कोल्हापूरच्या आसपास

0
0

यंदाही सालाबादप्रमाणे कोल्हापूरला गेलो होतो. दरवर्षी जात असल्याने बघायची अशी नवी ठिकाणे राहिलीच नव्हती. दरम्यान काहि मित्रांना फोनाफोनी करून दोन ठिकाणे कळली होती. तिथेच जायचा प्लान केला. पहिलं होतं "कण्हेरी मठ". कोल्हापुरातून बाहेर पडून जुन्या पुणे-बंगळूरु मार्गावरुन कागलच्या दिशेने निघालं की जवळच उजव्या हाताला कण्हेरी/कणेरी हे ठिकाण आहे. या ठिकाणी काडसिद्धेश्‍वर महाराजांचा मठ आहे. मात्र तो कणेरी मठ म्हणून प्रसिद्ध आहे. अलीकडे ग्रामसंस्कृती, ग्रामीण जीवनशैली यांची पुढच्या पिढ्यांना ओळख व्हावी म्हणून कण्हेरी मठातर्फे एक वेगळा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत जुन्या शैलीतील घरं व ग्रामीण शैलीचं दर्शन घडवणारं एक वेगळं गावच वसवण्यात आलं आहे अशी माहिती मिळाली होती
मग काय चौकशी केली. भवानी मंडपातून सकाळी ८:१५ ला एक बस तिथे जाते हे कळलं. निघालो. अर्ध्या-पाऊण तासात तिथे पोचलो. उतरल्यावर समोरच चौकात गांधीजींच्या "तीन माकडांचा" पुतळा लक्ष वेधून होता. त्या वसवलेल्या गावाची फी (रु. ४०/- माणशी) भरली आणि एका कृत्रिम गुहेत शिरलो. फोटो काढण्यास सक्त मनाई असल्याने क्यामेरा ब्यागांमधेच टाकावा लागला.
सुरवातीला भारतीय पुराणांतील विविध ऋषींची शास्त्रज्ञ म्हणून ओळख होऊ लागली. चार्वाक, कौटील्य, आर्यभट्ट, भास्कराचार्य, भृगु, चरक, सुशृत वगैरे मंडळींचे पुतळे उभारले आहेत. त्यांचे पुतळे इतके जिवंत आहेत की आता ही मंडळी एखादा डायलॅग मारतील की काय असे वाटते. त्यांच्याबरोबर गार्गी, शबरी वगैरे पौराणिक स्त्रीयांवरचे प्रसंगही सुंदर रंगवले आहेत. डोळ्यांच्या खाचा झालेली शबरी, समोर उष्ट्या बोरांचे ताट, आणि क्षितीजावर प्रभुरामचंद्रांच्या दिसलेल्या आकृतीमुळे उमटलेले चेहर्‍यावरचे भाव इतके बेमालूम आहेत की त्या भक्तभेटीने आपल्या डोळ्यात पाणी यावे.

त्या पुराणपुरुषांच्या गुंफेतून आम्ही एका गावात बाहेर पडलो. समोरच एक पाणी विहीरीतून पाणी शेंदताना आणि एक मुलगी विहीरीत डोकावून बघताना दिसली . काय बाई आहे पोरगी पडली तर असं म्हणणार इतक्यात जाणवलं की अरेच्या! ती विहीरच नव्हे तर ती बाई आणि ती मुलगी देखील पुतळेच आहेत. विहीरीवरचा सीन खरोखरच अप्रतीम. पाणी शेंदणारी बाई, बाजुची उपद्व्यापी कारटी, धुणं धुणार्‍या बायका, त्यापैकी एका धुणं धोपटणार्‍या बाईचा ढळलेला पदर, बायकांची खोचलेला काचा, वाहतं पाणी..पर्फेक्ट! अजूनही तो सीन जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे.

मग ग्रामीण जीवनातील विविध गोष्टी एकापाठून एक समोर येतच जातात. कुठे पेरणी चाली आहे, कुठे घाण्याला बैल जुंपले आहेत, कुठे गुराख्याची पोरं विटी दांडु खेळताहेत. इथे केवळ पुतळे नसून बारीक विचार करून दाखवलेली समाज व्यवस्था आहे. अगदी विटी दांडूच्या घोळल्याचं उदाहरण घ्या. त्यातल्या मुलांबद्दल काहिहि लिहिलेलं नसताता कोण कोण आहे हे आपण सांगू शकतो. बामणाच्या पोराची शेंडी आहे, शर्टातून जानवं डोकावतं आहे. पाटलाचं पोर टेचात आहे - गळ्यात बारीच सोनसाखळी आहे, गुराख्याची पोरं फाटक्या चड्डीत- बटणं तुटलेल्या शर्टांत- पायाला जखमा- एक लक्ष गुरांकडं अशी खेळताहेत, मुसलमान पोराच्या गळ्यातला ताईत- दणकट शरीरयष्टी.. सगळंच कसं जमून आलं आहे.

पुढे आपण जितके प्रसंग बघतो तितका केवळ कलाकारांचे कसब नाहि तर हे पुतळे उभारणार्‍याचा ग्रामिण जीवनाचा अभ्यास जाणवतो. पारावरच्या गप्पा टाकायल्या बसलेल्या टोळक्यातील प्रत्येकाची आर्थिक स्थीती, राजकीय वजन न सांगता फक्त पुतळ्यांतून समजतं. पुढे गावात शिरल्यावर आपल्याला बारा बलुतेदार भेटतात. त्यांची अवजारं, घरं व्यवसाय यांची उत्तम मांडणी केली आहे. याशिवाय पुर्वीच माजघर तर इतकं बेमालूम आहे की ह्याउपक्रमाच्या चर्चांमधली बरीचशी भांडी मला तिथे बघायला मिळाली. नूसती भांडीच नाहि तर काळाच्या पडद्याआड गेलेल्या बर्‍याच वस्तु तिथे बघायला मिळाल्या

तेव्हा सांगायची गोष्ट अशी, की हे अप्रतिम ठिकाण बघितलं नसेल तर पुढच्या वेळी जरूर जा आणि बराच मोकळा वेळ काढून जा.

दुसरं ठिकाण होतं चंद्रकांत मांढरे कला संग्रहालय. ऐन कोल्हापूरात राजारमपुरीत नवव्या गल्ली कै. चंद्रकांत मांढरे यांनी आपल्या बंगल्यात त्यांच्या स्वतःच्या जलरंगांतील चित्रांचं, पेन्सिल/कोल मधिल स्केचेसचं प्रदर्शन मांडलं आहे. काहि शित्र तर अतिशय सुंदर आणि लाजवाब. फार मोठ नसलं तरी थोडा फावला वेळ सत्कारणी लागेल याची खात्री आहे.

काही ना काही कारणामुळे

1

काही ना काही कारणामुळे मागच्या वर्षी इकडे जाण्याची ईच्छा अपुरी राहीली Sad

असो,

आता तुम्ही एवढे मनसोक्त लिहले आहे त्या बदल तर नक्की जाईल ह्यावेळी.


"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."

एकदा नक्की जाउन पाहण्यालायक

2

एकदा नक्की जाउन पाहण्यालायक जागा...
ॠशिकेष मस्त वर्णण..


-निखिल

चांगली

3

माहिती. लेख वाचनखूण म्हणून साठवला आहे. चंद्रकांत मांढरे यांच्या पश्चात त्यांच्या चित्रांचं जतन व्यवस्थित केलं जातंय हे वाचून बरं वाटलं.

कन्हेरी मठाच्या त्या गावातील

4

कन्हेरी मठाच्या त्या गावातील मला सगळ्यात जास्त आवडलेला पुतळा म्हणजे एक आजीबाई वाकळ शिवत आहे हा. अस वाटत होत की आजी आता पुढचा टाका घालेल. हास्य

चंद्रकांत मांडरे कलादालन मात्र पहायच राहुन गेलय.

चांगली माहिती.

5

चांगली माहिती.

अरे वा ... खूप छान ..

6

मला एका ई-मेल मधुन काही फोटो आले आहेत ... ते चढवतो ..
असचं कोकण दर्शन सुद्धा आहे असं ऐकलं आहे ... कदाचित सावंतवाडीला आहे

फोटो ....

7

फोटो टाकत नाही .. कदाचित प्रॉब्लेम होईल ... म्हणून जरा गुगल वर चेक केला ...
या संकेतस्थळावर http://www.siddhagirimuseum.org सगळी माहिती मिळेल ...

प्राचीन कोकण ...

8

प्राचीन कोकण हे गणपतीपुळे जवळ मालगुंड या गावी आहे ... हे ही एक म्युझिअम आहे जिथे जुने कोकण मुर्तींच्या स्वरूपात वसवले आहे .. जास्त फोटो सापडले नाहीत

दुवा १

दुवा २

आणखी काही फोटो ...

9

मस्तच रे

10

मस्तच रे संग्राम!

धन्यवाद!

राजे, लवकर बघा बुवा ह्या टिरिपचं हास्य

अरे वा!

11

अरे वा! इथे डकवल्याबद्दल धन्यु, संग्राम


-ऋ

छान महिती.. आधीही ऐकून

12

छान महिती.. आधीही ऐकून होतेच.. पण आज विस्तृत माहिती मिळाली....
एकदा जायचं आहेच तिथे!!!

अरे वा..

13

गेलं पाहिजे एकदा! छान माहिती ऋषिकेश,
स्वाती

सह्हीच रे भावा... आता

14

सह्हीच रे भावा...

आता राजेच्या घरी गेलो की राजेलाच की चक्कर आयोजित करायला लावु हास्य

मस्त वर्णन ... धन्स

15

मस्त वर्णन ...

धन्स संग्राम...

मस्त

16

वर्णन

फार वेळा कोल्हापूरला गेलो आहे

17

फार वेळा कोल्हापूरला गेलो आहे पण हे ठिकाण बघितले नाही ..परत जातोय तेन्ह्वा एकदा बघूनच येतो.