नमस्कार मंडळी,
आजकाल आपण (म्हणजे आपल्यातले बरेचजण, सगळेच नव्हे!) मराठी माणूस कसा दुर्लक्षित केला जातो, त्याला कसं डावललं जातं अशा प्रकारची बर्याचदा चर्चा करत असतो. आपला मित्र मी मराठीकर 'सुहास'सारखे काही लोक शक्य तितकी मदतही करत असतात.
नुकतंच आपल्या मीमराठीकर सदस्या वरदाताई हिनं तिला आलेल्या 'न्यु जर्सी मराठी' इथुन आलेल्या नोकर्यांच्या संधींची माहिती देणारा एक विरोप पाठवला. वरदाताईला वेळ मिळेलच ह्याची खात्री नसते, तेव्हा तीने हे काम माझ्याकडे सोपवलं, तेव्हा म्हणलं वेळ दवडायला नको. लगेच धागा काढुया.
तर सर्वप्रथम अत्यंत उपयोगी अश्या संकलीत माहितीसाठी वरदाताई आणि 'न्युजर्सी मराठी' ह्यांचे मनापासुन आभार!
तर मित्रांनो, ह्याचा फायदा घेऊ शकतील असे कोणी तुमच्या ओळखीत असतील तर त्यांना आवर्जुन कळवा.
*मुळ विरोपामध्ये असलेल्या, परंतु शेवटची तारीख उलटुन गेलेल्या संधी वगळल्या आहेत.
नोकर्यांच्या संधी खालीलप्रमाणे:
--------------------------------------------------------------------------------------------
ठाणेपोलीस दलात शिपाई पदाच्या ६७० जागा
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती अंतर्गत ठाणे शहर पोलीस दलात पोलीस
शिपाई (६६८ जागा), बँडसमन (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती
दि. ८ मार्च २०१० रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम, ठाणे शहर येथे होणार
आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.
भंडारा जिल्हा न्यायालयात १३० जागा
भंडारा जिल्हा न्यायालयात बेलिफ (३० जागा), शिपाई (२५ जागा), कनिष्ठ
लिपिक (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख
१५ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बँक ऑफ इंडियामध्ये ४२ जागा
बँक ऑफ इंडियामध्ये सुरक्षा सल्लागार (१ जागा), तांत्रिक अधिकारी (२
जागा), फायनान्स एक्झिक्युटिव्ह (३९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑन
लाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक
माहिती www.bankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची
जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३ फेब्रुवारी २०१० रोजी प्रसिद्ध
झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६२ जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये
विभागातील अधिव्याख्याता (६२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज
करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर
जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २९ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध
झाली आहे.
पुणे येथील सी डॅक केंद्रात २३ जागा
पुणे येथील प्रगत संगणक विकास केंद्र (सीडॅक) येथे प्लेसमेंट
एक्झिक्युटिव्ह (१ जागा), प्लेसमेंट असिस्टंट (२ जागा), मार्केटिंग
एक्झिक्युटिव्ह (२ जागा), कॉन्सुलर (२ जागा), सेक्रेटरी (५ जागा), अकाउंट
असिस्टंट (१ जागा), हिंदी ऑफिसर (१ जागा), रिसेप्शनिस्ट (३ जागा),
मल्टिफंक्शनल स्टाफ (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.cdac.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बेस्टमध्ये प्रशिक्षणार्थी तारतंत्रीच्या ३३ जागा
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमात (बेस्ट) प्रशिक्षणार्थी
तारतंत्री (३३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची
तारीख २२ फेब्रुवारी २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै.
लोकमतमध्ये दि. २८ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञाच्या ११ जागा
राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ (११ जागा) हे पद भरण्यात येणार
आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०१० आहे.
अधिक माहिती http://www.nplindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सशस्त्र सीमा दलमध्ये खेळाडूंसाठी १४२ जागा
सशस्त्र सीमा बलमध्ये खेळाडूंसाठी कॉन्स्टेबल-पुरुष (१४० जागा),
कॉन्स्टेबल-स्त्री (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची
शेवटची तारीख १० मार्च २०१० आहे. अर्ज व अधिक माहिती
http://www.ssb.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इंडियन ऑईल कार्पोरेशनध्ये अपंगांसाठी ४ जागा
इंडियन ऑईल कार्पोरेशनमध्ये अपंगांसाठीच्या विशेष भरती मोहिमेअतंर्गत लॅब
अनॉलिस्ट (१ जागा), मटेरियल असिस्टंट (२ जागा), असिस्टंट केमिस्ट (१
जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६
फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती http://www.iocl.com/ या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
पंजाब अँड सिंध बँकेत अधिकार्यांच्या ५६५ जागा
पंजाब अँड सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (५०० जागा), तांत्रिक अधिकारी (५
जागा), चार्टर्ड अकाउंटंट (२५ जागा), ईडीपी ऑफिसर (३५ जागा) ही पदे
भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे.
अधिक माहिती http://www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या
संबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी
प्रसिद्ध झाली आहे.
पंजाब अँड सिंध बँकेत लिपिका -नि- रोखपालच्या २५० जागा
पंजा? अँड सिंध बँकेत लिपिक-नि-रोखपाल (२५० जागा) हे पद भरण्यात येणार
आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०१० आहे. अधिक माहिती
http://www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात
दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २० जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये ३३ जागा
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये शास्त्रज्ञ (३३ जागा) हे
पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ मार्च २०१० आहे.
अधिक माहिती http://www.iictindia.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ईआरएनईटीमध्ये १५ जागा
ईआरएनईटी इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा),
ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर (१ जागा), तांत्रिक सहायक (२ जागा), खासगी सचिव
(२ जागा), सहायक (३ जागा), स्टेनोग्राफर (५ जागा) ही पदे भरण्यात येणार
आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे. अर्ज जाहिरात
प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. अधिक माहिती www.eis.ernet.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट
न्यूजच्या ९-१५ जानेवारी २०१० च्या अंकात आली आहे.
पुण्याच्या एफटीआयआयमध्ये ९ जागा
पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडियामध्ये प्रोफेसर
साऊंड इंजिनिअर (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर टिव्ही ग्राफिक (१ जागा),
लेक्चरर टिव्ही ग्राफिक (१ जागा), लेक्चरर आर्ट डायरेक्टर (१ जागा),
लेक्चरर साऊंड इंजिनिअर (१ जागा), ग्रंथपाल (१ जागा), सहायक सुरक्षा
अधिकारी (१ जागा), डेमोस्ट्रेटर-साऊंड रेकॉर्डिंग (१ जागा), प्रयोगशाळा
तंत्रज्ञ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध
झाल्यापासून ६० दिवसात करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या
२६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी २०१०च्या अंकात आली आहे. अधिक माहिती
www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये १ जागा
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डमध्ये सहायक संचालक - जनसंपर्क (१ जागा) हे पद
भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावे.
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ डिसेंबर २००९ - १ जानेवारी
२०१०च्या अंकात आली आहे.
{धमाल मुलगा आणि वरदा,}
धमाल मुलगा आणि वरदा, दोघांनीही हे चांगल काम केलयत
{खुपच छान उपक्रम ! * }
खुपच छान उपक्रम !
*
माझ्याकडे देखील २-३ ओपनिंग आहेत.
मार्केटिंग / टेली कॉलर / ट्रेडर ( ऑपरेटर ) हवा आहे.
काम येणे महत्वाचे शिक्षण गरजेचे नाही.
Hope is a good thing...
{>>काम येणे महत्वाचे शिक्षण}
>>काम येणे महत्वाचे शिक्षण गरजेचे नाही.
हे आवडले.
{हे अनुभवातून कळाले आहे }
हे अनुभवातून कळाले आहे मित्रा...
Hope is a good thing...
{सहमत.}
सहमत.
अन मुळ धाग्याचा उद्देशही चांगला आहे.
राजे नोकरीविषयी एक स्वतंत्र टॅब उघडा ना. म्हणजे ज्याला गरज असेल तो टॅबवत जाईल.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
{मीम वर एखादा कोपरा 'जॉब' साठी}
मीम वर एखादा कोपरा 'जॉब' साठी ठेवता येईल का याचा विचार व्हावा.
संजा
{राजे ह्या पद्धतीचे काही बनवता}
राजे ह्या पद्धतीचे काही बनवता येईल का जिथे जास्तित जास्त नौकरी विषयक माहिती उपलब्ध करता येईल का???
बाकी छान माहिती...
-निखिल
{विचार करुन नक्की आपण ह्यावर.}
विचार करुन नक्की आपण ह्यावर.
Hope is a good thing...
{छान माहिती}
खूपच छान माहिती.
निखीलशी सहमत. असे काही करता आले तर फार चांगलं होईल.
"काम येणे महत्वाचे शिक्षण गरजेचे नाही" १००% सहमत.
{काम येणे महत्वाचे शिक्षण}
काम येणे महत्वाचे शिक्षण गरजेचे नाही
हे ज्या दिवशी सगळ्यांना कळेल तो सुदिन...
{धमू खरोखरीच खुप चांगला}
आणि उपयुक्त धागा. अभिनंदन आणि धन्यवाद
पु.ले.शु.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
{मस्त उपक्रम धमु आणि वरदा....}
असा उपक्रम हाती घेतल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद. एकदम लोकसेवा समितीच्या दिवसांची आठवण करुन दिलीत.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
{एका औषध कंपनी मधे मुंबई}
एका औषध कंपनी मधे मुंबई महानगरासाठी नोकर भरती चालु आहे ...
कंपनीच नाव जेनेक्स फार्मा लि.
कामाचे स्वरुप मेडिकल रिप्रेझेटिटिव्ह
शैक्षणीक पात्रता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा/असावी
पगार ८०००/-
निवडल्या गेलेल्या उमेदवाराला कंपनीतर्फे १५ दिवसाच्या प्रशिक्षणासाठी कंपनी पाठवेल
संपर्क घाशीराम कोतवाल ९९६७८३६२६१
-निखिल
{चांगला उपक्रम}
शुभेच्छा मित्रांनो.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले....
-गंगाधर मुटे
(पूर्ण कविता इथे वाचा)