ही म्हण कशावरुन आस्तित्वात आली असावी.
मराठीत बर्याच म्हणी /वाक्प्रचार आहेत आहेत त्याना काही प्रसंग कारणी भूत आहेत.
उदा:होता जीवा म्हणून वाचला शिवा / गड आला पण सिंह गेला / छातीचा कोट करणे / अमक्यातमक्याचा कात्रज करणे, ध चा मा करणे, अशा बर्याच म्हणी/वाक्प्रचाराना ऐतिहासीक संदर्भ आहेत.
काथ्या कूटणे वगैरे वाक्प्रचाराना देखील ऐतीहासीक शिक्षेचा संदर्भ आहे.
,रण माजणे ,धराशायी होणे या वाक्प्रचाराला तर युद्धाचा संदर्भ आहे.आजीबाईचा बटवा याला त्यातील कोण्या एका आजीबाईने बटव्यात ठेवलेल्या औषधोपचारांची संदर्भ आहे.
मात्र काही म्हणी/वाक्प्रचारांचे संदर्भ लागत नाहीत.
उदा:आपले ठेवायचे झाकुन अन दुसर्याचे बघायचे वाकून" ही म्हण कशामुळे आलेली असावी बरे?
अशा काही म्हणी तुम्हालाही आठवत असतील तर
.jpg)
{(विषय दिलेला नाही)}
{तुम्ही तुमच्या घरी आई, बायको,}
तुम्ही तुमच्या घरी आई, बायको, मुलगी समोर अश्या प्रकारच्या म्हणींचा वापर करता का ?
करत नसाल अशी आशा मग येथे सार्वजनिक ठिकाणी तुम्ही असल्या गोष्टीवर चर्चा करत बसणार आहात का? येथे देखील स्त्रीया, मुली येतात तेव्हा सभ्यता पाळावी असे संकेत आहेतच की.
सदर लेखन काढून टाकावे अशी मी मागणी करते आहे.
{किंचित असहमती. अशा प्रकारच्या}
किंचित असहमती.
अशा प्रकारच्या म्हणी सर्वसाधारण चर्चेत वापरल्या जातात.मिंम हे घरातील सदस्यांचे चर्चास्थान नसून समाजातील चर्चेचे प्रतिबिंब येथील चर्चेत पडते पडावे
त्यामुळे ह्या म्हणीवर चर्चा झाल्यास त्यात वावगे असे मला तरी काही वाटत नाही.
बाकी या म्हणीचा उगमस्थान समजून घेणे आवडेल हे नक्की
{पुर्ण असहमती. सामाजिक}
पुर्ण असहमती.
सामाजिक प्रतिबिंब असे म्हणून याकडे दुर्लक्ष केले तर द्विअर्थी व लैंगिकतेकडे झुकत जाणार्या लेखनाचा भडिमार येथे होईल. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या संकेतस्थळावर असे घडले आहे अथवा घडत आहे. याकडे कानाडोळा करू नये.
दुसरा मुद्दा येथे स्पष्ट लिहीत नाही परंतू तुम्हाला व्यनी करून कळवते.
{संपुर्ण असहमती}
कोणत्या म्हणी अश्लील वाटल्या? अन तुम्हालाच फक्त त्या तशा वाटताहेत याचा अर्थ तुम्ही तुमची मानसिकता थोडी खुली ठेवावी जी माझ्या आजीच्या वयाच्या लोकांचीसुद्धा आहे. कित्येक म्हणी सर्रास वापरल्या जातात त्यातुन तुम्ही वाटेल तो अर्थ वाटेल त्या वाक्यातुन घेउ शकताच की...असो.
आतातायीपणा करुन लेखन काढावे असे यात काहीही नाही असं माझं मत.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket
{ही म्हण मराठीत सर्वसामान्य}
ही म्हण मराठीत सर्वसामान्य आहे. यात असभ्य किंवा लैंगीकतेकडे झुकणारे काय आढळले हे ठाऊक नाही.
चिंवी जोशी ( चिमणराव ), वसंत सबनीस, यानी या म्हणीचा वापर केलेला मला ठाऊक आहे.
चिंवि जोशींचे साहित्य घरात आई, बायको, मुलगी समोर वाचण्याजोगे नसते असे का तुम्हाला म्हणायचे आहे.
माझ्या पहाण्यात अशा अनेक म्हणी आहेत की ज्या माझ्या आजीच्या वयाच्या स्त्रीया देखील नि:संकोच सर्वत्र वापरत असतात. त्याना असे बोलण्यात काही गैर आढळले नाही.
तुकाराम महाराजांच्या अभंगात तर याहुनही कितीतरी जास्त स्पष्ट शिव्या आढळतील.
साधारण पन्नास एक वर्षापूर्वीच्या लग्न पत्रीकेत विवाह या ऐवजी शरीरसंबंध हा शब्द सर्रास वापरला जायचा.
लग्नात नवरा बायकोने विडा तोडणे वगैरे प्रकार चालायचे. त्यात त्याकाळीही कधी कोणाला अश्लील असे वाटले नव्हते.
काही म्हणी थट्टीखोर असतात. ते त्या भाषेचे सौंदर्य असते.
राहिला प्रश्न श्लील अश्लीतेचा तर मग शंकराच्या पिंडीचे दर्शन्तरदेखील अश्लील मानावे लागेल.
सभ्यता पाळावी असे संकेत आहेतच की.
कोणे एके काळी पुण्यात एक गृहस्थ अश्लील मार्तम्ड म्हणून कुप्रसिद्ध पावले होते . त्याना शेळी रस्त्याने जाते यात देखील अश्लीलतेचा वास यायचा म्हणे. मराठीतली एक जुनी म्हण आनि त्याचा उद्गम विचारणे यात मी कोणत्या सभ्यतेचा भंग केला आहे असे मला वाटत नाही.
सभ्यता म्हणजे काय हे कोणी कोणाला शिकवु नये.
सदर लेखन काढून टाकावे अशी मी मागणी करते आहे
हा आक्रस्ताळेपणा आहे असे मी म्हंटले तर ते चालेल का.
असो: दूरदर्शनवर करवाचौथ /सुहाग रात वगैरे सण आवडीने सहकुटुंब पहाताना काय करताहो तुम्ही.
घरातील स्त्रीया ना दुसर्या खोलीत पाठवता की काय?
अवांतरः "मालवून टाक दीप चेतवुनी अंग अंग" किंवा "मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे" या सुरेश भटांच्या गजला तुम्ही कधी ऐकल्या आहेत का हो?
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
{शांत गदाधारी भीम शांत !!!!}
शांत गदाधारी भीम शांत !!!!
Hope is a good thing...
{(विषय दिलेला नाही)}
********************************************************
"When you are just about to finish your journey, LIFE changes your destination."
{या ही पेक्षा}
आमच्या ग्रामीण भागात तर याही पेक्षा खतरनाक म्हणी आहेत व त्यांचा मुक्तहस्ते वापर सुद्धा होतो.
कधी वेळ मिळाला तर इथे डोकाऊन बघा... http://www.amolmendhe.co.cc
{ती डोकाउन बघायला सांगणारी}
ती डोकाउन बघायला सांगणारी तुमची सही आहे का? मधे काहीतरी स्टार किंवा आडवी रेषा वगैरे टाका...गैरसमज होतोय.
http://shilpasview.blogspot.com/
http://facebook.com/shilpket