मानले.
"सर, तीच्या आईला तुम्हाला भेटायचे आहे. मी पण असेन. सर्वोतपरी सहभाग घेणार आहे मी ह्या केस मधे"
वा. रुटीन पक्के कळाले आहे की.
.................................................................................................................
आईचे वय साधारण ३५ असावे.
शाळेच्या मुख्याध्यपकाच्या केबिन मधे ती आली.
नमस्कार झाला.
" तुम्हाला माझ्या बद्दल मॅडंम नी कल्पना दीली असेलच" आई
" नाही. ते तुच सर्व काही बोल्" मॅडम
"I am a professional" आई
ओके. मला मुलीबद्दल बोलायचे आहे. तुमच्या खाजगी जिवनाशी मला काहीही देणे घेणे नाही. आणि तुम्ही काय आहात त्याने मला जे बोलायचे आहे त्यात काहीही फरक पडणार नाही.
चेहर्यावर आनंद मिश्रित आश्चर्य.
" माझी मुलगी डॉक्टर होउ शकते का? हे नक्की ओळखण्याची सोय आहे का?"
पण हे आताच ठरवायची काय घाई. मुली मधे टॅलन्ट नक्की आहे. पण ते कॉलेज मधे टीकले तरच.
"अहो तीचाच आग्रह आहे. तीला तुम्ही म्हणता ते धोके संपुर्ण माहीत आहेत. लागणारे मार्क हा तीला प्रॉब्लेम नाही. पण लागणारा पैसा हा माझा प्रॉब्लेम आहे. गवर्मेंट कॉलेजात अॅडमिशन मिळाली तरी मला जरा जडच जाणार आहे. वाढत्या वयात मला जमेलच असे नाही."
"अग, ११वी चे मी बघते" मॅडम
बारावी चे मी बघतो. पण त्या आधी तीची एक परिक्षा घेईन. आणि त्यात पास झाली तर त्यानंतरचे मेडीकल चे एक वर्ष मी बघुन घेतो.
" तो पर्यंत मी साधारण २ लाख जमा करेन. एकदा डॉक्टर झाली की तीला कोणीही थांबवु शकत नाही एवढा तिच्याबद्दल आत्मविश्वास आहे. पण असे खात्री लायक सांगु शकणारी परिक्षा असते"?
९९%
मी माझ्या कडचा पेपर काढला. मुलीला वर्गाबाहेर बोलवुन तो दीला.
अर्ध्या तासात मुलीने ४० प्रश्न सोडवले.
माझा अंदाज बरोबर निघाला.
३६/४० मार्क मिळ्वले मुलीने.
............................................................................................
मॅडम नी आईच्या हातात ३० हजाराचा चेक ठेवला.
तीची बारावी ची व्यवस्था मी कशी करणार ह्याची मी कल्पना मॅडम ना दीली.
सहज शक्य होते ते मला.
हजारात एक होती ती.
............................................................................................................
चहा घेता घेता .. आईची कर्म कहाणी.
वयाच्या सतराव्या वर्षी घरातुन हाकलुन दिलेली.
कारण..
घराण्याची इज्जत धुळीला मिळवली वगैरे वगैरे.
मित्राने जबाबदारी नाकारली.
अबॉर्शन नंतर पुरुष जातीवर सुड उगवण्याकरता पेशा पत्करला.(ह्या मानसिकतेचा फोलपणा माहीत असुन सुद्धा)
त्यात ही मुलगी जन्माला आली.
बाप नक्की कोण हे माहीत नाही.
मुली पासुन काही ही लपवले नाही.
फक्त मुलीला होस्टेल मधे ठेवलेले त्रास होउ नये म्हणुन.
सर्व माहीत असुनही मुलीला आईबद्दल खुप प्रेम.
तीचा सहवास हवा तेवढा मिळत नाही ही एकच तक्रार.
...........................................................................................................
मॅडम नी ठरवले आहे. येत्या काही महीन्यात हालचाल करुन राहीलेल्या २ लाखाची व्यवस्था करणार आहेत त्या. आणि तसे झाले तर ती पेशा सोडेल असे त्याना वाटते.
माझे क्षेत्र नसल्यामुळे मी ह्यात काहीही मतप्रदर्शन केले नाही.
तीने पेशा सोडला तरी ठीक नाही तरी ठीक.
मुलगी मात्र नक्की मार्गी लागणार होती.
मॅडम नी पुढाकार घेतला होता ना.
त्यांचे मतपरिवर्तन नेमके कशामुळे झाले हे मला अजुनही माहीत नाही.
सांगतील केंव्हातरी.
मी म्हणालो होतो ना सर ! जरा
मी म्हणालो होतो ना सर !
जरा पध्दत बदला बघा कसा लेख सर्वांग सुंदर होतो ते
रियली ग्रेट !
सलाम प्रभु सर !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
सलाम
राहु द्यात राजे.
नंतरच्या भागात तुमचे हे मत परत बदलण्याची शक्यता आहे.
नंतरच्या भागात तुमचे हे मत
णेमकं आत्ताच "बेहती हवा सा था वो ... उडती पतंग सां था वो... " हा अप्रतिम म्युजिक ट्रॅक ऐकत होतो .. घाबरू नका .. राजे म्हणजे काही फ्युण्सुक व्यँग्डू नाही ..
बाकी मास्तर जोरात
आता आंटी लोकांचे चरित्र आपल्या बचावासाठी असे चव्हाट्यावर आणन्याचे कारण का ? असल्या प्रश्नांना सामोरे जायला सज्ज रहा (असालंच ) हॅहॅहॅ ..
- (प्रेक्षक) टारझन
बचाव?
कसला?
असो.
जगात काय काय घडते / घडू
जगात काय काय घडते / घडू शकते... !!!
मास्तर मागे एक घटना सांगितली होती ती हीच बहुतेक...
खराय.
मला भेट्णार्या हायपर पालकांपेक्षा ग्राउंड रिअॅलिटी ला महत्व देणारी ही आई कितीतरी मोठी.
+१
सहमत! अगदी सहमत!!
प्रभुबाबा, लेख उत्तमच! त्याहुन अधिक म्हणजे जो संदेश पोचवायचाय तो अगदी ठळक पोहोचला.
_/\_
प्रभुबाबा, लेख उत्तमच!
प्रभुबाबा, लेख उत्तमच! त्याहुन अधिक म्हणजे जो संदेश पोचवायचाय तो अगदी ठळक पोहोचला.
अगदी मनातले बोललास बघ धमु
-निखिल
संपुर्ण सहमती.
संपुर्ण सहमती.
ग्रेट
...
समजला
समजला ब्वॉ मास्तरांचा लेख एकदाचा.
खर आहे मास्तर
शिवीत दिलेल्या श्रीनिवास हेमाडेंच्या लेखातील स्त्रीने स्त्रीला दिलेल्या शिव्यातील पेशा आठवला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
वेल प्लेड!
व्हेरी गुड इन्निंग्ज!
ऑल द बेस्ट!
>नंतरच्या भागात तुमचे हे मत परत बदलण्याची शक्यता आहे.
शक्य आहे. शॉट सिलेक्शन चुकले व आउट झाला तर शिव्या पडतातच.
तुमच्या खाजगी जिवनाशी मला
+१००००००००००००
मुलीला, तिच्या आईला आणि तिच्या मानलेल्या पालकांनाही ऑल द बेस्ट!
लेख समजला आणी सगळ्यांचं कार्य
लेख समजला आणी सगळ्यांचं कार्य ही आवडलं..ऑल द बेस्ट!
उत्तम.
उत्तम.
मस्त
मास्तर ये हुईना बात !!!
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
मस्त
लेख समजला....
उत्तम.