लेखन स्पर्धा २०१२ ( नियम व कालावधी मध्ये बदल -१०/०१/१२)

6
0

नमस्कार,

मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती.

स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा. सूरू होईल व प्रवेशिका घेण्याची सुरवात देखील तेव्हा होईल. स्पर्धा पुर्ण होईपर्यंत स्पर्धेच्या घोषणेचा हा अधिकृत धागा असेल.

स्पर्धेचे स्वरूप थोडक्यात या प्रमाणे:

  • स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. लेखन मुद्रण माध्यमात पूर्वप्रकाशित झालेले नसावे.
  • एक लेखक जास्तीत जास्त ३ प्रवेशिका सादर करू शकतो.
  • लेखनाचा प्रकार हा लघुकथा असा ठेवण्यात आला आहे. शब्द बंधन नसले तरी क्रमशः लेखन स्पर्धेत घेतले जाणार नाही. इतर विषय स्विकारले जाणार नाहीत.
  • डाव्या बाजूला लेखन करा मध्ये लेखन स्पर्धा २०१२ हा विभाग या विभागामध्ये लेखन प्रकाशित करावयाचे आहे
  • विजेत्यांची निवड करताना शुद्धलेखन व कथेची मांडणी यांचा विचार केला जाईल यांची नोंद घ्यावी.
  • सर्व प्रवेशिकाचे परिक्षण लेखन क्षेत्रातील ३ मान्यवर व्यक्ती करतील, त्यांची नावे स्पर्धा चालू होईल त्या दिवशी येथे दिली जातील
  • स्पर्धा १० डिसेंबर ते ३० जानेवारी २०१२ या कालावधीसाठी खुली राहील. त्यानंतर अंदाजे २८ फेब्रुवारी २०१२ च्या सुमारास अंतिम निकाल जाहीर केला जाईल, जो मीमराठी.नेट या संकेतस्थळावर तसेच संबंधित संस्थांच्या मुद्रित वितरणातून जाहीर केला जाईल.
  • स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील जी पुस्तक स्वरूपात असतील. या तिघांव्यतिरिक्त अंतिम फेरीत पोचलेल्या सर्वांना मीमराठी.नेट तर्फे प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. प्रथम क्रमांक :१२ पुस्तके, द्वितीय क्रमांक :८ पुस्तके, तृतीय क्रमांक :५ पुस्तके
  • स्पर्धेकरता लिहिलेल्या साहित्यावर मूळ लेखकाचा संपूर्ण अधिकार राहील. विजेते लेखन मीमराठी तर्फे मुद्रण माध्यमात प्रसिद्ध करावयावे झाल्यास लेखकांशी स्वतंत्रपणे पत्रव्यवहार केला जाईल.
  • बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुणे अथवा मुंबई येथे होईल. विजेत्यांनी बक्षीस स्वहस्ते घेणे आहे. बक्षीस वितरणासंबधीची घोषणा वेगळ्या धाग्यावर केली जाईल.
  • स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी स्पर्धानियमांमध्ये वेळोवेळी योग्य ते बदल करण्याचे अधिकार स्पर्धा-व्यवस्थापन नि मीमराठी संचालक मंडळ राखून ठेवत आहे.
  • सदर स्पर्धेची जाहीरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात आली आहे. या दरम्यान सदर माहिती मधे होणार्‍या सहेतुक/निर्हेतुक बदलांशी स्पर्धा-व्यवस्थापक सहमत असतीलच असे नाही. मीमराठी.नेट येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या स्पर्धा सूचनेच्या धाग्यावरील मसुदा अंतिम मानण्यात येईल.

प्रवेशिका सादर करण्याची पद्धत.

१. लेखन स्पर्धा खुली असण्याच्या काळात मीमराठी.नेट इथे प्रकाशित करावे लागेल.

२. यासाठी लेखकाला मीमराठी.नेट चे सभासदत्व घेणे आवश्यक आहे. १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणाही व्यक्तीला मीमराठी.नेट चे सभासदत्व विनामूल्य घेता येते.

३. स्पर्धेच्या कालावधीत आपण प्रकाशित केलेले साहित्य स्पर्धेतील प्रवेशिका म्हणून गणले जावे याचा व्यक्तिगत निरोप व्यवस्थापक या आयडीला पाठवणे आवश्यक आहे. अन्यथा प्रकाशित साहित्य हे प्रवेशिका म्हणून गृहीत धरले जाणार नाही. या निरोपात लेखकाचे मूळ नाव (स्पर्धेच्या निकालात मूळ नावाची घोषणा केली जाईल.), प्रवेशिका म्हणून सादर करावयाचे असलेले लेखन मीमराठीवर स्पर्धा विभागात प्रसिद्ध करून त्याचा मीमराठीवरील दुवा, संपर्क क्र., विरोप पत्ता (ई-मेल), ब्लॉग पत्ता (असल्यास) व भारतातील पत्ता देणे बंधनकारक आहे.

४. सदर स्पर्धा मीमराठी.नेट चे मालक व त्यांच्या कुटुंबियाव्यतिरिक्त इतर सर्वांसाठी खुली आहे.

५. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश मूल्य नाही, ती सर्वांसाठी खुली आहे.

६ एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

७. अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क मीमराठी.नेट राखून ठेवत आहे.

८. निकालाबाबत मीमराठी.नेट ने नियुक्त केलेले पर्यवेक्षक / परीक्षक यांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास मीमराठी.नेट बांधील नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.
______

पुढील सर्व बदल/घोषणा/ स्पर्धेची सुरवात या बद्दलची माहिती येथे अद्यावत केली जाईल.
सर्व मीमकरांना नम्र विनंती आहे की सर्वांनी भरभरून भाग घ्या व हा धागा/ स्पर्धेची माहिती आपल्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा.

व्यवस्थापक,

मी मराठी.नेट

{सर्व सदस्यांना लेखन स्पर्धेचे}

सर्व सदस्यांना लेखन स्पर्धेचे आमंत्रण इ-पत्राद्वारे पाठवले आहे, तरी ज्यांना मिळाले नसेल त्यांनी हेच आमंत्रण पत्र असे समजावे wink
मागील लेखन स्पर्धेमध्ये २७० प्रवेशिका आल्या होत्या व खूप चांगले लेखन वाचावयास मिळाले होते. तसेच यावेळी देखील चांगले व कसदार लेखन वाचावयास मिळेल अपेक्षा आहे.


Hope is a good thing...

{स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व}

स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा !!

उत्तमोत्तम लेखन वाचावयास मिळेल अपेक्षा आहे. हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{वाहत्या गंगेत हात धुवून}

वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल wink
धन्यवाद हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{तुझ्या कथेची आर्जवून वाट पाहत}

तुझ्या कथेची आर्जवून वाट पाहत आहे हास्य


Hope is a good thing...

{बढीया...... !}

बढीया...... ! म्हणजे...वाचकांचे ग्रह उच्चीचे आहेत तर ! Wave हास्य

एक गोष्ट लक्षात आली... यावेळी स्पर्धेचे नियम मोजके पण नेमके आहेत ....! सर्वांना शुभेच्छा ! हास्य


Ignited Mind ! हा माझा , माझ्या कवितांचा ब्लॉग आहे बरं का ! हास्य

{काही प्रश्न / शंका असतील तर}

काही प्रश्न / शंका असतील तर नक्की विचारा त्याचे समाधान केले जाईल.


Hope is a good thing...

{सदस्यांतील 'लेखक'}

इथले सभासदत्व घेतलेल्या अगदी पहिल्या दिवसापासून माझी काही सदस्यांसमवेत छानपैकी मैत्रीचे धागे जुळले असल्याने त्यांच्यातील लेखकाचे "इलेमेन्ट" मी जाणले आहे. अशांना या 'लघुकथा' स्पर्धेत भाग घेण्यासाठी नक्की मी उद्युक्त करीन (आणि ते भाग घेतीलही इतका विश्वास आहेच.)

स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आहेतच. [त्या निमित्ताने होणार्‍या पारितोषिक वितरण समारंभास हजर राहून अनेक नव्या सुहृदांशी परिचयही होईल. म्हटले तर हा एक फायदाच आहे या स्पर्धा आयोजनाचा.]

अशोक पाटील

{काही सदस्यांसमवेत छानपैकी}

काही सदस्यांसमवेत छानपैकी मैत्रीचे धागे जुळले असल्याने त्यांच्यातील लेखकाचे "इलेमेन्ट" मी जाणले आहे. अशांना या 'लघुकथा' स्पर्धेत भाग घेण्यासाठी नक्की मी उद्युक्त करीन >> नुसते उद्युक्त करु नका...... तुमच्या कडुन पण कथा अपेक्षित आहे मामा हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{राजे }

ह्या स्पर्धेत जास्तीतजास्त सहभाग व्हावा या साठी प्रचार करावा ही विनंती. शक्य त्या प्रसार माध्यमाचा वापर हजार-एक तरी प्रवेशीका याव्यात. शुभेच्छा.

{try chalu aahe}

try chalu aahe


Hope is a good thing...

{अरे व्वा....आमच्यासारख्या}

अरे व्वा....आमच्यासारख्या वाचकांसाठी मेजवानीच आहे जणू.....


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{तुमचा सहभाग अपेक्षित आहे मॅडम}

तुमचा सहभाग अपेक्षित आहे मॅडम हास्य


Hope is a good thing...

{राजे, मलाही आवडलं असतं कथा}

राजे, मलाही आवडलं असतं कथा टाकायला, पण नविन project मुळे डोकं वर काढायलाही फुरसत नाहिए. Clients ने dead lines दिल्या आहेत. Sad वेळ मिळाला आणि काहि सुचलं तर नक्की देईन.


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{वाह परत एकदा मेजवानी.}

वाह परत एकदा मेजवानी. हास्य
सर्वांना ऑल द बेस्ट.


*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा

{तुला पण रे भाग घेतो आहेस}

तुला पण रे wink

भाग घेतो आहेस ना!


Hope is a good thing...

{अरे वा छान}

सुंदर प्रकल्प सुरु केला आहे
ज्यामुळे अनेक नवोदित लेखकांना प्रोत्साहन मिळू शकेल

माझ्या भरघोस शुभेच्छा
मी आहेच, काही मदत करु शकलो तर आनंदच होईल हास्य


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{आपल्या मित्रांना बोलवा, सहभाग}

आपल्या मित्रांना बोलवा, सहभाग घ्याला लावा तुम्ही पण सहभाग घ्या wink
एवढंच करा.


Hope is a good thing...

{वा:}

खूप नवीन आणि उत्तम वाचायला मिळणार आहे तर...

स्पर्धेस मनापासून शुभेच्छा!!!

{दोन दिवस राहिले स्पर्धा चालू}

दोन दिवस राहिले स्पर्धा चालू होण्यासाठी... झाली का तयारी wink


Hope is a good thing...

{आमच्याही मनापासून}

आमच्याही मनापासून शुभेच्छा...
मस्त, लै भारी, जबर्‍या वगैरे कथांची वाट पहातोय. लेखनस्पर्धा विभागाकडे डोळे लावून बसलोय. १० डिसेंबरची उलटगणती करतोय...

{लेखनस्पर्धा विभागाकडे डोळे}

लेखनस्पर्धा विभागाकडे डोळे लावून बसलोय. १० डिसेंबरची उलटगणती करतोय... >>> तुम्ही पण कथा पाठवणार ना ?हास्य


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{लेखन स्पर्धेचे स्वागत}

लेखन स्पर्धेचे स्वागत आहे!अनेक चांगल्या कथा वाचायला मिळतील अशी मला अपेक्षा नाही खात्री आहे.


माझा ब्लॉग http://world97.blogspot.com/

{शुभेच्छा. }

लेखन स्पर्धेचे स्वागत आणि या उपक्रमास शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

{तुमचा देखील सहभाग असेल अशी}

तुमचा देखील सहभाग असेल अशी आशा.
हास्य


Hope is a good thing...

{शुभेच्छा. }

लेखन स्पर्धेचे स्वागत आणि या उपक्रमास शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

{लई भारी... नक्की भाग घेणार}

लई भारी... नक्की भाग घेणार हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{हार्दिक शुभेच्छा !!}

हार्दिक शुभेच्छा !! हास्य


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{ह्याचीच वाट पहात होतो}

नक्की भाग घेणार.

होऊन जाऊदे.... Cool


कळावे,
___मनस्वी राजन

अनुभव… क्षण वेचलेले…

{स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व}

स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा !


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{हार्दिक शुभेच्छा !}

हार्दिक शुभेच्छा !

{वा!}

हार्दिक शुभेच्छा! मी नक्कीच भाग घेणार ! आत्तापासूनच तयारीला लागते.


*क्रान्ति*
नाही दु:खाचा आडोसा नको सुखाची चाहूल
झाड वाढता वाढता त्याने होऊ नये फूल

{अरे वा! धन्यवाद}

प्रयत्न करतो रे लिहण्याचा..
वाचकांनी आपल्या जबाबदारीवर माझी कथा वाचावी.. Evil


---------------------------------------------------------------
स्पंदने माझ्या मनाची >>
मन वढाय वढाय

{हार्दिक शुभेच्छा! आता नविन}

हार्दिक शुभेच्छा!
आता नविन नविन दर्जेदार साहित्य वाचायला मिळेल.

{स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व}

स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा.


___________________________________
योगेश नाईक

{स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व}

स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना हार्दिक शुभेच्छा. >>>> तुम्ही पण भाग घेताय ना??


********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."

{लेखन स्पर्धेचा दिवस जवळ येत}

लेखन स्पर्धेचा दिवस जवळ येत आहे.. झाली की नाही तयारी सर्वांची हास्य


Hope is a good thing...

{छान योजना व कल्पना. लेखन न}

छान योजना व कल्पना.
लेखन न करता मी सहभाग नोंदवू इच्छीत आहे, प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना माझ्याकडून ही छोटसं बक्षीस द्यावे असे मनात आहे चालेल का?
माझ्या भरघोस शुभेच्छा हास्य

{माहिती ईपत्रद्वारे पाठवली}

माहिती ईपत्रद्वारे पाठवली आहे.


Hope is a good thing...

{काही अडचणी असतील तर}

काही अडचणी असतील तर निःसंकोचपणे येथे विचारा ही विनंती.


Hope is a good thing...

{आजच जमा झालो इथे....!!!}

आजच जमा झालो इथे... दोन-चार कथा चाळल्या.. सवडीने वाचेनही.. स्वताही काही लिहायला घेतले आहे.. इथे टाकेनही.. एकंदरीत चुकीच्या जागी नाही आलोय.. स्वता एक नवोदीत लेखक आहे.. खरे तर लेखक हा शब्द "जो लिहितो तो लेखक" असा ढोबळमानाने स्वतासाठी वापरला आहे.. बघू इथे ज्या दर्जाच्या कथा आहेत तसे काही जमते का.. बाकी सर्वांना शुभेच्छा.. हास्य

... तुमचा अभिषेक


... तुमचा अभिषेक

{इथे एखादी कथा स्पर्धेला टाकली}

इथे एखादी कथा स्पर्धेला टाकली तर ती इतर कुठे ओर्कुट समूहांवर वगैरे कधी प्रकाशित करू शकतो..???
१) लगेच दुसर्या दिवशी
२) स्पर्धेची मुदत संपल्यावर
३)निकाल जाहीर झाल्यावर.


... तुमचा अभिषेक

{इथे एखादी कथा स्पर्धेला टाकली}

इथे एखादी कथा स्पर्धेला टाकली तर ती इतर कुठे ओर्कुट समूहांवर वगैरे कधी प्रकाशित करू शकतो..???>>>>

निकाल जाहीर झाल्यानंतर. तोवर कृपया कुठेही म्हणजे सोशल नेटवर्कींग साईट्स. इतर संस्थळे किंवा आपल्या वैयक्तीक ब्लॉगवरही प्रकाशित करु नये. हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{abhishek tumcha swagt ahe,}

abhishek tumcha swagt ahe, aani spardhesathi subhechha हास्य

abhishek anakhi ek mahtwachi goshta tumchi katha purvaprakashit nasavi हास्य


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा.}

स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा.

{निवेदीता अन विशाल, धन्यवाद..}

निवेदीता अन विशाल, धन्यवाद.. टाकली कथा.. नव्यानेच लिहिलेली.. ना कुठे पूर्वप्रकाशित आहे ना मला बक्षीस मिळेपर्यंत करणार.. हास्य


... तुमचा अभिषेक

{मी मा़झ्या मुलीची कविता देवू}

मी मा़झ्या मुलीची कविता देवू शकते का स्पर्धेसाठी...

कृपया लवकर सांगा


----निवेदिता--------

{लेखन स्पर्धा चालू आहे. काव्य}

लेखन स्पर्धा चालू आहे.
काव्य स्पर्धा नाही हास्य


Hope is a good thing...

{राजे, स्पर्धेचे परीक्षक काय}

राजे, स्पर्धेचे परीक्षक काय निकाल लावतील तो त्यांचा प्रश्न आहे.

पण इतक्या वेगवेगळ्या कथा स्पर्धेत वाचल्यावर 'वाचकांचा कौल' अशी पण काही सोय करता येईल तर बर अस वाटलं. म्हणजे वाचकांनी त्यांना आवडलेल्या पाच कथा कळवाव्यात अशा प्रकारच काहीतरी. हे अर्थात स्पर्धेची मुदत संपल्यावर कराव म्हणजे सर्व कथा वाचता येतील.

--माझ काय जातंय नवनवीन कल्पना सुचवायला? करायचं मालकांना आहे ते Evil

{परवानगी हवी होती -}

मागे मी इथे टाकलेली कथा ओर्कुट वर प्रकाशित करता येईल का असे विचारले होते तेव्हा निकाल लागेपर्यंत थांबायचा सल्ला मिळाला होता. त्या नंतर येथील एक स्पर्धक युवराज पाटील यांच्या कथा मी इथे प्रकाशित झाल्यावर एका ओर्कुट समूहावरही पाहिल्या. चौकशी करता समजले की त्यांनी पूर्वपरवानगी घेतली आहे. नियम सर्वांना सारखेच असतील अशी अपेक्षा, म्हणून मलाही माझी कथा ओर्कुट समूहावर प्रकाशित करायची परवानगी हवी आहे.

धन्यवाद हास्य


... तुमचा अभिषेक

{इतर जागी प्रकाशित करू नकाच}

इतर जागी प्रकाशित करू नकाच अशी अट नाही आहे, पण मीमराठी.नेट एवढा वेळात वेळ काढून स्पर्धा चालवत असेल, बक्षिसांपासून कार्यक्रमापर्यंतचा खर्च उचलत असेल तर लेखकांनी कमीत कमी आपले लेखन फक्त मीमराठीवर प्रकाशित करावी अशी माफक अपेक्षा होती. परंतू जर कोणाला आपले लेखन इतरजागी प्रकाशित करायचेच असेल तर मीमराठी लेखन स्पर्धाचा उल्लेख करून केल्यास आवडेल.

{धन्यवाद आणि धन्यवाद}

धन्यवाद, परवानगी दिल्याबद्दल,
धन्यवाद हा व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल,

आपला कोणताही नियम तोडायचा हेतू नव्हताच, पण मी नवोदीत लेखक आहे, काही लिहिले आणि स्वताला ते आवडले तर चार लोकांनी वाचावे अशी इच्छा होणे साहजिकच आहे.. इथेही स्पर्धेसाठी नाही तर माझे लिखाण आणखी लोकांनी वाचावे आणि त्यात सुधारणा सुचवाव्यात हा मूळ हेतू होता. राहिला ओर्कुट समूहावर प्रकाशित करायचा प्रश्न तर तिथे मी जुना आहे, माझे ओळखीचे माझे मित्र तिथे आहेत, त्यांनी ते वाचावे, त्यांना आवडावे असे वाटते, हेच माझे सर्वात मोठे बक्षीस आहे, त्यामूळे तिथे प्रकाशित करण्यास मी उत्सुक आहे.

बाकी मी आपला उल्लेखच नाही तर आपल्या समूहाची लिंक देखील तिथे देईन, म्हणजे तेथील वाचक माझ्या कथेबरोबर येथील इतरही कथांचा लाभ उचलतील,

मराठी समूहांची, संकेतस्थळांची अशी जाहीरात केली तरच मराठी साहित्याला चांगले दिवस येतील ना.. आपली जाहीरत सुद्धा मी ओर्कुट समूहावर बघून तर इथे आलो होतो.. हास्य


... तुमचा अभिषेक

{राजेंनी परवानगी दिलीच आहे}

राजेंनी परवानगी दिलीच आहे तेव्हा बोलण्यासारख्के असे काही उरलेच नाही.
पण एक वैयक्तीक मत - नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक स्पर्धकाने किमान मीम स्पर्धेचा निकाल जाहीर होइपर्यंत इतरत्र कुठेही स्पर्धेतील कथा प्रकाशित करु नये असे मला वाटते. कुठल्याही लेखन स्पर्धेचा हा मुलभुत नियम असतो. एकदा निकाला जाहीर झाला की मग कुठेही तुम्ही आपले लेखन प्रकाशित करु शकता. हास्य


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{अणुमोदन}

अणुमोदन हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{नैतिक जबाबदारी}

नैतिक जबाबदारी,
एवढे भारी शब्द नका हो वापरू, उगाच धर्मसंकटात टाकलेत,
ठीक आहे जर असे करणे योग्य नसेल तर महिनाभर थांबतो.. हाय काय आणि नाय काय.. कमीतकमी त्यांनी परवानगी दिली होती यातही समाधान आहे.. हास्य


... तुमचा अभिषेक

{तुम्ही एकदा मीमराठीवर आलात की}

तुम्ही एकदा मीमराठीवर आलात की आपल्या या कुटुंबाचे सदस्य बनता. तेव्हा कुटुंबप्रमुख (राज्या, या शब्दासाठी अजुन एक पार्टी ड्यु रे तुझ्याकडे wink ) म्हणुन तुमच्या इच्छेचा, विनंतीचा मान ठेवणे मीमच्या चालकाचे कर्तव्य ठरते. त्याबरोबरच कुटुंबसद्स्य म्हणुन आपल्या जबाबदार्‍या ओळखणे हे आपले कर्तव्य ठरते. Evil


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{तुम्ही इथे जुने असल्याने}

तुम्ही इथे जुने असल्याने तुम्हाला हे कुटुंब वाटू लागले तसे मी ओर्कुटवरच या आधी रमत असल्याने माझे कुटुंब तिथे मला वाटायचे.. म्हणून त्यांना कथा वाचायला न देता इथे स्पर्धेसाठी म्हणून टाकणे जरा कसेसेच वाटत होते.. असो, पण सध्या मनात काही नाहिये.. प्रश्न फक्त महिनाभर काय तो थांबण्याचाच अहे न.. जमेल.. हास्य


... तुमचा अभिषेक

{अनेक वाचकांच्या / लेखकांच्या}

अनेक वाचकांच्या / लेखकांच्या मागणीला मान देऊन नियम व कालावधीमध्ये बदल केला आहे, याची नोंद घ्यावी.
हा धागा आपल्या सर्व मित्रांपर्यंत पोहचण्यासाठी मीम ला सह्हाय करा.


Hope is a good thing...

{!}

'ललित लेखन' म्हटल्यास त्याला अनेक पैलू आहेत. प्रवासवर्णन, स्मरणरंजनात्मक लेख, आत्मशोधपर लेख, नाट्य, श्रुतिका, काव्यसमिक्षा, व्यक्तीचित्रणे आणि बरेच काहि. प्रत्येकाचा बाज वेगळा, पद्धत वेगळी, शक्तीस्थाने वेगळी.

लघु/दीर्घ कथा आणि या विविध प्रकारचे ललित लेखन यांच्यात तुलना कशी करणार हे कळले नाही.
नियमांत किंवा काय प्रकारचे लेखन अपेक्षित आहे यात अधिक नेमकेपणा हवा असे वाटते


-ऋ

{लघुकथा / ललित लेखन }

लघुकथा / ललित लेखन हव्यात.
ललित कथा अपेक्षित आहेत आम्हाला येथे.


Hope is a good thing...

{ललित कथा ?}

राजे....काहीतरी गोंधळ होतोय.

नव्याने स्पर्धेच्या रुपात बदल का केला गेला आहे हे समजत नाही. म्हणजे सुरुवातीस केवळ 'लघुकथा' हीच मागणी असताना आता "लघुकथा/ललित लेखन' अशी पुस्ती कशासाठी जोडली गेले हे समजत नाही. स्पर्धेसाठी लघुकथा हा वाङ्मय प्रकार सर्व सदस्यांत पोचला असल्याने तसेच छानपैकी प्रतिसादही लाभल्याचे दिसत असताना आता त्यात 'ललित लेखन' वाढविण्याची आवश्यकता भासू नये.

"ललित कथा' असा काही प्रकार नसतो. कथेत दोनच प्रकार 'लघु' आणि 'दीर्घ'. त्याचे उपप्रकार असतील, उदा.रूपककथा, जातककथा, शौर्यकथा, नीतिकथा आदी. पण याना 'ललित' म्हणत नाहीत.

तेव्हा स्पर्धा घोषणेच्या मूळ मसुद्यात केवळ 'लघुकथा' याचाच उल्लेख असावा असे वाटते. अर्थात तुम्ही इथल्या अन्य ज्येष्ठांशीही या संदर्भात सल्लामसलत करून निर्णय घ्यालच.

अशोक पाटील

{लघू कथा व ललित मध्ये माझा}

लघू कथा व ललित मध्ये माझा गोंधळ होतो आहे असे वाटत आहे.
तात्पुरते मी ललित काढतो व इतरांशी चर्चा करून बदल करतो.


Hope is a good thing...

{मुदत वाढली का.. वा छान... एक}

मुदत वाढली का.. वा छान... एक वाचक म्हणून आनंद झाला.. लेखक म्हणून आधीच तीन कथा टाकल्या आहेत.. पण स्पर्धक म्हणून जीव आणखी टांगणीला लावलात हो..


... तुमचा अभिषेक

{धन्स राजे.... अजुन मेजवानी}

धन्स राजे.... अजुन मेजवानी मिळेल ह्यामुळे हास्य हास्य


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{मालक, एक लेखक जास्तीत जास्त ३}

मालक,

एक लेखक जास्तीत जास्त ३ प्रवेशिका सादर करू शकतो.
हा नियम बदलता येईल का ? ३ एवजी ५ तेव्हढ्याच जास्त कथा वाचायला मिळतील. कदाचित परिक्षकांचा लोड वाढेल पण वाचकांना मजा येईल.


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{यावर देखील विचार करू}

यावर देखील विचार करू या.
इतरांचे काय म्हणणे आहे ???


Hope is a good thing...

{इतरांचे काय म्हणणे आहे ???}

इतरांचे काय म्हणणे आहे ???

असं विचारल्याने लिहितोय.

लोकशाही पद्धत काही बाबतीत चांगली पण सर्वत्र नसावी.. हे माझं वैयक्तिक मत.

स्पर्धेच्या बाबतीत एकदा ठरवलेले आणि जाहीर केलेले नियम बदलू नयेत. जर सदस्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मुदत बदलावी लागली तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण मूलभूत मुद्दे (साहित्यप्रकार, शब्दमर्यादा (असेल तर), अन्य अटी) हे नंतर बदलून गोंधळाची स्थिती वाढत जाते. स्पर्धेत त्यापूर्वी लिहिलेल्यांवर काहीसा अन्याय होतो. फार काळ मुदत वाढवली तर विरस, रसभंग होतो. अति वाट पाहून उत्सुकता नष्ट होते.

शिवाय हे सर्व निर्णय लोकमताने घेतले तर चर्वितचर्वणाने स्पर्धेतली मजाही जाते आणि तिचे महत्वही कमी होते.

ठरलेल्या नियमांनुसार शक्यतो स्पर्धा पार पाडावी असं माझं मत आहे. त्यातून बदल करायचे झालेच तर ते आयोजकांनी ठरवून फक्त कम्युनिकेट करावेत. त्यावर मते मागवू नये अशी माझी नम्र सूचना आहे.

इनफॅक्ट बाकी सगळीकडे मतं घेणं / गप्पा या गोष्टी कराव्यात पण घोषणेचे धागे वाचनमात्र असावेत असंही वाटून जातं.

स्पष्ट मताबद्दल राग नसावा. तेवढा माझा हक्क मीमवर आहे असं मी मानतो.

{+१}

+१ अगदी तंतोतंत गविसारखंच म्हणतो


-ऋ

{+२}

माझेही गविंना अनुमोदन.

-(गविंच्या मुद्देसूद विचारांनी प्रभावित) ननि

{+२}

गवि नि ऋषिकेश यांच्याशी सहमत.


वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)

{तीनाचे पाच नाहीतर किमान चार}

तीनाचे पाच नाहीतर किमान चार करा.. अन्यथा माझ्यासारखे जे ठरलेल्या मुदतीत तीन कथा लिहून बसलेत ते काय करणार.. पेन बंद करून, कोर्या कागदांची चुरंगळी करून आता इतरांच्या कथा वाचत बसायचे म्हणजे कंटाळवाणे काम आहे.. ते ही तब्बल वीस दिवस.. सुचलेच तर लिहू आणखी काहितरी.. म्हणून जर मुदत वाढणार असेल तर साथीला प्रवेशिका संख्या वाढण्याचाही विचार व्हायला हवा.. असे मला वाटते.. अर्थात हे न्याय्यही आहे.. वेळेत पेपर पूर्ण केलेल्यांवरही अन्याय होता कामा नये न.. हास्य


... तुमचा अभिषेक

{>>>इतरांच्या कथा वाचत बसायचे}

>>>इतरांच्या कथा वाचत बसायचे म्हणजे कंटाळवाणे काम आहे
Crying

मायला आमी बी हाय म्हन्ल हीतं... कोन म्हंतय रं त्ये गावाच्या कता वाचायाचं मंजी बोर हुतंय म्हनून आँ. (ह. घ्या)

{अभिषेकराव, आमच्यासाठी त्या}

अभिषेकराव, आमच्यासाठी त्या इतरांमध्ये आपलं नाव आलं तर चालेल का?

स्पर्धा वैयक्तिकरित्या घेऊ नका. मीमराठी ह्या संकेतस्थळाने ही स्पर्धा लेखकांना उत्स्फूर्तपणे लिहिण्यास उद्युक्त करायला सुरु केली आहे. ह्या निमित्ताने अनेक लेखकांनी कंटाळा झटकून कथा लिहायचे मनावर घेतलंय आणि इथे पोस्ट होणाऱ्या प्रत्येक लेखावर-कथेवर कमेंट देणे कंटाळवाणे वाटत असल्यास, आपण सगळ्या मराठी संकेतस्थळावरून जालीय संन्यास घ्यावा असे नम्रपणे सुचवतो... Big smile

-- मीमराठीच्या लेखन स्पर्धेचा एक चाहता


*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
I couldn't wait for success, so I went ahead without it !!

माझा ब्लॉग - मन उधाण वार्‍याचे…

{पूर्ण वाचा हो.. आणि अर्थाचा}

पूर्ण वाचा हो.. आणि अर्थाचा अनर्थ करू नका.. स्वताचे लिहिणे आटोपून आता वाढीव वेळात तसेच बसून राहायच्या कंटाळ्याबद्दल मी बोलतोय.. जर मुदत वाढवायचीच असेल तर प्रवेशिकाही तीनाच्या जागी चार कराव्यात.. असे माझे म्हणने आहे..

बाकी एक मात्र खरे आहे.. मी खूप बेकार वाचक आहे.. फार कमी कथा न कंटाळता पूर्ण वाचू शकतो.. माझ्या बोलण्याचेही तसे.. कोणाला फोन केला तर मीच बोलत सुटतो.. समोरच्याचे ऐकून घ्यायची मला सवयच नाही.. असो.. उगाच विषयांतर नको...

अवांतर - आपल्यासाठी मी इतरच आहे... मीच का... प्रत्येक जण हा इतर प्रत्येकासाठी इतरच असतो... मी काहीही लिहून आपल्याकडे आता हे वाचाच असा हट्ट धरू शकत नाही.. तसेच मी एखादी कथा लिहिली तर ती कोणी वाचावी यासाठी मी पण त्याची वाचली पाहिजे असा हट्टही इतर कोणी धरू शकत नाही .. ना... हास्य


... तुमचा अभिषेक

{अभिषेकराव... संन्यास घ्यावा}

सगळ्या मराठी संकेतस्थळावरून जालीय संन्यास घ्यावा असे नम्रपणे सुचवतो...

________________________________________

अनुमोद्न ..

अभिषेक राव तुम्ही फार चांगल लिहिता ..अस तुम्हाला वाटन साहजिक आहे Quest

पण दुसर्यांच्या लिखाणाला वाचन म्हणजे कांटाळवान अस समजून दुसर्यांच्या लिखाणाचा अपमान करू नये ..

वाचावस वाटल तर वाचाव अन्यथा सोडून द्यावं ..जगजाहीर करण्याची गरज नसावी

{पूजा पवार, मी आपणास ऑर्कुट}

पूजा पवार, मी आपणास ऑर्कुट समूहापासून ओळखतो, आणि माझ्यामते आपण १०० टक्के तेथील एक फेक प्रोफाईल आहात, जे मुददाम इथेही नेहमीसारखे कांड्या लावायला आला आहात, म्हणून मला एका फेक व्यक्तीमत्वाशी वाद घालण्यात रस नाही.. आपणही माझ्या या इच्छेचा आदर करावा अशी विनंती..

अवांतर - अरे यार हे विनम्रतेने लिहिणे किती कठीण असते ना.. कसे जमते काही लोकांना... Sad


... तुमचा अभिषेक

{विषयांतर करून उगाच व्ययक्तीक}

विषयांतर करून उगाच व्ययक्तीक होण्याची गरज नाहीये...
अन विनम्रपना आतून असेल तर साहिजिक येतो, अथवा कठीण वाटत...

{मुदत किति वाढलीय हे जाणून}

मुदत किति वाढलीय हे जाणून घेण्यास उत्सुक आहे...

{वरील धाग्यामध्ये / पोस्ट}

वरील धाग्यामध्ये / पोस्ट मध्ये दिनांक दिली आहे ( ३०/०१/२०१२)


Hope is a good thing...

{'More is Better' हे अनेकदा}

'More is Better' हे अनेकदा खर नसत .. तरी त्या मोहात फक्त माणसच नाही तर संस्थळही पडतात (कारण ती माणसच चालवतात..). असो.

{लिहायला घेतली आहे.}

लिहायला घेतली आहे.

{नियमानूसार इतर संकेतस्थळावर}

नियमानूसार इतर संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेले लेखन चालणार नाही आहे, फक्त लेखकाच्या स्वतःच्या ब्लॉगवर प्रकाशित झालेले लेखनच पुर्वप्रकाशित म्हणून चालेल, याचा विसर पडलेला दिसतो आहे अनेकांना wink


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{व्यवस्थापक,}

मी स्पर्धेत आधीच तीन कथा टाकल्या होत्या, पण मुदत वाढली, त्यामुळे आणखी एक कथा लिहावीशी वाटली, म्हणून इथे चार प्रवेशिका टाकता येतील का असे विचारले होते, पण त्यावर पुढे उत्तर नाही आले, हरकत नाही, पण डोक्यात एक विषय आहे, जर लिहिलीच कथा तर आधीची एखादी प्रवेशिका स्पर्धेतून मागे घेऊन त्या जागी स्प्रधेला नवीन कथा टाकू शकतो का?

सहकार्य अपेक्षित,
तुमचा अभिषेक


... तुमचा अभिषेक

{चालेल. मागे घेतलेली प्रवेशिका}

चालेल.
मागे घेतलेली प्रवेशिका आस्वाद लेखन मध्ये जाईल, आधी तुम्ही मागे घेणार्‍या प्रवेशिकेचे नाव मला व्यनीतून कळवा त्याचा विभाग बदलल्या नंतर तुम्ही नवीन प्रवेशिका प्रकाशित करू शकता.


Hope is a good thing...

{प्रवेशिका पाठवण्यासाठी शेवटचे}

प्रवेशिका पाठवण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिले आहेत याची नोंद घ्यावी.


Hope is a good thing...

{प्रवेशिका पाठवण्यासाठी आज (३०}

प्रवेशिका पाठवण्यासाठी आज (३० जानेवारी २०१२) शेवेळेनूसार, भारतीय वेळेनूसार रात्री १२.०० पर्यंत येणार्‍या प्रवेशिका ग्राह्य धरल्या जातील.

सर्वांचे मनःपुर्वक आभार व स्पर्धकांना शुभेच्छा.


Hope is a good thing...

{सर्व स्पर्धाकांना शुभेच्छा}

सर्व स्पर्धाकांना शुभेच्छा हास्य


Hope is a good thing...

{कधी कळणार निकाल???}

कधी कळणार निकाल???

{लवकरच घोषणा होईल. निकालाची}

लवकरच घोषणा होईल.
निकालाची तारीख आज/उद्या कळवली जाईल सर्वांना.
हास्य


Hope is a good thing...

{निकाल नाही तर निकालाची तारीख}

निकाल नाही तर निकालाची तारीख तरी कळवावी...
Crazy

{तुम्हाला वाचता येत नसेल तर}

तुम्हाला वाचता येत नसेल तर दोष तुमचा. wink
लेखात पहिल्यापासून लिहलेले आहे की २८ फेब्रुवारीच्या आसपास निकाल जाहीर होईल.


Hope is a good thing...

{अद्याप १५ दिवस बाही आहेत.}

अद्याप १५ दिवस बाही आहेत. Sad


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{२८ फेब्रुवारी वाचली होती...}

२८ फेब्रुवारी वाचली होती... अन् गेलीही...
आता आसपासची वाट बघावी लागणार वाटत...
तसही निट वाचता न येण्याचा दोष आहेच मुळात...

{काढा काढा रे हा धागा वर}

काढा काढा रे हा धागा वर त्याशिवाय राजेला जाग यायची नाही ! Big smile

{गेल्या स्पर्धेचा बक्षिस}

गेल्या स्पर्धेचा बक्षिस समारंभ होळीला होता. आता बहुतेक या स्पर्धेचा निकाल होळीला लागणार. मालकांना होळी हा सण जास्त प्रिय असावा. हास्य


Quickly, bring me a beaker of wine, so that I may wet my mind and say something clever.

{बोंबाबोंब करायला जरा जास्तच}

बोंबाबोंब करायला जरा जास्तच आवडते मला wink


Hope is a good thing...

{शिमगा हा जास्त योग्य शब्द आहे}

शिमगा हा जास्त योग्य शब्द आहे त्यासाठी


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{होली कब है, कब है होली ?}

होली कब है, कब है होली ? Evil

{स्पर्धेचा निकाल कधी? }

मालक स्पर्धेचा निकाल कधी?

वाट पाहुनी जीव शिणला, महिन्यांमागून महिना सरला Crazy

उत्तेजनार्थ Beer हे घ्या म्हणजे निकालाच्या मागे लागण्यासाठी तुम्हाला उत्तेजना मिळेल


मी एक पुस्तकवेडा
http://pustakveda.blogspot.com/

{सहज आठवले..!!}

मागे मी एमपीएससी ईंजीनीअरींग सर्विसेस २००७ ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने २००८ साली दिली होती जिचा निकाल २००९ साली लागला होता आणि त्याचीच पुढची पायरी २००९ साली झालेल्या तोंडी मुलाखतीचा निकाल लागेपर्यंत २०१० उजाडले आणि त्यानंतर मी सिलेक्ट झाल्यावर पोस्टींग मिळेपर्यंत २०११ च उजाडणार होते.. पण वाचलो आणि नोव्हेंबर-डीसेंबर २०१० दरम्यान हातात सरकारी खात्यात जमा व्हायचे लेटर आले.. हास्य


... तुमचा अभिषेक