बनाना लीफ ग्रीन चिकन

0
0

राम राम मंडळी.
दिवाळीच्या सुट्टी नंरत आमची ही पहिली पाककृती.
महिनाभर आयतच गिळायला मिळत होतं. त्यामुळे किचनकडे जास्त फिरकण्याची गरज पडली नाही.
आता परत येरे माझ्या मागल्या.

आज ग्रीन मसाला चिकन बनवलं होते. चांगलं लागल. मग म्हटलं तुम्हा सोबत शेअर करावं.
फार काही कटकटीचं नाही.

४-५ मोठे चमचे हिरवं वाटण. (यात भरपूर कोथिंबीर + ४-५ हिरव्या मिरच्या + ४-५ पाकळ्या लसुण + १" आलं + एका लिंबाचा रस.)
१/२ चमचा हळद.
२ चमचे मसाला.
२ चमचे ऑलिव्हचं तेल.
मीठ चवी नुसार.
एका लिंबाचा रस.

१/२ ते ३/४ किलो चिकन.

चिकन स्वच्छ धुवून चाळणीत ठेऊन निथळवून घ्यावं. त्यात हळद, मसाला, मीठ आणि वाटण टाकुन चांगले एकत्र करुन घ्यावं.

केळ्याच्या पानात वरील मसाला लावलेले चिकन गुंडाळुन, बेकिंगच्या भांड्यात ठेवावं.
वरुन अ‍ॅल्युमिनीयमची फॉईल लावून हवाबंद करावं.
ओव्हन २५० ते २७५° C वर ठेउन ४० ते ४५ मीनिटे शिजवावे,

४० ते ४५ मीनिटां नंरत अ‍ॅल्युमिनीयम फॉईल आणि केळीची पानं काढून अजुन ८-१० मिनिटे ग्रील मोड वर शिजवावं.

{बाबब्बो !!!!!!!}

बाबब्बो !!!!!!!
Grade


Hope is a good thing...

{तु करून तुझ्या मित्रांना खाऊ}

तु करून तुझ्या मित्रांना खाऊ घाल ना ही डिश. खुप सोपी आहे. Big smile

{तु करून तुझ्या मित्रांना खाऊ}

तु करून तुझ्या मित्रांना खाऊ घाल ना ही डिश. खुप सोपी आहे. >>> नाही !! दिशातै गरीबांवर दया करा

राजेंनी अस काही केलं ना तर किचनची अवस्था बघुन मी आणि आई आम्ही दोघी पण झिट येऊन पडायचो

( बाकी त्यांच्या मित्रांना हॉस्पिटलात अ‍ॅडमिट करावे लागेल तो भाग वेगळा )


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{मस्तच !!}

मस्तच !!


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{ऑलिव्ह ऑईल}

गणपाभौ ~ पाहूनच पोट भरले, डोळेही निवले. नक्की करणार मी ही डिश.

फक्त थोडे मार्गदर्शन करा :

"ऑलिव्ह ऑईल" ऐवजी 'शेंगदाणा तेल" वापरल्यास चवीत फरक पडेल काय ? आय मीन, मला ऑलिव्ह न वापरता करायचे असल्यास. (पडणार नसेल तर मग शेंगदाणा तेल किती वापरावे तेही सांगावे)

माझ्याकडे ओव्हन नाही. त्यामुळे त्याऐवजी गॅस वापरताना चिकनीला शिजायला किती वेळ द्यावा ?

अशोक पाटील

{"ऑलिव्ह ऑईल" ऐवजी 'शेंगदाणा}

"ऑलिव्ह ऑईल" ऐवजी 'शेंगदाणा तेल" वापरल्यास चवीत फरक पडेल काय ?
चवीत फारसा फरक पडणार नाही.
ऑलिव्हचं तेल त्यातल्या त्यात हार्टसाठी बर.

जर ओव्हन नसेल तर साध्या फ्राइंग पॅनमध्ये पण करता येईल.
केळीच्या पानात गुंडाळलेल चिकन फ्राइंग पॅनमध्ये ठेउन वरुन झाकण लावून मध्यम ते मंद आचेवर २०-२५ मिनीटे शिजवावं. थोडं पाणी सुटेल. पण मग शेवटची ४-५ मिनीटे झाकण आणि केळीची पानं काढुन पाणी आटवावं.
गॅस ऐवजी चुल किंवा कोळसे असतील तर उत्तमच.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{झकास...}

वा वा वा... Grade
तुम्ही आम्हांलादेखील किचनमध्ये जाण्यास प्रवृत्त करता. नेहमीचे चिकन/मटण खावून कंटाळा आल्यावर तुमच्या पोस्ट वाचून पालकगोश्त आणि इतर चिकनचे प्रकार मुखी लागले. मासे किंवा सी-फूडवर देखील अशाच नविन नविन रेसिपी असतील तर कृपया शेअर करा. धन्यवाद...


--------------------
सिद्धार्थ
माझ्या गजाल्या

{श्री.गणपा}

यांच्या पाककृतीला प्रतिसाद दिला ही नोंद केली आहे.

( प्रत्येक पाककृतीला नावाजण्यासाठी लागणारी विशेषणे सर्वांनी वापरुन झाली आहेत. आता अजून काय लिहू ?? )

{मस्त रेसिपी...}

मस्त रेसिपी... Grade Grade


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{छान पाककृती}

छान पाककृती Grade

{तोंपासु. मस्त रेशिपी...}

तोंपासु.
मस्त रेशिपी...

{(विषय दिलेला नाही)}

Crying

{गणपा भाऊजींना किडनॅप करायचा}

गणपा भाऊजींना किडनॅप करायचा विचार चालू आहे वाट्ट अस्मि ताई !! thinking


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{यिप्पी}

हे तर इतकं सोप आहे की माझ्यासारखा ठोंब्यासुद्धा बनवेल......... आले लगेच कधी बोलावतोय्स म्हणत. अजिबात बोलावणार नाही कोणाला. (न जाणो यातही सालं ते चिकन जाळून ठेवायचो नि पोपट व्हायचा... आमचं मधलं नाव 'मर्फी' आहे ना. Drunk )


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)