ती............

0
0

खरं तर हा लेख किंवा अनुभव"आस्वाद"ह्या विभागात कसा टाकावा ह्या विवंचनेत मी आहे.
सामाजिक जीवनात वावरताना,कामे करताना मला बरेच बरे-वाईट अनुभव येतात.काही दाहक वास्तवे कळतात,पण कधी-कधी मात्र प्रकरण आपल्याच अंगाशी येत.सरळ सांगतो ,फाटतं. हा अनुभव असाच.

तो रविवार जसा एक रविवार असावा असाच उगवला होता. लोहगाव च्या आठवडी बाजाराच्या निमित्ताने गावातल्या मनसेसैनिकांच्या गाठीभेटी, आठवड्याभराचा आढावा, वीज बिलांचा गोंधळ, स्वाईन फ्लूची दक्षता इतर तत्सम कामे आवरेपर्यंत सहा वाजले. आता नागपूर चाळीत निघायचे होते. संध्याकाळी आपली सर्व जुनी गँग नागपूर चाळीत असते.नगरसेवकाच्या डोक्यावर बसून आणि थोडाफार फंड खर्च करून तिथे एक जिम उभा केला होता. त्या जिमच्या गच्चीवर गँग अजूनही जमते, अट फक्त एकच - ज्याने-त्याने आपापली दारू आणायची आणि प्यायची. जेवणात शेअरिंग चालेल. एकूण काय? कल्ला असतो. मी गेलो नाही तर शिव्या खाव्या लागतात. "हां, बाळ्या आता स्टॅन्डर्ड झालाय, फ्लॅट घेतलाय, आता इथे कशाला येणार?" असे टोमणे ऐकावे लागतात.

गाडीला किक मारली. लोहगाव च्या बसस्टॉपवर सिगरेट घेतली. मोबाईल वाजला. उचलला. प्रकाश जैन, गावातल्या दलित वस्ती ओव्हाळ वस्तीतल्या बियर शॉपीचे मालक.
"हां पका, बोल"
"अरे, बाई पडलीय."
"आं, काय झालंय?"
"अरे एक बाई पडलीय इथं, दोन तास झाले, पाणी मारलं, उठायला तयार नाही."
(येरवड्यातल्या लमाण्यांचा बायकांचा हा तमाशा बर्‍याच वेळा आधी बघून झालाय. पिऊन पडलेल्या असतात बाजाराच्या दिवशी,दोन एक तास...एकदा उतरली की उठतात.)
"कुठं?"
"आपल्या दुकानासमोर, भर रस्त्यात."
"आलोच."
तिथे गेलो. जे दिसले ते हे -

"ही तर पिलेली आहे," बाजूला पडलेली नाईन्टीची बॉटल बघून मी म्हणालो.
"नाय ती माझी हाय, मीच मघाशी बियर मध्ये टाकली होती."
"तू कधी पाहिलं?"
"ही इथं आली तेव्हापासून, ही आली, मला पाणी मागितलं, मी आतून पाणी बाहेर आणेपर्यंत ही खाली पडली. पाणी शिंपडतोय्, हाका मारतोय. काय उठायला तयार नाय, शेवटी आख्खी बादली वतली."
मी खाली वाकून श्वास चालू असल्याची खात्री करून घेतली. तिच्या कपड्यां वरून तरी ती लमाणाची वाटत नव्हती. दारूचा ही वास येत नव्हता.
"हं, आलो चौकीतून कोणाला तरी घेऊन, काय आजारी-बिजारी नाय ना?" मी.
"काय सांगता येत नाय राव."
दिवस स्वाईन फ्लूचे. काय करावे? चौकीत गेलो. चौकीत पोलीस नाही. परत दुकानापाशी आलो. फौजदाराला फोन लावला. घटनेची माहिती दिली. केस वगैरे नंतर पाहू, असे त्यांना सांगून टाकले. एक अ‍ॅम्ब्युलन्स अरेंज केली. पण ड्रायव्हर आणि आतला वार्डबॉय तिला हात लावायला तयार नव्हते. शेवटी मी आणि पकाने कसेबसे तिला स्ट्रेचरवर चढविले. स्ट्रेचरवर तिला चढवताना तिचा चेहरा पाहून ती घरंदाज, चांगल्या घरची असल्याचा अंदाज येत होता. अ‍ॅम्ब्युलन्स थेट शास्त्री नगरच्या "गलांडे पाटील" इस्पितळात. केस पेपर वगैरे बनवून झाले. तिचे नाव-गाव माहीत नसल्याने केस-पेपरावर माझ नाव-नंबर लिहीला. रीतसर दाखल केल्यानंतर, डॉक्टरांनी चेक-अप वगैरे केले.
"ती प्रेग्नंट आहे, बहुधा तीन-चार दिवसांपासून उपाशी असावी, म्हणून कदाचित बेशुद्ध झाली असावी, बाकी सलाईन वगैरे चढवलंय, बघूया."
ती थोडीफार उपाशी असण्याची शंका मला वाटत होती, पण प्रेग्नंट?
आपली येरवड्यातली पोरं आणि काही महिला कार्यकर्त्या, स्वाईन फ्लूच्या कारणानं, तिथे इस्पितळात थांबलेले होते त्यामुळे मी थोडा निश्चिंत होतो. पोरांबरोबर तिथे थोडा वेळ बसलो. झालेला प्रकार त्यांना सांगितला. लक्ष ठेवायला सांगितलं. नागपूर चाळीत गेलो. नवाच्या सुमारास तिथून सटकलो. जाताना दिघे मावशीकडून जेवणाचा डबा घेतला. तो इस्पितळात नेऊन दिला. पण ती तेव्हाही बेशुद्ध होती. रात्री तिथं थांबायची गरज नव्हती.
दुसर्‍या दिवशी सकाळी इस्पितळात गेलो,तोवर तिला शुद्ध आली होती,पण ती बोलण्याच्या स्थितीत नव्हती .मी पोरांना सांगून कामावर निघून गेलो. रात्री पोरांशी फोना-फोनी केली. ती ठीक होती.
दिवस तिसरा.......
सकाळी पोह्याचा डबा घेउन मी इस्पितळात गेलो.तिला पाहिल्यावर, ती एक बाई असण्याचा गैरसमज,दुर झाला.बाई कसली मुलगी होती ती.साधारण १८-१९ वर्षाची.
"कोण आहात आपण ? "बोलणे तर सभ्य वाटत होते.
" मी सुहास,लोहगाव-मनसेचा उपाध्यक्ष"
तिने माझ्यापुढे हात जोडले.
" खुप उपकार झाले आपले,आपण नसता तर माझाच नव्हे तर माझ्या होणार्‍या बाळाचा जीव ही धोक्यात आला असता" मी तिची सुसंस्कृत भाषा पाहून दंग झालो.

क्रमश..........

आठवतंय...

1

पण हा पुढचा भाग बोलला नव्हतास कधी. लवकर येऊ दे पुढं काय झालं ते. काय झालं होतं तिला?


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

सुहास क्रमशः??? अरे बाबा असे

2

सुहास क्रमशः???
अरे बाबा असे खिळवुन ठेवणारे लिहितोस लवकर टाक रे पुढचा भाग!!!


-निखिल

!!!!!!!!!

3

!!!!!!!!!

बाबब्ब्बो ! तु सांगितले

4

बाबब्ब्बो !

तु सांगितले होतेस हे सर्व .... पण आज परत वाचताना अंगावर काटा आला रे...

जरा लवकर लिही...


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

पुढचा भाग लगेच टाकतोय अशी

5

पुढचा भाग लगेच टाकतोय अशी अपेक्षा करतोय !! पटकन येऊ देत !

अरे

6

त्यादिवशी इतका डिटेल्ड बोलला नाहीस रे!

लवकर लिही बे पुढचा भाग...

7

लवकर लिही बे पुढचा भाग...

ह्म्म्म...ऐकताना जितकं वाईट

8
ह्म्म्म...ऐकताना जितकं वाईट नव्हतं वाटलं त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त एक फोटो पाहुनच वाटलं. :( बाकी, इतर बाबींवर काही बोलत नाही! विचारवंतांना वाईट वाटेल.

बाकी, इतर बाबींवर काही बोलत

9

बाकी, इतर बाबींवर काही बोलत नाही! विचारवंतांना वाईट वाटेल.

हाच विचार मनात आला.... असो.

लिहि बाबा लिही...

सुन्न करणारं नि त्याच वेळेला

10

सुन्न करणारं नि त्याच वेळेला खिळवून ठेवणारं लिहितोस.. लवकर टाक रे पुढचा भाग!!!

लवकर पुढचा भाग टंका ...

11

लवकर पुढचा भाग टंका ...

ह्म्म...

12

पुढे ?
स्वाती

काय बोलु ?

13

पुढचा भाग पट्टकन लिहुन टाक बे.
वाट पहातो आहे.

...

14

पुढचा भाग येऊदे लगेच.

फोटो बघून एक ठोका

15

फोटो बघून एक ठोका चुकल्यासारखं वाटलं....
पुढे काय...उत्कंठा वाढलीय...

(अशा लेखांमधे क्रमशः नको असे वाटते)

-अनामिक

(अशा लेखांमधे क्रमशः नको असे

16

(अशा लेखांमधे क्रमशः नको असे वाटते)
सगमत, अरे ही काय सिरीयल आहे का? लवकर संपव बाबा!!

..

17

लवकर पुढचा भाग येउ दे.

...

18

पुढे काय?

19

पुढे काय?



मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

किती जणांनी पुढचा भाग टाक असं सांगायचंय?

20

चतुरंग

ती..

21

ती..
सामाजिक जाणीव/अनुभव असणार्‍या कृतिशील विचारवंत सुहास याला सलाम!


प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

सुहासजी

22

पका काकांशी १०००% सहमत. तुझ्या सारखे मित्र लाभल्याचा माझा मला अभिमान वटतो आहे.

पु.ले.शु.


*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)

पटकन लिहा....

23

पुढे....?

पुढे????

24

पुढे????


-ऋ

सुहास पुढे लिही बाबा लवकर.

25

सुहास पुढे लिही बाबा लवकर. उगा काळजी नको लावुस.

मला शिव्या घालतोस तू कधी

26

मला शिव्या घालतोस तू कधी पुर्ण करणार आहेस हे ????


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

एपिसोडलि

27

अरे बाबा खरी कहाणी सांगतोयस कि एकता कपूरची नवीन मालिका एपिसोडलि सांगतोयस


मी स्मरणांच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो .... सुकलेली वेचीत सुमने भिजणारे डोळे पुसतो....
-मेघ

अशी मदत करणारि माणसे खुप कमि

28

अशी मदत करणारि माणसे खुप कमि भेटतात लोकांना....... असाच मदतिचा हात सदैव रहावा हिच सदिछा..........

आयला, हे कसं काय मिसलं होतं

29

आयला, हे कसं काय मिसलं होतं मी? Sad


*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो. हास्य

ऐसी अक्षरे मेळविन

मी पण

30

मै ये कैसे मिस कर सकता हूं? (द कोअर या चित्रपटातला हा डायलॉग आहे) पण आशय हाच आहे.
माझेही फीलींग अगदी हेच आहे विशाल सारखे ...

ब्राव्हो सुहास भाऊ... तू ग्रेट आहेस Grade

बंगळूरातल्या आणि या अनुभवापास्नं आपण सुहासचे भक्त झालोय. एवढ्या पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे काम करणारे आज आहेतच किती?

जियो सुहासभाऊ


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/