भारत पाक चर्चा
भारत आणी पाकिस्तान - जणु एकमेकांचे कट्टर वैरी झालेली जुळी भावंडे - लवकरच चर्चेसाठी एकत्र येणार आहेत. या दोन देशांमधील औपचारिक चर्चा बंद झाली ती २६/११ नंतर आणि आता ती सुरु होत आहे जर्मन बेकरी बॉम्बहल्ल्याच्या २६/११ नंतरच्या पहिल्या दहशतवादी कृत्यानंतर.
या दोन देशात यापुर्वीही अनेकदा चर्चा झाल्या परंतु त्यातुन दिर्घकालीन परिणाम दिसतील अशी कोणतीच निष्पत्ती झालेली नाही. या चर्चेतुन तरी काय निष्पन्न होईल हा प्रश्नच आहे. मुळात हे दोन देश चर्चा करताहेत ते उभयतातील प्रश्न सोडवण्याच्या प्रामाणिक हेतुंनी का दोन्ही देशांवर असलेल्या अंतर्गत व बाह्य दबावाने हे देखिल अद्याप स्पष्ट नाही. अफगाणीस्तान मधे सुरु असलेले युद्ध, पाकिस्तानमधील अंतर्गत परिस्थिती आणि या सर्वामधे हितसंबंध गुंतलेल्या शक्तींचा दोन्ही देशांवर चर्चेसाठी प्रचंड दबाव आहे असे बोलले जात आहे.
मुळात कोणतीही चर्चा यशस्वी होण्यास समायिक विषयपत्रिकेची गरज असते तीच अद्याप तयार नसावी असे दिसते. भारताला फक्त दहशतवाद या विषयावर चर्चा करायची इच्छा आहे व तशी विधाने परराष्ट्र्मंत्री एस एम कृष्णा, परराष्ट्रसचिव निरुपमा रॉय यांनी अनेकदा केलेली आहेत. पाकिस्तानला मात्र काश्मीर प्रश्न आणि पाणीवाटपाबाबतचे वाद यावर चर्चा करण्यात अधिक रस दिसतो. काही दिवसांपुर्वीच पाकिस्तानने त्या देशात भारतीय बनावटीची शस्त्रे व स्फोटके जप्त केली असल्याचा दावा केला आहे तो भारताने उपस्थित केलेल्या दहशतवादाच्या मुद्यातली हवा काढुन घेण्यासाठीच असावा असे वाटते. पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव सलमान बशीर यांनी यापुर्वीच भारत पाकिस्तान यातील चर्चेस योग्य असे वातावरण होण्यासाठी कोणत्याही विषय मर्यादा असु नयेत अश्या आशयाचे विधान केलेले आहे.
यापुर्वी पाकिस्तानने काश्मीर या विषयावर अनेकदा पत्रके काढुन त्या प्रश्नावर चर्चा करण्याला आपल्या देशाच्या दृष्टीने प्राधान्य असल्याचे पाकिस्तानी व काश्मीरी जनतेस सांगीतले आहे चर्चेनंतरच्या संयुक्त मसुद्यात मात्र याबाबत उल्लेख टाळण्यात आले होते आणि त्यानंतर लगेचच परत पत्रके काढुन पाकिस्तानने काश्मीर प्रश्न व पाणीप्रश्न वगळता अन्य विषयांवर चर्चा करण्यात अर्थ नसल्याचे स्पष्टही केले होते.
हा इतिहास लक्षात घेता या चर्चाही निव्वळ औपचारिकताच ठरण्याची शक्यता दाट आहे. दोन्ही बाजुचे लोक एकत्र येतील, थोडीफार बोलणी होतील, त्यानंतर संयुक्त मसुदा तयार होईल परंतु सहमती कोणत्याच मुद्यावर नाही असे घडण्याचीच शक्यता वाटते. सकारात्मक चर्चा होण्यासाठी उभयपक्ष संयुक्त विषयपत्रिका बनवुन व सकारात्मक दृष्टीकोण घेऊन भेटत नाहीत तोवर असेच घडत राहील अशी भीती आहे.
परंतु या चर्चेला एका वेगळ्या प्रकारे महत्व आहे. जर तालिबानने पुन्हा उचल घेतली तर भारतातील दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता तर आहेच परंतु पाकिस्तानातही तेथील सरकारला गंभीर प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. उभय पक्ष यासंदर्भात गंभीर विचार करून चर्चा फलदायी व्हाव्यात असे प्रयत्न करतील अशी आशा करणेच आत्तातरी शक्य आहे.
.jpg)
हम्म
चर्चा फलदायी व्हाव्यात असे प्रयत्न करतील अशी आशा करणेच आत्तातरी शक्य आहे.
+१
पण..... असो.
हे विधान थोडं धाडसाचं आहे, पण
हे विधान थोडं धाडसाचं आहे, पण पाकिस्तान मधे "चुकुन" खरी लोकशाही आली आणी तिथली आर्थिक परिस्थिती जर सुधारली तर हा आतंकवाद कमी होउ शकेल??
पाकिस्तानबाबत विचार....
करताना स्ट्रॅटेजिक अॅनॅलिस्ट लोकांना अनेक फॅक्टर्स बाबत विचार करावा लागतो. तिथल्या परिस्थितीत सरकार (मंत्रीमंडळ), राष्ट्राध्यक्ष, लष्कर, आयएसआय, दहशतवादी संघटना आणि अवाम (म्हणजे सामान्य लोक) हे वेगवेगळे फॅक्टर्स अस्तित्वात आहेत.
अवामला भारताबरोबर वैर कायम सुरु रहावे असे बव्हंशी वाटत नाही तर त्यांना संबंध सुधारावेत, परस्पर देवाण-घेवाण व्हावी असे वाटते. मंत्रीमंडळ आणि राष्ट्राध्यक्षांची मते त्या त्या वेळी त्यांची राजकीय अवस्था काय आहे त्यावर अवलंबुन असते. ते अवाम, लष्कर, आयएसआय, दहशतवादी संघटना यांचा गरज पडेल तसा वेळोवेळी पाठिंबा घेतात. आयएसआय, लष्कर यांना जर त्यांची परिस्थिती भारतापेक्षा चांगली आहे असे वाटले तर त्यांना चर्चा नको असतात. दहशतवादी संघटनांचा सततच चर्चेला विरोध असतो.
सध्या पाकिस्तानमधे असलेल्या परिस्थितीमुळे अवाम, राष्ट्राध्यक्ष, मंत्रीमंडळ आणि लष्कर यांना असुरक्षित वाटत असावे. त्यामुळे त्यांचा चर्चेला पाठिंबा असावा. परंतु अवामच्या मते पाणीप्रश्न सर्वात महत्वाचा आहे. अवामला बरोबर खेचण्यासाठीच्या कुतरओढीत त्या प्रश्नाचा वापर सर्वच घटक करतील यात शंका नाही. पाणीप्रश्नावर चर्चा झाली तर दहशतवादाचा मुद्दा बाजुला पडेल असे भारताला देखील वाटत रहाणार आहे.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
सद्यस्थितीत तरी आयएसआय/लश्कर
सद्यस्थितीत तरी आयएसआय/लश्कर हा ओव्हर्रुलिंग घटक दिसतो आहे.
राज्यकर्ते हताश आणी अवाम कायम भितीखाली.
पण तिथली लश्करी राजवट ना आपल्याला नवीन आहे ना त्यांना, मग तणाव गेल्या काही वर्षात विकोपाला जायचं कारण?
९३ नंतरची परिस्थिती कारणीभुत आहे??
अवांतरः मुद्दे कदाचित विस्कळीत वाटतील, जसे मनात आले तसे मांडत आहे.
तणाव गेल्या काही वर्षात विकोपाला जायचं कारण...
१९९३ नंतरची परिस्थिती मला वाटत नाही. तणाव कायमच होता फक्त १९९३ नंतर तो देशात बर्याच ठिकाणी पसरला. भारत पाक संबंधातली संक्षिप्त टाईम लाईन मला वाटते अशी आहे:
- ऑगस्ट १९४७: स्वातंत्र्य आणी धर्माधिष्ठीत फाळणी, त्यातुन हिंसाचार. काश्मीर वादाची सुरुवात.
- १९४७-४९: काश्मीरमधे घुसखोरी, काही भुभागाचा ताबा पाकिस्तानकडे, एलओसी ची निर्मिती. हरिसिंगांचे पलायन व काश्मीरचे भारतात विलीनीकरण. अन्य राष्ट्रांच्या मध्यस्थीवरुन तणातणी.
- १९६५: भारत पाक युद्ध, तह, वाटाघाटी पण काश्मीर प्रश्न अनिर्णित.
- १९७१: बांग्ला देश युद्ध, पाकिस्तानची शकले, नव्या देशाचा उदय.
- १९७९-८९: अफगाणीस्तानात शीतयुद्ध. भारत पाकिस्तानात तणाव अजुन वाढला. भारत रशियाबरोबर तर पाकिस्तान अमेरिकेबरोबर.
- १९८०-१९९३: पंजाब प्रश्नावरुन हिंसाचार, त्यात पाकिस्तानचा हात. भारतीय परागंदा गुंडाना पाकिस्तानची मदत. अयोध्या प्रश्न आंदोलन, वादग्रस्त वास्तु पाडली, मुंबई दंगली, मुंबई बॉम्बस्फोट.
- १९९५-२०००: सियाचीन प्रश्न. भारत, पाकिस्तानच्या अणुचाचण्या, कारगील युद्ध.
- डिसेंबर २००१: संसदेवर हल्ला. दोन्ही देशातली चर्चा स्थगीत.
- २००३: काश्मीरवरुन परत वाद, राजनैतिक संबंध सुरु.
- नोव्हेंबर २००८: मुंबई हल्ला. संबंध तुटले.
- २००९-२०१०: हेडली प्रकरण, प्रोजेक्ट कराची, जर्मन बेकरी हल्ल्यात पाकिस्तानमधे असलेले नॉन स्टेट अॅक्टर असल्याचा आरोप.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
हा इतिहास लक्षात घेता या
हा इतिहास लक्षात घेता या चर्चाही निव्वळ औपचारिकताच ठरण्याची शक्यता दाट आहे.
हेच वाटते
-निखिल
मला तर काहीच आशा नाही आहेत
मला तर काहीच आशा नाही आहेत ह्या चर्चे कडून.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
चर्चा
वाचतो आहे. ही (म्हणजे पुणेरी यांच्या या धाग्यावरची) चर्चा चांगली होईल, अशी चिन्हे आहेत
मुर्खपणा आहे झाले.
मुर्खपणा आहे झाले.
भारताच अचानक चर्चेला हो म्हणण
भारताच अचानक चर्चेला हो म्हणण तेही २६.११ नन्तर टाकलेल्या अटीन्ची पूर्तता झाली नसतानाही ही बाब भारत किन्वा पाक पेक्षा अफगाणिस्थान शी जास्त निगडीत असावी अस वाटत.
Recently पाकिस्तान न मान्डलेले
अफगाणिस्थानच्या Rebuilding मध्ये फक्त 'सख्ख्या' शेजारयान्याच भाग घेउ द्यावा आणि तालिबान ला ही चर्चेत सामिल करावे (आणि अमेरिके न त्याला दिलेला दुजोरा) हे मुद्दे कदाचित भारताच्या Long term planning च्या विरोधात असावेत .
कारण तालिबान चा अफगाण Rebuilding मध्ये सहभाग पुन्हा एकदा तालिबान ला पाकिस्तान्चे 'Assets' बनवेल जे भारताला नकोय आणि आत्तापर्यन्त भारतान बरेच पैसे ( काही Billion $ ) अफगाणिस्थानात ओतलेत ( जे पाकिस्तानला अतिशय खटकतेय ) ते सगळे स्वाहा होतिल. त्यामुळे माझ्यामते तरी ही फक्त सुपरफिशिअली भारत्-पाक चर्चा आहे मुळ गाभा हा अफगाणिस्थानच आहे, आणि हे दोन्ही पार्ट्यन्ना व्यवसथित माहिती आहे. त्यामुळे कशावरही चर्चा केली तरी सद्यस्थितीत काहीही फरक पडणार नाही.
पुष्करिणी
सहमत आहे !
सहमत आहे !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हे सरळ होईल का?
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
=))
लै हसलो जयपालचा प्रतिसाद
लै हसलो जयपालचा प्रतिसाद पाहुन
-निखिल
फलीत शून्य! पाकिस्तानचा
फलीत शून्य!
पाकिस्तानचा अमेरिकेपुढे "आम्ही तोडगा काढायला तयार आहोत पण भारतच आडमुठी भुमिका घेतोय" असं चित्र निर्माण करण्याचा एक डाव...
आणि आपल्या महादयाळु सरकारचा, "आमचं सरकार पहा कसं दयाळु आहे..ते आमच्या छाताडावर नाचलात तरी आम्ही त्यांच्याशी चर्चा करु इच्छितो. युध्द आम्ही होऊ देणार नाही. त्याने आमच्या पक्षपित्याच्या आत्म्याला वेदना होतील हे तर आहेच, पण आम्हाला जनतेचीही काळजी आहे.. वगैरे वगैरे " अशी गाजरं जनतेला आणि जगाला दाखवायची एक संधी!
असो.
)
फार काही लिहायचं होतं, पण आज हात अंमळ जास्तच दुखत असल्याने लिहु शकत नाहीये. (च्यायला..माऊस सिंड्रोम झालाय की काय कळेना राव
हा इतिहास लक्षात घेता या
हा इतिहास लक्षात घेता या चर्चाही निव्वळ औपचारिकताच ठरण्याची शक्यता दाट आहे. दोन्ही बाजुचे लोक एकत्र येतील, थोडीफार बोलणी होतील, त्यानंतर संयुक्त मसुदा तयार होईल परंतु सहमती कोणत्याच मुद्यावर नाही असे घडण्याचीच शक्यता वाटते. सकारात्मक चर्चा होण्यासाठी उभयपक्ष संयुक्त विषयपत्रिका बनवुन व सकारात्मक दृष्टीकोण घेऊन भेटत नाहीत तोवर असेच घडत राहील अशी भीती आहे.
असेच वाटते..
याच विषयावर एक डिबेट आहे IBN वर..
दुवा: http://ibnlive.in.com/videos/110487/02_2010/devil_advocate11/devils-advo...