अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

0
0

अंधारातील रजतरेषा: डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

दैनिक दिव्य मराठीतील दिनांक २४ ऑक्टोबर २०११ मधील खाली दिलेली बातमी आशादायक आहे. आताच्या नित्याच्या बातम्यांमधे भ्रष्टाचार, खुन, दरोडे, पोलीसांची गुन्हेगारांशी हातमिळवणी, बॉलिवूडी अभिनेत्यांच्या बातम्या, त्यांनी ट्विटरवर काय लिहीले, राजकारणी, प्रिंस काय जेवला, कोणत्या झोपडीत काय खाल्ले आदींसारख्या, एक बिग अभिनेता व एखादा खेळाडू पैशासाठी व स्व:तासाठी सारी मेहनत करत असून सामाजिक योगदान शुन्य असतांनाही त्याला भारतरत्न आदींसारखे पुरस्कार देण्याची मागणी केली जाते अन त्या व्यक्तीही मुकसंमती देतात या असल्या काळ्या बातम्या असतात. अंधारातील रजतरेषा ठरावी अशी दैनिक दिव्य मराठीतील वरील तारखेची बातमी जशीच्या तशी देत आहे. आताच्या काळात डॉक्टरलोकंही व्यापारी झालेत. डॉक्टर सुनिल गाजरेंसारखे सन्माननिय अपवाद प्रत्येक क्षेत्रात आहेत म्हणूनच त्या बॉलबेअरींगरूपी माणसांमुळे देश चालतोय.

डॉक्टर सुनिल गाजरेंना मानाचा मुजरा!

पॅरालिसीसचा दोन लाखांचा उपचार 20 हजारात!

(सुनील बडगुजर । जळगाव)

डॉ. सुनील गाजरे यांचे संशोधन; रक्त शुद्धीकरण उपचार पद्धतीने 10 वर्षात 110 रुग्णांना जीवदान

हातापायाचा पॅरालिसीस झाल्यानंतर ‘आयव्हीआयजी’ या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यासाठी सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. र्शीमंताना हा खर्च परवडणारा असला तरी गरिबांना मात्र ही उपचारपद्धती न परवडणारी आहे. परिणामी अनेक रुग्णांना उपाचाराअभावी अपंगत्व किंवा थेट मृत्यूला सामोरे जावे लागते. या दुर्दैवी प्रसंगावर मात करण्याच्या दृष्टीने न्युरोफिजिशिअन डॉ. सुनील गाजरे यांनी ‘लो डेअसर प्लाझ्मा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत शोधून काढली असून यामुळे अवघ्या 20 हजारांत रुग्ण बरा होत आहे. या पद्धतीने आतापर्यंत 110 रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

हवा आणि पाण्यातील विषाणूंमुळे इमिनो अँलर्जीचे इनफेक्शन शरीरात झाल्याने हाता-पायाचा पॅरालिसीस होतो. यामुळे रुग्ण आयुष्यभर लुळा होतो. त्यापुढेही अधिक लागण झाली तर यात मृत्यूही ओढवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा रुग्णांवर विशेष पध्दतीने इलाज करावा लागतो.

अशी आहे नवीन आणि स्वस्त उपचार पद्धती

या रोगाच्या रुग्णांवर डॉ. गाजरे त्यांनी संशोधन केलेल्या नवीन उपचार पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीला त्यांनी ‘लो डेअसर प्ला ामा फेरेसेस’ (रक्त शुद्धीकरण) पद्धत हे नाव दिले आहे. यात ते रुग्णांच्या शरीरातून दिवसाला दोन वेळा 350 एमएल रक्त काढतात. ते रक्तपेढीत पाठविल्यानंतर तेथे प्रक्रिया होऊन रक्तातील प्लाझ्मा व लाल-पांढर्‍या पेशी वेगळ्या काढल्या जातात. त्यामध्ये अँण्टी बॉडीज असल्याने त्या नष्ट करण्यात येतात. त्यानंतर शुद्ध झालेले रक्त पुन्हा रुग्णाला दिले जाते. असा उपचार पाच दिवस केला जातो. यासाठी दिवसाला तीन ते चार हजार रुपये असे पाच दिवसासाठी फक्त 20 हजार रुपये खर्च येतो.

{डॉक्टर सुनिल गाजरें यांचे}

1

डॉक्टर सुनिल गाजरें यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.
चांगली माहिती.

{सहमत }

2

डॉक्टर सुनिल गाजरें यांचे कौतुक करावे तेवढे कमीच.अशा सेवाभावी वृत्तीने काम करणारे लोक ह्या जगात आहेत त्यामुळे जग चालत हास्य

छान माहिती


बन्सी को लकडी सदा समझा किये तुम पर उसके नग्मो कि धुन कहाँ सुन सके तुम!

{छान माहिती दिलीत. धन्यवाद.}

3

छान माहिती दिलीत. धन्यवाद.


परिजा
******

बशर नवाज साहेबांचा हा शेर-
"अब कोई दिल टूटा है यकीनन फिर यहां,
दूर तक रस्तेपे शबनम है बहोत..!)

{छान माहिती...}

4

छान माहिती दिलीत.
डॉक्टर सुनिल गाजरें यांचे कौतुक करावे तेवढे कमीच. असेच म्हणतो. असे इनोव्हेटर्स समाजाला बरेच काही देतात.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{हा अर्धांगवायूवरचा उपचार}

5

हा अर्धांगवायूवरचा उपचार नाहे. अर्धांगवायु म्हणजे मेंदूत रक्तस्त्राव किंवा गुठळी होऊन पॅरालिसिस होणे.. याअला स्ट्रोक म्हणतात.

हा उपचार गुलेन बेरी सिन्ड्रोम ( जी बी सिंड्रोम) नावाच्या रोगावर असावा असे एकंदर माहितीवरुन वाटते. काही विषाणूंमुळे आधी ताप येतो.. मग त्या तापात विषाणूंच्या विरोधात रक्तात अँटीबॉडी तयार होतात.. पण या अँटी बॉडी शरीरातील पेरिफेरल नर्व- नसा यांच्या बरोबर क्रॉस रिअ‍ॅक्ट होतात.. ( कारण हे विषाणू आणि हे नर्व टिश्यु यांची रचना काही अंशी सारखी असते. ) त्यामुळे पॅरॅलिसि होतो.. शक्यतो हा पॅरॅलिसिस पायाना होतो.. अगदी क्वचित हात किंवा छाती याना झाल्यास मृयुत्यु येऊ शकतो... त्यावर उपचार म्हणून रक्तात निर्म्,आण झालेले अँटीबॉडी कमी करावे लागतात.. त्यासाठी आय व्ही आय जी वापरले जातात.. जे फार महाग आहेत. हे आय व्ही आय जी या अँटीबॉडीबरोबर रीअ‍ॅक्ट होऊन त्याना काढून टाकतात..

पण त्याला उपाय म्हणून डॉक्टरानीही ही वेगळी पद्धत शोधली आहे.. शरीरातील रक्त काढून ते फिल्टर करुन अँटीबॉडीज काढून टाकणे.. असे वारंवार केल्यास हे अँटीबॉडीज कमी होतात.

साधारण ४ ते ६ आठवडे हा पॅरालिसिस रहातो. त्यानंतर स्नायूना परत ताकद हळूहळू येत जाते.

अर्धांगवायू हा मध्यम वयीन, म्हातारे लोक यांचा आजार आहे.. पण जी बी सिंड्रोम प्रामुख्याने लहान मुले, तरुण लोक याना होतो. हा आणखे एक फरकाचा मुद्दा. अर्धांगवायुत मेंदू, स्पायनल कॉर्ड यात दोष असतो.. पण या आजारात पेरिफेरल नर्व अ‍ॅफेक्ट होतात, हा एक दुसरा फरकाचा मुद्दा.