स्वातंत्रवीर सावरकर
उद्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची पुण्यतिथी.
सावरकरांचे विचार पुढच्या पिढी पर्यंत पोचण्यासाठी आपण काय करु शकतो?
उद्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची पुण्यतिथी.
सावरकरांचे विचार पुढच्या पिढी पर्यंत पोचण्यासाठी आपण काय करु शकतो?
{खुप मोठा प्रश्न आहे हा...}
खुप मोठा प्रश्न आहे हा... !
सावरकरांची जिवनी सर्वांच्या पर्यंत पोह्चणे आवश्यक आहे असे माझे मत आहे.
Hope is a good thing...
{सावरकर्.ऑर्ग}
http://www.savarkar.org/
हे संकेतस्थळ जास्तितजास्त लोकांना माहीत होईल, तिथले साहित्य लोक वाचतील असा प्रयत्न करु शकतो!
चतुरंग
{उतरवून घेण्यासाठी खूप सुंदर आहे.}
हे संकेतस्थळ व येथील उपलब्ध साहित्य सुंदर आहे.
*** मनापासुन धन्यवाद ***
जे जे उतरवून घेता येण्यासारखे होते ते सगळे मी उतरवून घेतले आहे.
वर वर पाहिली...डॉक्युमेंटरी छान वाटत आहे. पण अजुन सगळी पाहिली नाहिये..
पी.डी.एफ. व एमपी थ्री चा खजिना मस्तच आहे.
सर्वांनी आवर्जून उतरवून घ्यावा असा आहे.
सावरकरांना सादर व नम्र श्रद्धांजली.
(सावरकरप्रेमी) सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{विज्ञाननिष्ठ निबंध}
सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध जरी लोकांपर्यंत पोहोचले तरी खुप झाले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{या निबंधांचं पुस्तक प्रकाशित}
या निबंधांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे का?
{हा दुवा}
हा दुवा
-निखिल
{छान दुवा.}
छान दुवा.
{+१}
हेच म्हणतो. निबंध माहीती व दुव्याबद्दल धन्यवाद प्रकाशकाका व निदे
{सावरकरांबरोबर अनेक गोष्टी समजून घेतल्या तर कळतात सावरकर...}
स्वातंत्र्यवीर सावरकर कळण्यासाठी फक्त सावरकरांचे साहित्य वाचून उपयोग नाही.
सावरकरांचे लेखनच त्यांचे विचार किती प्रगल्भ होते आणि भविष्यकाळातील वेध घेणारे दूरगामी होते याची निश्चितच प्रचिती येते.
पण गांधीजींचे विचार, त्या विचारांमुळे क्रांतिकारकांमध्ये पसरलेली निराशा, इंग्रजांनी भारतीयांवर (खास करुन हिंदूंवर) केलेले अनन्वित अत्याचार, हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील तेढ निर्माण होण्याची कारणे (गोपाळराव गोडसेंनी नथुराम गोडसेंचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे यासाठी लिहिलेली पुस्तके मार्गदर्शक ठरु शकतील) आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा विदेशी लेखकांच्या नजरेतून इतिहास (फ्रिडम अॅट मिडनाईट हे एक पुस्तक या विचारावर चांगला प्रकाश टाकते)
अशा व्यापक दृष्टीकोनातून सावरकरांचे व्यक्तिमत्त्व व त्यांचे विचार अभ्यासले तर सावरकर अधीक चांगले कळतील असे माझे मत आहे.
माझ्या सुदैवाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गाव "भगूर" (नाशीकपासून खूप जवळ आहे) येथे भेट देण्याचा योग मला वयाच्या २२व्या वर्षी मिळाला होता. . आत्ता प्रशासनाने थोडीफार व्यवस्था केलेली आहे, पण मी भगूर ला सावरकरांचे स्मारक पाहिले ते अतिशय वाईट अवस्थेत होते. पडझड झालेले व कोणतीही व्यवस्था नसलेले. तरीही गांधीजींच्या स्मारकाला वा गांधी परिवारातील कोणाही नेत्याला जो गौरव प्राप्त होतो तो दुर्दैवाने महाराष्ट्रातच मराठी जनतेकडुनच मराठी आद्य क्रांतीकारकांना मिळाला नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
(सावरकरप्रेमी) सागर
मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/
{सावरकरांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत विचार...}
काय होते हे कुणी जाणकार विषद करु शकेल काय? जाणुन घेण्याबाबत बराच उत्सुक आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{कालच सावरकर स्मृती समिती ने}
कालच सावरकर स्मृती समिती ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांचे नाट्य काव्य लेखन यांचा संगीत अविष्कार गरवारे कॉलेजला झाला. कार्यक्रम उत्तम झाला. सावरकरांची गीते मंजिरी मराठे यांच्या शतजन्म शोधिताना कार्यक्रमात उत्तम सादर झाली. आपल्याला सावरकरांचे ने मजसी ने हे गाजलेले गीत माहित आहेच. माहित नसलेली गाणी देखील ऐकायला मिळाली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
{_/\_ स्वातंत्र्यवीर तात्याराव}
_/\_
स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांच्या चरणि माझी विनम्र श्रध्दांजली!