हिरवे डोळे
खरं तर किती तरी दिवसांपासुन तुम्हाला सांगायचं होतं. पण आज सांगु उद्या सांगु करता करता बरेच दिवस झाले. खरं तर आधी सांगायला हवं होतं पण नाही सांगितलं. आता का नाही सांगितलं असं विचारलं तर मी म्हणेन असंच नाही सांगितलं. पण आता जेव्हा विचार करतो तेव्हा जाणवतं आहे की ती एक पळवाट होती. मलाच सांगायचं नव्हतं हे महत्वाचं होतं. मग त्यासाठी अनेक वेळेला मनात येवुनही मी टाळलं. कारणं बरीच दिली पण महत्वाचं कारण हेच होतं.
पण आता मी ठरवलं. जे काही आहे ते स्पष्ट सांगायचंच. जे काही घडलं ते तसंच सांगायच. काय होईल जास्तीत जास्त ? काहीही होणार नाही. जे घडलं ते घडलं. नाही का ? त्यात तर आता बदल करता येत नाही. मग उगाच लपवायचे कशाला ? जितकं लपवु तितका त्रास अजुन वाढणार. मनातल्या मनात खुप काही ठेवलं की ते अचानक कधीतरी बाहेर पडतं. त्यापेक्षा आपणच त्याला वाट देवुन बाहेर काढलं तर जास्त बरं नाही का होणार असा विचार मनात करुन मी एकदाचा निर्णय घेतला. सांगायचंच. जसे घडले तसे सांगायचे.
दोनतीन महीने झाले असतील नसतील. जास्तच झाले असतील कदाचित. हल्ली तसेही लक्षात रहात नाही. सीएसटी कडे चाललो होतो. फास्ट लोकल होती. दुपारची वेळ असल्याने जरा गर्दी कमी होती. दादरला बरेच लोक उतरले. मधे फक्त भायखळा आणि मग सीएसटी. भायखळा आलं. गाडी थांबली. दोन चार उतरले. एक जण चढला. गाडी काही सुटेना. असं सहसा होत नाही. लगेच गाडी सुटते. पण आज जरा जास्तच थांबली.
जरा वेळ गाडीत थोडावेळ फलाटाकडे पहात होतो तेवढ्यात सुटली. स्टेशनपासुन जरा अंतर जात नाही तोच परत थांबली. पाच दहा मिनिटांनी परत सुटली, लगेच थांबली. थोडं थोडं सरकतच चालली होती. काहीतरी लोचा झालेला दिसतोय असा मनाशी विचार करत दारात येवुन उभा राहिलो. बहुधा सिग्नलचा काही तरी लोचा झाला होता. सगळ्याच गाड्या हळुहळू सीएसटीकडे सरकत होत्या. दारातुन पुढे उभ्या असलेल्या, दुस-या लाईनवरच्या गाड्या दिसत होत्या. कितीवेळ असं रखडावं लागेल कुणास ठाउक असा विचार करुन मी उतरुन जावे की काय असा विचार करत होतो. पण मला आज आरबीआयला जायचे होते, मस्जिदला काम असतं तर पटकन उतरुन चालत गेलो असतो. शेवटी जे होईल ते होईल असा विचार करत समोरच्या लाईनवरच्या गाड्या पहात होतो. कधी कधी बघण्यालायक गोष्टी असतात. तेवढेच तिकीटाला खर्च केलेले पैसे वसुल.
तेवढ्यात पलिकडची लाईन सुरळीत झाली आणि तिकडच्या गाड्या पटापट पुढे सरकु लागल्या. तेवढ्यात मला तो दिसला. हो तोच होता तो. त्याचे नाव नक्की काय हे कधीच कळलं नाही. पण नाव कळुन तरी काय उपयोग होता. नाव सुद्धा बदलुन वावरता येतेच की. आणि तो तर त्यात भलताच तरबेज होता. तो नक्कीच असणार ही मला खात्री वाटत नव्हती. पण डोळे कधीच दगा देणार नाहीत. तेच डोळे. हिरवट झाक असलेले थंड डोळे. रोखुन पहायचा तो. आवाज तर जसा खोल विहिरीतुन आल्यासारखा. एकसुरी. निष्प्राण. पण मनाची पकड घ्यायचा. किंचित तुमचे मन तुमच्या ताब्यातुन गेले की घेतलाच त्याने ताबा. मग मुकाट्याने तुम्ही तो म्हणणार ते करणार. मी त्याला ओळखुन होतो. पण बरेच दिवसांत त्याची बातमी कळली नव्हती. आधी तर मला तो मेला असेल असंच वाटलं होतं. पण नाही. तो जिवंत होता. चांगला टुणटूणीत होता. तेच थंडगार हिरवे रोखुन बघणारे डोळे. फक्त शरीर बदललं होतं.
तेवढ्यात गाडी पूढे निघुन गेली. तो जसा अचानक दिसला तसा मनात हजार प्रश्न सोडुन गेला. सीएसटीवर उतरलो. इकडं तिकडं पाहिलं. तो दिसणारच नव्हता. पण खुळी आशा. बाहेर पडलो. काम करण्याच्या नादात पुढं दोन तीन दिवस त्याच्यावर विचार करायला वेळच मिळाला नाही. चार दिवसांनी कल्याणकडे जाणा-या लोकलमधे बसलो होतो. जराशी गर्दी होती. पण बसायला मिळालं. गाडी चालत होती. मनात अनेक विचार होतेच. त्यातच त्याचा पण विचार मधे मधे येत होता. समोरचा माणुस पेपर वाचत होता तर बाजुचा शब्द कोडं सोडवत होता. कोप-यातलं जोडपं संसाराच्या गप्पा मारत होतं. दोन चार पोरं उनाड गप्पा मारत होती. खिडकी बाहेर पाहुन कंटाळा आला म्हणुन समोरच्याच्या पेपरच्या मागील बाजुवर नजर टाकली.
कोप-यात एक जाहिरात होती. भरपुर पैसे कमवायचे आहेत ? फोन करा *******. ती जाहीरात पाहुन मला हसु आलं. लोकं पैशासाठी काहीही करायला तयार होतात. अगदी जीव सुद्धा धोक्यात घालतील. आणि अचानक मला आठवलं. अरे ही तर त्याचीच पद्धत. हो त्याचीच. अशीच जाहीरात द्यायचा तो.. आणि मासा गळाला लागला की..पण हा कशावरुन तोच असेल. कारण मागच्या प्रकाराला सुद्धा पाच सहा वर्षे झाली होती. तेव्हाच तो आणि मी समोरासमोर आलो होतो. आणि तो गायब झाला होता. माझ्या एका मित्राला त्याने नादी लावलं होतं. मित्र तेव्हा खुप अडचणीत होता. पैशाची नितांत गरज होती त्याला. तेव्हा जाहिरात पाहुन मला म्हणाला बघतो मी हे काय आहे ते. मी त्याला सांगितले खूळे पणा आहे रे सगळा हा, उगाच फसु नकोस. पण त्याने ऐकले नाही. त्याने त्याच्याशी संपर्क साधलाच. त्यांचं काय बोलणं झालं माहीत नाही. पण मित्रानं बरंच काही काही सामान घरी आणलं होतं. ते पाहुन मी पार चक्रावलो होतो. हे काही वेगळंच आहे तु या भलत्या फंदात पडु नकोस असं सांगुनही मित्राने काही ऐकले नाही. अखेरीस अमावस्येला त्याने एका ठिकाणी बोलावलं. मित्र गेला. जातांना मला सांगुन गेला. मी तरी सांगितले जाउ नकोस. पण ऐकले नाही.
रात्री बारा साडेबाराला मला राहवले नाही. मी उठलो. त्या ठिकाणी गेलो. समोर चिता धडधडत होती. एकीकडे मित्र बसला होता उघडाबंब. समोर एक मध्यमवयाचा माणुस डोळे मिटुन काहीतरी पुटपुटत बसला होता. मधे छोटे कुंड होते त्यात मधुन काहीतरी टाकायचा, धाडकन ज्वाळा उठायच्या. माझं डोकं गरगरायला लागलं. मी जोरात मित्राच्या नावानं ओरडलो. त्याबरोबर त्या माणसाने डोळे उघडुन मला पाहिलं. हिरवेगार डोळे. भेदक नजर. ते बघत असतांनाच त्या माणसाने काही तरी मोठ्याने बोलत त्या कुंडात टाकलं. जोरदार आवाज येवुन ज्वाळा भडकल्या. सगळीकडे धूर धूर झाला. काहीच दिसेनासे झालं. दहा पंधरा मिनिटांनंतर जरा दिसायला लागलं. मी डोळे फाडुन फाडुन पहात होतो. तर तिथे तो माणुस पालथा पडलेला दिसला. मी जवळ गेलो. बहुधा तो मेला असावा. बरं झालं असा विचार करुन मी मित्राला शोधत होतो. चितेच्या बाजुला मित्र पाठमोरा उभा होता. मी जवळ गेलो. पटकन इथुन जावु असे त्याला म्हटले. तो हळुच वळला आणि माझ्या कडे पाह्यले. मी जागच्या जागी थबकुन गेलो. दोन हिरवेगार डोळे माझ्याकडे पहात होते. खोल आवाज आला माझ्या मागे येवु नकोस... जे घडले ते विसरुन जा... परत मागे येवु नको. आणि तो शांतपणे चालायला लागला.
मी मटकन खाली बसलो. काय घडलं हे मला काहीच कळत नव्हतं. हळुहळू लक्षात यायला लागलं. त्याने माझ्या मित्राच्या शरीरात प्रवेश केला होता. मग माझा मित्र कुठे गेला ? मी रडत रडतच परत आलो. कुणाला काय सांगणार ? कसं सांगणार ?
खरं तर किती तरी दिवसांपासुन तुम्हाला सांगायचं होतं. पण आज सांगु उद्या सांगु करता करता बरेच दिवस झाले. खरं तर आधी सांगायला हवं होतं पण नाही सांगितलं. आता का नाही सांगितलं असं विचारलं तर मी म्हणेन असेच नाही सांगितलं. पण आता जेव्हा विचार करतो तेव्हा जाणवतं आहे की ती एक पळवाट होती. मलाच सांगायचं नव्हतं हे महत्वाचं होतं. मग त्यासाठी अनेक वेळेला मनात येवुनही मी टाळलं. कारणं बरीच दिली पण महत्वाचं कारण हेच होतं.
मला हे सगळं आठवलं ती जाहिरात पाहुन. परवाच मला तो लोकलमधे दिसला होता. शरिर बदललं होतं. म्हणजे माझ्या मित्राच्या शरीरात त्याला पाहुन पाच वर्षे झाली होती. मधल्या काळात किती शरीरं बदलली असतील ते माहीत नाही. कदाचित एक कदाचित पन्नास. हे कुठेतरी थांबायलाच हवे. कुणाला सांगुन उपयोगच नव्हता. कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नसता. मलाच वेडा ठरवलं असतं. अर्थात मला तरी आधी कुठे अशा गोष्टींवर विश्वास होता ? प्रत्यक्ष मित्राच्या बाबतीत घडलेलं समोर पाहुनच माझा विश्वास बसला. मनाशी ठरवलं. समोरच्या जाहिरातीतला नंबर लिहुन घेतला.
बराच वेळा फोन केल्यावर त्याने उचलला. तोच एकसुरी आवाज. जुजबी बोलणं झाल्यावर त्याने मला भेटायला बोलावलं. शहाडसारख्या दूरच्या उपनगरात एका खोलीत रहात होता. मी गेलो. त्याने मला ओळखलं नसावं. मी मात्र चटकन त्या हिरव्या डोळ्यांमुळे ओळखलं. तोच होता. आता पक्की खात्री पटली. हो ना करता करता त्याने काय करावं लागेल याची कल्पना दिली. तशी माझ्या मित्रामुळे मला माहिती होतीच, पण मी ओळख दिली नाही. त्याने दिलेल्या सामानाची यादी घेवुन आलो. सगळं सामान मिळाल्यावर त्याला कळवलं. तो योग्य दिवशी मला कळवणार होता. वाट पहात होतो. एके शुक्रवारी फोन आला. दुस-या दिवशी रात्री ९ वाजता एका ठिकाणी बोलावलं होतं. पुढे एक गाव होतं त्याच्या बाजुला. मी तयारी करुन गेलो. जवळ गरज पडल्यास उपयोगी पडेल तर असु द्यावा म्हणुन एक धारदार चाकु सुद्धा ठेवला होता.
कुणाला काही सांगायची गरजच नव्हती. आणि सांगायचं झालं तरी कुणाला सांगायचं. त्याने सांगितलेल्या रस्त्यावर वाट पहात होतो. थोड्या वेळातच आला. त्याच्या मागोमाग पायवाटेने चालु लागलो. दुर वस्तीच्या खुणा होत्या. आजुबाजुला पाहिलं तर एक स्मशानच होतं ते. विझत आलेली चिता होती. दोन चार चुकार कुत्री भटकत होती. त्याने काही लाकडं चितेत टाकुन ती परत पेटवली. जाळ झाला. उजेडात जरा दिसायला लागलं. त्याची सगळी लगबग मी पहात होतो. काय करायचं कसं करायचं यावर विचार करत होतो. पूजा मांडून झाल्यावर त्याने मला कपडे काढुन बसायला लावले. मी बसलो. त्याचे पुटपुटणे सुरू झाले.
समोरच कुंडात मधुन मधून काहीतरी टाकणं चालू होतं. बसतांना मी गुपचुप चाकु मांडीखाली घेवुन बसलो होतो तो चाचपुन पाहिला. त्याने डोळे मिटलेले होते. मी चाकु उघडला. हातात नीट घेतला. आणि समोर त्याच्यावर वार करण्यासाठी उगारला. तेवढ्यात त्याने डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, राग दिसला. जोरात पुटपुटत त्याने काही तरी त्या कुंडात टाकले त्याचक्षणी मी त्याच्यावर जोरदार चाकुचा सपासप वार केला. सगळीकडे धुर धुर झाला. काही दिसेना. पाच दहा मिनिटे गेली. जरा दिसायला लागले. कुंडात थोड्या ज्वाळा होत्याच. चिता थोडी थोडी पेटलेलीच होती. बाजुला तो उताणा पडला होता. चाकु पोटात खुपसलेला होता. जवळ जावुन पाहिलं. मेला होता. हुश्श करुन मी तिथुन निघालो.
मुख्य रस्त्यावर बाजुला गाडी लावली होती. भरकन काढली. घरी आलो. मनानं आणि शरीरानं इतका थकलो होतो की आल्या बेडवर पडलो आणि झोपुन गेलो. सकाळी उठल्यावर खुपच ताजं तवानं वाटत होतं. मनावरचा इतके दिवसांचा भार गेल्यासारखं वाटत होतं. आंघोळीला गेलो. शॉवर खाली बराच वेळ उभा राहिलो. कालच्या झटापटीत मला काहीच लागलं नव्हतं. आंघोळ झाल्यावर बरं वाटलं. कपडे केले. बाहेर आलो.
खरं तर किती तरी दिवसांपासुन तुम्हाला सांगायचं होतं. पण आज सांगु उद्या सांगु करता करता बरेच दिवस झाले. खरं तर आधी सांगायला हवं होतं पण नाही सांगितलं. आता का नाही सांगितलं असं विचारलं तर मी म्हणेन असेच नाही सांगितलं. पण आता जेव्हा विचार करतो तेव्हा जाणवतं आहे की ती एक पळवाट होती. मलाच सांगायचं नव्हतं हे महत्वाचं होतं. मग त्यासाठी अनेक वेळेला मनात येवुनही मी टाळलं. कारणं बरीच दिली पण महत्वाचं कारण हेच होतं.
पण तुम्हाला जे सांगायचे आहे ते मी अजुनही सांगितलेलं नाही. ते सांगावं की नाही याच संभ्रमात मी आहे. मला वाटतं कदाचित तुम्ही ते ओळखलं असेल. मला विश्वास आहे तुम्ही तितके हुशार नक्की आहात. पण मला खात्री नाही की मला जे सांगायच होतं ते तुम्हाला असं कळेल की नाही. म्हणुनच मी निश्चय केला की तुम्हाला ते सांगुनच टाकायचं.
कपडे करुन बाहेर आल्यावर माझी नेहमीची पद्धत असते. शांतपणे आरशात पाहुन भांग पाडायची. अजुनही काळेभोर भांग पाडण्यालायक केस आहेत तोवर भांग पाडायला काय हरकत आहे असा विचार करुन सकाळची पाच मिनिटे मी त्यात रोज घालवतो. केस खसखसुन पुसुन हातात कंगवा घेउन मी आरशासमोर उभा राह्यलो आणि समोर पाहिले. समोरुन दोन हिरवेगार डोळे माझ्याकडे रोखुन पहात होते.

.jpg)
:-)
झान्टॅमॅटीक श्टोरी आवडली.
ह्म्म
वा काय स्टोरी आहे
मस्त....
काटा किर्र कथा!
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
मस्तच...
मस्त कथा.
खरं तर किती तरी दिवसांपासुन तुम्हाला सांगायचं होतं. पण आज सांगु उद्या सांगु करता करता बरेच दिवस झाले. खरं तर आधी सांगायला हवं होतं पण नाही सांगितलं. आता का नाही सांगितलं असं विचारलं तर मी म्हणेन असेच नाही सांगितलं. पण आता सांगतेय्.........लिहीत रहा....!
अग्गगागा ! लै भारी !!!!
अग्गगागा !
लै भारी !!!!
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
लै
लै भारी नाना.
बरे झाले बुवा नाना मला
बरे झाले बुवा नाना मला भांगपाडण्यासाठी आरशात पहावे लागत नाही
--------------------------------------------------------------------------
एकमेकाना समजून घेताना तुम्ही एकमेकांशी काय बोलता हे महत्वाचे नसते
संवाद थाम्बवल्यानन्तर तुम्ही किती मह्त्वाचे बोलायचा याचेही महत्व नसते
तुळतुळित विजुभाऊचा चेहरा नजरे
तुळतुळित विजुभाऊचा चेहरा नजरे समोर आला
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
नानबा.. मस्त कथा...
नानबा..
मस्त कथा...
-निखिल
+१
छान कथा आहे रे नान्या.
पण खरं सांगु, कथा वाचताना शेवट काय असेल त्याचा करेक्ट अंदाज आला होता.
मात्र तिथपर्यंत न्हेण्याची शैली वाखाणण्याजोगी आहे, अभिनंदन !
असेच सुरेख लेखन अजुन येऊदेत.
बरं मग? अवांतरः आज किती
बरं मग?
अवांतरः आज किती प्रतिसादाची सुपारी आहे?
+१ सहमत!!!
+१ सहमत!!!
लै भारी रे नान्या.....
तरी सांगितल तुला , एकटा दुकटा या वयात असा कुठेही फिरु नकोस म्हणुन.
ह्यवरुन मी एक निश्कर्श
ह्यवरुन मी एक निश्कर्श काध्लाय कि नाना सेन्त्रलवाला आहे
हिपनोटाइज्झड..
वाचताना हिपनोटाइज्झड झाले,
स्वाती
ठीक
आधिच अंदाज आल्याने कथा तशी ठिक वाटली, शेवट खास नाही वाटला
पुलेशु
चेतन
जबरा ..
जबरदस्त कथा ...
आता कुठे जाहिरात असेल तर त्यामध्ये तुमचा नंबर असेल काय हो
अंमळ नान्याच्या प्रतिबिंबाची
अंमळ नान्याच्या प्रतिबिंबाची आठवण झाली रे.....
अपेक्षित शेवट... पण नानाची
अपेक्षित शेवट... पण नानाची शैली चांगली आहे. शेवटपर्यंत ओढत नेतो...
+१ असाच ओढत नेला गेलेला!
(काळ्या डोळ्यांचा)चतुरंग
मस्त गोष्ट
अजून येऊ दे अश्या गोष्टी
-ऋ
मस्त कथा आहे. मला वाटले की
मस्त कथा आहे.
मला वाटले की हिरवा माज वैगेरे सारख आहे की काय.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
जबरदस्तच
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
नानांचे हिरवे डोळे...
"नानांचे हिरवे डोळे" ही कविता आठवली (संदर्भः बिगरी ते मॅट्रीक, लेखक कोण ते विसरलो बहुतेक.
)
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
बापरे काय भयानक लिहीलंय, ते
बापरे काय भयानक लिहीलंय, ते हिरवे डोळे तर स्वप्नातही आले माझ्या...
दिपाली
मस्त.
मस्त.
बळीराजा डॉट कॉम
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
आयला! भारीये राव हे! म्हातारं
आयला!
भारीये राव हे!
म्हातारं व्हायची बातच नश्शे...आला कंटाळा की बदलली बॉडी!
भारी लिहिलंय रे नानुस!! ड्येंजर एकदम
-(तपकिरी डोळे) ध.
अपेक्षित शेवट. कथेची मांडणी
अपेक्षित शेवट.
कथेची मांडणी आवडली.
- प्राजु
छानच. पण अजून थोडा धक्कादायक
छानच. पण अजून थोडा धक्कादायक शेवट आवडला असता. असो.
-पुण्याचे पेशवे
सुंदर लिखाण.......अप्रतिम
सुंदर लिखाण.......अप्रतिम
रत्नाकर मतकरींच्या कथांची
रत्नाकर मतकरींच्या कथांची आठवण झाली...
आपला स्नेहांकित...
-अशोक
कथा आवडली. नानांची बदललेली
कथा आवडली.
नानांची बदललेली इमेज डोळ्यात भरली!
भन्नाट
भन्नाट
*************************************************************************************
आपले मत ठामपणाने आणि स्पष्टपणाने मांडा, त्याचा फायदा इतरांनाही होतो.
ऐसी अक्षरे मेळविन
छान कथा आहे, कथेची मांडणी
छान कथा आहे, कथेची मांडणी आवडली.