"अय्या,सर तुम्ही. बर झाले तुम्ही भेटलात "
बॅकेत गर्दी होती. पैसे मिळायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. आता खिंड लढवणे भाग होते.
"पोरीने नशिब काढले हो"
लग्न ठरले का"?
"इश्श, काही तरीच काय. एवढ्यात कुठे लग्न"
ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो.
"माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते"
आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी. पण हे माझ्या कडे का बरे बोलावे ? मी आपला हैराण. काहीतरी बोलुन तोंड घशी पडण्यापेक्षा मी आपला नेहेमीचा उपाय वापरला.
हम्म
"आताच सेंटर ला जाउन आले"
कसले सेंटर?
मला काहीच कळेना.
"अहो सर, असे काय करताय? उद्यापासुन बारावीची परिक्षा सुरु होतेय ना"?
हां हां. तुम्ही नशिबाबद्दल काही तरी म्हणत होतात त्या मुळे मी गोंधळलो.
"माझ्या वेळी तर बाक पण हलत होता. बाकात ढेकुण सुद्ध्हा होते. त्या मुळे माझी मेरीट गेली"
हम्म.
" सेंटर अगदी छान आहे. भरपुर वेंटीलेशन आहे. उजेड आहे. सहा सहा पंखे सुद्धा आहेत."
चालु आहेत ना?
" हो, हो. त्याची पण खात्री करुन घेतली"
खरेच नशिबवान हो तुमचे कन्या रत्न.
"आमच्या ह्यांनी गेले ३ आठवडे ऑफिस ला सुट्टी घेतली आहे."
वा वा वा.
" सांगायचे म्हटले तर ह्यांनी पण खुपच मेहेनत घेतली हो"
म्हणजे?
" ह्यांचे म्हटले तर एकदम 'सायंटीफीक काम' हो.
मी दचकलो. आजुबाजुला कुणी श्रवण कुमार नसल्याची खात्री करुन घेतली.
म्हणजे काय?
"आता तुम्हा डॉक्टर आणि समुपदेशक मंडळी ना आम्ही काय सांगणार"?
मी तुम्ही म्हणता तसा काहीही नाही हो. पण एक पालक म्हणून काय असेल तर सांगा तुमच्या ह्यांच्या सायंटीफिक कामाबद्दल.
"ही तुमची विनम्रता आहे. पण आता विचारताहात तर सांगते. ३ आठवड्या पुर्वी ह्यांनी गजबजलेल्या रस्त्यावरच्या ध्वनी प्रदुषणाचे रेकॉर्डींग केले.
इतर क्लासेस चे पेपर झेरॉक्स केले. एक हलणारा बाक आणला. हे सर्व पेपर त्यानी मुली कडुन बाकावर बसुन सोडवुन घेतले. पार्श्वभुमीवर टेप रेकॉर्ड लावला होता. ए पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज."
काय सांगताय? एकदम चंद्रावरची स्वारी इतकी तयारी म्हणा की.
" हो आपण सर्व प्रकारांना तयार असायला पाहीजे असे ह्यांचे म्हणणे"
हो का? बर बर. एकदा भेटायला पाहिजे बाबाना.(भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ घालायला मिळाली तर उत्तम)
" शेवटच्या दिवशी अभ्यासाची काही टीप द्या हो."
परिक्षेच्या आयचा घो म्हणत मुलीला शांत झोपु द्या.
इतक्यात टोकन ची बेल वाजली आणि माझी खिंडीतुन सुटका झाली.
>>>भेटल्यावर ह्याच्या भुमीवर
>>>भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ घालायला मिळाली तर उत्तम
आमच्या तर्फे देखिल एक.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
हॅ हॅ हॅ खिंडीत गाठुन धिंडच
हॅ हॅ हॅ खिंडीत गाठुन धिंडच काढली म्हणा की.
हा हा हा (बाजी)प्रभू छाण खिंड
हा हा हा (बाजी)प्रभू छाण खिंड लढवलीत
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
हॅ हॅ हॅ
+१
अवांतर : आवल्या, आपलं काय ठरलयं? मी तुझी प्रतिक्रिया ढापणार नाही अन् तु माझी प्रतिक्रिया ढापायची नाही?
अर्रर्र चुकलोच की
एक टाईम माफी द्या साहेबा !
"पोरीने नशिब काढले हो"
"पोरीने नशिब काढले हो"?? - हे काय कळले नाही.
चांगले
सेंटर हे नशीब
अच्छा चांगले 'सेंटर' का ?
अच्छा चांगले 'सेंटर' का ?
हॅहॅहॅ
अगदी रेलींग वर रेलुन स्कायवॉकच्या
ओह अच्छा
चांगले सेंटर हे नशीब. -
असो चांगले आहे की!
मुलीच्या बापाला लाथ का मारताय कळले नाही. तुम्ही तर वर्ल्ड फेमस ती मुलगी तर तुमच्याकडे तक्रार घेउन आली नाही उलट त्या सिम्युलेशनमधे सामील होती.
हल्ली सहजकाकांना सगळ्या
हल्ली सहजकाकांना सगळ्या गोष्टी उलगडुन सांगाव्या लागतात....
>>>मुलीच्या बापाला लाथ का
>>>मुलीच्या बापाला लाथ का मारताय कळले न>>>
ह्मं सहमत. बापाला मारावेसे का वाटले हो मास्तर.
त्याने या बाबतीत काही वावग केलयस नाही वाटत.
काही क्रिप्टीक असल्यास जाणुन घायला आवडेल
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
जरुरीचे आहे ...
बापाच्या पार्श्वभागावर लाथ बसणे जरुरीचे आहे असे मनस्वी वाटले.
बाकी त्यावर उहापोह करण्याला आम्ही नालायक आहोत, लाथ घालणे योग्य आहे असे वाटले इतके बस्स आहे.
आमचे बाबा वर्षातुन १-२ वेळा विचारायचे अभ्यास कसा चालु आहे ते. उगाच असे बाकडे घेऊन टेप लाऊन बसले असते तर मी बसलो असतो गावाकडे दुकान काढुन.
असो.
भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ
भेटल्यावर ह्याच्या भुमीवर लाथ घालायला मिळाली तर उत्तम
माझ्याकडुन अजुन एक मारा मास्तर...
सिम्युलेशन करुन घेतात...
-निखिल
मस्त लिहिलय मास्तर....
शिक्षणाच्या आईचा ... असे म्हणावे असं बरच काही दिसतं, अनुभवायला मिळतं सध्या. आमच्या शेजारी पाजारी बरीच केजीतली पोरं-पोरी आहेत्त. सध्या त्यांच्या आयांची वार्षिक परिक्षेची कशी तयारी सुरु आहे ते बायकोनं सांगीतलं अन ऐकुन मी हादरलोच. च्यायला इथपासुन तणाव निर्मिती?
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
तणावग्रस्त प्रकार !!
तणावग्रस्त प्रकार !!
हो अशी तणावाची स्थिती फार
हो अशी तणावाची स्थिती फार वाईट्ट असते.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
च्यायला... अवघड आहे! पोरांना
च्यायला...
अवघड आहे!
पोरांना हल्ली एकवेळ ती शाळा, तो अभ्यास आणि परिक्षा परवडली पण आई-बाप आवरा असं म्हणायची वेळ येत असेल राव
+१
>>पोरांना हल्ली एकवेळ ती शाळा, तो अभ्यास आणि परिक्षा परवडली पण आई-बाप आवरा असं म्हणायची वेळ येत असेल राव
अगदी योग्य शब्दात लिहलं आहेस रे धमु...
अवांतर -
आता परवाच कचेरीमध्ये कपिल सिब्ब्ल यांच्या निर्णयाबद्द्ल [शाळेत जाण्यासाठी मुलांचे वय कमीत कमी ४ वर्षे असावे] बोलणं चालू होतं .. तेव्हा एक जण म्हणाला की त्याच्या जुळ्या मुलींच्या [वय वर्षे २]शाळेच्या प्रवेशासाठी ... ३.५ लाख डोनेशन मागताहेत
तेव्हा एक जण म्हणाला की
काय दोन पोरींसाठी आख्खी शाळा काढायचीये काय? च्यायला..ह्यापेक्षा पोरांना वेदपाठशाळेत पाठवुन द्यावं! आजकाल लै स्कोप आहे पौरोहित्याला!
त्यासाठी वेद्पाठशाळेत कशाला
त्यासाठी वेद्पाठशाळेत कशाला जायचं... दोनचार स्तोत्रं पाठ करुन सुरु व्हायचे...समोरच्याला कुठं कळतंय काय बोलतोय ते...
हॅ: !
आजकाल रेफरल्स तर तिथेही चालतात ना भौ!
ठाऊक नाही?
हे मला विचारतोस तु ?
हे मला विचारतोस तु ?
चुकलो!
चुकुन चुकलो बघा
पण ती रेफरल सिस्टिम सॉलिड आहे हां! भल्याभल्या कॉर्पोरेट्सना नाही जमली अजुन.
३.५ लाख!!!!! बाबौ... खरच
३.५ लाख!!!!!
बाबौ... खरच इतकी भयंकर परिस्थिती आहे ?
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
हो ना !
च्यायला असले महागडे शिक्शान शिकुन काय होणार आहे ?
नोकर्या कुठे आहेत ?
मी तर आपल्या पोराला बाबा "गावगुंड" करुन टाकणार आहे.
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा ...." हे आपण आत्ताच ठरवले आहे, नको ते शिक्शान आणि नको ते न्हाई ते लफडे !
+ १ सहमत आहे बॉ !
+ १
सहमत आहे बॉ !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
१०
वर्षाने मोठ्या डॉनच्या गँग मधे सुद्धा ग्रॅज्युएट चे सर्तीफिकेट कंपलसरी होणार हो छोटे डॉनराव.
तीन-चार वर्षांपूर्वी माझ्या
तीन-चार वर्षांपूर्वी माझ्या कलीगने बाँबे स्कॉटिश शाळेत चौकशी केली होती.. तिथे पहिलीची वार्षिक फी ८०,००० होती. (एकही शून्य कळचुकीने जास्त पडले नाहीय.)
अवांतरः राज ठाकरेची मुलं इथंच शिकतात बहुधा!!
अच्छा अच्छा, ही खिंड होय!
मला भलतीच शंका आली!
(खुद के साथ बातां : काय रे रंगा, मास्तर चटपटीत शीर्षके टाकून लेखाला अंमळ गर्दी खेचतो नै?)
चतुरंग
एक म्हण आठवली.. ज्याच्या मनात
एक म्हण आठवली..
ज्याच्या मनात पाप, त्याला पोरं होती आपोआप.
संदर्भःनाटकःरंग्या रंगिला...
मास्तर, मास्तर, मास्त$$$$$$$$र
" सांगायचे म्हटले तर ह्यांनी पण खुपच मेहेनत घेतली हो"




म्हणजे?
" ह्यांचे म्हटले तर एकदम 'सायंटीफीक काम' हो.
मी दचकलो. आजुबाजुला कुणी श्रवण कुमार नसल्याची खात्री करुन घेतली.
*********************************************************
भवतु सब्ब मंगल (सगळ्यांचे मंगल होवो)
हम्म्म
हम्म्म
काहीतरी बोलुन तोंड घशी पडण्यापेक्षा मी आपला नेहेमीचा उपाय वापरावा.
-ऋ
आम्चे अगदी सख्खे शेजारी जवळ
आम्चे अगदी सख्खे शेजारी जवळ जवळ असेच आहेत
शेजारच्या मुलीची १० वी चालू आहे..सम्पूर्ण घर दार गेल्या दीड वर्षापासून १०वी ला जुम्पल आहे..
शेजार्याना ( आम्हाला ) धमकीवजा विनन्ती केली गेली आहे...सर्व 'इतर' activity वर बन्धन आहेत्..म्हणजे येणार्या पाहुण्याना ठराविक वेळेतच ( तिची शाळा किन्वा क्लास असताना ) येण्यास सान्गणे, टीव्ही-रेडिओ कमित कमी वापरणे, कुकर ही ती शाळेत / क्लास मध्ये असताना लावणे..( अभ्यास करताना अचानक शिट्टी ऐकून ह्रुदयावर परिणाम होउ शकतो ..इती तिचे डोक्टर आजोबा)
सिलिन्डर वाला , भाजीवाला, पोस्टमन ला ह्ळू बोलायच फर्मान आहे..
हे सगळ अगदी परिक्षेच्या वेळेस असत तरी ठीक , पण हे सगळ गेले दीड वर्ष चालू आहे...माझी आई च तिची परिक्षा सम्पायची वाट पहीतेय. काही सान्गू शकत नाही ...कारण मुलीच आख्ख भविष्य १० वी वर अवलम्बून असल्याच रोज कानी कपाळी सान्गेतल्यामुळ माझी आई कोण्तही 'पाप' माथी घेउ इच्छित नाही...
शाळा ही काही कमी नाही..
नववीच्या सहमाही नन्तर डायरे़क्ट १० वी चा अभ्यासक्रम चालू करून १० वी च वर्ष सुरू होण्याआधीच सर्व अभ्यासक्रम पूर्ण झाला होता
१० वी त गेल्यावर फक्त पेपर आणि पेपर सोडवण्याच सराव करतेय ती. तिचे आजोबा तिला झोप न येण्यासाठी बरच काही 'योगा' वगैरे शिकवत असतात..
पेपरान्चा सराव करताना मुद्दाम मध्येच पेन बदलायला सन्गतात, कारण समजा खर्या परिक्षेच्या वेळी पेन मोडल तर वेगळ पेन वापरायची सवय हवी म्हणून..
पुष्करिणी
एक काम करा... तिच्या
एक काम करा... तिच्या घरच्यांना (आजोबासकट) अचानक लक्ष नसताना कुकरची शिट्टी ऐकवा. हृदयावर परिणाम होतोय का बघा. आय मीन... हृदयपरिवर्तन होतंय का बघा...
फट म्हणता ब्रह्महत्या वगैरे
फट म्हणता ब्रह्महत्या वगैरे झाली तर्..म्हणून गप्प आहोत...आईन माझे कधी इतके लाड नाही केले १०वी त असताना याचा मला जास्त राग आहे..
मी १० वी त असताना जनरेटर वगैरे च फ्याड नव्हत आणि लाइट तर रोजच जायची , एकदा कुणीतरी फारच कट्कट केल्यामुळ मी मेणबत्ती घेउन अभ्यास करायचा प्रयत्न करत होते ...पेन्ग आल्यामुळे की काय पण माझे डोळ्यावर आलेले सगळे केस पेटले काही कळायच्या आत ...फार काही झाल नाही पण खूप मार खावा लगला ..मी नन्तर कधीही रात्री जागून अभ्यास केला नाही
पुष्करिणी
अरे बाप रे किती हे एवढ्याश्या
अरे बाप रे किती हे एवढ्याश्या जीवावर अत्याचार
दहावीची परिक्षा होती.... आमची एक महिनाआधी घरात वातावरण !
राज्या अभ्यास कर - बाबा.
राज्या भाजी घेऊन ये रे - आई.
दाद्या - माझा निबंध लिहून दे आताच्या आता नाही तर आईला सांगेन - अक्का.
परिक्षेच्या दिवशी...
राज्या, जरा चार मिनारचे पॅकेट घेऊन ये मग जा. - बाबा.
अंबाबाईचे दर्शन घेऊन जा रे.. गेले दोन महिने बोंबलत फिरलास आता दे परिक्षा. अभ्यास कर म्हणून म्हणून घसा बसला माझा - आई.
दादा, माझे पेन दे, नाही तर नापास होशील असा शाप देईन हां. - अक्का.
सरांच्या कृपेने ३८% घेउण देव पावला.... !
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अच्छा!!! म्हणजे निबंधांचा आणि
अच्छा!!! म्हणजे निबंधांचा आणि कोल्हापूरचा संबंध फार जुना आहे म्हणायचा...
नाही ओ... तेव्हा मराठीवर एवढे
नाही ओ... तेव्हा मराठीवर एवढे अत्याचार होत नव्हते
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
अच्छा!!! म्हणजे निबंधांचा आणि
अच्छा!!! म्हणजे निबंधांचा आणि कोल्हापूरचा संबंध फार जुना आहे म्हणायचा...
अगायायाया....
लेखाचं नाव खिंड आणि प्रतिसादात पाहतो तर धिंड!
गप्प रे तुझे नाही ते ' पिंड '
गप्प रे तुझे नाही ते ' पिंड '
* पिंड तुला माहीत असेलच की रे पंजाबी मध्ये
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
ल्ले!
>>* पिंड तुला माहीत असेलच की रे पंजाबी मध्ये
तुसी मेन्नु दसदे हों? ये पिंड तां साढ्ढा ना हैगा, पर गल की है? की फर्क पैदा है वीरजी?
**तुर्त मराठी मोडमधुन अंमळ बाहेर येऊन सदर प्रतिसाद टंकला आहे. मराठीचा मुद्दा लाऊन धरणार्याने पंजाबी जाणावी तरी का असा वैचारिक दिवाळखोरीचा प्रश्न पडलेल्यांनी अंमळ इनो घ्यावा. कोणतेही ज्ञान वाया जात नाही ह्या तत्वाचा अंगीकार करुन आम्ही शिकतो.
हॅहॅहॅ.... त्या पालकांना
हॅहॅहॅ....
त्या पालकांना म्हणाव....कितीका आपटली तरी जेवढे गुण उधळायचे तेवढेच मिळतात...
भावना पोचल्या.. पण जर
भावना पोचल्या..
पण जर तुम्हांला पालकांच्या आततायीपणाबद्दल लिहायचं होतं, तर पोरीच्या चारित्र्याबद्दल कमेंट करण्याची गरज होतीच का??
स्वतःची लेखनाची स्टाईल म्हणून मुलींना प्रत्येक वेळेस उठवळ ठरवायलाच हवे का?? तुमच्या दीडशे लेखांपैकी १००चा सूर तर तोच आहे..
अवांतरः आयुष्यात तुम्हांला एकही सज्जन मुलगी भेटलीच नाही का हो????
>> तर पोरीच्या
>> तर पोरीच्या चारित्र्याबद्दल कमेंट करण्याची गरज होतीच का??
हा मुद्दा खरोखर विचार करण्याजोगा आहे.
विप्र खरोखर असे का ?
हा विचार कधी मनात आला नाही कारण माहीत नाही पण आता विचारला आहे मक ने तर उत्तर नक्कीच अपेक्षित आहे.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
आयुष्यात तुम्हांला एकही सज्जन
हेच म्हणतो! असो, पुढे मागे भेटली तर सांगा आम्हाला!
महत्त्वाचा प्रतिसाद दिसला म्हणुन आधी उत्तर दिले आहे, लेख वाचुन सावकाश प्रतिक्रीया देइनच.
-Nile
ह्म्म...
अंमळ विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरा.
पण, प्रभुबाबांची जितकी ओळख आहे त्या भांडवलावर मी तरी म्हणेन की, त्यांच्या कार्यक्षेत्राच्या अनुभवातुन ह्या बाबी फारच चटकन त्यांना समजत असाव्यात. जसं एखादा पोलीस किंवा फौजदारी वकील गुन्हेगारांबद्दल बोलतो, एखादा बिल्डर जमीन आणि जागेच्या भावांबद्दल तसंच काहीसं!
आय थिंक धिस पर्सन हॅज सीन हेल ऑफ अ वर्ल्ड, दॅट जनरली पिपल लाईक अस कॅन नॉट इव्हन इमॅजिन. त्यातुन ह्या बाबी आपसुक निरिक्षण होऊन येत असाव्यात.
>>प्रभुबाबांची जितकी ओळख आहे
>>प्रभुबाबांची जितकी ओळख आहे त्या भांडवलावर मी तरी म्हणेन की
प्रभुमास्तरांचे जितके लेख आजवर वाचले, त्यावरून मला तरी त्यांची इतकीच ओळख झाली आहे.. की जगात फक्त मुलीच उठवळ आणी उठवळच असतात..
आजच्या लेखातही आईबाबा मुलीसाठी इतकी यातायात करतात पण मुलगी मात्र शेण खातेय हेच अंडरलाईन होतेय.. जर त्यांना आईबाबांचा आततायीपणा दाखवायचा असता.. तर ते वाक्य त्यांनी लिहिले नसते हे नक्कीच..
>>>आय थिंक धिस पर्सन हॅज सीन हेल ऑफ अ वर्ल्ड, दॅट जनरली पिपल लाईक अस कॅन नॉट इव्हन इमॅजिन.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.. तेव्हा त्यांच्याकडे मुली चांगल्या असलेल्याही केसेस आल्या असतील.. पण त्याबद्दल कधी त्यांनी काही लिहिलेले निदान मला तरी आढळले नाही... असल्यास दुवा द्यावा..
आता त्यांना इतका अनुभव आहे.. तर सारासार विचाराने त्यांनी दोन्ही बाजूंनी मांडाव्यात ही अपेक्षा करणं चूक आहे का???? ते समुपदेशन करतात.. म्हणजे साध्या-सोप्या भाषेत लोकांना मार्ग दाखवतात.. मग हाच का तो मार्ग???
+ १ १००% सहमत मतांशी.
+ १
१००% सहमत मतांशी.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मकं. ... मकं ... आगे बढो ...
मकं. ... मकं ... आगे बढो ...
उठवळ
मी कधी कुणाला उठवळ म्हटले आहे.
बॉय फ्रेंड असणे म्हणजे उठवळपणा असे मी कुठे म्हटले आहे.
चांगल्या केसेस म्हणजे काय?
अच्छा...
मक आणि अदितीच्या मुद्यांना महत्त्व आहे. त्याचे साधे कारण आहे. संवादाची सुरवात जरा नीट पाहिली पाहिजे. 'पोरीनं नशीब काढलं' यानंतर समोरची व्यक्ती लग्नाची चौकशी करीत असेल तर एखादी माता (माझ्या अल्प अनुभवानुसार) आधी बारावीचा खुलासा करेल. सेंटर हा शब्दही कशा पद्धतीनं येतोय? (माझ्या अल्प अनुभवानुसार) कोणतीही माता अचानक उठून आपल्याच कन्येसंदर्भात इथं लेखकाला अपेक्षीत असलेल्या सेंटरचा उल्लेख करत नसते. आणि ती जर तो करत असेल तर मास्तरांच्या कौन्सेलरच्या भूमिकेसंदर्भात किंवा इतर तत्सम नात्याच्या अनुषंगाने. तसं असेल तर हे लेखन अधिक वावगं आहे. नावं घेतली नाहीत ही पळवाट; अशा पद्धतीनं लेखन करणं हेच आक्षेपार्ह आहे.
येथे मास्तरांच्या अनुभवाविषयी अनादर दाखवण्याचा प्रश्न नाही. माझी हरकत आहे ती फक्त त्यांची लेखनशैली आणि मांडणीला.
मास्तरांचं लेखन, त्यातला तो सूचकपणा हे सगळं पाहिलं की असं वाटू लागलंय की असं काही लिहून मास्तरही त्यांच्या त्या अनुभवांच्या कोंडमाऱ्यातून मोकळे होत असावेत.
पूर्वी कधी एकदा अवलियांकडून काही लिहून घेऊन ट्रीटमेंट करू पाहणारे (बहुदा ती ट्रीटमेंट यशस्वीही ठरली आहे) मास्तर ते हेच का?
बॉयफ्रेंड ते मावसभाऊ आणि पुढे मावस दादाभाऊ नौरोजी हा टोलेबाजीचा प्रवास चर्चेच्या सुराविषयीच बोलका आहे!
लेखन शैली
कसली लेखन शैली?
कसली मांडणी?
कसला कोंडमारा?
आणि कसली पळवाट.
जे झाले तस्सेच लिहीले.
आता माझ्या कडे कसे बोलावे ह्यावर माझा कसा काय कंट्रोल असणार बॉ?
आक्षेपार्ह?
माहीत नाही.
मी काहीही न म्हणता(लेखात) तरी आपापले निष्कर्ष काढ्णे चालु आहे.
मी काहीही न म्हणता(लेखात) तरी
एक म्हणाला ठीक आहे, दोन म्हणाले ठीक आहे ... बरेच लोकं म्हणतात तेव्हाही "मी काहीच म्हटलं नव्हतं"! कमाल आहे .... "असो. चालू द्यात"ही म्हणवत नाही आहे.
बरेच
दिसले नाहीत मला.
असो चालु द्यात.
मी काहीही न म्हणता(लेखात) तरी
मी काहीही न म्हणता(लेखात) तरी आपापले निष्कर्ष काढ्णे चालु आहे.
प्रॉब्लेम इथंच तर असतो. तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्ही कधीच म्हणत नाही. तिथं तुमचं मौनच असतं.
प्रस्तुत लेखच उदाहरणासाठी घेऊ. मुलीची आई तुम्हाला म्हणते की मुलीनं भाग्य काढलं. हे विधान सामान्यपणे मुलीच्या लग्नाशीच संबंधित असतं असं गृहीत धरल्यानंतरही त्या मुलीला कुठल्या स्कायवॉकवर कशा स्थितीत पाहिलं हेच तुम्हाला आठवतं. तुमच्या मौनाची भाषांतरं करण्याची ही संधी तुम्हीच ठेवता. इतरांना दोष देऊन उपयोग नाही.
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते
तुम्हाला काय म्हणायचे आहे ते तुम्ही कधीच म्हणत नाही. तिथं तुमचं मौनच असतं.
अगदी मनातले बोललात मोडक...
-निखिल
येथे मास्तरांच्या अनुभवाविषयी
येथे मास्तरांच्या अनुभवाविषयी अनादर दाखवण्याचा प्रश्न नाही. माझी हरकत आहे ती फक्त त्यांची लेखनशैली आणि मांडणीला.
+१ सहमत..
हा आक्षेप खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप महिन्यांपासून होता.. काल बोलून दाखवलं इतकंच... गोल्ड क्लासमधली, ट्रेनमध्ये दंडाला चावा घेणारी इ. इ. इ... आणी अशाच धर्तीचे मुलींबद्दलचे लेखन वाचून असे मत बनलंय... @ पाषाणभेद, नक्कीच एक लेख वाचला नि मत मांडलंय असं नाहीय.
जीवती सारख्या कथा आठवाव्या लागतात . जर तुम्ही इतकं चांगलं लिहू शकत असाल.. तर हा एकसुरीपणा टाळलेला बरा.. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
जाता जाता महत्वाचे: मला वाद घालायचा नव्हता, नाहीये पण. हे माझं मत होतं, नि ते लेखकापर्यंत मला पोचवावंसं वाटलं..
हो हो गोल्द क्लास मला
हो हो गोल्द क्लास मला मास्तराच्या लेखामुळेच कळला... पण ट्रेनमध्ये दंडाला चावा घेणारी इ. माझ्या नजरेतुन कशि सुटली
मान्य आहे
दहावीसाठी आई-बाबांनी काय काय खुळे प्रकार केले यात तिला बॉयफ्रेंड असण्याचा काय संबंध?
अदिती आणि मक दोघींशी सहमत!
चतुरंग
मास्तरांनी त्या मुलीला आधी
मास्तरांनी त्या मुलीला आधी स्काय वॉक वर पाहिलेले होते. अन आता तो अनूभव त्यांना त्या मुलीच्या आईशी बोलतांना आठवला. मुलीच उठवळ असतात हे तर काही या लेखातून उधदृत होत नाही. मुलीच्या आईच्या बोलण्यातून त्यांना मागचे आठवले असेच लेखाच्या सुरूवातीला जाणवते.
बाकी धमु शी सहमत.
मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही
कमेंट
मी कुठे चारित्र्याबद्दल कमेंट केली आहे.
बॉय फ्रेंड बरोबर जवळीक ही चारित्र्याबद्दल कमेंट कशी काय बॉ?
बॉय फ्रेंड बरोबर जवळीक
कशावरुन हो तो बॉयफ्रेंड, मावस भाउ का म्हणुन नसेल?
कशावरुन त्याने केली ती 'जवळीक(च) ते पण सांगा!
(तेव्हढ्याच 'गोष्टी युक्तीच्या चार' आम्च्या साठी)
-Nile
अपुर्ण स्काय वॉक
जाउ द्या ना मास्तर , आपण कशाला जावे अपुर्ण स्काय वॉक वर.
हो
(मावस दादाभाई नौरोजी)
मास्तर पुढच्या लेखाला आधी
मास्तर पुढच्या लेखाला आधी शुद्धीचिकित्सक लावा ब्वा !
आयच्यान
खरे आहे बॉ?
ते साल कुठे मिळते ते पण सांगा.
ठाण्यात बगा
ठाण्यात बगा
समुपदेशकाने झापडबंद विचार
समुपदेशकाने झापडबंद विचार करावा हे काहीसे चुकीचे नाही का? किंवा मुलीच्या आईला काय म्हणायचे आहे हे पूर्णपणे समजावून न घेता, ऐकून न घेता, स्वतःच काहीतरी ठरवून, निष्कर्ष काढून मोकळे होणे, हे योग्य आहे का?
आणि "मावस दादाभाई नौरोजी" ही जर समुपदेशकाचीच मनोवृत्ती असेल तर मग बोलण्यासारखे काही उरतच नाही!
निर्मयी, मक आणि श्रामो
निर्मयी, मक आणि श्रामो यांच्याशी एकदम सहमत.
याच लेखाबद्दल बोलायचं तर नक्की काय मुद्दा तुम्हाला मांडायचा आहे? पालकांचे खुळे चाळे, का मुलगी अपूर्ण स्कायवॉकवर तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आहे का आईसुद्धा अगदी 'रोचक' पद्धतीने बारावीच्या पूर्वतयारीचं वर्णन करते आहे?
मागच्या लेखांचं म्हणाल तर 'केलं रामूने आणि बिल भरलं शामूने' यातही मुलगी कुठे आहे? तुम्हाला कधी स्वतंत्र वृत्तीच्या, स्वयंपूर्ण आणि बॅलन्स्ड मुली आणि त्यांना सहन करायला लागणार्या गोष्टी दिसतच नाहीत का? 'मी केलं आणि मी त्याची जबाबदारी घेते आहे' अशी लोकं फक्त गोष्टीच्या पुस्तकातच असतात का?
..
..
मास्तर... मक आणि कंपनीने पुढे
मास्तर... मक आणि कंपनीने पुढे आणलेले मुद्दे नक्कीच विचार करण्यासारखे / पटण्यासारखे आहेत. बरेच वेळा तुमच्या लेखनात तशी झाक नक्कीच येते.
मागे पण या मुद्द्यावर मी बोललो होतो तुमच्याशी. अर्थात... तुमच्या थोड्या वाकड्या वळणाने लिहायच्या सवयीमुळे असे होते. पण विपर्यास होत असेल तर शैली बदलणे आवश्यक नाही का?
अर्थात, हा आक्षेप तुम्हाला मान्य नसावा असे तुमच्या वरील एका प्रतिसादातून दिसते. तसं असेल तर नक्कीच जास्त विचार करण्यासारखा प्रश्न आहे... तुम्ही ज्या भूमिकेवरून लिहू / मांडू पाहता आहात, ती भूमिका वाचकांपर्यंत पोचतच नाहीये. आणि ज्या अतिशय महत्वाच्या प्रश्नांवर / समस्यांवर तुम्ही काम करता त्यांच्याबद्दलची योग्य भूमिका जर का पोचत नसेल तर हे खरंच दुर्दैव...
झुंडशाही
लेखकाला अभिव्यक्ति स्वातंत्र्य काही असतं की नाही?
सर्वांनी विरोध करुन लेखकाला आपली शैली बदलण्यास भाग पाडणे म्हणजे झुंडशाहीच. आणि झुंडशाही म्हणजे देशद्रोहच नाही का?
हॅ हॅ हॅ, इतक्याने शैली
हॅ हॅ हॅ, इतक्याने शैली बदलतील ते मास्तर कुठले?
-Nile
तो जयपालचा पाक धाग्यावरचा फटु
तो जयपालचा पाक धाग्यावरचा फटु आठवला !
हाहाहा
लेखकाला त्याची शैली (नशीब, इथं ही शैली किंवा मांडणी कोण हा पांचट प्रश्न अद्याप आलेला नाही) निकोप आहे याची खात्री आणि आत्मविश्वास असेल तर तो ती बदलणार नाही. तशी खात्री असेल तर त्याने ती बदलू नये. वाचकांनी ती स्वीकारली की, त्या शैलीला दोष देणाऱ्यांच्या बोलण्याला अर्थ राहणार नाही. आणि त्याउपरही ती शैली दोषपूर्ण आहे असं ज्यांचं म्हणणं असेल त्यांना ती शैली जोवर जाहीरपणे व्यक्त होतीये तोवर तसे सनदशीर म्हणण्याचा हक्क आहे. ते तसे म्हणत राहतील. त्याकडे दुर्लक्ष करण्याचा सनदशीर अधिकार वाचकांना असतोच.
अर्थात, हे सारे "समाजात राहुन काहिही माहित नसलेल्या" माझ्यासारख्याचे म्हणणे आहे. ते मान्य करावयाचे की नाही याचा फैसला करण्याचा तुम्हालाही सनदशीर अधिकार आहेच.
शांत घ्या अवलिया
मास्तरांनी तुम्हाला परत लेखन आउटसोर्स करावे असे निवेदन देत आहे.
बाकी प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नाहीच आहे. मास्तरांनी त्यांना वाटेल ते लिहावं पण मग ते नक्की पटेलच किंवा लोक समजवुन घेतीलच यापुढे असे नाही. मुळ मुद्दा हरवता कामा नये जर त्यांना प्रामाणीकपणे मुद्दाच मांडायचा असेल तर. असो.
मास्तरांनी तुम्हाला परत लेखन
मास्तरांनी तुम्हाला परत लेखन आउटसोर्स करावे असे निवेदन देत आहे.
हा हा हा
सहजराव तिकडे तुमचे जीवाभावाचे मित्र बोलावत आहेत ते बघा आधी !
(आता काय टायपावे म्हणजे १०० प्रतिसाद होतील ?
)
पण नक्की मुद्दा काय आहे या
पण नक्की मुद्दा काय आहे या लेखाचा?
हा एक चांगला चर्चेचा मुद्दा
हा एक चांगला चर्चेचा मुद्दा आहे
( ७ की ८ )
ज्यांना अवांतर प्रतिसाद नको
ज्यांना अवांतर प्रतिसाद नको आहेत त्यांनी चुकीचे टाचण द्या ही सुविधा वापरावी.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
मी मागे वापरली होती त्याचा
मी मागे वापरली होती त्याचा उपयोग झाला नाही... मालक येड्यात काढतो.
वरच्या दोघांना चुकिचे टाचण
वरच्या दोघांना चुकिचे टाचण दिले आहे.
-Nile
ह्या धाग्याव्र मी मोडकांना
ह्या धाग्याव्र मी मोडकांना दिलेल्या उपप्रतिसाद सोडुन ईतर सर्व प्रतिसाद काढुन टाकण्यात यावेत ही विनंती.
कारण माझ्या व ईतर काही लोकांच्या प्रतिसादा मुळे.. तळमळीने लिहिणार्या काही लोकांचा मुद्दा हरवु नये!!!!
-निखिल
सहमत आहे. (माझे नाव घेवुन
सहमत आहे.
(माझे नाव घेवुन बोल रे निख्या बिनधास्त... )
ह्या संस्थळावर मी मला आलेल्या
ह्या संस्थळावर मी मला आलेल्या माझ्या लेखनावरील प्रतिसादांना दिलेल्या उपप्रतिसाद सोडुन ईतर सर्व प्रतिसाद काढुन टाकण्यात यावेत ही विनंती.
कारण माझ्या व ईतर काही लोकांच्या प्रतिसादा मुळे.. जळजळीने लिहिणार्या काही लोकांचा मुद्दा हरवुन जावा!!!!
ईश्श्य
ईश्श्य ! मास्तर तुमी बाई फारच चावट! अस्स खिंडीत पकडता ना!
काय म्हणता? मीच पकडलय खिंडीत?
छे बाई मी कशाला पकडू? आणि काय हो सुटायला एवढ्या जागा असताना तुमी तरी कशाला पकडुन घेताय?
स्कायवॉक वर काय वेगळ पाहिल? आमी पण बघतोच की पण पाहुन दुर्लक्ष करतो. अशी नीरीक्षणे काय चव्हाट्यावर आणतात का? हे स'मूक'देशन अस्त हे आम्ही काय बाई सांगायच तुमच्यासारख्याला?
जरा टेकू म्हणता टोकन च करुन टाकलत तुम्ही? तुमच्या तोंडात जर्रा म्हणुन तीळ भिजत नाही. मीच जाते बाई आपली बिळात? नाही तर तिथेही याल आयत्या बिळात नागोबा?
आपली चिचुंद्री
हघ्यासांनल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
घाटपांडे काका, मुद्दयाला बगल
घाटपांडे काका,
मुद्दयाला बगल मिळतेय. इथं या लेखाबद्दल चर्चा चाललेली नाही.. चर्चा चाललीय ती मूळ विधायक विषय(असावा असं वाटतंय) सात्यत्याने चुकीच्या मार्गाने सादर केला जातोय त्याबद्दल.. त्यामुळे चुकीच्या खिंडी सोडून राजमार्गावर या..
सहमत
घाटपांडे काका, बोलायचं असेल तर बोला नाहीतर बोलू नका. पण बोलायचं आणि काहीही सांगायचं नाही हे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं.
>>अशी नीरीक्षणे काय
>>अशी नीरीक्षणे काय चव्हाट्यावर आणतात का? हे स'मूक'देशन अस्त >>
घाटपांडेसाहेब, निरीक्षणं चव्हाट्यावर आणायला काहीच हरकत नाही. त्यावरुन समुपदेशकाने तिरकस, सूचक वगैरे लिहायलाही हरकत नाही, पण नंतर मी कुठे असं काय म्हटलं, कधी म्हटलं वगैरे म्हणून पळ काढू नये एवढच म्हणण आहे.
फारच जड
हघ्यासांनल फारच जड घेताय ब्वॉ तुम्ही!
मास्तरांच क्रिप्टिक आमाल समाजल त पाहिजेल ना! त्यान्ला तरी समाजत कि नाय कल्पना नाई ब्वॉ
अवांतर- झुंडशाही वाचताय ना?
आमचे भाकित: प्रतिसादांच्या शंभरीत अनेकांचा हातभार
असो!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हलकं घेण्यासारखं काय आहे?
हलकं घेण्यासारखं काय आहे? ज्या लेकीबाळींशी आपला दुरान्वयाने संबध नसतो, त्यांच्याबद्दल कसही आणि काहीही बोलणं किती सोपं आहे नाही का घाटपांडेसाहेब?
ह्म्म ! सहमत.
ह्म्म !
सहमत.
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
+१
अगदी सहमत.
बाँबस्फोटावर विनोद करून ह.घ्या म्हणणार का आपण?
झुंडशाहीबद्दल: 'दहशतवादाचा निषेध' असे फलक लावणारे लोकंही झुंडशाहीच करतात का?
सापेक्ष
यात सापेक्षता असते. अतिशियोक्ती व कारुण्य यातुन निर्माण होणारा विनोद हा देखील एक विचार मांडतो.एखाद्याच्या वेदनेचा विषय दुसर्या च्या जेव्हा विनोदाचा असतो त्यावेळी त्यावेळी ती व्यक्ती शत्रु वाटु लागते.
एका परिसंवादात अपघात व सामाजिक जबाबदारी अशा विषयात एक वक्ता पी एम टी चालकाच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल बोलत होता. चर्चा खुप गांभीर्याने चालली होती. कॉलेजची पोर वैतागली होती.दुसर्या वक्त्याने पीएमटी चालकाच्या कौशल्यावर विनोद केल्याने चर्चेचे गंभीर स्वरुप एका हल्क्या फुलक्या वळणावर आले. पहिल्या वक्त्याने संधी मिळताच या प्रमादावर तोंडसुख घेतले. पण (बहुसंख्य) श्रोत्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. अशा वेळी वक्त्यांचे प्रोफाईल सुद्धा महत्वाचे ठरत असते.
राजकारणात भावनिक गुंत्यांचे भाडवल केले जाते हे आपण पाहतोच
तात्पर्य- (संकेत)स्थलकालव्यक्ति सापेक्षतेने या गोष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोण ठरतो
झुंडशाही बद्दल- 'दहशतवादाचा निषेध' फलक लावणारे लोक कुठल्या पद्ध्तीने समुह वर्तन करताहेत यावर ते अवलंबुन आहे,
खुलासा- आम्ही सहजच ते टंकले होते . अथात त्यात काही विचार होता असे नाही. गंभीरपणे लिहायचे झाल्यास वेगळेच लिहावे लागेल
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
एखाद्या मुलीबद्दल, तिच्या
एखाद्या मुलीबद्दल, तिच्या वर्तनाबद्दल, तिला 'टेकान घेवा' असे समुपदेशकांनी पाहिलेय आणि एकूणच लेखनशैलीबद्दल वगैरे चर्चा सुरु झालेली होती. नंतर समुपदेशकांनी हे माझे म्हणणे नव्हेच म्हणत पळवाट घ्यायचाही प्रयत्न केलाय, पण ते असो.
ही मुलगीही एखाद्या चांगल्या घरातलीच असेल, आणि समजा नसली तरी, तिच्याबद्दल आणि एकूणच सहज आणि विचार न करता टंकण्यासारखे ह्यात काही आहे का?
आपल्या स्वतःच्या घरातल्या लेकीबद्दल वा त्या अनुषंगाने असे विचार न करता, सहजच कोणी बोलले, टंकले तर ते तुम्हाला चालेल का घाटपांडे साहेब? काहीसा वैयक्तिक प्रश्न विचारल्याबद्दल मी तुमची माफी मागते, पण हा विचार कृपया करुन पहाल?
प्रत्येकाला हाच प्रश्न
प्रत्येकाला हाच प्रश्न विचारला तर काय उत्तर येईल? अन्य कुणाला हा प्रश्न विचारावासा वाटला का? हे अजमावुन घेण्यास उत्सुक आहे.
एकाने असेच विचारले होते. अमुक अमुक तुझा बाप आहे हे कशावरुन तु तसे मानतो किंवा तुझ्या आईने तसे सांगितले त्यावर तुझी श्रद्धा आहे म्हणुनच ना? आम्ही उत्तर दिले कि प्रत्येकाला कुणीतरी आई व कुणीतरी बाप आहेच.कोण ते आधुनिक विज्ञानाने ते सिद्ध करता येईल. मला तसे सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. रस्त्याने जाणारी स्त्री ही कुणाची मुलगी ,कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी असु शकते. ही जैविक बाब आहे. नाती ही मानवी आहेत. निसर्ग फक्त स्त्री /पुरुष असे मानतो.
जेम्स लेन प्रकरणात याचा कुशलतेने झुंडशाहीसाठी वापर झाला. चर्चा भरकटु नये अशी अपेक्षा करतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
चर्चा भरकटवण्याचा मुळीच
चर्चा भरकटवण्याचा मुळीच उद्देश्य नाही, पण ज्या सहजपणे तुम्ही हे लिहिले की मी विचार न करता सहज म्हणून प्रतिसाद टंकला ते वाचून अतिशय आश्चर्य वाटले होते. ह्या नवीन प्रतिसादातले तुम्हीच लिहिलेले वाक्य पहा की "रस्त्याने जाणारी स्त्री ही कुणाची मुलगी ,कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी असु शकते." मग ही मुलगीही कोणाची तरी कोणीतरी असेल ना? का तुमचे आमचे तिच्याशी मानवी नाते नाही, केवळ जैविक बाब आहे म्हणून तिच्याविषयी जीभ विचार न करता, सहज सैल सोडणे तुम्हाला मान्य आहे किंवा वावगे वाटत नाही?
>>अन्य कुणाला हा प्रश्न विचारावासा वाटला का? >> तुम्ही इथे मांडलेले विचार ज्यांना पटतात, त्या सर्वांनाच हा प्रश्न आहे असे समजा. तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी निमित्त झालेला आहात, असं समजा. बाकीचे तत्वज्ञान सांगताना माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही चलाखीने टाळलेत का?
मास्तर समुपदेशन...
नक्की कसल्या बाबतीत करतात हा प्रश्न पडतो अनेकदा त्यांचे लिखाण वाचताना. कधी वाटते ते करीयरच्या संधी वगैरेसारख्या विषयांवर समुपदेशन करत असावेत पण त्यांच्या लिखाणातल्या ग्रे एरियाज पाहिल्या की असे वाटते की ते `गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवा' वगैरेसारख्या विषयांवर जालावर समुपदेशन करत असावेत. हे आपले माझे वैय्यक्तिक मत आणि ते देखील जनरलाईज्ड.
असो!
आता या लेखाबाबत....
एव्हढी चर्चा सुरु आहे म्हणुन लेख पुन्हा पुन्हा वाचला. अगदी भिंग लावुन. एकेका अक्षराची, एकेका विरामचिन्हाची तपासणी केली. त्यात भर म्हणुन शाळा काढण्यासाठी किंवा बातम्या गोळा करण्यासाठी का होईना, कुठे कुठे (नको तिथे) गेलो त्यावेळच्या अनुभवांची कसोटी लावली. दादाभाई नौरोजी वगैरेसारखे संदर्भ जुन्या इतिहासात जाऊन घासुन पुसुन काढले अन ते ही कसोटीला लावले पण कुठेच काही न्युन मिळत नव्हते. पण आम्ही हाडाचे शोधपत्रकार अन त्यात ज्येष्ठ अन अनुभवी असा नावलौकिक मिळवलेले. आम्हाला न्युन मिळणार नाही असे कसे होईल. अन थोड्याच वेळापुर्वी ते मिळाले.
ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो. या वाक्याला आम्ही "आमच्या ह्यांनी गेले ३ आठवडे ऑफिस ला सुट्टी घेतली आहे." या वाक्याशी, त्यानंतरच्या सगळ्या सायंटीफिक धडपडीच्या वर्णनाशी जोडले अन एकदम युरेका म्हणुन ओरडत उडी मारली. (तरी बरे कार्यालयात बसल्याने अंगावर कपडे होते.)
आम्ही का ओरडलो? उत्तर सरळ आहे. जरा विचार करा - एकदम 'सायंटीफीक काम' असलेल्या `ह्यांनी ३ आठवडे सुट्टी काढलेली आहे, पर्फेक्ट सिम्युलेशन एक्सरसाइज सुरु आहे. पण कुणाचा? त्या ह्यांचा कि त्या मुलीचा? एव्हढे सगळे सुरु असताना ती एकदम 'सायंटीफीक काम' असलेल्या बापाची मुलगी अपुर्ण स्काय वॉक वर टेकान घेवा स्थितीत असु शकेल? तो बाप तिला सिम्युलेशन एक्सरसाईज ऐवजी स्टिम्युलेशन एक्सरसाईज करण्याकरता मोकळी सोडेल?
आता म्हणावेसे वाटते, "मास्तर तुम्हारा किधर चुक्या तो नही? खिंड लढवण्याच्या नादात गड तर नाही ना घालवला?"
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
धन्यवाद प्रसनदा.
धन्यवाद प्रसनदा.
चुक्या
तो चुक्या.
पत्रकार मित्रा कधी वेळ मिळाला तर ये अशा पालकांच्या सभेला.
परत कधी मास्तर चुक्या असे म्हणणार नाहीस.
मास्तर कधी वेळ मिळाला तर....
या एकदा बरोबर फील्डवर काम करायला. क्राईम रिपोर्टर समुपदेशन कसं करतात ते पहायला मिळेल.
---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)
अब आया उंट पहाड के नीचे!
प्रसन्नदा.. खरंच
प्रसन्नदा..
खरंच धन्यवाद..
खरं तर किती तरी दिवसांपासुन मला माझे मत सांगायचं होतं. पण आज सांगु उद्या सांगु करता करता बरेच दिवस झाले. खरं तर आधी सांगायला हवं होतं पण नाही सांगितलं. आता का नाही सांगितलं असं विचारलं तर मी म्हणेन खरंच का नाही सांगितलं?? पण आता जेव्हा विचार करते तेव्हा जाणवतं आहे की उगाच कंटाळा केला..
बर्याच जणांच्या बाबतीत असं झालेले दिसतंय खरे.. सगळ्यांची मते आता बाहेर पडत आहेत एकदाची!!!
मास्तर
प्रथम प्रतिसादाची शंभरी गाठल्याचे भाकीत आम्ही वर्तवले होते ते बरोबर आले त्याचे श्रेय आपल्यालाच.
मास्तर तुमचे लेखन आम्ही गांभिर्याने कधी घेतलेच नाही. कारण आम्हाला ते फारसे कधी समजलेच नाही. अनेकदा जालीय वाचनाच्या प्राधान्यक्रमात ते दखलपात्रही नव्हते. प्रसन्नदाच्या विश्लेषणाशी मी सहमत आहे. आपले अस्तित्व हे गुणदोषासकट इतरांनी स्विकारले आहे. परंतु आपल्या कडुन असलेल्या अपेक्षांमुळे आपल्याला फक्त गुणांसकटच स्वीकारावे असा काही सूर मला दिसतो. ते आपल्याला शक्य नाही असे आमचे भाकीत आहे. गुणधर्म हे गुण कि दोष हे परिस्थितीवर ठरते. काहींचे लेखन हे शिवराळ असते. पण त्यात देखील काही विचार असतो. आपल्याला त्यातील शिव्या बाजूला करुन विचार वेगळा करता येतो. सगळ्यांना ते जमेलच असे नाही. सर्वांचे सर्व लेखन / वर्तन
सदा सर्वदा उत्तम असावे असे नाही. असे असुही शकत नाही. प्रत्येकाचा असा काही पिंड असतो. तो लेखनात डोकावत असतो. मुख्य मुद्दा म्हणजे आपण आपल्या लेखनाशी प्रामाणिक आहोत की नाही असा आहे. लोक काय म्हणतील? हा मुद्दा गौण आहे. कुठलीच व्यक्ती आदर्श असु शकत नाही तसेच लेखनही. आपल्याला झोडपणारे हे आपल्यावर प्रेम करणारे देखील आहेत. तसे नसते तर आपल्याला अनुल्लेखाने मारुन आपल्याला अद्खलपात्र केले असते. हेच का ते मास्तर असा प्रश्न पडतो त्यावेळी हेही मास्तर आहेत व तेही मास्तरच आहेत हे उत्तर आम्हाला पटते. मला सांगा मनात जे आले ते सर्व टंकले / केले असे असु शकते का? समूहमानसिकतेचा प्रवाह पाहुनच व्यक्ती /आयडी चे वर्तन्/लेखन होत असते. अनेक विद्वान आपली लोकप्रियता जनमानसातुन उतरु नये यासाठी स्वतःला मुरड घालतात. भाष्य करण्याचे / भुमिका घेण्याचे टाळणे. मौनं सर्वार्थ साधनम ! मौनातुन होणार अनर्थ हा अभिव्यक्तीतुन होणार्या अनर्थापेक्षा परवडणारा असतो.
राज वा जाल कारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. कधी संख्याबळाच्या जोरावर, कधी बौद्धीक दांडगाई करुन,कधी भावनेला हात घालून राज वा जाल कारण होतच असते. इथे उपयुक्तता/ उपद्रव मुल्य तुमचे अस्तित्व दखलपात्र ठरवत असते. उद्या संकेतस्थळाचे वा आयडीचे अस्तित्व जालावरुन उडाले (कुठल्याही कारणाने असो)तरी जालाला काही फरक पडत नाही. तुम नही तो और सही | और नही और सही|
असो लई बिल झाल आमच!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
प्रतिसाद
अरे ! इतके दिवस होउन देखील कुणाचाच प्रतिसाद नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
प्रतिप्रतिसाद
आम्ही प्रतिसादातील भाकीता/ भाष्यावरील प्रतिप्रतिसादा बद्दल बोलत होतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
ह्या वर एकच उपाय्..काकुना नाव
ह्या वर एकच उपाय्..काकुना नाव सान्गणे..काकुनी ब्रेक मारला कि मास्तर लाइनीत